खालीलपैकी प्रयोगाची अयोग्य जोडी ओळखा.
उत्तर: विशालचा आंबा खाऊन झाला - शक्य कर्मणी प्रयोग

उत्तर: पर्याय 4 (विशालचा आंबा खाऊन झाला - शक्य कर्मणी प्रयोग)
स्पष्टीकरण:
विशालचा आंबा खाऊन झाला हे समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे.
विशालचा आंबा खाऊन झाला या वाक्यात खाऊन झाला या क्रियापदाचा अर्थ कार्य समाप्ती दर्शवित आहे, विशाल या कर्त्याला चा हा षष्ठीचा प्रत्यय लागला आहे, आंबा या कर्माला प्रत्यय नाही आहे तसेच वाक्यात खा या धातूला ऊन हा प्रत्यय असून पुढे झाला असे सहायक क्रियापद आले आहे म्हणून हे वाक्य समापन कर्मणी प्रयोगाचे होईल.
Important Points समापन कर्मणी प्रयोग - ह्या प्रयोगात क्रियापदाचा अर्थ कार्य समाप्ती दर्शवितो. कर्त्याला षष्ठीचा प्रत्यय असतो व कर्माला प्रत्यय नसतो. धातूला ऊन किंवा हून प्रत्यय असून पुढे झाला, होईल, व्हावे असे सहायक क्रियापद असते. उदा. साहिलचे पुस्तक वाचून झाले.
शक्य कर्मणी प्रयोग - जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदा. मला हा डोंगर चढवतो.
नवीन कर्मणी प्रयोग - ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्याला कडून प्रत्यय लागतात. उदा. चोर पोलिसांकडून पकडला गेला.
प्राचीन कर्मणी प्रयोग - प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला ज प्रत्यय जोडून तयार केलेल्या वाक्यांचा यात समावेश होतो. उदा. त्वा काय कर्म करिजे.
Additional Information प्रयोग - कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिला व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. प्रयोग ओळखण्यासाठी कर्ता, कर्म व क्रियापद यांची आवश्यकता असते.
प्रयोगाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.
कर्तरी प्रयोग
कर्मणी प्रयोग
भावे प्रयोग
कर्तरी प्रयोग - जेव्हा वाक्यात क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, पुरुष आणि वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्तरी प्रयोगात क्रियापद बहुधा वर्तमानकाळी असते आणि कर्ता प्रथमान्त असतो तसेच कर्त्याला प्रत्यय नसतो. उदा. विजय निबंध लिहितो.
कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.
सकर्मक कर्तरी प्रयोग
अकर्मक कर्तरी प्रयोग
सकर्मक कर्तरी प्रयोग - ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. सकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म असावेच लागते आणि ते प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते. उदा. तो गाणे गातो.
अकर्मक कर्तरी प्रयोग - ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. अकर्मक कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, पुरुष आणि वचनानुसार बदलते म्हणजेच कर्ता धातुरूपेश असतो . उदा. सूर्य उगवला.
कर्मणी प्रयोग - कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते म्हणून त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. कर्मणी प्रयोगात कर्माची आवश्यकता असते व ते प्रथमेतच असते. कर्मणी प्रयोगात कर्त्याला विभक्तीप्रत्यय असतो तर कर्माला नसतो. कर्मणी प्रयोगात क्रियापद बहुधा भूतकाळी असते. उदा. मधूने बैल बांधला.
कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.
प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग
नवीन कर्मणी प्रयोग / कर्मकर्तरी प्रयोग
समापन कर्मणी प्रयोग
शक्य कर्मणी प्रयोग
प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग
भावे प्रयोग - जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात. या प्रयोगात कर्ता व कर्माला प्रत्यय असतो.
भावे प्रयोगाचे सकर्मक व अकर्मक असे दोन प्रकार पडतात .
अकर्मक भावे प्रयोग - ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विध्यर्थीच असते तसेच अकर्मक शक्यार्थ क्रियापदांचा नेहमीच भावे प्रयोग असतो. उदा. त्याला आता पळवते.
सकर्मक भावे प्रयोग - ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. या प्रयोगात कर्त्याला शक्यतो तृतीयेचा ने/नी प्रत्यय असतो तसेच कर्मालाही प्रत्यय असतो. उदा. श्यामने गाईला बांधले.
📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म, तृतीया-करण, चतुर्थी-संप्रदान, पंचमी-अपादान, षष्ठी-संबंध, सप्तमी-अधिकरण) यांच्या जोड्या नियमित पाठ ठेवा.
Answer: Option 4 (विशालचा आंबा खाऊन झाला - शक्य कर्मणी प्रयोग)
Explanation:

📌 MPSC Exam Tip: Always memorize the 8 Marathi Grammatical Cases (Vibhakti) and their associated Semantic Roles (Karakartha: Prathama-Agent, Dvitiya-Object, Tritiya-Instrument, etc.).
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.