खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या (परिच्छेद ३ - प्रेमाचे तत्त्वज्ञान व आत्मसाधना):
प्रेम करणे चांगलं ही आहे कारण ते करणं कठीण असतं. एका माणसाने दुसऱ्या माणसावर प्रेम करणे ही बहुतेक आपल्यावर सोपवलेली व आपली अंतिम परीक्षा घेणारी तसेच आपल्या क्षमतेचा पुरावा देणारी सर्वात कठीण जबाबदारी आहे. इतर सर्व कामे ही फक्त प्रेमाची तयारी म्हणूनच करायची असतात. सर्वच बाबतीत नवोदित असलेल्या, ज्यांच्यात अजून प्रेम करण्याची ताकद नाही, अशा तरुण माणसांनी म्हणूनच प्रेम करायला शिकले पाहिजे. त्यांनी स्वत:च्या सर्वस्वानिशी, एकाकी, आतुर आणि अधिकाधिक स्पंदनशील होत जाणाऱ्या हृदयासोबत स्वतःची सर्व ताकद एकवटून प्रेम करणे शिकायला हवे. परंतु प्रेम शिकण्याचा कालखंड नेहमीच लांब पल्ल्याचा, एकांताचा व जीवनाचा मोठा भाग व्यापणारा असतो. प्रेम करणाऱ्या व्यक्तिसाठी एकांत म्हणजे एकप्रकारे उच्च पातळीचा व सखोल असा एकटेपणाचा अनुभव असतो. मुळातच प्रेम म्हणजे दुसऱ्यात विरघळून जाणे, स्वतःला समर्पित करणे, किंवा त्याच्याशी एकात्म होणे नव्हे (कारण स्वतः नीट न ओळखणारी, अपरिपक्व आणि अजूही एकस्पंद नसलेली दोन माणसे एक कशी होवू शकतील ? ) प्रेम ही तुम्हाला परिपक्व होण्यासाठी, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी, स्वतःचे असीम विस्तारण्यासाठी, दुसऱ्यांसाठी अवघे विश्व बनण्याची उच्च प्रेरणा देणारी गोष्ट आहे. प्रेम विशाल आहे. ते माणसाकडून फार मोठ्या अपेक्षा करते. ते माणसाची निवड करते आणि त्याला तपस्या करावयास लावते. केवळ या दृष्टीने स्वतःला घडवण्याच्या कामात स्वत:ला गुंतवून घेताना (रात्रंदिवस लक्षपूर्वक ऐकत व स्वतःवर घणाचे घाव घालत) तरुणांनी स्वतःला मिळणारे प्रेम उपयोगात आणावे. दुसऱ्यात विखरून जाणे, दुसऱ्यासाठी मिटून जाणे किंवा कोणत्याही प्रकारे एकात्म होणे यापासून त्यांनी स्वत:ला दूर ठेवले पाहिजे (कारण त्यांना अजूनही खूप, खूप लांब जायचे आहे व त्यासाठी स्वतःची सर्व ताकद वापरायची आहे.) प्रेम जीवनाचे अंतिम स्वरूप आहे. ते एका आयुष्यात पूर्णत्वाला जाईल असे नाही.
लेखक लिहितो, “... प्रेम करायला शिकण्यासाठी प्रत्येकाला बराच मोठा काळ तर कधी पूर्ण जीवन एकाकी व्यतीत करावे लागते ...". याचा अर्थ-लेखक असे गृहीत धरतो की ... अ. इतरांच्या सहवासात गोष्टी शिकणे शक्य होत नाही कारण इतर व्यक्ती आपले विचार प्रभावित करतात. ब. एकांतात व्यक्तीला स्वत:च्या व्यक्तिगत अनुभवांवर चिंतन व त्यांचे परीक्षण करायला वेळ मिळतो. क. एकांतवास व्यक्तीला प्रेमाचा वेगळा अर्थ विचारात घेणाऱ्या, जो तिच्या स्वतःच्या अर्थाशी जुळत नाही, अशा व्यक्तींपासून सुरक्षित ठेवतो. ड. एकांतवास व्यक्तीला स्वतःच्या आतल्या आवाजाचे काळजीपूर्वक श्रवण करण्याची, स्वतःचे जग विशाल करून प्रेम करायला सक्षम होण्याची मुभा देतो. यापैकी कोणते/ती गृहीतक/के परिच्छेदाच्या संदर्भात अंतर्निहित आहेत ?
Writer writes, "... for learning to love one needs to spend long time or may be life in seclusion ...". This means that he assumes that, a. it is not possible to learn things in the presence of other persons as they influence our thoughts. b. in seclusion a person gets time to reflect and examine his or her personal experiences. c. seclusion protects a person from other persons nurturing different meaning of love, that is not matching with her or his meaning of love. d. Seclusion allows a person to listen carefully to one's inner voice, widen one's world for becoming capable of loving. Which of the assumption/s is/are implicit in the paragraph?