खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या:
आधुनिकतेची सुरुवात 1453 मध्ये कॉन्स्टॅन्टिनोपलच्या पाडावापासून झाल्याचे मानले जाते. 1789 मधील फ्रेंच राज्यक्रांतीपासून पहिल्या महायुद्धापर्यंत (1914-1918) चा कालावधी अतिशय आधुनिकतेचा मानला जातो. पहिल्या महायुद्धापासून सर्वच गोष्टींबाबतच्या प्रस्थापित समजांना प्रश्न करण्यास सुरुवात झाली. इथपासून आधुनिकतेला उतरती कळा लागली आणि उत्तराधुनिकतेचा कालखंड सुरू झाला असे मानले जाते. मात्र आजच्या जगात हे दोन्ही पर्व कसेबसे एकत्र राहताना दिसतात. चार्लस् बोदले याला 'द पेंटर ऑफ मॉडर्न लाइफ' या निबंधात सन 1864 मध्ये आधुनिकता या संकल्पनेचा सर्वप्रथम उपयोग केल्याचे श्रेय दिले जाते. या संकल्पनेत परंपरेपासून तुटलेले वर्तमान काळाचे नाते अभिप्रेत होते. एकोणिसाव्या शतकात आधुनिकता भरात असताना जरी ही संकल्पना निर्मिली गेली, तरी तिची विविध वैशिष्ट्ये पंधराव्या शतकापासून दिसून येतात. एन्थनी गिडन्स यांच्या मते आधुनिकता म्हणजे आधुनिक समाज किंवा औद्योगिक समाजाचेच नामाभिधान आहे. त्याच्यामते त्यासमवेत येतात. (एक) असे जग जे की मानवी प्रयत्नांती बदलण्यास तयार आहे असा विचार (दोन) औद्योगिक उत्पादन आणि बाजारपेठेची अर्थव्यवस्था यांचे मिश्रण असणारा आर्थिक संस्थांचा समूह आणि (तीन) राजकीय संस्था ज्यात लोकशाही आणि राष्ट्र सम्मीलित आहेत. युरोपातील आधुनिकतेमध्ये भांडवलशाहीचा प्रसार, लोकशाही, औद्योगिक क्रांती आणि त्यांच्या जोडीला धर्माबाबत् टिकात्मक विवेचन यांचा समावेश होता. हीच प्रक्रिया थोड्याफार फरकाने वसाहतींमध्ये देखील आविष्कृत झाली. आधुनिकतेच्या काही पाउलखुणा जिथे आधिच दिसू लागल्या होत्या अशा आफ्रो-आशियाई देशांच्या इतिहासात साम्राज्यवादामुळे खंड पडला आणि त्यांच्या इतिहासाला शोषण आणि वासाहतिक वास्तव्याचे वेगळेच वळण मिळाले. वसाहतवादी आणि वासाहतिक अशा भूमिकेतून वेगवेगळ्या संस्कृती आमनेसामने आल्यावर आत्मपरीक्षण आणि बदलासाठी प्रयत्न अपरिहार्य होते. वासाहतिक सत्तेच्या राजकीय आणि सांस्कृतिक प्रभुत्वामुळे भारतातील लोकांना आधुनिकतेभोवतालच्या विविध संकल्पनांना सामोरे जावे लागले - स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, तर्कनिष्ठपणा, कायद्याचे राज्य, प्रश्न विचारण्याची मनोवृत्ती आणि व्यक्तिवाद. याचा अर्थ असा नाही की या संकल्पना भारतीयांना अजिबात माहितीच नव्हत्या. विवेक आणि स्वातंत्र्यासारख्या विचारांचा समावेश किमान गौतम बुद्धांच्या काळापासून म्हणजे इ. स. सहाव्या शतकाच्या पासून भारतीय तत्त्वज्ञान आणि साहित्यातील चर्चाविश्वाचा भाग होत्या.
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? अ. धार्मिक रूढ़ी आधुनिक मानल्या जात नाहीत. ब. परकीय सत्तेमुळे भारत आधुनिक झाला नाही, असे नाही.
Which of the following two statements is/are correct? a. Religious rituals are not said to be modern. b. It is not that because of the foreign power India did not modernise.