खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची (प्र. ११ ते १५) योग्य उत्तरे द्या:
शब्द हा माझ्या अखंड कुतूहलाचा, आवडीचा आणि अभ्यासाचाही विषय आहे. गेल्या काही दिवसांत शब्दांच्या संदर्भात मला काही मजेदार अनुभव आले. तसे तर ते नेहमी येतात; पण का कोण जाणे, या खेपेला मला ते विशेष ठळकपणे जाणवले. गंमत म्हणजे हे सारे शब्द एकाक्षरी आहेत. लिहिण्यात, बोलण्यात, जाहीर वक्तृत्वापासून तो एकांतातील भाव निवेदनापर्यंत सर्वत्र आपण शब्दांचाच वापर करतो; पण यापैकी बहुतेक शब्द आकाराने मोठे, गुंतागुंतीचे, जड किंवा संदिग्ध असतात. माणसे भडाभडा बोलतात. अनावरपणे लिहितात. आपण त्याला 'शब्दबंबाळ' हे विशेषण लावतो; पण साधा एक अक्षराचा शब्ददेखील केवढा गहन आशय व्यक्त करू शकतो, हे अगदी अलीकडे वेगवेगळ्या घटनांनी माझ्या निदर्शनाला आणून दिले.
माझ्या भाचीची मुलगी. माझी छोटी नात. वय तीन-साडेतीन वर्षे. ती मराठी छान बोलते. वयाच्या मानाने अर्थपूर्ण आणि अगदी ठसकेबाज. हल्ली तिला एक शब्द सापडला आहे. तो म्हणजे 'का?' ती सारखे प्रश्न विचारत असते. मी कोणतेही वाक्य उच्चारले, म्हणजे 'मला आता काम आहे', 'मी चहा पिणार आहे', 'कावळा उडून आपल्या घरी गेला', 'साखर फार खाऊ नये' यांतले काहीही, तरी तिचा प्रश्न ठरलेला असतो 'का?' मी तात्पुरते काहीतरी उत्तर देऊन तिला गप्प बसवते; पण आपल्या उत्तराचा आवाका किती मर्यादित आहे आणि काही प्रश्नांना उत्तरेच कशी नसतात, हे त्याचवेळी मला उमगते आणि मी फार अस्वस्थ होऊन जाते. छोटीच्या त्या एकाक्षरी प्रश्नात जगातल्या साऱ्या जिज्ञासेचे, अनुभवाचे, ज्ञानाचे आणि उत्कट जाणिवेचे मूळ सामावले आहे, याचा मला साक्षात्कार होतो. जगाच्या इतिहासात कोणाला तरी, केव्हा तरी, कशाच्या तरी संदर्भात 'का?' असा प्रश्न विचारावासा वाटला. त्यातून शास्त्रे निर्माण झाली. वैज्ञानिक शोध लागले. आध्यात्मिक बोध झाला. सुंदर काव्ये, कलाकृती स्फुरल्या. हा 'का?' जर आपण गमावून बसलो तर सारी प्रगतीच थांबेल.
आपण नेहमी वापरतो तो 'वा!' शब्द सकृतदर्शनी तो कौतुकाचा उद्गार वाटतो; पण जरा खोलवर विचार केला तर तो दिसतो तितका सोज्वळ नाही. चांगलाच लबाड आहे, हे ध्यानात येते. कोणी नवी खरेदी दाखवते, कोणी लेख किंवा कविता वाचून त्यावरची प्रतिक्रिया विचारते, कोणी लेकीचे गाणे ऐकवते, तर कोणी स्वकृत पाकसिद्धी खाऊ घालते. आणि आपण मनातले भाव लपवत येणारी जांभई आवरत तोंडदेखले 'वा!' म्हणत असतो. तो 'वा!' शब्द कंटाळा, नाराजी, उपेक्षा अशा कितीतरी भावना सूचित करतो. सभ्यता, सुसंस्कृतता, प्रेमापोटी पडणारी भीड अशा किती अडचणी आपल्या वाटेत उभ्या असतात आणि त्या आपल्याला कौतुकाची दाद द्यायला लावून 'वा!' म्हणणे भाग पाडतात.
'छे!' हाही असाच एकाक्षरी; परंतु अर्थाचे डोंगर पोटात सामावणारा शब्द. आत्यंतिक आश्चर्यापासून आत्यंतिक कृतज्ञतेपर्यंत, आत्यंतिक आनंदापासून तो पराकाष्ठेच्या तुच्छतेपर्यंत कितीतरी परस्परविरोधी प्रतिक्रिया या एकाच एकाक्षरी उद्गारातून आपण प्रकट करत असतो. 'परवा भीमसेनजींची मैफल ऐकली. छे! कमाल केली पंडितजींनी त्या दिवशी.' या वाक्यातला 'छे!' कौतुकादर दाखवतो. 'छे! कसलं घाणेरडं पिक्चर दाखवलंस तू मला. वैताग आला ते बघताना!' या वाक्यातला 'छे!' तुच्छता, तिरस्कार यांचा सूचक असतो. 'छे! आम्ही का ती मुलगी पसंत करणार आमच्या मुलासाठी? काहीतरीच काय?' या वाक्यातला 'छे!' बोलणाऱ्याच्या अहंकारी आढ्यतेमधून उमटलेला असतो. 'छे! छे!! कहर झाला अगदी! हसून हसून माझं पोट दुखायला लागलं,' ही एखाद्या सुंदर विनोद नाटकाबद्दलची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते.
असे कितीतरी एकाक्षरी शब्द. 'हं', 'रे', 'हो', 'छी' हेही त्याच्याच मालिकेतले. मात्र, या शब्दांच्या उच्चाराबरोबर स्वरांचा चढउतार, त्यातला सूक्ष्म फरक, चेहऱ्यावरचे भाव हे ध्यानी घेतले नाहीत, तर त्यांचा खरा अर्थ समजणारच नाही.
खालील शब्द व त्या अनुषंगाने व्यक्त होणारे अर्थविशेष यांच्या योग्य जोड्या लावा:
गट अ (शब्द)गट ब (अर्थविशेष)
अ. 'का?'i. विशेषण
ब. शब्दबंबाळii. लबाडशब्द
क. 'वा!'iii. गहन आशय
ड. 'हं', 'रे', 'हो', 'छी'iv. परस्पर विरोधी प्रतिक्रिया उद्गारणारा
इ. 'छे!'v. एकाक्षरी मालिका
शब्द हा माझ्या अखंड कुतूहलाचा, आवडीचा आणि अभ्यासाचाही विषय आहे. गेल्या काही दिवसांत शब्दांच्या संदर्भात मला काही मजेदार अनुभव आले. तसे तर ते नेहमी येतात; पण का कोण जाणे, या खेपेला मला ते विशेष ठळकपणे जाणवले. गंमत म्हणजे हे सारे शब्द एकाक्षरी आहेत. लिहिण्यात, बोलण्यात, जाहीर वक्तृत्वापासून तो एकांतातील भाव निवेदनापर्यंत सर्वत्र आपण शब्दांचाच वापर करतो; पण यापैकी बहुतेक शब्द आकाराने मोठे, गुंतागुंतीचे, जड किंवा संदिग्ध असतात. माणसे भडाभडा बोलतात. अनावरपणे लिहितात. आपण त्याला 'शब्दबंबाळ' हे विशेषण लावतो; पण साधा एक अक्षराचा शब्ददेखील केवढा गहन आशय व्यक्त करू शकतो, हे अगदी अलीकडे वेगवेगळ्या घटनांनी माझ्या निदर्शनाला आणून दिले.
माझ्या भाचीची मुलगी. माझी छोटी नात. वय तीन-साडेतीन वर्षे. ती मराठी छान बोलते. वयाच्या मानाने अर्थपूर्ण आणि अगदी ठसकेबाज. हल्ली तिला एक शब्द सापडला आहे. तो म्हणजे 'का?' ती सारखे प्रश्न विचारत असते. मी कोणतेही वाक्य उच्चारले, म्हणजे 'मला आता काम आहे', 'मी चहा पिणार आहे', 'कावळा उडून आपल्या घरी गेला', 'साखर फार खाऊ नये' यांतले काहीही, तरी तिचा प्रश्न ठरलेला असतो 'का?' मी तात्पुरते काहीतरी उत्तर देऊन तिला गप्प बसवते; पण आपल्या उत्तराचा आवाका किती मर्यादित आहे आणि काही प्रश्नांना उत्तरेच कशी नसतात, हे त्याचवेळी मला उमगते आणि मी फार अस्वस्थ होऊन जाते. छोटीच्या त्या एकाक्षरी प्रश्नात जगातल्या साऱ्या जिज्ञासेचे, अनुभवाचे, ज्ञानाचे आणि उत्कट जाणिवेचे मूळ सामावले आहे, याचा मला साक्षात्कार होतो. जगाच्या इतिहासात कोणाला तरी, केव्हा तरी, कशाच्या तरी संदर्भात 'का?' असा प्रश्न विचारावासा वाटला. त्यातून शास्त्रे निर्माण झाली. वैज्ञानिक शोध लागले. आध्यात्मिक बोध झाला. सुंदर काव्ये, कलाकृती स्फुरल्या. हा 'का?' जर आपण गमावून बसलो तर सारी प्रगतीच थांबेल.
आपण नेहमी वापरतो तो 'वा!' शब्द सकृतदर्शनी तो कौतुकाचा उद्गार वाटतो; पण जरा खोलवर विचार केला तर तो दिसतो तितका सोज्वळ नाही. चांगलाच लबाड आहे, हे ध्यानात येते. कोणी नवी खरेदी दाखवते, कोणी लेख किंवा कविता वाचून त्यावरची प्रतिक्रिया विचारते, कोणी लेकीचे गाणे ऐकवते, तर कोणी स्वकृत पाकसिद्धी खाऊ घालते. आणि आपण मनातले भाव लपवत येणारी जांभई आवरत तोंडदेखले 'वा!' म्हणत असतो. तो 'वा!' शब्द कंटाळा, नाराजी, उपेक्षा अशा कितीतरी भावना सूचित करतो. सभ्यता, सुसंस्कृतता, प्रेमापोटी पडणारी भीड अशा किती अडचणी आपल्या वाटेत उभ्या असतात आणि त्या आपल्याला कौतुकाची दाद द्यायला लावून 'वा!' म्हणणे भाग पाडतात.
'छे!' हाही असाच एकाक्षरी; परंतु अर्थाचे डोंगर पोटात सामावणारा शब्द. आत्यंतिक आश्चर्यापासून आत्यंतिक कृतज्ञतेपर्यंत, आत्यंतिक आनंदापासून तो पराकाष्ठेच्या तुच्छतेपर्यंत कितीतरी परस्परविरोधी प्रतिक्रिया या एकाच एकाक्षरी उद्गारातून आपण प्रकट करत असतो. 'परवा भीमसेनजींची मैफल ऐकली. छे! कमाल केली पंडितजींनी त्या दिवशी.' या वाक्यातला 'छे!' कौतुकादर दाखवतो. 'छे! कसलं घाणेरडं पिक्चर दाखवलंस तू मला. वैताग आला ते बघताना!' या वाक्यातला 'छे!' तुच्छता, तिरस्कार यांचा सूचक असतो. 'छे! आम्ही का ती मुलगी पसंत करणार आमच्या मुलासाठी? काहीतरीच काय?' या वाक्यातला 'छे!' बोलणाऱ्याच्या अहंकारी आढ्यतेमधून उमटलेला असतो. 'छे! छे!! कहर झाला अगदी! हसून हसून माझं पोट दुखायला लागलं,' ही एखाद्या सुंदर विनोद नाटकाबद्दलची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते.
असे कितीतरी एकाक्षरी शब्द. 'हं', 'रे', 'हो', 'छी' हेही त्याच्याच मालिकेतले. मात्र, या शब्दांच्या उच्चाराबरोबर स्वरांचा चढउतार, त्यातला सूक्ष्म फरक, चेहऱ्यावरचे भाव हे ध्यानी घेतले नाहीत, तर त्यांचा खरा अर्थ समजणारच नाही. Match the words in Column A with their corresponding characterizations in Column B:
Column A (Word)Column B (Attribute) a. 'Why?' ('का?')i. Adjective b. Shadbambal ('शब्दबंबाळ')ii. Deceitful word c. 'Wah!' ('वा!')iii. Deep/profound meaning d. 'Han', 'Re', 'Ho', 'Chhi'iv. Expresses contradictory reactions e. 'Chhe!' ('छे!')v. Monosyllabic series