"आर्थिक प्रगती ही कोणत्याही देशाच्या विकासाची महत्त्वाची खूण आहे. परंतु आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक सामंजस्य, पर्यावरण संवर्धन, व शाश्वत विकास हे देखील तितकेच आवश्यक आहेत. देशाचा एकूण विकास GDP वाढला तरी तो फक्त काही विशिष्ट वर्गापुरता मर्यादित राहिल्यास त्याला खरा विकास म्हणता येत नाही. सर्व घटकांचा समावेश असलेला, गरिबी, बेकारी, असमानता कमी करणारा विकासच खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकास होय. यासाठी शिक्षण, आरोग्य, नोकरीच्या संधी, व कौशल्य विकास या क्षेत्रांवर भर द्यावा लागतो." खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकास कोणता?
उत्तर: गरिबी, बेकारी, असमानता कमी करणारा