"वाचन हा मानवी विकासाचा सर्वोत्तम मार्ग आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते, शब्दसंग्रह वाढतो, व विचार क्षमता तीव्र होते. पुस्तके ही माणसाची खरी मित्रे आहेत. ती कधीही फसवत नाहीत, तर नेहमीच ज्ञान देतात. परंतु आजच्या डिजिटल युगात माणूस पुस्तकांपासून दूर जात आहे. मोबाईल, टीव्ही, इंटरनेट यांचे वर्चस्व वाढले आहे. छोट्या छोट्या बातम्या, व्हिडिओज, रील्स यांची सवय झाल्याने दीर्घकाळ वाचन करण्याची क्षमता कमी होत आहे. वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने दिवसातून थोडा वेळ पुस्तक वाचनासाठी द्यावा. वाचन ही एक सवय बनवावी." वाचन हा मानवी विकासाचा कोणता मार्ग आहे?
उत्तर: सर्वोत्तम