सराव केंद्र ➔
बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) PSI Mains 2019 MEDIUM

डे बॉट्टन यांच्या The News : A User's Manual (बातम्या : वापरण्यासाठी मार्गदर्शिका) या पुस्तकाचे सिंहावलोकन करतांना संशोधक लुई बोव्डन नोंदवतात, डे बॉट्टन यानी पुरस्कारलेल्या परिकल्पनेप्रमाणे आपले जीवन सधन करणे वा अधिक समाधानकारक बनवणे ही बातम्यांची भूमिका नाही. अगदी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मोठ्या कळकळीने भलावण करणाऱ्या आणि बातम्यांवर भाष्य करणाऱ्या परोपकारी लोकांना देखील न्याहारी करत असताना या सूचनेमुळे ठसका लागेल. असे दावे ही स्व-मदत गुरू, दूरदर्शनवरील वास्तव स्पर्धा, आणि मूलतत्त्ववादी भाविकांची क्षेत्रे आहेत. आदर्शवाद केव्हाही टाकाऊ विचार प्रयोग नसला तरीही बातमी कशी असावी या संबंधाने व्याख्या, भूमिका, मर्यादा, इतिहास आणि सद्य सामाजिक वातावरण यांच्या सखोल शोधाशिवाय बातम्या माध्यमाची मार्गदर्शिका फारशी उपयुक्त ठरत नाही. काही मौलिक मर्मदृष्टी समाविष्ट असूनही मुळातच सुधारणा, अचूकता आणि अर्थपूर्ण चर्चेच्या अभावी The News हे पुस्तक शेवटी निराश करते. वरील नोंदीच्या संदर्भात सत्य नसलेले/ली विधान/ने निवडा. (a) सिंहावलोकन करणाऱ्याच्या मते, डे बॉट्टन यांचा बातम्यांच्या भूमिकेबाबतचा आदर्शवाद पूर्णपणे निरुपयोगी विचार प्रयोग ठरतो कारण त्यासाठी आदर्श बातमीची व्याख्या, भूमिका, मर्यादा इत्यादींचा शोध घेण्याची गरज आहे. (b) लुई बोव्डन यांच्या मते आपली जीवने सधन करणे वा ती अधिक समाधानी करणे ही बातम्यांची भूमिका नाही. (c) अर्थपूर्ण चर्चेसाठी आदर्श बातम्यांसंबंधाने आधार पुरवलेले नाहीत ही 'The News' या पुस्तकाची प्रमुख त्रुटी आहे. (d) बातम्यावर भाष्य करणाऱ्या परोपकारी व्यक्ती देखील डे बॉट्टन यांच्या बातम्यांच्या लोकांच्या जीवनातील भूमिकेबाबत सहमत होणार नाहीत. पर्यायी उत्तरे :

EN Reviewing Alain de Botton's book 'The News: A User's Manual', researcher Louis Bowden notes that, contrary to de Botton's premise, it is not the role of news to enrich our lives or make them more satisfying. Even benevolent commentators passionately praising the fourth pillar of democracy would choke on their breakfast at such a suggestion. Such claims belong to self-help gurus, reality television, and fundamentalists. While idealism is never a wasted thought experiment, a user's guide to the news media cannot be very useful without an in-depth exploration of definition, roles, limitations, history, and the current social context of news. Despite containing some valuable insights, 'The News' ultimately disappoints due to a lack of rigor, accuracy, and meaningful discussion. Select the statement(s) that is/are NOT true in the context of the above review: (a) According to the reviewer, de Botton's idealism regarding the role of news is a completely useless thought experiment because it requires exploring definitions, roles, limitations, etc. of ideal news. (b) According to Louis Bowden, it is not the role of news to enrich our lives or make them more satisfying. (c) The lack of grounding for meaningful discussion about ideal news is a major flaw of 'The News'. (d) Benevolent commentators on news would also disagree with de Botton's view on the role of news in people's lives. Alternative answers:
A
(d) शिवाय एकही नाही. None except (d)
B
(c) शिवाय एकही नाही. None except (c)
C
(b) शिवाय एकही नाही. None except (b)
✓
(a) शिवाय एकही नाही. None except (a)
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

स्पष्टीकरण:

परिच्छेदाचे विश्लेषण:

• समीक्षक लुई बोव्डन नोंदवतात: "आदर्शवाद केव्हाही टाकाऊ विचार प्रयोग नसला तरीही..." (Idealism is never a wasted thought experiment).
• याचा अर्थ समीक्षकाच्या मते डे बॉट्टन यांचा विचार प्रयोग पूर्णपणे निरुपयोगी नाही.

विधानांची तपासणी:

• विधान (a): "सिंहावलोकन करणाऱ्याच्या मते, डे बॉट्टन यांचा बातम्यांच्या भूमिकेबाबतचा आदर्शवाद पूर्णपणे निरुपयोगी विचार प्रयोग ठरतो..."
• परिच्छेदात स्पष्ट म्हटले आहे की आदर्शवाद टाकाऊ (निरुपयोगी) नसतो. त्यामुळे विधान (a) हे परिच्छेदाशी विसंगत असून सत्य नाही (असत्य आहे).
• इतर विधाने (b, c, d) ही परिच्छेदातील माहितीनुसार सत्य आहेत.
• त्यामुळे (a) शिवाय एकही नाही (म्हणजेच केवळ विधान 'a' सत्य नाही) हा पर्याय अचूक ठरतो.

त्यामुळे पर्याय (4) हे योग्य उत्तर आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

नकारात्मक शब्दरचना तपासा: परिच्छेदात "आदर्शवाद केव्हाही टाकाऊ नसतो" म्हटले असताना विधानात "पूर्णपणे निरुपयोगी ठरतो" म्हटले आहे, त्यामुळे विधान (a) असत्य ठरते.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Explanation:

Passage analysis:

The reviewer explicitly writes: "While idealism is never a wasted thought experiment..."

Evaluating the statements:

• Statement (a): Claims that the reviewer considers de Botton's idealism a "completely useless thought experiment". This directly contradicts the reviewer's explicit acknowledgment that idealism is never a wasted exercise. Thus, statement (a) is NOT true.
• Statements (b), (c), and (d) accurately reflect the contents of the review.

Hence, None except (a) is the correct choice.

Therefore, Option (4) is the correct answer.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Spot direct contradictions: The passage states idealism is 'never wasted', making statement (a)'s claim of 'completely useless' factually false.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →