उत्तर: पर्याय 4 ((अ) - (4), (ब) - (1), (क) - (2), (ड) - (3))
स्पष्टीकरण:
•
भारतापेक्षा पाकिस्तान आकाराने लहान आहे. या वाक्यात पेक्षा हे शब्दयोगी अव्यय पंचमी विभक्ती प्रत्ययाचे कार्य करते.
•
मधूने बाबांसाठी शर्ट आणला. या वाक्यात साठी हे शब्दयोगी अव्यय चतुर्थी विभक्ती प्रत्ययाचे कार्य करते.
•
तुझ्याकडून हे काम होणार नाही. या वाक्यात कडून हे शब्दयोगी अव्यय तृतीया विभक्ती प्रत्ययाचे कार्य करते.
•
कृष्ण अर्जुनाप्रत बोलला. या वाक्यात प्रत हे शब्दयोगी अव्यय द्वितीया विभक्ती प्रत्ययाचे कार्य करते.
•
Important Pointsविभक्ती प्रत्ययाचे कार्य करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाला विभक्ती प्रतिरुपक शब्दयोगी अव्यय म्हणतात. खालील शब्दयोगी अव्यये विभक्तीचे कार्य करतात.
•
विभक्ती
•
अव्यय
•
द्वितीया
•
प्रत, लागी
•
तृतीया
•
कडून, करवी, मुळे, योगे, प्रमाणे
•
चतुर्थी
•
करिता, कडे, साठी, प्रीत्यर्थ, स्तव
•
पंचमी
•
पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, वाचून
•
षष्ठी
•
विषयी, संबंधी
•
सप्तमी
•
मध्ये, खाली, ठायी, समोर, भोवती
•
द्वितीया - जर कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल व अशा कर्माला प्रत, लागी प्रत्यय जोडलेला असेल व दानाचा किंवा भेटीचा संबंध नसेल तर हे शब्द द्वितीयेच्या प्रत्ययाचे कार्य करतात. उदा. नितीन मनीषप्रत बोलला. -----→ नितीन मनीषला बोलला.
•
तृतीया - नामाला जोडलेले कडून, करवी, सह, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे, बरोबर हे प्रत्यय ने, ए, शी, नी या तृतीयेच्या प्रत्ययाचे कार्य करतात.
•
उदा. मांजराकडून उंदीर मारला जातो. -----→ मांजराने उंदीर मारला.
•
चतुर्थी - प्रत्यक्ष कर्म सोडून इतर शब्दांना लागलेले करिता, कडे, साठी, प्रीत्यर्थ, स्तव हे प्रत्यय स, ला, ना, ते या चतुर्थीच्या विभक्ती प्रत्ययाचे कार्य करतात तसेच दान घेणाऱ्या कर्माचे हेच प्रत्यय चतुर्थीचे असतात. उदा. तो मुंबईकडे गेला. -----→ तो मुंबईला गेला.
•
पंचमी - पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, वाचून हे अव्यय नामाला जोडले असता ऊन, हून या पंचमीच्या प्रत्ययाचे कार्य करतात.
•
उदा. तुझ्यापेक्षा मी दहा वर्षांनी मोठा आहे. -----→ तुझ्याहून मी दहा वर्षांनी मोठा आहे.
•
शब्दयोगी अव्यय - जी अव्यये नामे आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्यापुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.
•
शब्दयोगी अव्यये मुख्यत: नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडली जातात पण कधी कधी ती क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा लागतात.
•
शब्दयोगी अव्यय शब्दाला लागल्यावर बनलेला जोडशब्द त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवतो.
•
शब्दयोगी अव्यय हे अव्यय असल्याने त्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.
•
शब्दयोगी अव्यय शब्दाला लागताना, त्या शब्दाचे सामान्य रूप होते.
•
शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून पुढील प्रकार पडतात.
•
कालदर्शक शब्दयोगी अव्यये - नंतर, पावेतो, पुढे, पूर्वीं, आधी
•
गतिवाचक शब्दयोगी अव्यये - पासून, पर्यंत, मधून, खालून, आतून
•
स्थलवाचक शब्दयोगी अव्यये - अलीकडे, आत, जवळ, ठायी, नजीक, पाशी, पुढे, बाहेर, मध्ये, मागे, समोर
•
करणवाचक शब्दयोगी अव्यये - कडून, करवी, करून, द्वारा, मुळे, योगे, हाती
•
संबंधवाचक शब्दयोगी अव्यये - विशी, विषयी, संबंधी
•
हेतुवाचक शब्दयोगी अव्यये - करिता, साठी, अर्थी, निमित्त, अर्थी, स्तव, प्रीत्यर्थ, कारणे
•
कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यये - च, ना, मात्र, पण, केवळ, फक्त
•
योग्यतावाचक शब्दयोगी अव्यये - समान, सम, योग्य, प्रमाणे, जोगा, सारखा, बरहुकूम
•
तुलनावाचक शब्दयोगी अव्यये - पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस
•
व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यये - विना, खेरीज, वाचून, शिवाय, व्यतिरिक्त, परता
•
संग्रहवाचक शब्दयोगी अव्यये - सुद्धा, देखील, बरीक, पण
•
साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यये - संगे, सह, बरोबर, सकट, सहित, सवे, निशी
•
भागवाचक शब्दयोगी अव्यये - पैकी, पोटी, आतून
•
विनिमयवाचक शब्दयोगी अव्यये - बद्दल, जागी, बदली, ऐवजी, मोबदला
•
दिकवाचक शब्दयोगी अव्यये - प्रत, प्रति, कडे, लागी
•
विरोधवाचक शब्दयोगी अव्यये - उलटे, उलट, वीण, विरुद्ध
•
परिणामवाचक शब्दयोगी अव्यये - भर
•
पूर्णतावाचक शब्दयोगी अव्यये - पुरता, पुरेसा
📌 MPSC परीक्षा टीप: विभक्तीचे एकूण ८ प्रकार असून प्रथमा ते संबोधन पर्यंतचे प्रत्यय आणि त्यांचे ६ मुख्य कारकार्थ (कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण) तोंडपाठ असणे अत्यंत आवश्यक आहे.