उत्तर: पर्याय 2 (कोणी - कोणास हसू नये.)
स्पष्टीकरण:
•
कोणी - कोणास हसू नये. या वाक्यात कोणी - कोणास ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही म्हणून हे अनिश्चित सर्वनाम असलेले वाक्य होईल.
•
Important Pointsसर्वनाम - वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
•
सर्वनामाचे एकूण मुख्य सहा प्रकार आहेत.
•
पुरुषवाचक सर्वनाम
•
दर्शक सर्वनाम
•
संबंधी सर्वनाम
•
प्रश्नार्थक सर्वनाम
•
सामान्य / अनिश्चित सर्वनाम
•
आत्मवाचक सर्वनाम
•
पुरुषवाचक सर्वनाम - पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण तीन उपप्रकार पडतात
•
प्रथम पुरुषवाचक सर्वनाम - बोलणारा स्वत:विषयी. बोलतांना किंवा लिहितांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात. उदा. मी, आम्ही, आपण, स्वत:
•
वाक्य - मी मुंबईला जाणार आहे.
•
व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम - जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलावयाचे आहे. त्याचा उल्लेख करतांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदा. तो, तुम्ही, आपण, स्वतः इ
•
वाक्य - तुम्ही घरी कधी येणार आहात?
•
तृतीय पुरुषवाचक सर्वनाम - जेव्हा बोलणारा दुसर्या व्यक्तीशी बोलतांना व तिसर्या व्यक्तींचा उल्लेख करतांना ज्या, ज्या सर्वनामाचा वाक्यात उपयोग करतो त्या सर्वनामांस तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. उदा. तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.
•
वाक्य - ते सर्वजण इथेच येत आहेत.
•
दर्शक सर्वनाम - जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. उदाहरण - हा, ही, हे, तो, ती, ते.
•
संबंधी सर्वनाम - गौण वाक्यातील जो, जी, जे ज्या ही संबंधी सर्वनामे आहेत कारण ती उल्लेख केलेल्या एखाद्या नामाशी संबंधीत असतात तर मुख्य वाक्यातील तो, ती, ते, त्या ही अनुसंबंधी सर्वनामे आहेत. कारण अनु चा अर्थ नंतरचा असा होतो त्यामुळे दर्शक सर्वनामे संबंधी सर्वनामानंतर येऊन ती संबंधी सर्वानामांशी संबंध दर्शवितात म्हणून त्यांना अनुसंबंधी सर्वनामे म्हणतात. उदा - जो, जी, जे, ज्या
•
प्रश्नार्थक सर्वनाम - ज्या सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. असा प्रश्न विचारल्यास उत्तर नाम येते. उदा. कोण, काय, कोणी
•
सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम - कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. या सर्वनामांना सामान्य सर्वनाम असेसुद्धा म्हणतात. उदा. काय मुलगा आहे हा !
•
आत्मवाचक सर्वनाम - आपण, स्वतः, निज या सर्वनामाचा वापर स्वतः या अर्थाने केल्यास ती आत्मवाचक सर्वनामे होतात. अशा वेळी ती कर्त्यानंतर वापरली जातात.
•
उदा. तो आपण होऊन माझ्याकडे आला.
📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Answer: Option 2 (No one should laugh at anyone.)
Explanation:
•
Answer - One should not laugh at anyone. This is a sentence without subject pronouns.
•
No one should laugh at anyone. In this sentence someone - someone these pronouns do not appear in the sentence to ask a question, so it would be a sentence with indefinite pronouns as it is impossible to say for sure what nouns they are referring to.
•
Important Points Pronoun - A word that comes in place of a noun is called a pronoun to avoid repeated pronunciation of the noun in the sentence.
•
There are six main types of pronouns.
•
Masculine pronouns
•
Spectator pronouns
•
Relative pronouns
•
Interrogative pronouns
•
Common / Indefinite Pronouns
•
Subjective pronouns
•
Masculine Pronouns - There are three subtypes of masculine pronouns
•
First Person Pronoun - The speaker is about himself. A pronoun that we use in a sentence while speaking or writing is called a first person pronoun. E.g. I, we, you, myself
•
Sentence - I am going to Mumbai.
•
Positive Masculine Pronoun - When the speaker is speaking to someone. The pronoun used in the sentence while referring to him is called the masculine pronoun. E.g. He, you, us, myself etc
•
Sentence - When are you coming home?
•
Third Person Pronoun - When the speaker is talking to another person and referring to third persons who,
📌 MPSC Exam Tip: Marathi vocabulary, word origin classifications (Tatsama, Tadbhava, Deshi), idioms, and proverbs are high-scoring, direct topics in Police Bharti.