अचूक उत्तर: पर्याय (3) [अकर्मक कर्तरी]
स्पष्टीकरण:
उत्तर - पावसाळा सुरू झाला. हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे.
वरील वाक्यात पावसाळा हा कर्ता आहे आणि कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत आहे तसेच या वाक्यात कर्म आलेले नाही म्हणून हे वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचे होईल.
कर्तरी प्रयोग - जेव्हा वाक्यात क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, पुरुष आणि वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्तरी प्रयोगात क्रियापद बहुधा वर्तमानकाळी असते आणि कर्ता प्रथमान्त असतो तसेच कर्त्याला प्रत्यय नसतो. उदा. विजय निबंध लिहितो.
कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.
•
सकर्मक कर्तरी प्रयोग
•
अकर्मक कर्तरी प्रयोग
सकर्मक कर्तरी प्रयोग - ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. सकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म असावेच लागते आणि ते प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते. उदा. तो गाणे गातो.
अकर्मक कर्तरी प्रयोग - ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. अकर्मक कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, पुरुष आणि वचनानुसार बदलते म्हणजेच कर्ता धातुरूपेश असतो. उदा. सूर्य उगवला.
📌 Important Pointsप्रयोग - कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिला व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. प्रयोग ओळखण्यासाठी कर्ता, कर्म व क्रियापद यांची आवश्यकता असते.
प्रयोगाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.
•
कर्तरी प्रयोग
•
कर्मणी प्रयोग
•
भावे प्रयोग
कर्मणी प्रयोग - कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते म्हणून त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. कर्मणी प्रयोगात कर्माची आवश्यकता असते व ते प्रथमेतच असते. कर्मणी प्रयोगात कर्त्याला विभक्तीप्रत्यय असतो तर कर्माला नसतो. कर्मणी प्रयोगात क्रियापद बहुधा भूतकाळी असते. उदा. मधूने बैल बांधला.
कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग कधीच नसतो.
कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.
•
प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग
•
नवीन कर्मणी प्रयोग / कर्मकर्तरी प्रयोग
•
समापन कर्मणी प्रयोग
•
शक्य कर्मणी प्रयोग
•
प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग
भावे प्रयोग - जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात. या प्रयोगात कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. भावे प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
•
प्रधानकर्तृक भावे प्रयोग
•
गौणकर्तृक भावे प्रयोग
•
अकर्तृक भावे प्रयोग/ भावकर्तरी प्रयोग
प्रधानकर्तृक भावे प्रयोगाचे दोन प्रकार पडतात.
•
प्रधानकर्तृक सकर्मक भावे प्रयोग - या प्रकारात कर्त्याला प्राधान्य दिले जाते. यामध्ये कर्त्याला तृतीयेचा ने/नी प्रत्यय असतो आणि कर्माला सुद्धा प्रत्यय असतो. उदा. श्यामने गाईला बांधले.
•
प्रधानकर्तृक अकर्मक भावे प्रयोग - यामध्ये सकर्मक भावे प्रयोगाप्रमाणेच लक्षणे असतात, फक्त वाक्यात कर्म नसते. अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विध्यर्थीच असते तसेच कर्त्याला प्रत्यय असतो. उदा. त्याने आता घरी जावे.
गौणकर्तृक भावे प्रयोगाचे चार प्रकार पडतात.
•
गौणकर्तृक पुराण भावे प्रयोग - हा प्रयोग जुन्या मराठी भाषेत आढळतो. या प्रकारात वाक्यात कर्म नसते. कर्ता तृतीया विभक्तीत असतो तसेच क्रियापदाला शक्यतो ज प्रत्यय असतो. उदा. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे.
•
गौणकर्तृक नवीन भावे प्रयोग - या प्रकारात कर्त्याला कडून प्रत्यय असतो आणि कर्माला सुद्धा प्रत्यय असतो. उदा. पोलिसांकडून चोराला लवकरच पकडण्यात येईल.
•
गौणकर्तृक शक्य भावे प्रयोग - या प्रकारात कर्ता चतुर्थी/तृतीयेत असतो. वाक्य अकर्मक असते. धातूला व, अव, अवव प्रत्यय जोडून शक्यार्थ क्रियापद तयार केलेले असते. उदा. रामाला घरी जाववते.
•
गौणकर्तृक समापन भावे प्रयोग - या प्रकारात क्रियापद समाप्तीदर्शक असते. वाक्यात शक्यतो कर्म नसते आणि असल्यास ते द्वितीयेत असते तसेच कर्त्याला षष्ठीचा प्रत्यय असतो. उदा. त्याचे हसून झाले.
अकर्तृक भावे प्रयोग - वाक्यात क्रिया करणारा कर्ता असावाच लागतो. काही वाक्यात तो स्पष्टपणे दिलेला नसतो. क्रियापदाचा भावच कर्ता सांगत असेल तर अकर्तृक भावे प्रयोग होतो. उदा. वडगावजवळ सांजावले. (सायंकाळ झाली)
पर्यायांचे विश्लेषण:
•
पर्याय 1: 'सकर्मक कर्तरी' हा पर्याय चुकीचा आहे.
•
पर्याय 2: 'सकर्मक भावे' हा पर्याय चुकीचा आहे.
•
पर्याय 3 (अचूक उत्तर): 'अकर्मक कर्तरी' हे दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
•
पर्याय 4: 'कर्मणी' हा पर्याय चुकीचा आहे.
📌 पोलीस भरती परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना कर्त्याला व कर्माला प्रत्यय आहे का ते तपासा: कर्त्याला प्रत्यय नसल्यास 'कर्तरी', कर्माला प्रत्यय नसल्यास 'कर्मणी' आणि दोघांनाही प्रत्यय असल्यास 'भावे' प्रयोग होतो.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) [Intransitive case]
Explanation:
Answer - Monsoon has started. This is an example of an intransitive case experiment.
In the above sentence, monsoon is the subject and the subject is not suffixed but it is in the first form and as there is no action in this sentence, this sentence will be intransitive.
Kartari Experiment - When the form of the verb in the sentence changes according to the gender, gender and word of the doer, then the experiment is called Kartari experiment. In the past tense, the verb is usually in the present tense and the subject is first and last, and the subject has no suffix. E.g. Vijay writes an essay.
There are two subtypes of Kartari experiments.
•
Transitory experiments
•
Intransitive case studies
Transitive Sentences - Transitive Sentences in which verbs are present are called Transitive Sentences. In the transitive past participle, there must be a verb and it can be first or second. E.g. He sings a song.
Intransitive Verbs - Verbs in which there is no verb in the sentence are called intransitive verbs. In the intransitive case, the form of the verb varies according to the gender, gender and sentence of the subject, that is, the form of the subject is dhaturupesh. E.g. The sun rose.
📌 Important Points Prayoga - The matching, placement or construction of the doer and the verb with the verb is called Prayoga in grammar. Karta, Karma and Kriyapada are required to identify experiment.
There are three main types of experiments.
•
Kartari experiment
•
Work experience
•
Price experiments
Karmani Prabarak - In Karmani Prabarak, the form of the verb varies according to the gender or the word of the verb, so it is called Karmani Prabarak. Karmani experiment requires karma and it is Q
Distractor Analysis:
•
Option 1: 'Transitive Kartari' is incorrect in this context.
•
Option 2: 'Transitive expressions' is incorrect in this context.
•
Option 3 (Correct Answer): 'Intransitive case' is the correct response according to official examination criteria.
•
Option 4: 'Karmani' is incorrect in this context.
📌 Police Bharti Exam Tip: To identify Prayog (Voice): Check suffixes on subject and object. If subject has no suffix -> Kartari; if object has no suffix -> Karmani; if both have suffixes -> Bhave.