खालील विधाने विचारात घ्या : अ) अनुच्छेद 21-A मधील घटनात्मक तरतूदींची अंमलबजावणी करण्यासाठी बालकांचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 करण्यांत आला. ब) शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळ, शिक्षकांच्या खाजगी शिकवण्या आणि देणगी शुल्क यावर शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 द्वारे बंदी घालण्यात आली आहे. क) शाळेत प्रवेश न घेतलेल्यांसाठी वयानुसार योग्य त्या वर्गात प्रवेश देण्याची तरतूद शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मध्ये आहे. ड) शिक्षणाचा अधिकार अधिनियम दुरुस्ती 2012 नुसार शिक्षणाचा हक्क अधिनियम हा मदरसे आणि वैदिक पाठशाळा यांना देखील लागू होतो असे घोषित केले. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
EN
Consider the following statements:
a) The Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 was enacted to implement the constitutional provisions under Article 21-A.
b) Physical punishment and mental harassment, private tuition by teachers, and capitation fees are prohibited by the Right to Education Act, 2009.
c) There is a provision in the Right to Education Act, 2009 for admitting non-admitted children to an age-appropriate class.
d) By the Right to Education Amendment Act, 2012, it was declared that the Right to Education Act also applies to madrasas and vedic pathshalas.
Which of the above statements are correct?
कलम: 21'A' : शिक्षणाचा हक्क
1.
संसदेने पारित- ऑगस्ट 2009
2.
या हक्कांचा अंमल - 1एप्रिल 2010 पासून
3.
राष्ट्रपती संमती -3 सप्टेंबर 2009
•
या कायदयामुळे जगातील 135 देशांच्या यादीत भारताचाही समावेश.
•
कलम 21 नुसार राज्यसंस्था 6 ते 14 (हे वय 1956 च्या कायदयानुसार...) वर्षापर्यंतच्या मुलांना कायदयाने ठरविल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल.
•
कलम 21'A'- 86 वी घटनादुरुस्ती 2002 ने समाविष्ट.
•
या कलमाने 'प्राथमिक शिक्षण मुलभूत हक्क' बनविण्यात आले.
•
पंतप्रधानांच्या भाषणाने कायद्याची अंमलबजावणी होण्याची ही पहिलीच वेळ होती.
शिक्षणाच्या मुलभूत हक्कांची वैशिष्ट्ये :
•
6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण.
•
आर्थिक खर्च -केंद्र व राज्य भागीदारीत उचलतील.
•
सर्व खाजगी शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी आर्थिकदृष्ट्या वंचित समुदायातील मुलांसाठी 25%
जागा राखीव असतील.
•
प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.