'दशभुजा' हा कोणत्या प्रकारचा समास आहे?
उत्तर: बहुव्रीही
उत्तर: बहुव्रीही
उत्तर: पर्याय 4 (बहुव्रीही)
स्पष्टीकरण:
दशभुजा या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा (म्हणजे विष्णू) बोध होतो म्हणून हे बहुव्रीही समासाचे उदाहरण होईल.
दशभुजा हे समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समास या प्रकारात मोडते.
विग्रह - दहा आहेत भुजा ज्याला तो - विष्णू (प्रथमा विभक्ती)
Important Points बहुव्रीही समास - ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
बहुव्रीही समासाचे खालील चार उपप्रकार पडतात.
विभक्ती बहुव्रीही समास - ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.
विभक्ती बहुव्रीही समासाचे दोन प्रकार पडतात.
समानाधिकरण - या समासात विग्रह करताना दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.
उदा. वक्रतुंड - वक्र आहे तुंड (तोंड) ज्याचे तो - गणपती (प्रथमा विभक्ती)
व्याधिकरण - या समासात विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात.
उदा. चक्रपाणि - चक्र आहे पाणित असा तो विष्णू (प्रथमा/सप्तमी विभक्ती)
नञ बहुव्रीही समास - ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नञ बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. उदा. अनाथ - ज्याला नाथ नाही असा तो
सहबहुव्रीही समास - ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखादया विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात. उदा. सवर्ण - वर्णासहित असा तो
प्रादिबहुव्रीही समास - ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा. सुमंगल - पवित्र आहे असे
Additional Information द्वंद्व समास - ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात त्यास व्दंव्द समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदा. पापपुण्य - पाप आणि पुण्य
व्दंव्द समासाचे पुढील तीन प्रकार पडतात.
इतरेतर व्दंव्द समास
वैकल्पिक व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास
इतरेतर द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व, ही, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. स्त्रीपुरुष - स्त्री आणि पुरुष
वैकल्पिक द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. न्यायान्याय - न्याय अथवा अन्याय
समाहार द्वंद्व समास - ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. केरकचरा - केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ
तत्पुरुष समास - ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
तत्पुरुष समासाचे सात उपप्रकार पडतात.
विभक्ती तत्पुरुष समास
अलुक तत्पुरुष समास
उपपद तत्पुरुष समास
नञ तत्पुरुष समास
कर्मधारय तत्पुरुष समास
द्विगू समास
मध्यमपद लोपी समास
कर्मधारय समास - हा तत्पुरुष समासाचाच पोट प्रकार असून त्यात दोन्ही पदांची विभक्ती प्रथमा असते, यात पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो त्यास कर्मधारय समास म्हणतात. उदा. घनश्याम - घनासारखा श्याम, भाषांतर - अन्य भाषा
📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला प्रत्यय नसेल तर 'कर्तरी', कर्माला प्रत्यय नसेल तर 'कर्मणी', आणि कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असल्यास 'भावे' प्रयोग होतो.
Answer: Option 4 (बहुव्रीही)
Explanation:

📌 MPSC Exam Tip: Rule for Marathi Voice (Prayog): No suffix on subject = Kartari; No suffix on object = Karmani; Suffixes on both subject and object = Bhave Prayog.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.