'देशगत' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
उत्तर: द्वितीया तत्पुरुष
उत्तर: द्वितीया तत्पुरुष
उत्तर: पर्याय 3 (द्वितीया तत्पुरुष)
स्पष्टीकरण:
देशगत - विग्रह - देशाला गेलेला
वरील सामासिक शब्दात विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली आहेत म्हणून देशगत हे विभक्ती ( द्वितीया) तत्पुरुष समासाचे उदाहरण होईल.
विभक्ती तत्पुरुष समास - ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. सुखप्राप्त - सुखाला प्राप्त - द्वितीया तत्पुरुष समास
Important Points तत्पुरुष समास - ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
तत्पुरुष समासाचे सात उपप्रकार पडतात.
विभक्ती तत्पुरुष समास
अलुक तत्पुरुष समास
उपपद तत्पुरुष समास
नञ तत्पुरुष समास
कर्मधारय तत्पुरुष समास
द्विगू समास
मध्यमपद लोपी समास
अलुक तत्पुरुष समास - ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. अग्रेसर, तोंडी लावणे
उपपद तत्पुरुष समास - ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असते व ते धातुसाधित असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही त्यास उपपद तत्पुरुष समास म्हणतात. उदा. नीरज - नीरात जन्मलेले
नञ तत्पुरुष समास - ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद अ, अन, न, ना, बे, नि, गैर यांसारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरु होते त्याला नञ तत्पुरुष समास म्हणतात. उदा. अनादर - आदर नसलेला, बेडर - डर नसलेला
कर्मधारय समास - हा तत्पुरुष समासाचाच पोट प्रकार असून त्यात दोन्ही पदांची विभक्ती प्रथमा असते, यात पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो त्यास कर्मधारय समास म्हणतात. उदा. घनश्याम - घनासारखा श्याम, भाषांतर - अन्य भाषा
द्विगू समास - ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगू समास म्हणतात. उदा. सप्ताह - सात दिवसांचा समूह
मध्यमपद लोपी समास - ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यमपद लोपी समास म्हणतात. उदा. चुलत सासरा - नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा
📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद - अव्ययीभाव, दुसरे पद - तत्पुरुष, दोन्ही पदे - द्वंद्व, दोन्ही पदे गौण - बहुव्रीही समास होतो.
Answer: Option 3 (द्वितीया तत्पुरुष)
Explanation:

📌 MPSC Exam Tip: To determine compound words (Samas), check word precedence: 1st dominant = Avyayibhava, 2nd dominant = Tatpurusha, both dominant = Dvandva, both secondary = Bahuvrihi.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.