🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2023 CSAT Paper-II 2023 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची (प्र. ११ ते १५) योग्य उत्तरे द्या: शब्द हा माझ्या अखंड कुतूहलाचा, आवडीचा आणि अभ्यासाचाही विषय आहे. गेल्या काही दिवसांत शब्दांच्या संदर्भात मला काही मजेदार अनुभव आले. तसे तर ते नेहमी येतात; पण का कोण जाणे, या खेपेला मला ते विशेष ठळकपणे जाणवले. गंमत म्हणजे हे सारे शब्द एकाक्षरी आहेत. लिहिण्यात, बोलण्यात, जाहीर वक्तृत्वापासून तो एकांतातील भाव निवेदनापर्यंत सर्वत्र आपण शब्दांचाच वापर करतो; पण यापैकी बहुतेक शब्द आकाराने मोठे, गुंतागुंतीचे, जड किंवा संदिग्ध असतात. माणसे भडाभडा बोलतात. अनावरपणे लिहितात. आपण त्याला 'शब्दबंबाळ' हे विशेषण लावतो; पण साधा एक अक्षराचा शब्ददेखील केवढा गहन आशय व्यक्त करू शकतो, हे अगदी अलीकडे वेगवेगळ्या घटनांनी माझ्या निदर्शनाला आणून दिले.

माझ्या भाचीची मुलगी. माझी छोटी नात. वय तीन-साडेतीन वर्षे. ती मराठी छान बोलते. वयाच्या मानाने अर्थपूर्ण आणि अगदी ठसकेबाज. हल्ली तिला एक शब्द सापडला आहे. तो म्हणजे 'का?' ती सारखे प्रश्न विचारत असते. मी कोणतेही वाक्य उच्चारले, म्हणजे 'मला आता काम आहे', 'मी चहा पिणार आहे', 'कावळा उडून आपल्या घरी गेला', 'साखर फार खाऊ नये' यांतले काहीही, तरी तिचा प्रश्न ठरलेला असतो 'का?' मी तात्पुरते काहीतरी उत्तर देऊन तिला गप्प बसवते; पण आपल्या उत्तराचा आवाका किती मर्यादित आहे आणि काही प्रश्नांना उत्तरेच कशी नसतात, हे त्याचवेळी मला उमगते आणि मी फार अस्वस्थ होऊन जाते. छोटीच्या त्या एकाक्षरी प्रश्नात जगातल्या साऱ्या जिज्ञासेचे, अनुभवाचे, ज्ञानाचे आणि उत्कट जाणिवेचे मूळ सामावले आहे, याचा मला साक्षात्कार होतो. जगाच्या इतिहासात कोणाला तरी, केव्हा तरी, कशाच्या तरी संदर्भात 'का?' असा प्रश्न विचारावासा वाटला. त्यातून शास्त्रे निर्माण झाली. वैज्ञानिक शोध लागले. आध्यात्मिक बोध झाला. सुंदर काव्ये, कलाकृती स्फुरल्या. हा 'का?' जर आपण गमावून बसलो तर सारी प्रगतीच थांबेल.

आपण नेहमी वापरतो तो 'वा!' शब्द सकृतदर्शनी तो कौतुकाचा उद्गार वाटतो; पण जरा खोलवर विचार केला तर तो दिसतो तितका सोज्वळ नाही. चांगलाच लबाड आहे, हे ध्यानात येते. कोणी नवी खरेदी दाखवते, कोणी लेख किंवा कविता वाचून त्यावरची प्रतिक्रिया विचारते, कोणी लेकीचे गाणे ऐकवते, तर कोणी स्वकृत पाकसिद्धी खाऊ घालते. आणि आपण मनातले भाव लपवत येणारी जांभई आवरत तोंडदेखले 'वा!' म्हणत असतो. तो 'वा!' शब्द कंटाळा, नाराजी, उपेक्षा अशा कितीतरी भावना सूचित करतो. सभ्यता, सुसंस्कृतता, प्रेमापोटी पडणारी भीड अशा किती अडचणी आपल्या वाटेत उभ्या असतात आणि त्या आपल्याला कौतुकाची दाद द्यायला लावून 'वा!' म्हणणे भाग पाडतात.

'छे!' हाही असाच एकाक्षरी; परंतु अर्थाचे डोंगर पोटात सामावणारा शब्द. आत्यंतिक आश्चर्यापासून आत्यंतिक कृतज्ञतेपर्यंत, आत्यंतिक आनंदापासून तो पराकाष्ठेच्या तुच्छतेपर्यंत कितीतरी परस्परविरोधी प्रतिक्रिया या एकाच एकाक्षरी उद्गारातून आपण प्रकट करत असतो. 'परवा भीमसेनजींची मैफल ऐकली. छे! कमाल केली पंडितजींनी त्या दिवशी.' या वाक्यातला 'छे!' कौतुकादर दाखवतो. 'छे! कसलं घाणेरडं पिक्चर दाखवलंस तू मला. वैताग आला ते बघताना!' या वाक्यातला 'छे!' तुच्छता, तिरस्कार यांचा सूचक असतो. 'छे! आम्ही का ती मुलगी पसंत करणार आमच्या मुलासाठी? काहीतरीच काय?' या वाक्यातला 'छे!' बोलणाऱ्याच्या अहंकारी आढ्यतेमधून उमटलेला असतो. 'छे! छे!! कहर झाला अगदी! हसून हसून माझं पोट दुखायला लागलं,' ही एखाद्या सुंदर विनोद नाटकाबद्दलची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते.

असे कितीतरी एकाक्षरी शब्द. 'हं', 'रे', 'हो', 'छी' हेही त्याच्याच मालिकेतले. मात्र, या शब्दांच्या उच्चाराबरोबर स्वरांचा चढउतार, त्यातला सूक्ष्म फरक, चेहऱ्यावरचे भाव हे ध्यानी घेतले नाहीत, तर त्यांचा खरा अर्थ समजणारच नाही. जगातील साऱ्या जिज्ञासेचे, ज्ञानाचे आणि उत्कट जाणिवेचे मूळ 'का?' या एका शब्दात सामावले आहे. कारण

अ. 'का?' शब्द नसता तर सारी प्रगती झपाट्याने झाली असती.
ब. 'का?' ची भाषा कधी कधी लहान-थोर सर्वांना उमगत नाही.
क. 'का?' अर्थहीन शब्द आहे.
ड. 'का?' चा अर्थपूर्ण आवाका मोठा आहे.

EN Read the given Marathi passage and answer the questions (Q. 11 to 15): (Note: हा परिच्छेद अधिकृत मराठी भाषा आकलनाचा असल्याने मूळ मराठी उतारा व संकल्पना प्रमाण मानल्या जातात.)

शब्द हा माझ्या अखंड कुतूहलाचा, आवडीचा आणि अभ्यासाचाही विषय आहे. गेल्या काही दिवसांत शब्दांच्या संदर्भात मला काही मजेदार अनुभव आले. तसे तर ते नेहमी येतात; पण का कोण जाणे, या खेपेला मला ते विशेष ठळकपणे जाणवले. गंमत म्हणजे हे सारे शब्द एकाक्षरी आहेत. लिहिण्यात, बोलण्यात, जाहीर वक्तृत्वापासून तो एकांतातील भाव निवेदनापर्यंत सर्वत्र आपण शब्दांचाच वापर करतो; पण यापैकी बहुतेक शब्द आकाराने मोठे, गुंतागुंतीचे, जड किंवा संदिग्ध असतात. माणसे भडाभडा बोलतात. अनावरपणे लिहितात. आपण त्याला 'शब्दबंबाळ' हे विशेषण लावतो; पण साधा एक अक्षराचा शब्ददेखील केवढा गहन आशय व्यक्त करू शकतो, हे अगदी अलीकडे वेगवेगळ्या घटनांनी माझ्या निदर्शनाला आणून दिले.

माझ्या भाचीची मुलगी. माझी छोटी नात. वय तीन-साडेतीन वर्षे. ती मराठी छान बोलते. वयाच्या मानाने अर्थपूर्ण आणि अगदी ठसकेबाज. हल्ली तिला एक शब्द सापडला आहे. तो म्हणजे 'का?' ती सारखे प्रश्न विचारत असते. मी कोणतेही वाक्य उच्चारले, म्हणजे 'मला आता काम आहे', 'मी चहा पिणार आहे', 'कावळा उडून आपल्या घरी गेला', 'साखर फार खाऊ नये' यांतले काहीही, तरी तिचा प्रश्न ठरलेला असतो 'का?' मी तात्पुरते काहीतरी उत्तर देऊन तिला गप्प बसवते; पण आपल्या उत्तराचा आवाका किती मर्यादित आहे आणि काही प्रश्नांना उत्तरेच कशी नसतात, हे त्याचवेळी मला उमगते आणि मी फार अस्वस्थ होऊन जाते. छोटीच्या त्या एकाक्षरी प्रश्नात जगातल्या साऱ्या जिज्ञासेचे, अनुभवाचे, ज्ञानाचे आणि उत्कट जाणिवेचे मूळ सामावले आहे, याचा मला साक्षात्कार होतो. जगाच्या इतिहासात कोणाला तरी, केव्हा तरी, कशाच्या तरी संदर्भात 'का?' असा प्रश्न विचारावासा वाटला. त्यातून शास्त्रे निर्माण झाली. वैज्ञानिक शोध लागले. आध्यात्मिक बोध झाला. सुंदर काव्ये, कलाकृती स्फुरल्या. हा 'का?' जर आपण गमावून बसलो तर सारी प्रगतीच थांबेल.

आपण नेहमी वापरतो तो 'वा!' शब्द सकृतदर्शनी तो कौतुकाचा उद्गार वाटतो; पण जरा खोलवर विचार केला तर तो दिसतो तितका सोज्वळ नाही. चांगलाच लबाड आहे, हे ध्यानात येते. कोणी नवी खरेदी दाखवते, कोणी लेख किंवा कविता वाचून त्यावरची प्रतिक्रिया विचारते, कोणी लेकीचे गाणे ऐकवते, तर कोणी स्वकृत पाकसिद्धी खाऊ घालते. आणि आपण मनातले भाव लपवत येणारी जांभई आवरत तोंडदेखले 'वा!' म्हणत असतो. तो 'वा!' शब्द कंटाळा, नाराजी, उपेक्षा अशा कितीतरी भावना सूचित करतो. सभ्यता, सुसंस्कृतता, प्रेमापोटी पडणारी भीड अशा किती अडचणी आपल्या वाटेत उभ्या असतात आणि त्या आपल्याला कौतुकाची दाद द्यायला लावून 'वा!' म्हणणे भाग पाडतात.

'छे!' हाही असाच एकाक्षरी; परंतु अर्थाचे डोंगर पोटात सामावणारा शब्द. आत्यंतिक आश्चर्यापासून आत्यंतिक कृतज्ञतेपर्यंत, आत्यंतिक आनंदापासून तो पराकाष्ठेच्या तुच्छतेपर्यंत कितीतरी परस्परविरोधी प्रतिक्रिया या एकाच एकाक्षरी उद्गारातून आपण प्रकट करत असतो. 'परवा भीमसेनजींची मैफल ऐकली. छे! कमाल केली पंडितजींनी त्या दिवशी.' या वाक्यातला 'छे!' कौतुकादर दाखवतो. 'छे! कसलं घाणेरडं पिक्चर दाखवलंस तू मला. वैताग आला ते बघताना!' या वाक्यातला 'छे!' तुच्छता, तिरस्कार यांचा सूचक असतो. 'छे! आम्ही का ती मुलगी पसंत करणार आमच्या मुलासाठी? काहीतरीच काय?' या वाक्यातला 'छे!' बोलणाऱ्याच्या अहंकारी आढ्यतेमधून उमटलेला असतो. 'छे! छे!! कहर झाला अगदी! हसून हसून माझं पोट दुखायला लागलं,' ही एखाद्या सुंदर विनोद नाटकाबद्दलची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते.

असे कितीतरी एकाक्षरी शब्द. 'हं', 'रे', 'हो', 'छी' हेही त्याच्याच मालिकेतले. मात्र, या शब्दांच्या उच्चाराबरोबर स्वरांचा चढउतार, त्यातला सूक्ष्म फरक, चेहऱ्यावरचे भाव हे ध्यानी घेतले नाहीत, तर त्यांचा खरा अर्थ समजणारच नाही. The origin of all curiosity, knowledge, and intense consciousness in the world is contained in the single word 'Why?'. Because:

a. If 'Why?' was absent, all progress would have happened rapidly.
b. The language of 'Why?' is at times incomprehensible to both young and old.
c. 'Why?' is a meaningless word.
d. 'Why?' encompasses a vast and meaningful scope.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
अ फक्त
a only
B
ब आणि ड फक्त
b and d only
C
क आणि अ फक्त
c and a only
D
क फक्त
c only
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

उताऱ्यातील सूक्ष्म विश्लेषणावरून योग्य उत्तर पर्याय २ [ब आणि ड फक्त] आहे.

सविस्तर स्पष्टीकरण:

१. उताऱ्यातील संदर्भ:
• विधान ड (सत्य): लेखिका स्पष्ट सांगते की लहान नातीच्या त्या एकाक्षरी 'का?' या प्रश्नात संपूर्ण जगाचे ज्ञान, जिज्ञासा आणि शास्त्रांची निर्मिती सामावलेली आहे; म्हणजेच 'का?' चा अर्थपूर्ण आवाका अतिशय मोठा आहे.
• विधान ब (सत्य): लेखिका स्वतः कबूल करते: *"आपल्या उत्तराचा आवाका किती मर्यादित आहे आणि काही प्रश्नांना उत्तरेच कशी नसतात, हे त्याचवेळी मला उमगते आणि मी फार अस्वस्थ होऊन जाते."* म्हणजेच 'का?' ची सखोलता लहान-थोरांना सहजपणे उमगत नाही.
• विधान अ व क (पूर्णतः असत्य): 'का?' नसता तर प्रगती थांबली असती (झपाट्याने झाली नसती) आणि 'का?' हा अत्यंत गहन अर्थ असलेला शब्द आहे, अर्थहीन नाही.
💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

मराठी भाषा आकलनात नकारात्मक व सकारात्मक विधानांची सत्यता तपासून अचूक पर्यायांची निवड करावी.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Based on the passage text, the correct answer is Option 2 [b and d only].

Detailed Explanation:

1. Statement (d) is True: The author explicitly explains that the single monosyllabic query 'Why?' sparked all scientific breakthroughs, philosophies, arts, and human progress—demonstrating its profound and vast meaningful scope.
2. Statement (b) is True: The author admits being helpless when trying to answer her granddaughter's repeated 'Why?', discovering how limited our answers are and how profound questions elude simple comprehension.
3. Statements (a) & (c) are False: Progress would freeze without 'Why?', and it is the exact opposite of meaningless.
💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Discard extreme or logically inverted statements (e.g. saying 'Why?' is meaningless) to quickly isolate valid combinations.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) अ फक्त (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
✓ पर्याय (2) ब आणि ड फक्त (अचूक उत्तर): उताऱ्यातील सूक्ष्म विश्लेषणावरून योग्य उत्तर **पर्याय २ [ब आणि ड फक्त]** आहे.
⚠️ पर्याय (3) क आणि अ फक्त (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✗ पर्याय (4) क फक्त (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →