खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाचे (प्र. क्र. ३६ ते ४०) योग्य उत्तर द्या:
उद्देशपत्रिका ही संविधान ज्या मूलभूत तत्वज्ञानाबर आणि मूलभूत मूल्यांवर राजकीय, नैतिक व धार्मिक, आधारित आहे त्याचे प्रतिक आहे. उद्देशपत्रिकेत संविधान सभेचे भव्य व उदात्त दृष्टिकोण आहे. ते देशाच्या संविधानाच्या निर्मात्याच्या स्वप्नांचे व आकांक्षाचे प्रतिबिंब आहे. संविधान निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे संविधान सभेचे सदस्य अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्या शब्दात "आपल्या संविधानाची उद्देशपत्रिका आपण इतके दिवस जे विचार करत होतो किंवा स्वप्न पाहत होतो, ती व्यक्त करते."
संविधान सभेच्या मसुदा समितीचे सदस्य के. एम. मुंशी यांच्या मते, उद्देशपत्रिका ही "आपल्या सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताकाची कुंडली आहे". संविधान सभेचे आणखी एक सदस्य ठाकुरदास भार्गव यांनी उद्देश पत्रिकेचे महत्व पुढील शब्दांत मांडले, "उद्देशपत्रिका ही संविधानाचा सर्वात मौल्यवान भाग आहे, तो संविधानाची आत्मा आहे. ती संविधानाची किल्ली आहे. ती संविधानात ठेवलेला रत्न जडित संच आहे. ती एक योग्य मापदंड आहे, ज्याद्वारे संविधानाचे मूल्य मोजता येते." एक प्रतिष्ठीत इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ अर्नेस्ट बार्कर यांनी उद्देशपत्रिकेच्या लेखकाच्या राजकीय ज्ञानाला भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यांनी उद्देशपत्रिकेचे वर्णन संविधानाचे बीज (key note) असे केले आहे. उद्देशपत्रिकेतील मजकुराने ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्यांच्या लोकप्रिय ग्रंथ, प्रिन्सीपल्स ऑफ सोशल ॲण्ड पॉलिटिकल थिअरी (1951) च्या सुरुवातीला ते उद्धृत केले.
भारताचे माजी सरन्यायाधीश एम. हिदायतुल्ला यांनी निरीक्षण नोंदविले की, "उद्देशपत्रिका ही अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसारखी आहे, परंतु ती केवळ एका घोषणेपेक्षा जास्त आहे. ती आपल्या संविधानाचा आत्मा आहे, जी आपल्या राजकीय समाजाचा नमुना मांडते. त्यात एक गंभीर संकल्प आहे, जो क्रांती शिवाय काहीही बदलू शकत नाही."
उद्देशपत्रिके बाबतचा एक वाद आहे की, उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे किंवा नाही. बेरूबारी युनियन खटल्यात (1960), सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, उद्देशपत्रिका संविधानातील अनेक तरतुदीमागील सामान्य उद्देश दर्शविते आणि त्यामुळे संविधान निर्मात्यांच्या मनाची गुरुकिल्ली आहे. शिवाय कोणत्याही अनुच्छेदामध्ये वापरलेले शब्द अस्पष्ट असतील किंवा एकापेक्षा जास्त अर्थ लावू शकतील, अशा ठिकाणी, उद्देशपत्रिकेत नमूद केलेल्या उद्दिष्टांमधून अर्थ लावण्यासाठी काही मदत घेतली जाऊ शकते. उद्देशपत्रिकेचे महत्व ओळखूनही, सर्वोच्च न्यायालयाने विशेषतः असे मत मांडले की, उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग नाही.
केशवानंद भारती खटल्यामध्ये (1973) सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचे मत फेटाळून लावले आणि उद्देशपत्रिका ही संविधानाचा एक भाग, असे म्हटले. उद्देशपत्रिका अत्यंत महत्वाची आहे आणि उद्देशपत्रिकेत व्यक्त केलेल्या भव्य आणि उदात्त दृष्टिकोनाच्या प्रकाशात संविधान वाचले पाहिजे आणि त्याचा अर्थ लावला पाहिजे असे निरीक्षण नोंदवले. एलआयसी ऑफ इंडिया खटला मध्ये (1995) देखील सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा असे म्हटले की, उद्देशपत्रिका ही संविधानाचा अविभाज्य भाग आहे.
'उद्देशपत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे', असे कोणी म्हटले आहे ?
अ. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
ब. के. एम. मुंशी
क. ठाकुर दास भार्गव
ड. अर्नेस्ट बार्कर
ई. एम. हिदायतुल्ला
According to K. M. Munshi, a member of drafting Committee of the Constituent Assembly, the Preamble is the 'horoscope of our sovereign democratic republic'. Pandit Thakur Das Bhargava, member of Constituent Assembly, summed up the importance of the Preamble in the following words, "The Preamble is the most precious part of the Constitution. It is the soul of the Constitution. It is a key to the Constitution. It is a jewel set in the Constitution. It is a proper yardstick with which we can measure the worth of the Constitution." Ernest Barker, a distinguished English political scientist, paid a glowing tribute to the political wisdom of the authors of the Preamble. He described the preamble as the 'key-note' to the Constitution. He was so moved by the text of the Preamble that he quoted it at the opening of his popular book 'Principles of Social and Political Theory 1951'.
M. Hidayatullah, a former Chief Justice of India, observed, Preamble resembles the declaration of Independence of the United States of America, but is more than a declaration. It is the soul of our Constitution, which lays down the pattern of our political society. It contains a solemn resolve, which nothing but a revolution can alter.
One of the controversies about the Preamble is as to whether it is a part of the Constitution or not. In the Berubari Union Case (1960), the Supreme Court said that the Preamble shows the general purposes behind the several provisions in the Constitution and is thus a key to the minds of the makers of the Constitution. Further, where the terms used in any article are ambiguous or capable of more than one meaning, some assistance at interpretation may be taken from the objectives enshrined in the Preamble. Despite this recognition of the significance of the Preamble, the Supreme Court specifically opined that Preamble is not a part of the Constitution. In the Keshavananda Bharti case (1973), the Supreme Court rejected the earlier opinion and held that Preamble is a part of the Constitution. It observed that the Preamble is of extreme importance and the Constitution should be read and interpreted in the light of grand and noble vision expressed in the Preamble. In the LIC of India case (1995) also, the Supreme Court again held that the Preamble is an integral part of the Constitution. Who said that, 'Preamble is the soul of the Constitution ?'
A. Alladi Krishnaswami Iyer
B. K. M. Munshi
C. Thakur Das Bhargava
D. Ernest Barker
E. M. Hidayatullah