🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2025 CSAT Paper-II 2025 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाचे (प्र. क्र. ४१ ते ४५) योग्य उत्तर निवडा: औद्योगिक क्रांतीमुळं व्यापार, मानवीसंबंध, समाजजीवन, संस्कृती, धर्म यांच्या स्वरूपांत आणि संकल्पनांत क्रांतिकारी बदल झाले. या गोष्टी अर्थातच प्रामुख्याने युरोपात झाल्या. यंत्रांच्या साहाय्याने वस्तूंचे उत्पादन अमाप प्रमाणात होऊ लागले. मोठ्या प्रमाणावर कामगारांची आवश्यकता निर्माण झाली. ती पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक लोकांना कामावर घेतले गेले. त्यातून राजाचे जे निसर्गदत्त अधिकार वा ईश्वरदत्त अधिकार म्हणा, ते संपले. एक नवा, मोठा व वेगळा संघटित वर्ग तयार झाला. यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर माल तयार होऊ लागला तशी त्याला हुकमी गिऱ्हाईकांची, बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली. या काळात युरोपातल्या बऱ्याच देशांच्या जगभर वसाहती होत्या. त्या वसाहतीतील पारंपरिक उद्योग मोडून काढून तिथं कृत्रिमरीत्या गरजा निर्माण करून आपला माल खपवणं या देशांना शक्य झालं. वसाहतीच्या देशात उपलब्ध होणारं स्वस्त मनुष्यबळ - खरं म्हणजे कवडीमोलानं मिळणारं मनुष्यबळ - इकडून तिकडे सहज हलवता आलं. भारत, मॉरिशस, वेस्ट इंडिज बेटे किंवा ऑस्ट्रेलियाजवळ फिजी येथे अशाच गरजांपोटी पुष्कळ लोक नेण्यात आले. किंवा आफ्रिकेतून बोटींनी भरभरून काळी माणसे वेठबिगारी करण्यासाठी सध्याच्या अमेरिकेत नेण्यात आली. भारतात आपल्याकडं मांजरपाट नावाचा एक जाडाभरडा कपडा अगदी परवापर्यंत – सुमारे चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत - अगदी भरपूर मिळत असे. मांजरपाट हे मँचेस्टर क्लॉथचं देशी नामकरण. इथल्या हातमागावरचा उद्योग मोडकळीस आणून हे स्वस्त कापड इथं दीर्घकाळ वापरलं गेलं. डाक्क्याची महागडी मलमल आधीही जनसामान्य वापरत नव्हते. नंतर ती नाहीशीच झाली.

हे सारं बव्हंशी ग्रेटब्रिटन आणि त्याच्या वसाहतींमधलं चित्र म्हणता येईल. पण युरोपात औद्योगिक क्रांती फक्त ब्रिटनमध्येच झाली असं नव्हे तर ती फ्रान्स, हॉलंड, जर्मनी अशी सगळीकडेच झाली. सगळीकडे ती एकाच वेळी झाली असंही नाही. इंग्रजांच्या जशा वसाहती होत्या तशाच फ्रेंच व डच लोकांच्याही होत्या. जर्मनांच्या फार कमी. स्पेन आणि पोर्तुगालच्याही होत्या पण हे दोन्ही देश सगळ्यात आधी वसाहती करून नंतर स्वतः धार्मिक भानगडीत वेगळ्या रस्त्यानं गुंतत गेले. व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांच्या वसाहती मोठ्या होत्या. फ्रेंचांच्या, डचांच्या लहान होत्या; तरीही होत्या. जर्मनीत औद्योगिक क्रांती काहीशी उशिरा झाली पण त्यांचं तंत्रज्ञान तुलनेनं अधिक प्रगत होतं. साहजिकच उत्पादनाचा वेग जास्त होता अन् हुकमी बाजारपेठा त्यांच्याकडं फारशा नव्हत्या. त्या मिळवायच्या तर जर्मनांना इंग्रज, फ्रेंच यांचा पराभव करणं आवश्यक होतं. गेल्या शतकातल्या दोन्ही महायुद्धांना ही व्यापारी गरजांची महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. या महायुद्धांमुळे अपरिमित मानवी संहार, भीषण हानी होऊन युरोपातील जिंकणारे व हरणारे असे सारेच दुबळे होऊन गेले. या महायुद्धाची सगळ्यात कमी झळ पोहोचलेली अमेरिकेची संयुक्त संस्थाने-ज्यांचा उल्लेख सर्वसाधारणपणे आपण अमेरिका असा करतो ती आणि ज्यांना सगळ्यात जास्त झळ बसली तो रशिया-ज्यात बाकी सोवियत प्रजासत्ताके होती अशा दोन महासत्ता युद्धानंतर उदयाला आल्या. जर्मनांना इंग्रज-फ्रेंच यांचा पराभव करण्याची गरज का भासली ?

EN Read the following passage carefully and answer the question (Q. No. 41 to 45): The Industrial Revolution brought revolutionary transformations to trade, human relationships, social life, culture, and religion, primarily originating in Europe. Mechanized production skyrocketed, generating an immense demand for labor that drew vast numbers of local people into the workforce, dissolving the divine right of kings and creating a newly organized working class. As mass machine manufacturing escalated, European powers faced a desperate requirement for captive consumers and colonial markets. Having colonies across the globe, European imperialists dismantled indigenous traditional crafts, artificially fabricated demands, and dumped their industrial goods. Cheap, bonded labor was shipped across continents—Indians were relocated to Mauritius, Fiji, and the West Indies, while enslaved Africans were ferried in shiploads to the Americas. In India, coarse cloth locally known as 'Manjarpat'—a domestic moniker for Manchester cloth—became ubiquitous for decades, destroying local handlooms while fine Dhaka muslin vanished entirely.

This phenomenon was not confined to Great Britain; industrialization swept France, Holland, and Germany as well, though at staggered intervals. The British, French, and Dutch controlled vast colonial trade territories, whereas Germany possessed very few. Industrialization reached Germany later, yet its technology was remarkably sophisticated. With rapid manufacturing capabilities but lacking captive markets, Germany felt compelled to challenge and defeat Britain and France. This economic rivalry provided the critical impetus for both World Wars. The cataclysms decimated Europe, leaving both victors and vanquished critically weakened. In the post-war vacuum, two pre-eminent superpowers arose: the United States, which had suffered minimal home destruction, and the Soviet Union (Russia), which despite suffering colossal war damage emerged triumphant. Why did Germans feel the need to defeat the British and French?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सत्ता संपादन करण्यासाठी
To acquire power
B
हुकमी बाजारपेठा मिळविण्यासाठी
To acquire captive markets
C
अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी
To strengthen economy
D
हुकूमशाही निर्माण करण्यासाठी
To establish dictatorship
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर पर्याय २ (हुकमी बाजारपेठा मिळविण्यासाठी) आहे.

उताऱ्याच्या आधारे सविस्तर विश्लेषण:

  • उताऱ्यातील थेट संदर्भ: दुसऱ्या परिच्छेदात स्पष्ट नमूद केले आहे: "जर्मनीत औद्योगिक क्रांती काहीशी उशिरा झाली पण त्यांचं तंत्रज्ञान तुलनेनं अधिक प्रगत होतं. साहजिकच उत्पादनाचा वेग जास्त होता अन् हुकमी बाजारपेठा त्यांच्याकडं फारशा नव्हत्या. त्या मिळवायच्या तर जर्मनांना इंग्रज, फ्रेंच यांचा पराभव करणं आवश्यक होतं."
  • ब्रिटन आणि फ्रान्सने जगातील बहुतांश बाजारपेठांवर वसाहतींच्या माध्यमातून आधीच ताबा मिळवला होता. जर्मनीकडे उच्च तंत्रज्ञान व उत्पादन क्षमता असूनही माल विकण्यासाठी हक्काच्या बाजारपेठा नव्हत्या; म्हणून त्या बाजारपेठांवर ताबा मिळवण्यासाठी त्यांना इंग्रज व फ्रेंचांचा पराभव करणे अनिवार्य वाटले.
  • त्यामुळे योग्य उत्तर हुकमी बाजारपेठा मिळविण्यासाठी आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाचे एक प्रमुख आर्थिक कारण म्हणजे नव्याने औद्योगिक राष्ट्र बनलेल्या जर्मनीची वसाहती व जागतिक बाजारपेठांसाठी ब्रिटन व फ्रान्सविरुद्धची तीव्र साम्राज्यवादी स्पर्धा होती.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option 2 (हुकमी बाजारपेठा मिळविण्यासाठी / To acquire captive markets)

Detailed Passage-Based Analysis:

  • Direct Passage Citation: Paragraph 2 explicitly elucidates: "In Germany, the industrial revolution occurred somewhat later, but their technology was comparatively more advanced. Naturally, production speed was high, but they lacked captive markets. To secure those markets, it was imperative for the Germans to defeat the British and French."
  • Britain and France had already carved out massive global colonial monopolies. Despite superior production technology, Germany lacked colonies to dump goods; wresting control of these lucrative markets necessitated vanquishing the entrenched colonial masters.
  • Therefore, the primary motivation was to secure captive markets.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

In modern world history, the imperialistic friction between established colonial powers (Britain/France) and late-industrializing powers (Germany) over commercial spheres of influence was a foremost cause of World War I.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) सत्ता संपादन करण्यासाठी (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
✓ पर्याय (2) हुकमी बाजारपेठा मिळविण्यासाठी (अचूक उत्तर): योग्य उत्तर पर्याय २ (हुकमी बाजारपेठा मिळविण्यासाठी) आहे.
⚠️ पर्याय (3) अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✗ पर्याय (4) हुकूमशाही निर्माण करण्यासाठी (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →