खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची (प्र. ४६ ते ५०) योग्य उत्तरे द्या:
'प्रवाळद्वीप परिसंस्था'
प्रवाळ किटकांच्या वाढीसाठी २३ अंश सेल्सिअस ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान आवश्यक आहे. किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्या खाली जाता कामा नये. या किमान तापमानाच्या आवश्यकतेमुळेच प्रवाळ किटकांची वाढ शीत सागरी प्रवाहापासून दूर ३० अंश उत्तर ते ३० अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान उष्णकटिबंधीय पाण्यात मर्यादित झाली आहे. प्रवाळ खडकांची विविधता उच्च अक्षवृत्तीय समुद्रात सुमारे ३० अंश उत्तर ते ३० अंश दक्षिण पर्यंत कमी होत जाते. या प्रदेशाच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेस प्रवाळांची वाढ होत नाही. तथापि उत्तरेकडे वाहणाऱ्या उबदार पाण्याच्या प्रवाहात आढळणारे प्रवाळ या नियमाला अपवाद आहेत. प्रवाळांचे सर्वात जास्त केंद्रीकरण विषुववृत्ताजवळ आढळते, जेथे सागरजलाचे तापमान सर्वात जास्त असते. महासागराच्या पूर्व किनाऱ्यावर (म्हणजेच महाद्विपांच्या पश्चिम किनाऱ्यावर) कमी अक्षांशामध्ये प्रवाळांच्या वाढीचा मुख्य अडथळा म्हणजे वर्षाच्या किमान भागासाठी १८ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानासह थंड पाण्याची उपस्थिती असणे हा होय.
पर्ल बेटे, पनामाच्या आखाताच्या ईशान्येकडील लहान प्रवाळ खडकांची अपवादात्मक निर्मिती स्थानिक पातळीवर सागरजलाचे ऊर्ध्ववहन न झाल्यामुळे उद्भवते. तर नैर्ऋत्य बाजूस प्रवाळांची वाढ ईशान्येकडील व्यापारी वाऱ्यांमुळे थंड पाण्याचे ऊर्ध्ववहन झाल्यामुळे खुंटली आहे. सोमालियन किनाऱ्यावरील काही भागांमध्ये उन्हाळ्यात ऊर्ध्ववहन होऊन सागराच्या थंड पाण्यामुळे प्रवाळ किटकांच्या वाढीस स्थानिक पातळीवर अडथळा निर्माण होतो.
पर्शियन आखात आणि अकाबाचे आखात यांच्यामध्ये प्रवाळांच्या वाढीतील फरक शामल वाऱ्यांमुळे होतो. कुवेतवरील पर्शियन आखाताच्या उत्तरेकडील भागावर हिवाळ्यात वाहणाऱ्या थंड वायव्य वाऱ्यांमुळे त्या क्षेत्राचे तापमान १५ अंश सेल्सिअस आणि कधीकधी १३.२ अंश सेल्सिअस पर्यंत कमी होते. उच्च अक्षवृत्तीय भागात जसे लॉर्ड होवे बेटाजवळ प्रवाळ सागराकडून दक्षिण महासागराकडे वाहत येणाऱ्या पूर्व ऑस्ट्रेलियन उष्ण सागरी प्रवाहामुळे प्रवाळ किटकांची वाढ होते. आखाती प्रवाहाच्या (गल्फ स्ट्रीम) उजव्या बाजूने वाहणाऱ्या प्रवाहामुळे (१९°C ते २७°C) बर्मुडा बेटांना उष्ण पाणी मिळते; तसेच दक्षिण जपानी बेटांलगत क्युरोशियो उष्ण प्रवाहामुळे (२०°C ते २८°C) प्रवाळांच्या वाढीला अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या वायव्य भागाकडून वाहत येणारा लियूविन प्रवाह पॅसिफिक महासागरातील विषुववृत्तीय उष्ण प्रवाहाला वाहत आणून ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यालगत दक्षिण ध्रुवीय भागाकडे वाहत जातो, त्यामुळे हुटमॅन ॲब्रोल्हास येथील प्रवाळद्वीप अपवादात्मक स्थितीत निर्माण झालेले आहे.
खालील पैकी कोणती तापमानाची स्थिती प्रवाळ किटकांच्या वाढीसाठी अधिक अनुकूल असते ?
Coral require temperatures between 23°C to 25°C for their growth. The minimum temperature must not go below 18°C. This temperature requirement restricts their growth to tropical waters between 30° N and 30° S latitudes away from cold water currents. The diversity of coral reefs decrease in higher latitudes to about 30° N and 30° S latitudes. North or South of this zone, coral growth does not occur. However, corals lying in the path of northward moving warm water are an exception to this rule. The largest concentration occurs near the equator where water temperatures are highest. The main obstacle to coral growth in low latitudes along the east coast of oceans (west coast of continents) is the presence of cool water with a temperature lower than 18°C for at least part of the year.
The exceptional occurrence of small reefs on the north eastern side of the pearl islands, Gulf of Panama results from a local absence of upwelling, whereas on the South western side coral growth is inhibited by cool upwelling caused by north easterly trade winds. Coral growth is locally hindered by summer cool upwelling in parts of the Somalian coast.
Between the Persian Gulf and the Gulf of Aqaba the difference in coral growth is due to the Shamal, a cold north westerly wind blowing in winter over the northern part of the Persian Gulf so that temperature in that area is lowered to 15°C and sometimes to even 13.2°C on the Kuwait reefs. At high latitudes, such as Lord Howe Island, reef growth results from the East Australian warm current which flows from the coral sea to the Southern ocean; the Bermuda receive warm water flowing along the right hand side of the Gulf stream (19°C to 27°C); Southern Japanese Islands are favoured by the warm Kuroshio current (20°C - 28°C). The exceptional occurrence of Houtman's Abrolhas, western Australia results from Leeuwin current which flows pole wards along this coast and carries warm equatorial pacific water around north west Australia. Which of the following temperature conditions is the most favourable for the growth of coral ?