खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची (प्र. २६ ते ३०) योग्य उत्तरे द्या:
गेल्या काही शतकांपासून हवामान बदलांमुळे पृथ्वीचे वाढते तापमान, ढगफुटी, वारंवार आढळणारे चक्रीवादळ, दीर्घकाळ व अनियमित हिवाळा व दुष्काळ यासारख्या घटनांनी सार्वजनिक व्यासपीठावर लक्ष वेधले असले तरी अनेक पर्यावरणीय समस्या पृथ्वी द्वारे अनुभवल्या जात आहेत.
या हवामान बदलांमुळे होणाऱ्या टोकाच्या घटनांमुळे मानवासमोर आर्थिक, सामाजिक व मानसिक स्वास्थाला आव्हान दिले असून त्यावर विचारमंथन करण्यास व व्यक्त होण्यास भाग पाडले आहे. ह्या वास्तविकतेमुळेच हवामान बदलामुळे घडणारे विपरीत परिणाम आटोक्यात आणण्याकरिता अनेक एजन्सीज् / संस्था प्रयत्नशील आहेत. हे सर्वश्रुतच आहे की जागतिक तापमान वृद्धीसाठी विविध हरित गृह घटकांपैकी ऑटोमोबाईल व तत्सम उद्योगांद्वारे अवाजवी पद्धतीने वातावरणात उत्सर्जित होणारा / फेकल्या जाणारा कार्बन डायऑक्साईड प्रामुख्याने अत्यंत टोकाच्या हवामान बदलांमुळे होणाऱ्या घटनांसाठी उत्प्रेरक आहे.
पूर्वी नैसर्गिक वने व महासागरांद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड प्रचुर प्रमाणात अधिशोषित / अधिग्रहित केला जात असे. (प्रचुर प्रमाणात शोषला जात असे). तथापि वारंवार / सततची होणारी जंगलतोड व महासागराच्या व वनांच्या सभोवताली मानवनिर्मित वाढत्या दबावांमुळे सदर प्रणालीद्वारे कार्बन पृथक्करण / अधिग्रहित करण्याची क्षमता मंदावलेली आहे.
विविध प्रजातींच्या आंतरिक व आपापसांतील संबंध व विशिष्ट पर्यावरणीय परिस्थितीशी घडणाऱ्या परस्पर प्रक्रियेतून नैसर्गिक वने विकसित होत असतात. आणि हरित गृह वायूंचे होणारे दुष्परिणाम शमविण्यासाठी / आटोक्यात आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावत असतात, तसेच ऑक्सिजन निर्मिती सुद्धा करीत असतात. तथापि अन्य वनांच्या / वनक्षेत्रांच्या तुलनेत उष्णकटिबंधीय व "सावन्ना" वनक्षेत्रे जास्त प्रमाणात प्राणवायूची निर्मिती करतात. अभ्यासांद्वारे प्रस्थापित करण्यात आले आहे की वनक्षेत्रांची (वनांची) नैसर्गिक पुनरुत्पादन क्षमता सततच्या जंगलतोडीमुळे खालावत चालली आहे.
परिस्थितीकी शास्त्रज्ञ असे मत मांडतात की, नैसर्गिक वनांची पुनर्निर्मिती / पुनर्स्थापना करणे ही जागतिक तापमान वृद्धीमुळे होणारे दुष्परिणाम आटोक्यात आणण्याकरिता आदर्श प्रणाली ठरू शकते. तथापि नैसर्गिक वनांचे त्यांच्या विशिष्ट (unique) किंवा उपजत आकृतिबंधानुसार (Zonation Pattern) पुनर्निर्माण किंवा पुनरुज्जीवित करणे अवघड कार्य असून जवळपास अशक्यप्राय असे कार्य आहे. दिवसेंदिवस कमी होणारे वनांचे आवरण विविध सजीव प्रजातींचा ऱ्हास होण्यास कारणीभूत असून पर्यायाने प्राणवायू निर्मिती व कार्बन साठवणुकीच्या प्रणालीसाठी बाधक ठरतात ज्यामुळे जागतिक तापमान वाढीच्या प्रक्रियेला चालना मिळते. आणि म्हणूनच संशोधक व धोरणकर्ते वृक्षारोपण व वनसंवर्धन उपक्रमांना प्रोत्साहन देतात की जेणेकरून जागतिक तापमान वृद्धीला शमविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी हातभार लावता येईल.
स्थलीय परिसंस्थेच्या कार्बन पृथक्करण क्षमतेत वाढ करण्यासाठी खालीलपैकी योग्य पर्यायांची निवड करा.
(a) वृक्षारोपण करणे व वनीकरण उपक्रम
(b) औद्योगिक सांडपाणी जलस्रोतात सोडणे
(c) हरित गृह वायूंची वाढ
(d) बेकायदेशीर वृक्षतोड थांबविणे
पर्यायी उत्तरे :
These extreme climatic events have challenged the physical, mental and economic health of humans and made them to think and speak out. This realisation has been following by several agencies making efforts to mitigate the climate change impacts.
It is known that global warming is the result of the incessant release of greenhouse gases especially carbon dioxide (CO2) from several sectors especially from automobile and associated industries triggering the extreme climatic events.
Earlier the natural forests cover and oceans absorbed the enormous quantities of CO2 released in the environment. However, continuous deforestation and other anthropogenic pressures prevailing in and around the ocean and forest have slowed down the carbon sequestration potential of these systems.
Natural forests evolve due to the constant interplay of inter and intra species alongwith unique environmental conditions and play an important role in mitigating the greenhouse gases to a large extent, also acting as oxygen factories. However, in comparison, tropical and savannah forests produce more oxygen than other forests.
Studies have established that the natural regeneration potential of the forest has been decreasing due to continuous deforestation. Ecologists opine that the restoration of natural forests is the ideal way to overcome the global warming impacts. However, restoration of natural forest is a herculean task and almost impossible. The diminishing forest cover affects the life-forms and also carbon storage and oxygen production which might speed-up the global warming process, and so researchers and policymakers encourage afforestation programmes in order to mitigate global warming. How the carbon sequestration potential of terrestrial ecosystem can be increased. Choose correct options among the following.
(a) Planting of trees and Afforestation activities.
(b) Release of industrial wastes in river streams.
(c) Increase in greenhouse gases.
(d) Protecting illegal cutting of trees in forests.
Answer options: