खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची (प्र. ३६ ते ४०) योग्य उत्तरे द्या:
भारतीय घटनात्मक लोकशाही आणि कायद्याचे राज्य यांना साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. खरं तर या निमित्ताने भारतीय घटनात्मक लोकशाहीचा लेखाजोखा मांडण्याची आणि राजकीय लोकशाहीच्या गौरवशाली प्रयोगाची चिकित्सा करण्याची संधी साधणे गरजेचे आहे. घटनाकारांनी एका उदारमतवादी राष्ट्राची स्वप्ने पाहिली आणि त्याच मूल्यांच्या आधारे राष्ट्राची पायाभरणी केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आजही आपण उदारमतवादी मूल्यांचे पालन करताना दिसतो. आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये मात्र लोकशाही मोडकळीस आलेली दिसते. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार सारख्या राष्ट्रांमध्ये लोकशाहीपुढे गंभीर आव्हाने आहेत आणि आपल्या उत्तरेला आर्थिकदृष्ट्या समृद्ध पण प्रत्यक्षात हुकूमशाही राजवट असणारा चीन आहे. या सगळ्या राष्ट्रांमध्ये राजकीय अराजकता माजल्याचे आपणास दिसून येते. भारताच्या आसपास असणाऱ्या देशातील वाळवंटरुपी अराजकतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय राज्यघटनेमुळे मात्र समाजात अधिकार, प्रतिनिधित्व, न्याय या संकल्पना रुजून नंदनवन फुलून आल्यासारखे वाटते.
राज्यघटनेने प्रजासत्ताकाच्या आराखड्याची यशस्वी निर्मिती केली. घटना समितीतील सदस्य हे तत्कालीन भारतातील सर्वोत्तम राजकीय विचारवंत आणि कायदेपंडित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद, के. एम. मुन्शी आणि घटनासल्लागार बी. एन. राव यांच्यासारखे दिग्गज घटना समितीत होते. या सगळ्यांनी उदात्त उद्दिष्ट्ये बाळगून भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. घटनासमितीचे अथक प्रयत्न आणि दूरदृष्टीमुळेच भारतासारख्या सांस्कृतिक बहुलता असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या खंडप्राय देशास सर्वोत्तम घटना मिळाली.
आज आपण राज्यघटनेवर टीका करू शकतो, तिच्यातील काही मर्यादांवर चर्चा करू शकतो. आपल्या समाजातील काही समुदाय तर घटनेविषयी अनादर देखील व्यक्त करतात. पण आपण लक्षात घेतले पाहिजे की हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील घटनेमुळेच मिळालेले आहे. ही घटना नसती तर आपण राजकीयदृष्ट्या स्वतंत्र होऊनही सामाजिकदृष्ट्या पारतंत्र्यात राहिलो असतो. भारतीय समाजातील अधिकारशाहीवादी, सरंजामशाही, सांप्रदायिक, लष्करी दडपशाहीचे समर्थक, प्रतिगामी घटक शिरजोर झाले असते. राज्यघटनेवर आक्षेप घेणारे लोक देखील मान्य करतात की राज्य घटनेच्या तत्वांची अंमलबजावणी करताना प्रत्यक्ष व्यवहारात जरी मर्यादा जाणवल्या तरी कागदावर राज्यघटना सर्वोत्तमच असली पाहिजे. आजच्या घडीला जगातील सर्वोत्तम राज्यघटनांमध्ये भारताची राज्यघटना गणली जाते. अशी घटना आपल्याला प्रदान करणाऱ्या घटनाकारांच्या नैतिक बांधिलकी आणि व्यावहारिक दूरदृष्टीबद्दल आपण कायम कृतज्ञ राहिले पाहिजे.
लोकशाही मोडकळीस आलेल्या राष्ट्रांच्या भूमीचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरण्यात आला आहे ?
It could be argued that the Constitution, as the textual blueprint of the republic, is not responsible for its own marginalization, violation, or suspension. That it was conceived in a certain era, written in a certain spirit, and promulgated in good faith by the best political and legal minds active in India around the time of independence. That a document first articulated and steered by the likes of Dr. B.R. Ambedkar, Sardar Patel, Jawaharlal Nehru, Maulana Azad, Rajendra Prasad, K.M. Munshi and Constitutional Advisor B.N. Rau, continuously guarded and carefully interpreted by three generations of lawmakers since, is as good as it gets for an overly large, unremittingly poor, vexingly diverse, and precariously free post-colony like India.
That we may criticize the Constitution; we may lament its disrespect or point out its inefficacy in many parts of India, but without it, we would still be colonized, if not by the British then by undemocratic, militarist, communal or other sorts of nonprogressive strains within the Indian political spectrum. Better to have an excellent constitution in the letter if not in practice, than no constitution at all, the objector says. Today the Indian constitution is considered as best amongst all other constitutions. We should be grateful for the moral commitment and practical foresight of our founders. Which word has been used to describe the land of nations where democracy is failed?