🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या (प्रश्न ४१ ते ४५) : ज्ञानाचे प्रयोजन आणि सामाजिक उत्तरदायित्व 'ज्ञान हे उपयुक्त असो वा नसो; त्याचे पावित्र्य स्वतःसिद्ध आहे. जिज्ञासापूर्तीचा निरागस आनंद, मानवाच्या अंतःशक्तीचा स्व-तंत्र विलास व संपूर्ण विकास हेच ज्ञानाचे खरे प्रयोजन आहे' असा पक्ष हिरीरीने मांडला जातो. पण ज्ञानाचे चिरंतन पावित्र्य व त्याची देशकालसापेक्ष उपयुक्तता यांमध्ये मुळातच विरोध आहे असे मानण्याचे कारण नाही. मानवी बुद्धीला आपल्या सामर्थ्याचा प्रत्यय आणून देणारे सत्यज्ञानाचे नवे उन्मेष निःसंशय आनंददायक असतात. त्या वेळी विद्यावंताची मनःस्थिती 'कळो न ये सुखदुःख । तान हरपली भूक' अशी होत असेल. त्याची सामाजिक अस्मिता, किंबहुना बाह्यसृष्टी व मनुष्यत्व यांतील द्वैतही ह्या अनुभवात क्षणभर विरून जात असेल. स्वान्तःसुखाच्या ह्या क्षणावरील त्याचा नैसर्गिक हक्क कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. मात्र ज्ञानसमाधीचा हा फक्त क्षणच असतो, तो ज्ञानोपासकाच्या जीवनाचा स्थायी भाव होऊ शकत नाही. विद्यानंद हा आत्मनिष्ठ व अलौकिक आहे हे मान्य केले, तरी विद्याभिवृद्धीचा सामाजिक संदर्भ, त्यासाठी खर्ची पडलेले सामूहिक श्रम व संपत्ती यांचा विचार लौकिक दृष्टीनेच करावा लागेल. ज्ञानाची निर्मिती, विकास आणि प्रसार ही कार्ये सातत्याने चालू राहायची असतील, तर विद्यावंतांना आपली सामाजिक जबाबदारी टाळता येणार नाही. मात्र त्यासाठी त्यांनी आपले ज्ञानैकनिष्ठेचे ब्रीद सोडण्याची किंवा विचारस्वातंत्र्याला पारखे होण्याची मुळीच गरज नाही. विज्ञानाची मूळ प्रेरणा जरी मानवाच्या अंतिम हिताची असली, तरी प्रत्येक शास्त्रीय शोध वा सिद्धान्त तात्कालिक दृष्ट्या उपयुक्त ठरलाच पाहिजे असे कोणीही म्हणणार नाही. कोणतीही नवी उपपत्ती जेव्हा मांडली जाते तेव्हा एकंदर सामाजिक जीवनावर तिचे दूरगामी परिणाम काय होतील याचा खात्रीशीर निर्णय करणे कोणालाच शक्य नसते. कोणत्याही सिद्धान्ताच्या उपयोजनेसाठी विचाराच्या व व्यवहाराच्या प्रांतात पुरेसे अनुकूल वातावरण नसेल तर तो काही काळ अगदी निरुपयोगी किंवा विघातकही ठरण्याचा संभव असतो. म्हणून एखाद-दुसऱ्या सिद्धान्ताच्या उपयुक्ततेपेक्षा ज्ञानोपासकांच्या भूमिकेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे यांत दुसराही एक मूलभूत फरक आहे. नैसर्गिक शास्त्रे बाह्य सृष्टीचा शोध घेतात. मानवाचे जीवन समृद्ध व सुखावह करणे हेच त्यांचे मूळ प्रयोजन होय. शास्त्रीय शोधांचा वापर मानवाच्या सुखासाठी न होता संहारासाठी होऊ लागला म्हणजे ज्ञाननिष्ठ की मानवनिष्ठ असा प्रश्न शास्त्रज्ञांपुढे उभा राहतो. सामाजिक शास्त्रे तर व्यक्ती, जाती, वर्ग, प्रदेश, राष्ट्रे व मानवसमाज यांच्या प्रवृत्तींचा व परस्परसंबंधांचा विचार करतात. ह्या प्रवृत्ती, हे संबंध, कधी परस्परपूरक तर कधी परस्परविरोधी असतात. एकाला जे लाभदायक ते दुसऱ्याला हानिकारक ठरण्याचा संभव असतो. शिवाय जाती, वर्ग, प्रांत यांसारखा कोणताही घटक पूर्णपणे एकजिनसी नसतो. त्यात एकमेकांना छेद देणारी द्वंद्वे असतात. अशा वेळी समाजजीवनाबद्दल काही निष्कर्ष काढावयाचे तर सामाजिक कलहात औपपत्तिक पातळीवर का होईना; पण निश्चित बाजू घ्यावी लागते. ज्ञानाची पवित्रता आणि देशकाल सापेक्ष उपयुक्तता यामध्ये कोणते नाते असणे आवश्यक आहे ? अ. ज्ञानवंत व समूह यांच्या आनंदमयतेचे ब. समन्वयाचे क. सामाजिक अस्मितेचे ड. मानव समूहाच्या अंतिम हिताचे

EN Read the following Marathi comprehension passage carefully and answer the questions based on it (Questions 41 to 45): Purpose of Knowledge and Social Responsibility (Marathi Passage) 'Whether knowledge is utilitarian or not, its sanctity is self-evident. The innocent joy of quenching curiosity, the free expression and holistic development of human inner potential is the true purpose of knowledge'—this perspective is often vigorously advocated. Yet there is no intrinsic conflict between the eternal sanctity of knowledge and its spatio-temporal utility. New revelations of true knowledge that affirm the potency of human intellect are undoubtedly joyous. During such moments, a scholar's state of mind might well be described as 'oblivious to joy or sorrow, thirst and hunger forgotten'. Their social identity, indeed the duality between external nature and humanity, dissolves for a fleeting instant. None can strip them of their natural right to this moment of inner bliss. However, this state of intellectual absorption is only a passing phase, not a permanent disposition. While acknowledging that the joy of learning (vidyananda) is subjective and transcendent, the social context of expanding knowledge—along with the collective labour and wealth invested—must be evaluated from a practical, worldly viewpoint. If the creation, growth, and dissemination of knowledge are to continue uninterrupted, scholars cannot evade their social accountability. Doing so, however, does not require them to abandon their intellectual commitment or forfeit freedom of thought. Although the fundamental impetus of science is the ultimate welfare of humanity, none would argue that every scientific breakthrough must yield immediate utility. When a new theory is postulated, forecasting its far-reaching societal consequences with absolute certainty is impossible. Without a receptive climate of thought and praxis, a theory may temporarily prove completely redundant or even counterproductive. Hence, the ethical stance and social role of truth-seekers matter far more than the immediate utility of an isolated theory. There exists another fundamental divergence between the natural sciences and the social sciences. The natural sciences explore the external physical world; their primary raison d'être is to enrich human life and enhance human comfort. When scientific inventions are channeled towards devastation rather than human welfare, scientists confront the moral dilemma: commitment to pure knowledge versus loyalty to human survival. Social sciences, on the other hand, analyze the dispositions and interactions of individuals, castes, classes, regions, nations, and human society. These tendencies and relationships can be mutually complementary or starkly adversarial. What benefits one may well disadvantage another. Moreover, sociological categories such as caste, class, or region are never fully monolithic; they contain cross-cutting tensions. Arriving at sociological generalizations thus demands taking an intellectual stance amidst societal dialectics. What relationship must exist between the sanctity of knowledge and its spatio-temporal utility? a. Of joyfulness between scholars and society b. Of harmonization / synthesis c. Of social identity d. Of the ultimate welfare of humanity
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
अ आणि ड
a and d
B
ब आणि ड
b and d
C
क आणि ड
c and d
D
ब आणि क
b and c
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर पर्याय (२) म्हणजेच ब आणि ड आहे.

सविस्तर स्पष्टीकरण :

  • उताऱ्यातील मध्यवर्ती विचार:

    1. समन्वय (ब): उताऱ्याच्या सुरुवातीलाच लेखक ठामपणे मांडतात: "ज्ञानाचे चिरंतन पावित्र्य व त्याची देशकालसापेक्ष उपयुक्तता यांमध्ये मुळातच विरोध आहे असे मानण्याचे कारण नाही." म्हणजे ज्ञानाचे पावित्र्य आणि उपयुक्तता या दोन्हींमध्ये परस्परविरोध नसून समन्वय साधला गेला पाहिजे.
    2. मानव समूहाचे अंतिम हित (ड): पुढे लेखक सांगतात: "विज्ञानाची मूळ प्रेरणा जरी मानवाच्या अंतिम हिताची असली..." म्हणजेच ज्ञान आणि त्याच्या उपयुक्ततेचे अंतिम ध्येय हे नेहमी मानवजातीचे सर्वांगीण कल्याण आणि हित साधणे हेच असायला हवे.

  • अशा प्रकारे, ज्ञानाची पवित्रता आणि उपयुक्तता यांमध्ये समन्वय (ब) आणि मानवाचे अंतिम हित (ड) यांचे अतूट नाते असणे आवश्यक आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

उताऱ्यातील तात्त्विक संघर्षाचा परिहार करताना लेखक 'ज्ञानाचे पावित्र्य' आणि 'सामाजिक उपयोग' यांचा सुरेख समन्वय मानवाच्या अंतिम हितात शोधतो.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

The correct answer is Option (2) i.e. b and d.

Detailed Explanation:

  • Core Conceptual Synthesis:

    1. Harmonization / Synthesis (b): The author explicitly rejects the dichotomy between pure knowledge and practical utility: "Yet there is no intrinsic conflict between the eternal sanctity of knowledge and its spatio-temporal utility." They must exist in constructive harmony.
    2. Ultimate Human Welfare (d): The author underscores: "Although the fundamental impetus of science is the ultimate welfare of humanity..." Both philosophical exploration and utilitarian applications must converge towards human betterment.

  • Therefore, the relationship between knowledge's intrinsic sanctity and its temporal utility must be founded on harmonization (b) and the ultimate welfare of humanity (d).

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

In thematic reading comprehension questions, extract the overarching philosophy reconciling pure theoretical pursuit with social application.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) अ आणि ड (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
✓ पर्याय (2) ब आणि ड (अचूक उत्तर): योग्य उत्तर पर्याय (२) म्हणजेच ब आणि ड आहे.
⚠️ पर्याय (3) क आणि ड (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✗ पर्याय (4) ब आणि क (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →