खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या (परिच्छेद ३ - प्रेमाचे तत्त्वज्ञान व आत्मसाधना):
प्रेम करणे चांगलं ही आहे कारण ते करणं कठीण असतं. एका माणसाने दुसऱ्या माणसावर प्रेम करणे ही बहुतेक आपल्यावर सोपवलेली व आपली अंतिम परीक्षा घेणारी तसेच आपल्या क्षमतेचा पुरावा देणारी सर्वात कठीण जबाबदारी आहे. इतर सर्व कामे ही फक्त प्रेमाची तयारी म्हणूनच करायची असतात. सर्वच बाबतीत नवोदित असलेल्या, ज्यांच्यात अजून प्रेम करण्याची ताकद नाही, अशा तरुण माणसांनी म्हणूनच प्रेम करायला शिकले पाहिजे. त्यांनी स्वत:च्या सर्वस्वानिशी, एकाकी, आतुर आणि अधिकाधिक स्पंदनशील होत जाणाऱ्या हृदयासोबत स्वतःची सर्व ताकद एकवटून प्रेम करणे शिकायला हवे. परंतु प्रेम शिकण्याचा कालखंड नेहमीच लांब पल्ल्याचा, एकांताचा व जीवनाचा मोठा भाग व्यापणारा असतो. प्रेम करणाऱ्या व्यक्तिसाठी एकांत म्हणजे एकप्रकारे उच्च पातळीचा व सखोल असा एकटेपणाचा अनुभव असतो. मुळातच प्रेम म्हणजे दुसऱ्यात विरघळून जाणे, स्वतःला समर्पित करणे, किंवा त्याच्याशी एकात्म होणे नव्हे (कारण स्वतः नीट न ओळखणारी, अपरिपक्व आणि अजूही एकस्पंद नसलेली दोन माणसे एक कशी होवू शकतील ? ) प्रेम ही तुम्हाला परिपक्व होण्यासाठी, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी, स्वतःचे असीम विस्तारण्यासाठी, दुसऱ्यांसाठी अवघे विश्व बनण्याची उच्च प्रेरणा देणारी गोष्ट आहे. प्रेम विशाल आहे. ते माणसाकडून फार मोठ्या अपेक्षा करते. ते माणसाची निवड करते आणि त्याला तपस्या करावयास लावते. केवळ या दृष्टीने स्वतःला घडवण्याच्या कामात स्वत:ला गुंतवून घेताना (रात्रंदिवस लक्षपूर्वक ऐकत व स्वतःवर घणाचे घाव घालत) तरुणांनी स्वतःला मिळणारे प्रेम उपयोगात आणावे. दुसऱ्यात विखरून जाणे, दुसऱ्यासाठी मिटून जाणे किंवा कोणत्याही प्रकारे एकात्म होणे यापासून त्यांनी स्वत:ला दूर ठेवले पाहिजे (कारण त्यांना अजूनही खूप, खूप लांब जायचे आहे व त्यासाठी स्वतःची सर्व ताकद वापरायची आहे.) प्रेम जीवनाचे अंतिम स्वरूप आहे. ते एका आयुष्यात पूर्णत्वाला जाईल असे नाही.
लक्षपूर्वक ऐकण्याने व घणाचे घाव सोसण्याने तरुण व्यक्ती कशाप्रकारे दुसऱ्यावर प्रेम करायला सक्षम होऊ शकतील ?
How will young persons become capable of loving another person by hearkening and getting hammered ?