खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या (परिच्छेद ४ - कौशल्य विकास व नवोन्मेष):
एकूणच वृद्धी व स्पर्धेत चढाओढीचा लाभ या साठीच नव्हे तर भारताचा भविष्यातील विकास हा शाश्वत व सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने भारतात नवोपक्रम किंवा नवता ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. आपल्या देशात आरोग्य, शिक्षण, शेती, उर्जा आणि कौशल्ये या अत्यंत महत्वाच्या विभागामध्ये गरजपूर्तीचा अभाव दिसून येतो. लोकसंख्येच्या दृष्टीनेही या देशात अनेक आव्हाने आहेत. उदा. 55 कोटी लोकसंख्या ही 25 पेक्षा कमी वयोगटात मोडणारी असल्याने त्यांना संधींची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. त्यांचे साठी वर्ग, जात, लिंग, प्रदेश अशा बहुविध अंगाने विषमता वाढीचे आणि विकासाचे आव्हान तर आहेच, त्याबरोबरच आत्यंतिक दारिद्रयात अडकलेल्या कोट्यावधी नागरिकांना दारिद्रयरेषेच्या वरती आणणे ही तातडीची गरज आहे.
नवोपक्रम (Innovation) हेच या अत्यंत दबावात्मक आव्हांनाना सामोरे जाण्यासाठीचे उत्तर आहे व सर्वच उपक्रमांचा केंद्र बिंदू आहे. ज्ञानार्धारित अर्थव्यवस्था तयार होत असतांना त्यातून निर्माण होणाऱ्या लाभांचे वितरण होण्यासाठीही संधी संरचना निर्मिती अशाच नवोपक्रमातून होत असते. सर्वसामान्यांच्या आवाक्यातील परवडण्याजोगे उपाय, नाविण्यपूर्ण व्यवसायिक प्रतिमाने किंवा प्रक्रिया यातूनच सर्वसामान्य नागरिकांना सेवा प्राप्त करून घेणे सुलभ जात असते व कामाच्यापरंपरागत मार्गांपलीकडे जावून अधिकाधिक लोक विकास प्रक्रिये मध्ये सहभागी होत असतात.
तथापि आपली एकमेव गरज म्हणजे नवोपक्रमाच्या नव्या प्रतिमानाचा शोध घेणे ज्याचा भर हा सर्वसामान्याना पखडणारा व सर्वसमावेशक वृद्धी बरोबर त्रिकोणाच्या सर्वात खाली असलेल्या कमी उत्पन्न असणाऱ्यांना दारिद्रयातून व अभाव स्थितीतून वरती काढणे हा असेल.
दुर्देवाची गोष्ट म्हणजे. मागील कितीतरी दशकांत नवोपक्रम व संशोधन यांनी विकसितांच्या मागणीलाच प्राधान्य दिले श्रीमंतांच्या इच्छापूर्ती वरच अधिक भर दिला असून बौद्धिकता व भांडवल यांची संपूर्ण व्यवस्था त्यांचे समाधान करण्यासाठीच वापरली जात आहे. भारताला हा मार्ग स्वीकारता येणार नाही. त्यापेक्षा आपल्या देशातील संशोधन व नवोपक्रमांनी गरीबांवर आणि गरीब जनतेच्या अत्यावश्यक गरजावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. परंपरागत जुना सधन उपभोगाचा दृष्टिकोण आता चालणार नाही.
आपली प्रचंड लोकसंख्या आणि त्यांच्या अमाप गरजा लक्षात घेता आपल्या नवोपक्रमांनी दुर्मिळ संसाधनें काटकसरीनेच वापरली पाहिजेत व सर्वांना परवडणारी आणि पर्यावरणदृष्ट्या शाश्वत अशी आपली संशोधन व नवतेची दिशा असावी भारताचे राष्ट्रीय नवता महामंडळाचे कामकाजही हीच विचारसरणी दाखवते. विकसित भारतासाठी लोकाचे-लोकांसाठी-लोकांनी तयार केलेले नवतेचे प्रतिमान विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ज्ञाननिर्मितीत जेथे लोकच लाभार्थी आहेत अशाच सर्वसमावेशक दृष्टीकोनातूनच आपण अधिकाधिक शाश्वत विकासाचे प्रतिमान निर्माण करू शकू.
पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? अ. सर्वकष विकासासाठी आपण गरीबी व लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करायाला हवे. ब. कमीत कमीतून अधिकाधिक उत्पादनाचा आपण प्रयत्न केला पाहीजे.
Which of the following statements is/are correct? a. For an all-round development we should concentrate on our poverty and population. b. We should try to produce more and more with less and less.