खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या (मराठी भाषा विभाग):
समाजातील भूमिका - भूमिकांत, समूहा - समूहांत वा सामाजिक संस्थांमध्ये सापेक्षतः स्थिर स्वरूपाचे परस्परसंबंध असतात. या स्थिर स्वरूपाच्या घटकांतील परस्परसंबंधांनी संरचना बनते. आता या संबंधांना स्थिरत्व (stability) कशामुळे येते ? 'सामाजिक नियमनांमुळे' (social norms) असेच याचे उत्तर द्यावे लागेल. सामाजिक नियमने हा समाज-संरचनेचा एक महत्त्वाचा घटक ठरतो तो यासाठीच.
सामाजिक नियमने म्हणजे समाजातील विविध भूमिका वठविणाऱ्या व्यक्तींनी परस्परांशी कसे वागावे याविषयीचे नियम होत. म्हणजेच ते वर्तनविषयक नियम असतात. समाजातील सामाजिक स्थाने व्यक्ती भूषवितात व स्थानाला दर्जा व भूमिका हे दोन पैलू असतात. ह्या सामाजिक स्थानांचा आशय (content) सामाजिक नियमने हाच असतो. उदा. पित्याची भूमिका म्हणजे पित्याने आपल्या मुलाशी कसे वागावे याविषयीच्या अपेक्षा होत. कोणत्याही समूहातील विविध भूमिका परस्परसंबंधित असतात व सामाजिक नियमने म्हणजे या परस्परसंबंधांचे नियम असतात, पति-पत्नी, बहीण-भाऊ, वडील-मुलगा, यांनी परस्परांशी कसे वागावे याबद्दल सामाजिक नियमने ही मार्गदर्शक तत्त्वे किंवा वर्तनविषयक आदर्श असतात.
सर्वच मानवी समाजात सामाजिक नियमने असतात आणि त्यांना संपूर्ण समाजाचा पाठिंबा असतो. वर्तन दिसते तसे हे वर्तनविषयक नियम दिसत नाहीत, म्हणजेच नियमने अमूर्त असतात. व्यक्तीच्या वर्तनावर मर्यादा घालणारा आणि मनात बाळगलेला, अमूर्त आदर्श म्हणजे नियमन होय अशी नियमनाची व्याख्या जॉन्सन यांनी केली आहे. नियमने वर्तनाचे नियंत्रण करतात. नियमने निश्चयात्मक व निषेधात्मक अशा दोन्ही स्वरूपाची असतात. व्यक्तीने कसे वागावे हे सांगणारी नियमने म्हणजे निश्चयात्मक नियमने. उदा. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या आज्ञा पाळाव्यात. तर निषेधात्मक नियमने व्यक्तीचे वर्तन कसे नसावे, तिने कसे वागू नये हे सांगतात. उदा. चोरी करू नये, शिक्षकांशी उद्धटपणे वागू नये इ. सामाजिक नियमने स्थळ, काल, परिस्थिती आणि सामाजिक स्थानसापेक्ष असतात. परिस्थितीनुरूप, भूमिकेनुरूप, तसेच कालावघात / काळाप्रमाणे ती बदलतात. पण नियमने अचानकपणे बदलत नाहीत. ती सापेक्षतः स्थिर असतात. सर्व समाजातील नियमने एकसारखीच असत नाहीत. प्रत्येक समाजातील नियमनांचे स्वरूप भिन्न भिन्न असते. समाजीकरण प्रक्रियेत व्यक्तीकडून नियमनांचे आंतरीकरण होते. नियमनांचे विविध प्रकार आहेत. लोकरीति (Folkways), लोकनीति (Mores) व कायदे (Laws) या स्थूल गटात नियमनांचे वर्गीकरण समाजशास्त्रज्ञ करतात. समाजातील व्यक्ती व समूहांच्या वर्तनाचे नियमन करून समाजात व्यवस्था निर्माण करणे व समाजाला स्थैर्य प्राप्त करून देणे ही महत्त्वाची भूमिका सामाजिक नियमने पार पाडतात.
प्रश्न 34. सामाजिक नियमने कशाचे नियंत्रण करतात? अ. मानवी परस्पर संबंधाचे ब. मानवी स्वभावाचे क. व्यक्तिच्या वर्तनाचे ड. भिन्न भिन्न समाज गटाचे
सामाजिक नियमने म्हणजे समाजातील विविध भूमिका वठविणाऱ्या व्यक्तींनी परस्परांशी कसे वागावे याविषयीचे नियम होत. म्हणजेच ते वर्तनविषयक नियम असतात. समाजातील सामाजिक स्थाने व्यक्ती भूषवितात व स्थानाला दर्जा व भूमिका हे दोन पैलू असतात. ह्या सामाजिक स्थानांचा आशय (content) सामाजिक नियमने हाच असतो. उदा. पित्याची भूमिका म्हणजे पित्याने आपल्या मुलाशी कसे वागावे याविषयीच्या अपेक्षा होत. कोणत्याही समूहातील विविध भूमिका परस्परसंबंधित असतात व सामाजिक नियमने म्हणजे या परस्परसंबंधांचे नियम असतात, पति-पत्नी, बहीण-भाऊ, वडील-मुलगा, यांनी परस्परांशी कसे वागावे याबद्दल सामाजिक नियमने ही मार्गदर्शक तत्त्वे किंवा वर्तनविषयक आदर्श असतात. सर्वच मानवी समाजात सामाजिक नियमने असतात आणि त्यांना संपूर्ण समाजाचा पाठिंबा असतो. वर्तन दिसते तसे हे वर्तनविषयक नियम दिसत नाहीत, म्हणजेच नियमने अमूर्त असतात. व्यक्तीच्या वर्तनावर मर्यादा घालणारा आणि मनात बाळगलेला, अमूर्त आदर्श म्हणजे नियमन होय अशी नियमनाची व्याख्या जॉन्सन यांनी केली आहे. नियमने वर्तनाचे नियंत्रण करतात. नियमने निश्चयात्मक व निषेधात्मक अशा दोन्ही स्वरूपाची असतात. व्यक्तीने कसे वागावे हे सांगणारी नियमने म्हणजे निश्चयात्मक नियमने. उदा. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या आज्ञा पाळाव्यात. तर निषेधात्मक नियमने व्यक्तीचे वर्तन कसे नसावे, तिने कसे वागू नये हे सांगतात. उदा. चोरी करू नये, शिक्षकांशी उद्धटपणे वागू नये इ. सामाजिक नियमने स्थळ, काल, परिस्थिती आणि सामाजिक स्थानसापेक्ष असतात. परिस्थितीनुरूप, भूमिकेनुरूप, तसेच कालावघात / काळाप्रमाणे ती बदलतात. पण नियमने अचानकपणे बदलत नाहीत. ती सापेक्षतः स्थिर असतात. सर्व समाजातील नियमने एकसारखीच असत नाहीत. प्रत्येक समाजातील नियमनांचे स्वरूप भिन्न भिन्न असते. समाजीकरण प्रक्रियेत व्यक्तीकडून नियमनांचे आंतरीकरण होते. नियमनांचे विविध प्रकार आहेत. लोकरीति (Folkways), लोकनीति (Mores) व कायदे (Laws) या स्थूल गटात नियमनांचे वर्गीकरण समाजशास्त्रज्ञ करतात. समाजातील व्यक्ती व समूहांच्या वर्तनाचे नियमन करून समाजात व्यवस्था निर्माण करणे व समाजाला स्थैर्य प्राप्त करून देणे ही महत्त्वाची भूमिका सामाजिक नियमने पार पाडतात. Question 34. सामाजिक नियमने कशाचे नियंत्रण करतात? अ. मानवी परस्पर संबंधाचे ब. मानवी स्वभावाचे क. व्यक्तिच्या वर्तनाचे ड. भिन्न भिन्न समाज गटाचे