खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या:
जागतिक नेत्यांनी अलीकडेच 17 शाश्वत उद्दिष्टे आणि 169 सहयोगी लक्ष्य जाहीर केली आहेत. उद्दिष्टे आणि लक्ष्य हे एकात्मिक आणि अविभाज्य स्वरुपाची आहेत. जागतिक नेत्यांनी एवढ्या व्यापक आणि वैश्विक धोरण कार्यसूची साठी समान कृती आणि प्रयत्नांची प्रतिज्ञा केली आहे. सर्वांच्या पूर्ण फायद्यासाठी त्यांनी ह्या कार्यसूचीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मानवी हक्कांचा जाहीरनामा आणि इतर आंतरराष्ट्रीय कायदे यांचे महत्त्व जगाने पुन्हा अनुमोदित केले आहे. संयुक्त राष्ट्राच्या सनदेस अनुसरून वंश, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, राजकीय व इतर मते, राष्ट्रीय किंवा सामाजिक उगम, मत्ता, जन्म, अक्षमता, इ. बाबतित कोणताही भेद न करता मानवी हक्कांचा आदर, संरक्षण आणि संवर्धन करणे तसेच सर्वांसाठी मुलभूत स्वातंत्र्य सुनिश्चित करणे याबाबत सर्व राज्यांच्या जबाबदारीवर भर देण्यात आला आहे.
नवीन उद्दिष्टे आणि लक्ष्य जानेवारी 1, 2016 पासून अमलात आली आहेत आणि पुढील पंधरा वर्षे निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करतील. विशेषतः आफ्रिका आणि आशिया मधील विकसनशील देशातील सर्वसमावेशी आणि शाश्वत आर्थिक वृद्धीसाठी राष्ट्रीय धोरण क्षेत्राचा आदर करणे आवश्यक आहे. जे लोक असुरक्षित आहेत त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे. या विकासकार्य सूचित ज्यांच्या गरजा प्रतिबिंबित होतात त्यात सर्व मुले, युवक, अक्षम व्यक्ति, एच.आय.व्ही./एड्स बाधित लोक, वयस्क, देशी किंवा खेड्यात राहणारे लोक, अंतर्गत निर्वासित, विस्थापित आणि स्थलांतरितांचा समावेश होतो. 2030 पर्यंत सर्व प्रकारचे आणि विविध परिमाण असणान्या दरिद्रयाचे निर्मुलन करण्याची बांधिलकी यात दर्शवली आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे मुलभुत राहणीमान, उपासमारीचा अंत, अन्न सुरक्षा साध्य करणे, यास उच्चतम प्राधान्य देवून सर्व प्रकारचे कुपोषण नाहीसे करणे इ. आश्वस्त करतात.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि निरोगीपणा प्रवर्तित करण्यासाठी आणि सर्वांचे आयुर्मान उंचावण्यासाठी आपण वैश्विक आरोग्य विस्तार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसुविधा यांची उपलब्धता केली पाहिजे. 2030 पर्यंत अर्भकमृत्यू, बालमृत्यू आणि मातामृत्यू यांचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. लैंगिक आणि पुनुरुत्पादन संबंधित आरोग्य सेवा सुविधा ज्यात कुटुंब नियोजन, माहिती आणि शिक्षण यांचा समावेश आहे अशांची विश्वव्यापी उपलब्धता यासाठी शाश्वत विकास उद्दिष्टे वचनबद्ध आहेत.मलेरिया,एच.आय.व्ही./एड्स, टीबी, हेपटायटीस, एबोला आणि अन्य संसर्गजन्य आजार व साथी यांच्याशी लढण्यात जी प्रगती सध्या केली आहे तिचा वेग वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
सर्व देशांची बळकट आर्थिक पायाभरणी व्हावी असा शाश्वत विकास उद्दिष्टांचा उद्देश आहे. समृद्धीसाठी सर्वसमावेशी आणि शाश्वत आर्थिक विकास आवश्यक आहे. जर संपत्तीचे सम वितरण झाले व उत्पन्न विषमतेची समस्या सोडवली तर हे अधिक सोपे होईल. बहुआयामी, शाश्वत, नवनिर्माणशील व जनकेन्द्रित अर्थव्यवस्थांची निर्मिती ज्यात तरुणांना रोजगार आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण यावर भर दिला असेल यासाठी देशांनी काम केले पाहिजे. निरोगी आणि सुशिक्षित श्रमबळ असेल तर सर्व देशांना फायदाच होईल. शाश्वत विकास उद्दिष्टांची व्यापक कार्यसूची ही येणाऱ्या दीड दशकातील मानवी प्रगतीची दिशा निश्चितपणे दर्शविते. यातील बहुतेक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि मानवी जीवनाचा दर्जा सर्वत्र सुधारण्यासाठी जगातील सर्व देशांनी अथकपणे प्रयत्न केले पाहिजेत.
यापैकी काय सत्य नाही ? अ. शाश्वत विकास उद्दीष्टे ही फक्त विकसनशील राष्ट्रांना लागू आहेत. ब. शाश्वत विकास उद्दीष्टांतील उद्दीष्ट्ये आंतरसंबंधित आहेत.
Which of the following is/are not true? a. Sustainable Development Goals (SDGs) are applicable only to the developing countries. b. Goals under SDG are interrelated.