खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या:
मानवाचा भाषा अध्ययनासाठी तसेच अमूर्त विचार व विवेकाविचाराची क्षमता असणारा मेंदू असामान्यरीत्या मोठा होण्याला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याबाबत अभ्यासक बराच काळ युक्तिवाद करत आहेत. वैज्ञानिकांनी पूर्व आफ्रिकेच्या रिफ्ट व्हॅलीतील अत्यंत ओल्या व अतिकोरड्या कालखंडांची सांगड मानवंशीय पूर्वजांच्या उत्क्रांतीने अचानकपणे घेतलेल्या उसळ्यांशी घातली. ज्यामुळे आधुनिक मानवाच्या मेंदूची उत्क्रांती झाली.
अगदी अलीकडची उत्पत्ती सुचवते की आदीमानवाच्या स्वतःच्या स्थानिक पर्यावरणातील नाट्यपूर्ण बदलांशी अनुकूलता साधण्याच्या गरजेपोटी मेंदूचा आकार वाढला. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन मधील प्राध्यापक मार्क मास्लिन म्हणतात, “असं दिसतंय की मानव हवामानाच्या बदलातून जन्माला आले असावेत कारण त्यांना दुष्काळाकडून सुकाळ आणि उलट होणाऱ्या वेगवान बदलांना तोंड द्यावे लागत होते. या बदलाने मोठे मेंदू असलेली नवी प्रजाती अस्तित्वात आली तसेच त्यांना पूर्व आफ्रिकेतून युरेशियात व दक्षिण आफ्रिकेत जावे लागले”.
रिफ्ट व्हॅली हा पर्वत, सरोवरे व सुपीक दऱ्या असलेला विस्तृत भूस्तरीय विभंग आहे. आदिमानवाचे अत्यंत महत्त्वाचे असे अनेक अश्मिभूत अवशेष या भागाच्या उत्खननात मिळाले आहेत व माणसाच्या उत्पत्तीचे हे सर्वात महत्त्वाचे आदिम स्थान असावे असे ते सूचित करतात.
या अभ्यासात गेल्या 5 दशलक्षवर्षातील हवामानातील बदलांचा आढावा घेतला गेला. वैज्ञानिकांना आढळले की 2 लक्ष वर्षांच्या त्या मानाने छोट्या कालखंडात, पृथ्वीच्या सूर्याभोवती चे प्रदक्षिणेतील चक्रीय बदल - ही मिलान्कोव्हिच चक्रे म्हणून ओळखली जातात - होत असताना, पूर्व आफ्रिका अतिशय संवेदनशील होती. या चक्रांमुळे हिमयुगांसारखे जागतिक पातळीचे हवामान बदल घडून आले.
प्राध्यापक मास्लिन म्हणतात, “या प्रदक्षिणेतील बदलांमुळे पूर्व आफ्रिकेतील हवामान गोड्या पाण्याच्या, समृद्ध व बहरलेल्या वनांनी वेढलेल्या खोल सरोवरापासून ते आजच्यासारखी वाळूच्या टेकड्यांची अतिशुष्क परिस्थितीतील रिफ्ट व्हॅलीतील जमीन, अशा दोन टोकाच्या प्रचंड हेलकाव्यात राहिले असावे. या बदलांच्या परिणामी मोठे मेंदू असलेल्या नव्या प्रजातीची उत्क्रांती झाली तसेच आदिमानवाला पूर्व आफ्रिकेबाहेर विखुरणे भाग पाडले.”
मानवी उत्क्रांतीतील महत्त्वाच्या पायऱ्यांशी जुळणारे अशा प्रकारचे हवामानातील बदलांचे विशेषतः तीन कालखंड अभ्यासात आढळलेले आहेत. यातील पहिला साधारणपणे 2.6 दशलक्ष वर्षांपूर्वी घडला जेव्हा रिफ्ट व्हॅलीतील रहिवासी दक्षिण आफ्रिकेत ढकलले गेले, व होमो हॅबिलीस ही नवी प्रजाती उदयाला आली. दुसरा साधारणपणे 1.9 दशलक्ष वर्षांपूर्वी घडला जेव्हा होमो इरेक्टस ही महत्त्वाची प्रजाती आफ्रिकेत उदयाला आली व तिने आशियाच्या मोठ्या भागात वसाहती केल्या. तिसरा बदल साधारणपणे 1 दशलक्ष वर्षांपूर्वी घडला जेव्हा होमो हायडेलबर्गेन्सिस उदयाला आली.
प्राध्यापक मास्लिन म्हणाले की जेव्हा होमो सेपिएन्सची प्रथम उत्क्रांती झाली त्या गत 150 हजार वर्षांतील आढावा घेण्यासाठी हे तंत्र पुरेसे अचूक नाही. तथापि ते मोठा मेंदूधारी, खऱ्या अर्थाने मानव-सदृश सांगाडा असलेल्या, पौगंडावस्थेतील वाढीव वैशिष्ट्यपूर्ण उसळी दाखवणाऱ्या पहिल्या मानववंशीयांना होमो इरेक्टसकडे नेणारे आधीचे उत्क्रांतीयुक्त परिवर्तन दर्शविते.
दिलेल्या परिच्छेदाच्या संदर्भातील सर्वात तर्कसंगत भाष्य निवडा.
Select the most logical comment with respect to the passage given.