खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या (परिच्छेद १ - प्रबोधनकाळ व विज्ञान):
तेराव्या ते सोळाव्या शतकांदरम्यान युरोपातील सरंजामदार वर्गाने भूदासांच्या पिळवणुकीतून भरपूर धन कमावले. या साठवलेल्या भांडवलाचा नवनवीन बाबतीत विनियोग केला गेला. नवीन भूप्रदेश आणि मार्ग शोधणाऱ्या लोकांना त्यांनी आर्थिक पाठबळ दिले. कोलंबसने अटलांटिक महासागर ओलांडून नव्या जगाचा शोध लावला. वास्को द गामाने आफ्रिका खंडाला वळसा घालून भारत आणि पूर्वेशी व्यापाराचा सुरक्षित मार्ग शोधला. मॅगेलानच्या जहाजांच्या ताफ्यातील एक जहाज युरोपला परतल्यामुळे पृथ्वीला सागरी प्रदक्षिणा घालणे शक्य आहे हे सिद्ध झाले. साठवलेल्या भांडवलाचा आणखी एक उपयोग म्हणजे लिओनार्दो द व्हिन्सी, मायकेलांजेलो आणि राफाएल सारख्या महान कलाकारांना आश्रयदाते मिळाले. या कलाकारांनी चित्रकला आणि शिल्पकलेत क्रांती घडवली आणि मानवी शरीराचे अतिशय तपशीलवार चित्रण केले. आपल्या कलेमध्ये मानवी शरीराचे चित्रण तंतोतंत व्हावे यासाठी द व्हिन्सीसारख्या कलाकारांनी शरीरशास्त्राचाही अभ्यास केला.
या काळात केवळ शरीरशास्त्राचाच विकास झाला असे नाही. परीस आणि अमृत यांच्या शोधात असणाऱ्या किमयेच्या अभ्यासकांना फॉस्फोरस सारख्या मूलतत्त्वांचा शोध लागला आणि रसायनशास्त्राचा विकास झाला. कोपरनिकस ने पृथ्वी नव्हे तर सूर्य हा आपल्या सूर्यमालेच्या केंन्द्रस्थानी आहे असा सिद्धांत मांडला. गॅलिलिओ आणि केपलर सारख्या वैज्ञानिकांनी त्याचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी प्रायोगिक पद्धतीचा उपयोग केला. निसर्गरूपी ग्रंथ हा गणिताच्या भाषेत लिहिलेला आहे, असे त्यांना वाटत होते. वेगवेगळ्या शोधांखेरीज खुद्द शास्त्रीय पद्धतीचाही विकास या काळात होत गेला. वैज्ञानिक कल्पना मांडत, ती सिद्ध करण्यासाठी प्रयोग करत, प्रयोगाचा तपशील नोंदवत आणि या नोंदी त्या-त्या क्षेत्रात काम करणाऱ्या इतरांना चिकित्सेसाठी खुल्या ठेवत. माणसाकडे या जगात सुधारणा घडवण्याची जवळजवळ अमर्याद क्षमता आहे, असे त्यांना वाटत होते. या काळात चर्च धर्मसंस्था जरी अतिशय श्रीमंत आणि शक्तिशाली असली, तरी नियतीवर आंधळा विश्वास ठेवत जगण्याला या लोकांनी नकार द्यायला सुरवात केली आणि चिकित्सक वृत्तीचा उदय झाला. मानवतावादाच्या नवीन तत्त्वज्ञानाने माणसाच्या व्यक्तीगत क्षमता आणि प्रयत्नांवर भर दिला. युरोपीय अभ्यासकांनी अभिजात ग्रीक आणि रोमन ग्रंथांना पुनरुज्जीवित केले आणि गुटेनबर्गने विकसित केलेल्या छपाईच्या नव्या तंत्राच्या मदतीने त्यांना सगळी कडे लोकप्रिय केले. रेनेसां या शब्दाचा अर्थ आहे पुनरुज्जीवन. या सगळ्या एकमेकांत गुंतलेल्या प्रक्रियांना एकत्रपणे रेनेसां - पुनरुज्जीवन म्हणतात.
अ. व्यक्तीच्या भांडवलाचे महत्त्व ब. व्यक्तीच्या प्रयत्नांचे महत्त्व क. छपाईचे नवे तंत्र लोकप्रिय करणे ड. माणसाच्या क्षमतेवर विश्वास वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?
According to the above paragraphs, what are the factors included in Humanism ? a. Importance of individual capital b. Importance of individual efforts c. Popularisation of new printing technology d. Belief in human potential Which of the statements given above are correct?