खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या:
या पूर्वी फार कमी लोकांनी अर्थविज्ञानात नोबल पारितोषिक मिळवले आहे हे सर्वाना माहीत असलेले तथ्य आहे. जग बदलवणारे असे स्वतःचे निष्कर्ष मिळवण्यासाठी त्या सर्वांनी दीर्घकाळ काम केले या वर्षीचे नोबल पारितोषिक जिंकणारे अँगस डीटन हे वेगळीच गोष्ट सांगतात व स्वतःच्या यशाबाबत नशिबाला महत्त्वाचा घटक मानतात. त्यांच्या मते त्यांचे वडील दुसऱ्या जागतिक युद्धात मरण पावले नाहीत कारण सुदैवाने त्यांना क्षयाची लागण झाली. स्कॉटलंडमध्ये कोळसा खाणकामगार असलेल्या त्यांच्या वडिलांना, युद्धानंतर सहज उपलब्ध असलेल्या श्रमबाजारात मुलकी अभियंता व्यवसाय पेढीत काम मिळाले. आपल्या इतर कुटुंबीयांच्या सल्ल्याविरोधात जाऊन त्यांनी छोट्या डीटनला पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. पुस्तकांच्या वाचनाने डीटनमध्ये लोकांच्या जीवनात नशिबाने वटविलेल्या भूमिकेबाबत तीव्र जाणीव निर्माण झाली. ते म्हणतात, “जर तुम्ही जगाचीपुन्हा मांडणी केली तर त्यात अगदी वेगळ्याच प्रकारचा खांदेपालट होईल.” आयुष्यभराच्या आपल्या नोबेल पारिताषिक प्राप्त कामात त्यांनी आपला हा दृष्टिकोन मिसळून टाकला आहे. ते लिहितात, “जगातील गरिबी आणि अनारोग्य कमी करणे हे योग्य देशात जन्माला येऊन पुरेसे नशीबवान ठरलेल्या आपल्यासारख्या लोकांचे नैतिक कर्तव्य आहे.”
लोक कशाप्रकारे चीजवस्तूंचा व सेवांचा उपभोग घेतात याचे आकलन करून घेण्यावर डीटन यांची जीविका केंद्रित झाली आहे. सुधारित आरोग्य व स्वास्थ्य निर्माण करणे, गरिबी व विषमता कमी करणे यासारख्या सामाजिक ध्येयांच्या प्राप्तीसाठी ही महत्त्वाची पायरी आहे. प्रत्येक व्यक्ती करत असलेल्या निवडी का करतात याचे आकलन प्राप्त करणे हा त्यांचा हेतू आहे. या लक्ष्यासह डीटन हे गरिबी व विषमता यांच्या कारणांना परिणामांच्या गुंत्यातून मोकळे करण्यात विशेष - कुशल राहिले आहेत. उदाहरणार्थ, भारताबाबत त्यांनी दाखवून दिले की, कुपोषण हे कमी उत्पन्नामुळे घडते-काहींना जसे वाटते तसे ते कमी उत्पन्नाला कारणीभूत ठरत नाही. त्यांनी दाखवून दिले की लोकांच्या उत्पन्नात केलेल्या वाढीने गरीब लोकांना उच्च उष्मांक खाण्याकडे प्रवृत्त केले. हे शिकण्यासाठी डीटन यांनी फक्त गरीब असलेल्या व्यक्तिंच्या वर्तनांची पाहणी केली. त्यांनी उच्च उत्पन्न असलेल्या लोकांना समाविष्ट करणारी आणि परिणाम सपाट करणारी एकत्रित माहिती वापरली नाही.
नोबेल पारितोषिक समितीने लिहिले की; 1980 च्या कालखंडातील संशोधन विकास हा बहुतकरून पोथीनिष्ठ होता जेथे हा अनुभवावर आधारित होता, तेथे तो राष्ट्रीय वृत्तांतातील एकत्रित आकडेवारीवर विसंबून होता. हे आता बदलले आहे. प्रत्येक कुटुंबीयांकडून गोळा केलेल्या माहितीच्या प्रगत विश्लेषणावर आधारित प्रगत (विकास) अर्थशास्त्र आता भरभराटीला आले आहे. डीटन यांचे संशोधन हे या परिवर्तनाला पुढे न्यायचे महत्त्वाचे कार्य करते.
ज्यामुळे जगाची विकास अर्थशास्त्राची दृष्टी प्रत्यक्षपणे बदलली अशी/अशा अँगस डीटन यांची/यांच्या कृती निवडा : अ. पुस्तके वाचणे व स्वतःला नशिबवान समजणे. ब. गरीब लोकांच्या घरगुती महितीचे प्रगत तंत्र वापरून विश्लेषण करणे. क. गरीब व्यक्तिंच्या निवडीशी संबंधित अशा वर्तनांचे निरीक्षण करणे. ड. विषमता व अनारोग्य कमी करण्यासाठी काम करणे.
Select the action(s) of Angus Deaton that directly changed the world view of development economics : a. Reading books and considering him lucky. b. Analysing household data of poor people using advanced technique. c. Observing behaviour of poor individuals related to their choices. d. Working for reduction of inequality and ill-health.