खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या:
जेव्हा लहान मोठ्या गोष्टींतील सौंदर्य ओळखणे सोपे होते आणि जेव्हा स्वतःच्या एकमेवत्वामुळे आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टींच्या तुलनेत सामान्य वस्तूंमधील सुसंगतीत ते आपण अधिक पाहतो तेव्हा सौंदर्यशास्त्राच्या इतिहासात बंधमुक्त होण्याचा काळ येतो. यातून असंही घडतं की आपल्याला प्रतिसादांच्या पायऱ्यांतून जावे लागते जेव्हा सौंदर्याच्या प्रतिरूपणात आपण सहजतेने प्रसन्न करणाऱ्या आणि साचेबद्ध मान्यतेचा मुकुट ल्यालेल्या सर्व बाबी टाळण्याचा प्रयत्न करतो. यातून आपल्याला सामान्याच्या सामान्यत्वाचा अतिशयोक्ती करण्यासाठी बंडखोरी करण्याचा मोह होतो व परिणामी त्या गोष्टींना आपण आक्रमकतेने असामान्य करतो. सुसंगती प्रस्थापित करण्यासाठी आपण विसंगती निर्माण करतो जी सर्व प्रतिसादांचे घटक असते. सध्याच्या काळात आपण अशा सौंदर्यात्मक प्रतिसादांची चिन्हे पाहतोच आहोत, जी सिद्ध करतात की माणसाला शेवटी एकदाचे समजले आहे की फक्त व्यक्तीच्या बोधाचे संकुचित्व हे त्याच्या सौंदर्यात्मक जाणिवेचे क्षेत्र कुरूपता व सौंदर्य यात तीव्र विभाजन करते. जेव्हा माणसाकडे वस्तूला स्वतःच्या स्वार्थापासून आणि संवेदनांच्या लालसेच्या अट्टाग्रही दाव्यांपासून अलग झालेल्या स्वरूपात पाहण्याची ताकद असते, फक्त तेव्हाच त्याला सर्वत्र असलेले सौंदर्य पाहण्याची खरी दृष्टी प्राप्त होते. केवळ तेव्हाच तो पाहू शकतो की आपल्याला सुखद न वाटणारे कुरूप असतेच असे नाही, कारण त्याचे सौंदर्य सत्यात असते.
जेव्हा आपण म्हणतो की सौंदर्य सर्वत्र आहे तेव्हा आपल्याला असे म्हणायचे नसते की कुरुपता हा शब्द भाषेतून नाहीसा केला पाहिजे. असे म्हणणे म्हणजे असत्य असे काही नसते असे म्हणण्याइतकेच मूर्खपणाचे ठरेल. असत्य हे खात्रीने अस्तित्वात आहेच, पण ते विश्वप्रणालीत असत नाही तर ते आपल्या आकलनाच्या क्षमतेत त्यातील नकारात्मक भाग म्हणून असते. याच पद्धतीने आपल्याला झालेल्या सत्याच्या अर्धवट साक्षात्कारामुळे आपल्या जीवनातून व आपल्या कलांतून सौंदर्याची विकृत अभिव्यक्ती होते आणि त्यामुळे कुरूपता येते. काही प्रमाणात आपण जे आपल्यात आहे, आणि जे इतर सर्वात आहे अशा सत्याच्या नियमांच्या विरोधात आपले जीवन मार्गस्थ करू शकतो आणि त्याचप्रमाणे सार्वत्रिक असलेल्या सुसंवादाच्या शाश्वत नियमाला उलटे फिरवत कुरूपता निर्माण करू शकतो.
संबंधित व्यक्तीच्या सौंदर्यात्मक संवेदनेने बंधमुक्ती प्राप्त केली आहे हे निर्देशित करणाऱ्या वर्तनाची निवड करा. अ. सर्वांना सहजतेने प्रसन्न करणान्या विविध पैलूंना व्यक्ती स्वतःच्या सौंदर्याच्या अभिव्यक्तीमध्ये समाविष्ट करते. ब. साचेबद्ध मान्यतेमुळे ज्या प्रतिरूपणांची सौंदर्यपूर्ण अशी स्तुती केली जाते त्यामुळे व्यक्ती भारावून जात नाही. क. गोष्टी विदूप स्वरूपात पाहिल्या जाऊ नयेत म्हणून व्यक्ती स्वतःची आकलनाची ताकद वाढवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते.
Select the behaviour that indicates concerned person's aesthetic sense has either attained or is in the process of attaining emancipation. a. Person incorporates various aspects that are obviously pleasing to all in his or her expression of beauty. b. Person doesn't get carried away by representations that are praised as beautiful due to sanction of convention. c. Person makes every effort to enhance his or her power of comprehension for seeing things without distortion.