खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या:
डोडो मृत पावला. प्रवासी कबुतर लुप्त झाले. परंतू “एकांडा जॉर्ज" - प्रसिद्ध गालॅपॅगोस् कासव-ज्याच्या मृत्यु पश्चात्, त्याची प्रजाती संपली असे वाटत होते, त्या प्रजातीचे नशीब चांगले होते.
एका शास्त्रीय शोधमोहिमे अंतर्गत त्याच्या रक्तानात्याचे काही नातलग जिवंत आणि सुदृढ आढळून आले आहेत. काळजीपूर्वक केलेल्या पैदाशीमुळे आता जॉर्जच्या प्रजातीचे पुनरुज्जीवन करणे शक्य आहे अशी आता जीवशास्त्र अभ्यासकांना आशा आहे.
शास्त्रज्ञांना आता असे वाटते की, प्रथमत: गालॅपॅगोस् कासवांच्या कमीत कमी आठ प्रजाती होत्या. त्यापैकी, किमान तीन अस्तंगत झाल्या आहेत. ज्यातील एक आहे “पिंटा" बेटावर रहाणारे कासव. त्यातील शेवटचा, जॉर्ज, 1972 साली एकटाच भरकटत फिरत असलेला आढळला ज्याला ममतेने ताब्यात घेतले गेले. वयाच्या 100 व्या वर्षापुढे सन् 2012 मध्ये त्याचे निधन झाले व नाजुक नैसर्गिक पर्यावरणावर मानवाने जगभर गेली दोन शतके केलेल्या घणाघाती आघाताचे, दुष्परीणाम पुन्हा एकदा समोर आले.
पण, आता अस्तंगत गालॅपॅगोस् कासवाच्या गोष्टीने एक, आशादायी वळण घेतले आहे.
असे दिसते की एका शतकापेक्षा अधिक काळापूर्वी काही नाविकांनी त्यांना नको असलेल्या पाठीवर उंचवटा असलेल्या कासवांना-इसाबेल बेटावरील वॉल्फ ज्वालामुखी जवळील बॅकबे येथे सोडून दिले. परंतू नशीबाने कासव पाण्याबाहेर मानकाढून पाठीवर तरंगू शकते. बरीच कासवे किनान्यावर आली. लाव्हायुक्त क्षेत्रातून हळू हळू पलीकडे गेली आणि इसाबेलच्या स्थानिक घुमटाकार कासवांबरोबर त्यांनी पैदास केली.
2008 साली, शास्त्रज्ञांनी ज्वालामुखीच्या बाजूच्या 1600 पेक्षा अधिक कासवांचे रक्ताचे नमूने गोळा केले आणि त्यांना क्रमांकीत केले. प्रयोगशाळेत अनुवंशशास्त्राचे एक महद आश्चर्य समोर आले. (89) एकोणनव्वद कासवांचा काही भाग “फ्लोरीआना” प्रजातीचा होता. त्यांचा पूर्ण जनुकें - "डीनए” प्रोफाईल एका शास्त्रीय वस्तुसंग्राहलायातून मिळवण्यात आला.
काही जनुके अशी माहिती देत होती की त्यांचे पालक हे जिवंत, शुद्ध जनुकधारी फ्लोरीआना कासव होते. जे ध्वनित करते की, ती प्रजाती अजून अस्तंगत झालेली नसावी.
17 कासवांमध्ये जास्त प्रमाणात “पिंटा" जनुके होती. कासवाचे आयुष्य 150 वर्षांपेक्षा जास्त असते. म्हणजेच त्याकासवांपैकी काही जण जॉर्जचे जवळचे, रक्ताचे नातलग ही असू शकतात.
गेल्या महिन्यात, शास्त्रज्ञ पुन्हा एकदा त्यांना शोधायला गेले. त्यांची योजना अशी होती की त्यांच्यातली “पिंटा आणि फ्लोरीआना" जनुके अधिक असलेली कासवे पकडून वेगवेगळी करून त्यांची पैदास वाढवणे जेणे करून जवळपास मूळ प्रजातीच्या जनुकांसारखीच् कासवे वाढवता येतील.
येत्या काही पिढयात, साधारणतः 95 टक्के नष्ट झालेली पूर्वजांची जनुके मिळवता येतील असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.
स्थानिक कासवांमध्ये स्थलांतरीत कासवापेक्षा वेगळे काय होते ?
The native species of tortoise was different from migrated species in having