खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या:
धर्मनिरपेक्षतेचा संबंध चांगल्या किंवा वाईट लोकांशी नाही. तिचा संबंध असहिष्णुतेचे सार्वजनिक प्रदर्शन न सहन करणाऱ्या न डगमगणाऱ्या कायद्याशी आहे. उद्या काय वाढून ठेवले आहे याची भीती न बाळगता सर्वसामान्य लोक सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील याची खात्री करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. कायदा तुमच्या बाजूने असेल तर तुम्हाला कशाचीच तमा बाळगण्याची गरज नाही.
कायदाच आपल्याला धर्मनिरपेक्ष बनवतो, निधर्मी दृष्टीकोन किंवा चर्च बंद करण्यामुळे आपण धर्मनिरपेक्ष होत नाही. वास्तविक पाहता पोपची अवज्ञा, घटस्फोट, पुनर्विवाह या घटनांमुळे आठवा हेन्री धर्मनिरपेक्ष ठरत नाही. व्हॅटीकनला त्याचे वागणे पसंत नसेल तर ते गेले उडत. धर्मनिरपेक्षता म्हणजे चर्च आणि राज्यसंस्थेला वेगळे करणे अशी भोळी भाबडी समजूत या ऐतिहासिक वास्तवामुळेच पसरली.
वास घ्या, जा शिकार करा आणि मारा असे आदेश चर्चने दिले म्हणून युरोपमध्ये धार्मिक छळ चालू राहीला असे नाही तर आता राजानेच तसे आदेश दिले होते. धर्ममार्तंडांच्या निर्विवाद सत्तेची जागा आता राजांच्या सत्तेने घेतली होती.
केवळ लोकशाहीच्या आगमनानंतरच धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात आली. आपण अचानक चांगले झालो किंवा आपल्या क्रुर हृदयांच्या जागी प्रेमळ हृदयांची स्थापना झाली असे नाही. आता जातीयवादी/जमातवादी आणि धार्मिक हिंसेसाठी कायद्यात शिक्षेची तरतूद झाली आणि त्यामुळेच खरा फरक पडला.
जेव्हा कायदा सांप्रदायिक असहिष्णुतेच्या विरोधात कोणत्याही अपवादाशिवाय पद्धतशीरपणे काम करतो तेव्हा धर्मनिरपेक्षता ही एक सवय बनते. मधुर आणि चंचल राजकीय व्याख्याने आणि शाळेतील नीतीशास्त्राचे धडे नव्हे तर असहिष्णुतेविषयी असहिष्णु असणारा कायदा आपल्याला सभ्य बनायला शिकवतो. जरी इतर समुदायांना जागा करून देणे किंवा सहन करणे क्लेशदायक असेल परंतु कायदा मोडण्यामुळे होणारे क्लेश या पेक्षा खूपच अधिक असतील.
सामाजिक आणि आर्थिक असुरक्षिततेमुळे असहिष्णुतेला प्रेरणा मिळते हे सार्वकालीन सत्य आहे. जेव्हा नोकऱ्यांचा तुटवडा भासू लागतो, एखाद्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचते त्यावेळी आपण इतर समुदायांना दोष द्यावयास लागतो आणि त्यांच्यामध्ये आपल्याला सर्व वाईट गोष्टी दिसू लागतात. याच्याशी सामना करण्याची सर्वाधिक उत्तम पद्धत कोणती, शब्दांची की कृतीची ? फाळणी नंतरचे स्फोटक वातावरण आणि तशातही धार्मिक भावनांना आपल्या नवजात लोकशाहीवर कब्जा मिळवण्यापासून रोखण्यात नेहरू कसे यशस्वी झाले ते आठवा. ते बरेचसे यशस्वी झाले याचे श्रेय जाते त्यांच्या नोकऱ्या देण्याच्या, धरणे बांधण्याच्या आणि पोलादाचे कारखाने उभे करण्याच्या आश्वासनांना. ते शुद्ध सहिष्णुतेविषयी किंवा धर्मनिरपेक्षतेविषयी क्वचितच बोलले त्यांनी फक्त कृती केली.
आज धर्मनिरपेक्षता आणि ढोंगी धर्मनिरपेक्षता याविषयी बाष्कळ चर्चा आणि एकमेकांवर दोषारोप चालू असतात कारण भांडणाऱ्या दोन्ही बाजूंना आपल्या अर्थ व्यवस्थेचा विकास कसा करता येईल याची सुतराम कल्पना नाही. हे तुमच्यासाठी द्विपक्षीय सहकार्य आहे, भारतीय पद्धतीचे !
लेखकाचा असा दावा आहे की
The author argues that