उत्तर: पर्याय 3 (फक्त (c) व (d) बरोबर)
स्पष्टीकरण:
•
मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यात परी हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे.
•
वाटेत मोटार नादुरस्त झाली म्हणून यावयास उशीर झाला या वाक्यात म्हणून हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे.
•
विजा चमकु लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यात आणि हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहे.
•
लोक आपली स्तुती करोत अथवा निंदा या वाक्यात अथवा हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे.
•
Important Pointsउभयान्वयी अव्यय - दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
•
उभायान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात.
•
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये
•
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
•
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये - अर्थाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये म्हणतात. जोडली गेलेली वाक्ये संयुक्त वाक्ये असतात. याचे खालील चार प्रकार पडतात.
•
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये
•
समुच्चयबोधक - या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केले जाते. उदा. आणि, व, शिवाय, आणिक, अन
•
विकल्पबोधक - या उभयान्वयी अव्ययाने पर्याय, निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकीला पसंती दर्शवली जाते. उदा. अथवा, किंवा, की, अगर, वा
•
न्यूनत्वबोधक - पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे दुसरे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते. उदा. पण, परंतु, परी, बाकी, किंतु
•
परिणामबोधक - पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो तेथे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरतात. उदा. म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तस्मात, अतएव
•
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये - या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. यातील गौण वाक्य किंवा मुख्य वाक्य ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जातो. याचे खालील चार प्रकार पडतात.
•
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
•
स्वरुपबोधक - उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्ये करतो त्या अव्ययास स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. की, म्हणून, म्हणजे, जे
•
कारणबोधक - जेव्हा कारण, का, की या अव्ययांमुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौणत्व वाक्यामधून व्यक्त होते अशा अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यये म्हणतात. उदा. कारण, कारण की,
•
उद्देशबोधक - जेव्हा म्हणून, सबब, यास्तव, कारण, की यासारख्या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतु दर्शविला जातो तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. म्हणून, यास्तव, सबब
•
संकेतबोधक - गौण वाक्यात अट दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम असतो तेव्हा संकेतबोधक अव्ययांचा उपयोग केला जातो. उदा. जर-तर, म्हणजे, की
📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Answer: Option 3 (Only (c) and (d) are correct)
Explanation:
•
Answer - Only (c) and (d) will be the correct answer.
•
In the sentence Marave Pari Kirtirupe Urave Pari is a diminutive dual object.
•
As the motor broke down on the way in the sentence, it was late to arrive, so it is an object of consequence.
•
In the sentence the lightning flashed and the rain began, and is a collective object.
•
In the sentence whether people praise or blame you, the subjunctive is a dual object.
•
Important Points Compound Adverbs - Compound words that join two or more words or sentences are called Compound Adverbs.
•
There are two types of Avyaya based on Ubhayan.
•
Predominant biphasic clauses
•
Subjunctive subjunctive clauses
•
Adverbial Adverbs - A word that connects two separate clauses in meaning is called an Adverbial Adverb. Conjoined sentences are compound sentences. It has the following four types.
•
Predominant Ambiguous Nouns
•
Accumulator - This dual clause serves to add more emphasis to the first statement. E.g. And, and, besides, andak, un
•
Subjunctive - This dual object expresses an alternative, choice or preference for one of the given things. E.g. Or, or, that, if, or
•
Diminutive - A second sentence that indicates something lacking or lacking in the first sentence
📌 MPSC Exam Tip: Marathi vocabulary, word origin classifications (Tatsama, Tadbhava, Deshi), idioms, and proverbs are high-scoring, direct topics in Police Bharti.