योग्य कथने ओळखा. अ) अनुच्छेद 33 संसदेला सशस्त्र दल, निमलष्करी दल, पोलीस दलातील सदस्यांचे मुलभूत अधिकार प्रतिबंधित किंवा रद्द करण्याचा अधिकार देते. ब) अनुच्छेद 33 चे उद्दिष्ट कर्तव्यांचे योग्य पालन सुनिश्चित करणे आणि सैन्यामध्ये शिस्त राखणे हे आहे. क) अनुच्छेद 33 अन्वये कायदे करण्याचा अधिकार राज्य विधान मंडळालाही बहाल करण्यात आला आहे. पर्यायी उत्तरे :
EN
Identify the correct statements:
a) Article 33 empowers Parliament to restrict or abrogate the Fundamental Rights of the members of Armed Forces, paramilitary forces, police forces.
b) The objective of Article 33 is to ensure the proper discharge of their duties and the maintenance of discipline among them.
c) The power to make laws under Article 33 is also conferred on State Legislatures.
Alternative answers:
कलम 33 : सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार
•
संसदेला फेरबदल पुढील व्यक्तींच्या मूलभूत हक्कांत करता येईल :
अ. सशस्त्र सेनेचे सदस्य :- 'सशस्त्र दलांचे सदस्य' या संज्ञेत योद्धा नसणारे लष्करी कर्मचारी उदा. न्हावी,
सुतार, यंत्रज्ञ कामगार, स्वयंपाकी, चौकीदार, चांभार, शिंपी वैगैरे सदस्यांचा देखील समावेश होतो.
ब. सार्वजनिक सुव्यवस्था राखणारे जवान. उदा. पोलीस, इतर.
क. गुप्तवार्ता / प्रतिगुप्त वार्ता Bureau सदस्य.
ड. वरील दल / Bureau / संस्थेच्या दुरसंचार यंत्रणेत कार्यरत व्यक्ती.