उत्तर: पर्याय 2 (मुलांनो, चांगला अभ्यास करा.)
स्पष्टीकरण:
•
मुलांनो, चांगला अभ्यास करा या वाक्यातील क्रियापादाच्या रुपावरुन आज्ञा व्यक्त होते म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे.
•
आज्ञार्थ - ज्या क्रियापदाच्या रुपावरुन आज्ञा, मागणी, आशीर्वाद, सल्ला, विनंती, प्रार्थना किंवा उपदेश याचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. म्हणतात. उदा. बस, बसा, बसू
•
व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिला एखादे काम सांगितल्यास ती आज्ञाच असते. उदा. देवा माझे भले कर. (प्रार्थना), देवा, त्याला सुखी ठेव. (आशीर्वाद)
•
क्रियापदांचे चार अर्थ असतात.
•
स्वार्थ - ज्या क्रियापदावरुन फक्त काळाचा बोध होत असेल म्हणजेच क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. अमित शाळेत जातो.
•
आज्ञार्थ - ज्या क्रियापदाच्या रुपावरुन आज्ञा, मागणी, आशीर्वाद, सल्ला, विनंती, प्रार्थना किंवा उपदेश याचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. मला तुमचे पेन द्या.
•
विद्यर्थ - विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे विध्यर्थी असतात. यात आज्ञेप्रमाणे बंधन नसते आणि अशी वाक्ये सर्वाना लागू पडणारी विधाने असतात तसेच धातूला वा, वी, वे हे प्रत्यय असतात. उदा. कृपया सहकार्य करावे.
•
संकेतार्थ - वाक्यातील क्रियापादावरून असे केले तर तसे होईल असा अर्थबोध होत असेल तर त्या क्रियापदाला संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. लवकर आलास तर फिरायला जाऊ.
•
Important Pointsमराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
•
अर्थावरून पडणारे प्रकार
•
वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार
•
अर्थावरून पडणारे प्रकार -
•
विधांनार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी बारावीत शिकत आहे.
•
प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. तू उद्या जाणार आहेस का?
•
उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोण ही गर्दी!
•
होकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात. उदा. मी येत आहे.
•
नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी येणार नाही.
•
वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार -
•
केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. अविनाश टेबल टेनिस खेळतो.
•
संयुक्त वाक्य - जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.
•
मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील.
📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Answer: Option 2 (Children, study well.)
Explanation:
•
Answer - Children, study well. This is an imperative sentence.
•
Children, study well, because the verb in the sentence expresses the command, so it is an imperative sentence.
•
Imperative - A verb that expresses a command, request, blessing, advice, request, prayer or exhortation is called an imperative verb. is called E.g. Sit, sit, sit
•
No matter how big a person is, if he is told to do something, it is a command. E.g. God bless me. (Prayer), God, keep him happy. (blessing)
•
Verbs have four meanings.
•
Selfishness - A verb that only has the sense of tense, i.e. if the original meaning of the verb is understood, then the verb is called a selfish verb. E.g. Amit goes to school.
•
Imperative - A verb that expresses a command, request, blessing, advice, request, prayer or exhortation is called an imperative verb. E.g. Give me your pen.
•
Vidyartha - Verbs expressing request, possibility, desire, reasoning, duty, ability are vidyarthi. It does not have a constraint like a command and such sentences are general statements as well as the suffixes Va, Vee, Ve. E.g. Please cooperate.
•
Implicit – the verb in the sentence implies that if it does so it will happen
📌 MPSC Exam Tip: Marathi vocabulary, word origin classifications (Tatsama, Tadbhava, Deshi), idioms, and proverbs are high-scoring, direct topics in Police Bharti.