पावलोपावली - या शब्दाचा समास ओळखा.
उत्तर: अव्ययीभाव
उत्तर: अव्ययीभाव
उत्तर: पर्याय 2 (अव्ययीभाव)
स्पष्टीकरण:
पावलोपावली हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे.
पावलोपावली - विग्रह - प्रत्येक पावलात
पावलोपावली या सामासिक शब्दात पहिले पद महत्वाचे असून हे एक क्रियाविशेषण अव्यय आहे यामुळे पावलोपावली हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे.
Important Points अव्ययीभाव समास - ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदा. प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला, यथाक्रम - क्रमाप्रमाणे, आजन्म - जन्मापासून
वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत.
बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यांसारखे फारशी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे.
उदा. दरसाल - प्रत्येक वर्षी, बेशक - शंकेशिवाय, बिनचूक - चुकीशिवाय
मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे सुद्धा क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातत म्हणून हे शब्द अव्ययीभाव समास या प्रकारात मोडतो. उदा. पानोपानी - प्रत्येक पानात, दारोदार - प्रत्येक दारी
Additional Information तत्पुरुष समास - ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा. महामानव - महान असलेला मानव, राजपुत्र - राजाचा पुत्र, तोंडपाठ - तोंडाने पाठ
वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
तत्पुरुष समासाचे सात उपप्रकार पडतात.
विभक्ती तत्पुरुष समास
अलुक तत्पुरुष समास
उपपद तत्पुरुष समास
नञ् तत्पुरुष समास
कर्मधारय तत्पुरुष समास
द्विगू समास
मध्यमपदलोपी समास
द्वंद्व समास - ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात त्यास व्दंव्द समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदा. विटीदांडू - विटी आणि दांडू
व्दंव्द समासाचे पुढील तीन प्रकार पडतात.
इतरेतर द्वंद्व समास
वैकल्पिक द्वंद्व समास
समाहार द्वंद्व समास
📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद - अव्ययीभाव, दुसरे पद - तत्पुरुष, दोन्ही पदे - द्वंद्व, दोन्ही पदे गौण - बहुव्रीही समास होतो.
Answer: Option 2 (अव्ययीभाव)
Explanation:
पावलोपावली हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे.
पावलोपावली - विग्रह - प्रत्येक पावलात
पावलोपावली या सामासिक शब्दात पहिले पद महत्वाचे असून हे एक क्रियाविशेषण अव्यय आहे यामुळे पावलोपावली हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे.
Important Points अव्ययीभाव समास - ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदा. प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला, यथाक्रम - क्रमाप्रमाणे, आजन्म - जन्मापासून
वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत.
बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यांसारखे फारशी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे.
उदा. दरसाल - प्रत्येक वर्षी, बेशक - शंकेशिवाय, बिनचूक - चुकीशिवाय
मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे सुद्धा क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातत म्हणून हे शब्द अव्ययीभाव समास या प्रकारात मोडतो. उदा. पानोपानी - प्रत्येक पानात, दारोदार - प्रत्येक दारी
Additional Information तत्पुरुष समास - ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा. महामानव - महान असलेला मानव, राजपुत्र - राजाचा पुत्र, तोंडपाठ - तोंडाने पाठ
वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
तत्पुरुष समासाचे सात उपप्रकार पडतात.
विभक्ती तत्पुरुष समास
अलुक तत्पुरुष समास
उपपद तत्पुरुष समास
नञ् तत्पुरुष समास
कर्मधारय तत्पुरुष समास
द्विगू समास
मध्यमपदलोपी समास
द्वंद्व समास - ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात त्यास व्दंव्द समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदा. विटीदांडू - विटी आणि दांडू
व्दंव्द समासाचे पुढील तीन प्रकार पडतात.
इतरेतर द्वंद्व समास
वैकल्पिक द्वंद्व समास
समाहार द्वंद्व समास
📌 MPSC Exam Tip: To determine compound words (Samas), check word precedence: 1st dominant = Avyayibhava, 2nd dominant = Tatpurusha, both dominant = Dvandva, both secondary = Bahuvrihi.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.