🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) Maharashtra Police Constable 2021 (Mira-Bhayandar) 02 April 2023 Official Paper 2021 MEDIUM

'पावसाळा सुरू झाला.' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

EN 'The rainy season has started.' Identify the use of this sentence.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सकर्मक कर्तरी
Transitive Kartari
B
सकर्मक भावे
Transitive expressions
C
अकर्मक कर्तरी
Intransitive case
D
कर्मणी
Karmani
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) [अकर्मक कर्तरी]

स्पष्टीकरण:

उत्तर - पावसाळा सुरू झाला. हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे.

वरील वाक्यात पावसाळा हा कर्ता आहे आणि कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत आहे तसेच या वाक्यात कर्म आलेले नाही म्हणून हे वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचे होईल.

कर्तरी प्रयोग - जेव्हा वाक्यात क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, पुरुष आणि वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्तरी प्रयोगात क्रियापद बहुधा वर्तमानकाळी असते आणि कर्ता प्रथमान्त असतो तसेच कर्त्याला प्रत्यय नसतो. उदा. विजय निबंध लिहितो.

कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.

• सकर्मक कर्तरी प्रयोग
• अकर्मक कर्तरी प्रयोग

सकर्मक कर्तरी प्रयोग - ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. सकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म असावेच लागते आणि ते प्रथमान्‍त किंवा द्वितीयान्‍त असते. उदा. तो गाणे गातो.

अकर्मक कर्तरी प्रयोग - ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. अकर्मक कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, पुरुष आणि वचनानुसार बदलते म्हणजेच कर्ता धातुरूपेश असतो. उदा. सूर्य उगवला.

📌 Important Pointsप्रयोग - कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिला व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. प्रयोग ओळखण्‍यासाठी कर्ता, कर्म व क्रियापद यांची आवश्यकता असते.

प्रयोगाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.

• कर्तरी प्रयोग
• कर्मणी प्रयोग
• भावे प्रयोग

कर्मणी प्रयोग - कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते म्हणून त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. कर्मणी प्रयोगात कर्माची आवश्‍यकता असते व ते प्रथमेतच असते. कर्मणी प्रयोगात कर्त्याला विभक्तीप्रत्यय असतो तर कर्माला नसतो. कर्मणी प्रयोगात क्रियापद बहुधा भूतकाळी असते. उदा. मधूने बैल बांधला.

कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग कधीच नसतो.

कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.

• प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग
• नवीन कर्मणी प्रयोग / कर्मकर्तरी प्रयोग
• समापन कर्मणी प्रयोग
• शक्य कर्मणी प्रयोग
• प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग

भावे प्रयोग - जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात. या प्रयोगात कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. भावे प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.

• प्रधानकर्तृक भावे प्रयोग
• गौणकर्तृक भावे प्रयोग
• अकर्तृक भावे प्रयोग/ भावकर्तरी प्रयोग

प्रधानकर्तृक भावे प्रयोगाचे दोन प्रकार पडतात.

• प्रधानकर्तृक सकर्मक भावे प्रयोग - या प्रकारात कर्त्याला प्राधान्य दिले जाते. यामध्ये कर्त्याला तृतीयेचा ने/नी प्रत्यय असतो आणि कर्माला सुद्धा प्रत्यय असतो. उदा. श्यामने गाईला बांधले.
• प्रधानकर्तृक अकर्मक भावे प्रयोग - यामध्ये सकर्मक भावे प्रयोगाप्रमाणेच लक्षणे असतात, फक्त वाक्यात कर्म नसते. अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विध्यर्थीच असते तसेच कर्त्याला प्रत्यय असतो. उदा. त्याने आता घरी जावे.

गौणकर्तृक भावे प्रयोगाचे चार प्रकार पडतात.

• गौणकर्तृक पुराण भावे प्रयोग - हा प्रयोग जुन्या मराठी भाषेत आढळतो. या प्रकारात वाक्यात कर्म नसते. कर्ता तृतीया विभक्तीत असतो तसेच क्रियापदाला शक्यतो ज प्रत्यय असतो. उदा. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे.
• गौणकर्तृक नवीन भावे प्रयोग - या प्रकारात कर्त्याला कडून प्रत्यय असतो आणि कर्माला सुद्धा प्रत्यय असतो. उदा. पोलिसांकडून चोराला लवकरच पकडण्यात येईल.
• गौणकर्तृक शक्य भावे प्रयोग - या प्रकारात कर्ता चतुर्थी/तृतीयेत असतो. वाक्य अकर्मक असते. धातूला व, अव, अवव प्रत्यय जोडून शक्यार्थ क्रियापद तयार केलेले असते. उदा. रामाला घरी जाववते.
• गौणकर्तृक समापन भावे प्रयोग - या प्रकारात क्रियापद समाप्तीदर्शक असते. वाक्यात शक्यतो कर्म नसते आणि असल्यास ते द्वितीयेत असते तसेच कर्त्याला षष्ठीचा प्रत्यय असतो. उदा. त्याचे हसून झाले.

अकर्तृक भावे प्रयोग - वाक्यात क्रिया करणारा कर्ता असावाच लागतो. काही वाक्यात तो स्पष्टपणे दिलेला नसतो. क्रियापदाचा भावच कर्ता सांगत असेल तर अकर्तृक भावे प्रयोग होतो. उदा. वडगावजवळ सांजावले. (सायंकाळ झाली)

पर्यायांचे विश्लेषण:

• पर्याय 1: 'सकर्मक कर्तरी' हा पर्याय चुकीचा आहे.
• पर्याय 2: 'सकर्मक भावे' हा पर्याय चुकीचा आहे.
• पर्याय 3 (अचूक उत्तर): 'अकर्मक कर्तरी' हे दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
• पर्याय 4: 'कर्मणी' हा पर्याय चुकीचा आहे.
💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

📌 पोलीस भरती परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना कर्त्याला व कर्माला प्रत्यय आहे का ते तपासा: कर्त्याला प्रत्यय नसल्यास 'कर्तरी', कर्माला प्रत्यय नसल्यास 'कर्मणी' आणि दोघांनाही प्रत्यय असल्यास 'भावे' प्रयोग होतो.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) [Intransitive case]

Explanation:

Answer - Monsoon has started. This is an example of an intransitive case experiment.

In the above sentence, monsoon is the subject and the subject is not suffixed but it is in the first form and as there is no action in this sentence, this sentence will be intransitive.

Kartari Experiment - When the form of the verb in the sentence changes according to the gender, gender and word of the doer, then the experiment is called Kartari experiment. In the past tense, the verb is usually in the present tense and the subject is first and last, and the subject has no suffix. E.g. Vijay writes an essay.

There are two subtypes of Kartari experiments.

• Transitory experiments
• Intransitive case studies

Transitive Sentences - Transitive Sentences in which verbs are present are called Transitive Sentences. In the transitive past participle, there must be a verb and it can be first or second. E.g. He sings a song.

Intransitive Verbs - Verbs in which there is no verb in the sentence are called intransitive verbs. In the intransitive case, the form of the verb varies according to the gender, gender and sentence of the subject, that is, the form of the subject is dhaturupesh. E.g. The sun rose.

📌 Important Points Prayoga - The matching, placement or construction of the doer and the verb with the verb is called Prayoga in grammar. Karta, Karma and Kriyapada are required to identify experiment.

There are three main types of experiments.

• Kartari experiment
• Work experience
• Price experiments

Karmani Prabarak - In Karmani Prabarak, the form of the verb varies according to the gender or the word of the verb, so it is called Karmani Prabarak. Karmani experiment requires karma and it is Q

Distractor Analysis:

• Option 1: 'Transitive Kartari' is incorrect in this context.
• Option 2: 'Transitive expressions' is incorrect in this context.
• Option 3 (Correct Answer): 'Intransitive case' is the correct response according to official examination criteria.
• Option 4: 'Karmani' is incorrect in this context.
💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

📌 Police Bharti Exam Tip: To identify Prayog (Voice): Check suffixes on subject and object. If subject has no suffix -> Kartari; if object has no suffix -> Karmani; if both have suffixes -> Bhave.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) सकर्मक कर्तरी (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) सकर्मक भावे (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (3) अकर्मक कर्तरी (अचूक उत्तर): [gold]**अचूक उत्तर: पर्याय (3) [अकर्मक कर्तरी]**[/gold]
✗ पर्याय (4) कर्मणी (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (मिरा-भाईंदर) 02 April 2023 मूळ प्रश्नपत्रिका' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (मिरा-भाईंदर) 02 April 2023 मूळ प्रश्नपत्रिका
quiz 100 प्रश्न timer 90 मिनिटे military_tech 100 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (मिरा-भाईंदर) 02 April 2023 मूळ प्रश्नपत्रिका

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (मिरा-भाईंदर) 02 April 2023 मूळ प्रश्नपत्रिका' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (मिरा-भाईंदर) 02 April 2023 मूळ प्रश्नपत्रिका' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (मिरा-भाईंदर) 02 April 2023 मूळ प्रश्नपत्रिका' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (मिरा-भाईंदर) 02 April 2023 मूळ प्रश्नपत्रिका' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →