'शोषणा विरुद्धचा हक्क' च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN
Which of the following statement is correct with respect to the 'Right against exploitation?
कलम 23 : माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई:
हा हक्क नागरिक तसेच गैर नागरिकांनाही उपलब्ध आहेत.
•
तसेच हा हक्क व्यक्तींना राज्यसंस्था तसेच खाजगी व्यक्तींविरुद्ध संरक्षण उपलब्ध करून देतो. (15 (2) ही अशीच तरतूद आहे.)
•
'माणसांचा अपव्यापार' यात पुढील बाबीचा समावेश होतो :
1.
पुरुष महिला व बालकांची खरेदी-विक्री वस्तू म्हणून करणे.
2.
महिला व बालकांचा अनैतिक व्यापार- वैश्याव्यवसाय
3.
देवदासी
4.
गुलामगिरी
कलम 24 : कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई:
•
14 वर्ष वयाखालील कोणत्याही बालकास, कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी नोकरीत ठेवले जाणार नाही / अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर त्यास लावले जाणार नाही.
↓
म्हणजेच धोक्याच्या नसलेल्या कामावर बालकास लावण्यास प्रतिबंध करत नाही.
•
बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा 1986.