योग्य उत्तर पर्याय १ (विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य असून 'ब' हे 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे) आहे.
स्पष्टीकरण:
•
पृथ्वीची भू-धवलता / अल्बेडो (Albedo of the Earth):
•
विधान अ सत्य आहे: सूर्यापासून वातावरणाच्या बाह्य सीमेवर येणाऱ्या एकूण १०० एकक सौरऊर्जेपैकी सुमारे ३५ एकक (३५%) ऊर्जा पृथ्वीचा पृष्ठभाग व वातावरण शोषून न घेता थेट अवकाशात परावर्तित केली जाते. या परावर्तित उष्णतेच्या प्रमाणाला 'पृथ्वीचा अल्बेडो' (Albedo) म्हणतात.
•
विधान ब सत्य असून ते योग्य स्पष्टीकरण आहे: हे ३५ एकक परावर्तन कसे होते?
१)
ढगांच्या माथ्यावरून परावर्तन: सुमारे २७ एकक.
२)
हवेतील सूक्ष्म धुलिकण व वायूंमार्फत विकिरण (Scattering): सुमारे ६ एकक.
३)
पृथ्वीच्या हिमच्छादित पृष्ठभागावरून थेट परावर्तन: सुमारे २ एकक.
(एकूण: २७ + ६ + २ = ३५ एकक).
पृथ्वीचा सरासरी अल्बेडो: ३०% ते ३५%. सर्वाधिक अल्बेडो: ताजा बर्फ (८०% ते ९०%); सर्वात कमी अल्बेडो: काळी मृदा व डांबरी रस्ते (५% ते १०%).
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
The correct answer is Option 1 (Both statements 'a' and 'b' are true, and 'b' is the correct explanation of 'a').
Explanation:
•
Planetary Albedo of Earth:
•
Statement a is TRUE: Out of 100 units of incoming shortwave solar insolation reaching the top of the atmosphere, approximately 35 units (~35%) are reflected and scattered back into space without being absorbed or heating the Earth-atmosphere system. This reflective fraction is defined as the Earth's planetary albedo.
•
Statement b is TRUE and provides the direct causal explanation: The 35 units of reflected shortwave radiation are partitioned as follows:
1)
Reflected by cloud decks: ~27 units
2)
Scattered into space by aerosols, air molecules, and dust: ~6 units
3)
Reflected directly by snow- and ice-covered ground surfaces: ~2 units
(Total: 27 + 6 + 2 = 35 units).
Earth's planetary albedo is ~30–35%. Highest albedo = Fresh snow (80–90%); Lowest albedo = Dark charcoal/black soil/asphalt (5–10%).