प्रोटिन्सचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे. यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात गैरवाजवी मासेमारी केली जाते तर काही ठिकाणी ते पूर्णपणे संपवले गेले आहेत. मानवी वापरासाठी मत्स्योत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे. पण यात मत्स्यशेतीशी संबंधित पाणी प्रदूषण आणि लागून असलेल्या नैसर्गिक माशांच्या समूहात आजारांचा प्रादुर्भाव पसरवणाऱ्या पर्यावरण जोखमीचेही व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. यासाठी शेती क्षेत्राने मत्स्य प्रजाती, विशेषतः कूपासारख्या भक्ष्यक माशांच्या परिणामकारक आणि पर्यावरणस्नेही पद्धती विकसित केली पाहिजे. सागरी वन्यपकडीचे मासे खायला घालून पोसलेल्या कूपासारखे मासे खाण्याचे धनवान लोकांना वेड असते आणि याचा सागरावर ताण येतो. पुढे दिलेल्या विधानांतून वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष निवडा.
EN
There is an increased demand for fish as it is a good source of protein. Due to this about 70% of the world's marine fish stocks are now overfished or already fished at full capacity. Aquaculture is continuously expanded for farming fish for human consumption. But it is necessary to manage environmental risks associated with fish farming, such as water pollution and transmission of disease to adjacent wild fish population. For this aquaculture sector needs to device effective and environment friendly methods of rearing fish species, particularly predator fish like tuna. Wealthy people are crazy about eating fish like tuna that are fed using marine wild-caught fish and this puts pressure on oceans.
Select from following statements the most appropriate conclusion of above paragraph.
अचूक उत्तर: पर्याय (3) - सागरांवर येणारा ताण टाळण्यासाठी लोकांना तळ्यांत व नद्यांत रहाणारे गोड्या पाण्यातील मासे खायला प्रोत्साहन दिले पाहिजे.
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - People should be encouraged to consume freshwater fish varieties that are living in lakes and rivers to avoid pressure on the oceans.
Per official MPSC answer key.