सराव केंद्र ➔
भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था Group C Pre 2024 MEDIUM

कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तिची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद केली ?

EN Which Constitutional Amendment Act added 'the right to form cooperative society' to Part III of the Indian Constitution?
A
पहिली घटना दुरुस्ती कायदा - 1951 97th Constitutional Amendment
✓
सातवी घटना दुरुस्ती कायदा - 1956 76th Constitutional Amendment
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
चोविसावी घटना दुरुस्ती कायदा - 1962 32nd Constitutional Amendment
D
बेचाळिसावी घटना दुरुस्ती कायदा - 1976 100th Constitutional Amendment
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

स्पष्टीकरण :

7 वी घटनादुरुस्ती, 1956 :

• राज्यांचे पूर्वीचे A, B, C व D भागांतील वर्गीकरण रद्द करून 14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले.
• उच्च न्यायालयात अतिरिक्त व हंगामी न्यायाधीशांच्या नियुक्तीची तरतूद करण्यात आली.
• उच्च न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला.
• दोन किंवा अधिक राज्यांसाठी सामाईक उच्च न्यायालय स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी सामाईक उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली.
• एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली. दिलेल्या नोंदीत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी सामाईक राज्यपालाची तरतूदही नमूद आहे.

1 ली घटनादुरुस्ती, 1951 :

• सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदी करण्याचे जादा अधिकार राज्यांना देण्यात आले.
• जमीन सुधारणा व इतर कायद्यांचे न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण करण्यासाठी 9 वी अनुसूची समाविष्ट करण्यात आली.
• कलम 19(2) अंतर्गत भाषण व अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर पुढील तीन नवीन निर्बंध समाविष्ट करण्यात आले :
1. सार्वजनिक सुव्यवस्था.
2. परराष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध.
3. गुन्ह्यास उत्तेजन देणे.
• व्यापार, धंदे व सेवा यांवर अंशतः निर्बंध घालण्यात आले.

24 वी घटनादुरुस्ती, 1971 :

• मूलभूत अधिकारांसह घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याच्या संसदेच्या अधिकाराला मान्यता देण्यात आली.
• घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणे राष्ट्रपतींना बंधनकारक करण्यात आले.

42 वी घटनादुरुस्ती, 1976 :

• प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि अखंडता/एकात्मता यांचा समावेश करण्यात आला.
• भाग IV-A मधील कलम 51A अंतर्गत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.
• भाग XIV-A समाविष्ट करून न्यायाधिकरणांसंबंधी कलम 323A व 323B ही दोन कलमे जोडण्यात आली.
• राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करणे बंधनकारक करण्यात आले.
• कलम 39A, 39(f), 43A व 48A यांद्वारे चार नवीन मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट करण्यात आली.
• राज्य सूचीतील पुढील पाच विषय समवर्ती सूचीत समाविष्ट करण्यात आले :
1. शिक्षण.
2. वनसंपदा.
3. जंगली प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण.
4. वजने व मापे.
5. न्यायाचे प्रशासन; सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांचे संघटन व रचना.
जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →