बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) STI Mains 2019 MEDIUM

"भारतात बनवा" या अभियानासंदर्भात लेखकाने नोंदवलेले निरीक्षण अभ्यासा. भारताला औद्योगिक-उत्कर्षापर्यंत नेणाऱ्या नवोपक्रमांचा इतिहास नाही. भारत हा विनिमय करणारा देश आहे तसेच मानवी (क्षमताच) मोजपट्टी आहे अशा नाजुक कारागिरीच्या आणि काळजी वाहण्याच्या क्षेत्रात तो उत्तम कामगिरी पार पाडू शकतो. हा देश सेवा पुरवण्यात देखील चांगली कामगिरी करतो. चांगले कायदे, आमिषे, आणि तंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य, अर्थतंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय शिक्षण, आरोग्य सेवा - म्हणजेच ज्या क्षेत्रात माणसाचे असणे अजूनही महत्त्वाचे आहे. जेथे व्यक्तिगत अवधान महत्त्वपूर्ण ठरते आणि यंत्रे व मोजणी साधने तुलनेने कमी महत्त्वाची आहे अशा क्षेत्रात तो चांगली कामगिरी करू शकेल. वरील माहितीच्या संदर्भात उचित अर्थनिर्वचन/ने निवडा. अ. औद्योगिक-उत्कर्षापर्यंत नेणाऱ्या नवोपक्रमांचा इतिहास नसल्याने "भारतात बनवा" हे अभियान यशस्वी होणार नाही. ब. भारत सेवा पुरवण्यात चांगले काम करत असल्यामुळे त्याने पर्यटन, आतिथ्य, अर्थतंत्रज्ञान, आरोग्य सेवा इत्यादी क्षेत्रे विकसित करण्याकडे प्रयत्न एकवटायला हवेत. क. उद्योगांची उभारणी करण्यात वेळ, पैसा व जमीन वाया घालवण्यापेक्षा भारताने चांगले कायदे, आमिषे, आणि तंत्रज्ञान यांचा वापर सेवा क्षेत्रे विकसित करण्यासाठी केला पाहिजे. ड. जेथे यंत्रे व मोजमापे फारशी महत्त्वाची नसतात आणि व्यक्तिगत अवधानाला महत्त्व असते अशा क्षेत्रांत भारत चांगली कामगिरी करू शकतो. पर्यायी उत्तरे :

EN Study the author's observation regarding the 'Make in India' campaign: India lacks a history of breakthroughs that lead to industrial pre-eminence. India is a country of traders and excels where human touch is the yardstick—in intricate craft and caregiving. The country also performs well in services. Good laws, incentives, and technology can help it excel in tourism, hospitality, fintech, international education, and healthcare—areas where human presence still matters, personal attention is vital, and machines and metrics are relatively secondary. Select the appropriate interpretation(s) in the context of the above passage: a. 'Make in India' will not succeed because India lacks a history of innovations leading to industrial success. b. Since India excels in providing services, it should focus efforts on developing tourism, hospitality, fintech, healthcare, etc. c. Instead of wasting time, money, and land setting up industries, India should use good laws and technology to develop the services sector. d. India can perform well in sectors where machines and metrics are less important and personal attention matters. Alternative answers:
A
क खेरीज सर्व All except c
B
फक्त ब व क Only b and c
✓
फक्त ब व ड Only b and d
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
ड खेरीज सर्व All except d
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

स्पष्टीकरण:

परिच्छेदातील मुख्य विचार:

• भारत हा सेवा क्षेत्रात उत्तम कामगिरी करतो.
• तंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य, आरोग्य सेवा या मानवी अवधान महत्त्वाचे असणाऱ्या सेवा क्षेत्रांवर भारताने लक्ष केंद्रित करायला हवे.

अर्थनिर्वचनांची पडताळणी:

• विधान ब: "भारत सेवा पुरवण्यात चांगले काम करत असल्यामुळे त्याने पर्यटन, आतिथ्य, अर्थतंत्रज्ञान, आरोग्य सेवा इत्यादी क्षेत्रे विकसित करण्याकडे प्रयत्न एकवटायला हवेत." $\implies$ योग्य अर्थनिर्वचन.
• विधान ड: "जेथे यंत्रे व मोजमापे फारशी महत्त्वाची नसतात आणि व्यक्तिगत अवधानाला महत्त्व असते अशा क्षेत्रांत भारत चांगली कामगिरी करू शकतो." $\implies$ योग्य अर्थनिर्वचन (परिच्छेदातील थेट विचार).
• विधान अ आणि क ही नकारात्मक व परिच्छेदाबाहेर जाऊन अतिरेकी दावे करणारी आहेत.

त्यामुळे योग्य अर्थनिर्वचने फक्त ब व ड आहेत.

त्यामुळे पर्याय (3) हे योग्य उत्तर आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

परिच्छेदातील शब्दांशी सुसंगत विधाने निवडा: विधान 'ब' आणि 'ड' ही परिच्छेदातील मानवी स्पर्श व सेवा क्षेत्राच्या सामर्थ्यावर आधारित आहेत.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Explanation:

Passage analysis:

The author argues that India excels in service-oriented sectors where human presence, personal attention, and care are paramount, such as tourism, hospitality, fintech, and healthcare.

Evaluating interpretations:

• Statement b accurately reflects the author's policy recommendation for prioritizing service sectors.
• Statement d directly mirrors the author's observation about human touch versus machines/metrics.
• Statements a and c present overly cynical and extreme mischaracterizations not endorsed by the text.

Thus, the appropriate interpretations are only b and d.

Therefore, Option (3) is the correct answer.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Select interpretations that faithfully reflect the author's nuanced perspective without endorsing fatalistic conclusions.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →