🌍 भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल • TOPIC PRACTICE HUB

भारताचा भूगोल सर्वसमावेशक सराव प्रश्नसंच (पृष्ठ 3)

Comprehensive India Geography Practice Set — Geography of India & Maharashtra

'भारताचा भूगोल सर्वसमावेशक सराव प्रश्नसंच' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 843 MCQs
विषय विभाग भूगोल व नदीप्रणाली
पृष्ठ क्रमांक 3 / 43
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 एसटी महामंडळ 🎯 MPSC राज्यसेवा

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 41 ते 60 (एकूण 843)
प्रश्न #41 📅 Combine Group B Pre 2024
+1.0 / -0.25
पश्चिम आणि वायव्य भारतामधे अति उष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना ______ म्हणतात.
EN The extremely hot, dry, and dust-laden winds blowing with high velocity across Northern and North-Western India during summer are called ______.
  • (A) नॉर्वेस्टर
  • (B) लू वारे
  • (C) कालबैसाखी
  • (D) चहा वारे
अचूक उत्तर: पर्याय (B) लू वारे

योग्य उत्तर पर्याय २ (लू वारे) आहे. स्पष्टीकरण: - लू वारे (Loo Winds): - उत्तर आणि वायव्य भारतामध्ये (राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार) उन्हाळ्यात (विशेषतः मे आणि जून महिन्यात) दुपारच्या वेळी वाहणाऱ्या अतिउष्ण, कोरड्या आणि धुळीच्या...

प्रश्न #42 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
दक्षिण गोलार्धात वाहणाऱ्या प्रति व्यापारी वाऱ्यांना विशिष्ट नावाने ओळखले जाते, यातील योग्य नावे निवडा.
a. गरजणारे चाळीस b. नॉर इस्टर
c. ध्रुवीय पूर्व वारे d. किंचाळणारे साठ
EN The westerlies blowing in the Southern Hemisphere are known by specific traditional nautical names. Select the correct options:
a. Roaring Forties
b. Nor'easter
c. Polar Easterlies
d. Screaming Sixties
  • (A) फक्त a आणि b
  • (B) फक्त b आणि c
  • (C) फक्त a आणि c
  • (D) फक्त a आणि d
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त a आणि d

प्रश्न #43 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
अन्न, निवारा व वाहतुक इ. मानवी गरजा आणि मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक क्षेत्राची गणना ____ करते.
EN The measure of biologically productive natural area required to produce the resources consumed and absorb the wastes generated by human demand (food, shelter, transportation, etc.) is called ..........
  • (A) कार्बन पावलाचा ठसा
  • (B) अन्न साखळी
  • (C) अन्न आणि मागणी जाल
  • (D) परिस्थितिकीय पावलाचा ठसा
अचूक उत्तर: पर्याय (D) परिस्थितिकीय पावलाचा ठसा

प्रश्न #44 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
______ उष्ण प्रवाहाच्या परिणामामुळे कॅनडा व संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनारा वर्षभर उबदार असतो.
EN Due to the effect of the ______ warm ocean current, the eastern coast of North America and Western Europe remains relatively warm and accessible throughout the year.
  • (A) लैब्रेडोर
  • (B) गल्फस्ट्रीम
  • (C) अलास्का
  • (D) उत्तर अटलांटिक
अचूक उत्तर: पर्याय (B) गल्फस्ट्रीम

योग्य उत्तर पर्याय २ (गल्फस्ट्रीम - Gulf Stream) आहे. स्पष्टीकरण: - गल्फस्ट्रीम उष्ण सागरी प्रवाह (Gulf Stream Warm Current): - हा अटलांटिक महासागरातील सर्वात शक्तिशाली आणि वेगवान उष्ण पाण्याचा प्रवाह आहे. - हा मेक्सिकोच्या आखातातून (Gulf of Mexico)...

प्रश्न #45 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
खालील विधाने पाहा.
a. कोरिओलिस बल वाऱ्याची दिशा आणि वेग प्रभावित करतो.
b. कोरिओलिस बल हा पृथ्वीच्या फिरत्या हालचालीचा प्रभाव आहे.
EN Examine the following statements:
a. Coriolis force affects both wind direction and wind speed.
b. Coriolis force is the effect of the Earth's rotational motion.
  • (A) विधान a बरोबर आहे
  • (B) विधान b बरोबर आहे
  • (C) विधान a आणि b बरोबर आहेत
  • (D) विधान a आणि b बरोबर नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (B) विधान b बरोबर आहे

योग्य उत्तर पर्याय २ (विधान b बरोबर आहे) आहे. स्पष्टीकरण: - कोरिओलिस बल (Coriolis Force): - विधान a चुकीचे आहे: कोरिओलिस बल केवळ वाऱ्याची दिशा बदलवते (Deflection), ते वाऱ्याचा वेग (Speed) बदलत नाही! वाऱ्याचा वेग हा केवळ 'दाब उतार बलावर' (Pressure...

प्रश्न #46 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
थॉर्नथवेट यांच्या हवामान वर्गीकरणानुसार BA'r म्हणजे थॉर्नथवेट
EN According to C. W. Thornthwaite's climatic classification, the symbol 'BA'r' represents ..........
  • (A) सर्व हंगामात पुरेसा पाऊस असलेले उष्णकटिबंधीय आर्द्र हवामान
  • (B) सर्व हंगामात पुरेसा पाऊस असलेले मध्यम तापी आर्द्र हवामान
  • (C) सर्व हंगामात पुरेसा पाऊस असलेले सूक्ष्म तापी आर्द्र हवामान
  • (D) सर्व हंगामात पुरेसा पाऊस असलेले उष्णकटिबंधीय दमट हवामान
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व हंगामात पुरेसा पाऊस असलेले उष्णकटिबंधीय दमट हवामान

योग्य उत्तर पर्याय ४ (सर्व हंगामात पुरेसा पाऊस असलेले उष्णकटिबंधीय दमट हवामान) आहे. स्पष्टीकरण: - थॉर्नथ्वेटचे हवामान वर्गीकरण (Thornthwaite's Classification): - थॉर्नथ्वेट यांनी पर्जन्य सक्षमता (Precipitation Effectiveness - PE Index) आणि तापीय...

प्रश्न #47 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
चिनूक वाऱ्यांबद्दल खालीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहे/आहेत ?
i. चिनूक वारे रॉकी पर्वताच्या पश्चिमे कडील उतारावरून वाहतात.
ii. चिनूक वारे ऊबदार आणि कोरडे असतात.
iii. चिनूक वारे हिवाळा आणि वसंत ऋतुमध्ये वाहतात.
EN Which of the following statement(s) regarding Chinook winds is/are true?
i. Chinook winds blow down the western slopes of the Rocky Mountains.
ii. Chinook winds are warm and dry.
iii. Chinook winds blow during winter and early spring.
  • (A) i आणि ii
  • (B) ii आणि iii
  • (C) फक्त iii
  • (D) फक्त ii
अचूक उत्तर: पर्याय (B) ii आणि iii

योग्य उत्तर पर्याय २ (ii आणि iii) आहे. स्पष्टीकरण: - चिनूक वारे (Chinook Winds): - विधान i चुकीचे आहे: चिनूक वारे उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पश्चिमेकडून नव्हे, तर पूर्वेकडील (Leeward / वातविमुख) उतारावरून खाली प्रेअरी मैदानांकडे वाहतात...

प्रश्न #48 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
तापमानाची विपरीतता म्हणजे काय ?
EN What is meant by 'Inversion of Temperature' (तापमानाची विपरीतता)?
  • (A) उंचीनुसार तापमान कमी कमी होत जाणे.
  • (B) उंचीनुसार तापमानात बदल न होणे.
  • (C) उंचीनुसार तापमान वाढत जाणे.
  • (D) उंचीनुसार तापमानात अचानक वाढ होणे.
अचूक उत्तर: पर्याय (C) उंचीनुसार तापमान वाढत जाणे.

योग्य उत्तर पर्याय ३ (उंचीनुसार तापमान वाढत जाणे) आहे. स्पष्टीकरण: - तापमानाची विपरीतता / विलोमता (Inversion of Temperature): - सामान्य परिस्थितीत तपांबरामध्ये (Troposphere) जसजसे उंच जावे तसतसे तापमान घटते (Normal Lapse Rate: दर १६५ मीटरला १° से...

प्रश्न #49 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
पृथ्वीच्या निव्वळ किरणोत्सर्ग संतुलनाबाबत खालील विधाने विचारात घ्या.
i. स्थलीय विकिरण आणि पृथक्करणाद्वारे उष्णता प्राप्त करून पृथ्वी आपले तापमान राखते.
ii. 40° उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान-निव्वळ विकिरण शिल्लक राहते.
iii. ध्रुवीय प्रदेशामध्ये किरणोत्सर्गाची कमतरता-असते आणि त्यांना कोणत्याही स्वरूपात उष्णता मिळत नाही.
iv. उष्ण कटिबंधातील अतिरिक्त उर्जा कमतरता प्रदेशात पुनर्वितरीत केली जाते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
EN Consider the following statements regarding the Earth's net radiation balance:
i. The Earth maintains its temperature solely by gaining heat through terrestrial radiation and isolation.
ii. A net radiation surplus exists between 40° North and 40° South latitudes.
iii. Polar regions suffer a permanent radiation deficit and do not receive heat in any form.
iv. Surplus thermal energy from the tropical zones is redistributed to deficit regions via winds and ocean currents.
Which of the above statements are correct?
  • (A) ii आणि iv
  • (B) i आणि ii
  • (C) ii, iii आणि iv
  • (D) ii आणि iii
अचूक उत्तर: पर्याय (A) ii आणि iv

योग्य उत्तर पर्याय १ (ii आणि iv) आहे. स्पष्टीकरण: - पृथ्वीचे किरणोत्सर्ग / उष्णता संतुलन (Heat Budget of the Earth): - विधान ii बरोबर आहे: सुमारे ४०° उत्तर आणि ४०° दक्षिण अक्षांशांदरम्यान प्राप्त होणारे सौर प्रारण (Incoming Solar Radiation) हे...

प्रश्न #50 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
उष्मावृद्धी केंद्रा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
i. शहरी उष्णतेच्या केंद्राचा प्रभाव दिवसाच्या वेळी अधिक ठळकपणे जाणवतो.
ii. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात उष्णता विसंगती निर्माण होते.
iii. ग्रामीण-शहरी वातावरणातील तापमान श्रेणी शहराच्या मध्य भागी रात्रीच्या वेळी संवहनशील वायु परिसंचरण निर्माण करते.
iv. पृष्ठ भागाच्या पातळीवर शहरी भागातून तुलनेने थंड हवा रात्री उष्ण ग्रामीण भागाकडे जाते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूकचे/ची आहे/आहेत ?
EN Consider the following statements regarding Urban Heat Islands (UHI):
i. The Urban Heat Island effect is more prominently felt during the daytime.
ii. It creates a temperature anomaly between rural and urban areas.
iii. The rural-urban thermal gradient generates convective air circulation towards the city center at night.
iv. At the surface level, relatively cooler air moves from the urban area to the warm rural area at night.
Which of the above statement(s) is/are INCORRECT?
  • (A) फक्त iv
  • (B) फक्त i आणि iv
  • (C) फक्त i
  • (D) फक्त i आणि iii
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त i आणि iv

योग्य उत्तर पर्याय २ (फक्त i आणि iv) आहे. स्पष्टीकरण: - शहरी उष्णता बेटे / उष्मावृद्धी केंद्र (Urban Heat Island - UHI): - विधान i चुकीचे आहे: UHI चा प्रभाव दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी (Night-time) सर्वाधिक तीव्रतेने जाणवतो, कारण काँक्रीट आणि...

प्रश्न #51 📅 Combine Group B Pre 2024
+1.0 / -0.25
कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात ?
EN The region lying between which two rivers is known as the Punjab Himalayas?
  • (A) सिंधु -सतलज
  • (B) सतलज -गंगा
  • (C) चिनाब -यमुना
  • (D) काली -तिस्ता
अचूक उत्तर: पर्याय (A) सिंधु -सतलज

सर सिडनी बुरार्ड यांनी हिमालयाचे नद्यांच्या आधारे चार प्रादेशिक विभाग केले आहेत: १. पंजाब / काश्मीर हिमालय: सिंधू आणि सतलज नद्यांच्या दरम्यानचा ५६० किमी लांबीचा प्रदेश. २. कुमाऊँ हिमालय: सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यानचा ३२० किमीचा प्रदेश. ३. नेपाळ...

प्रश्न #52 📅 Group C Pre 2024
+1.0 / -0.25
पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा.
(a) मकालू (b) नंदादेवी
(c) अन्नपूर्णा (d) बद्रीनाथ
पर्यायी उत्तरे :
EN Arrange the following mountain peaks in descending order of their heights:
(a) Makalu
(b) Nanda Devi
(c) Annapurna
(d) Badrinath
Alternative answers:
  • (A) (d), (a), (b), (c)
  • (B) (b), (d), (c), (a)
  • (C) (a), (c), (b), (d)
  • (D) (c), (b), (a), (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (c), (b), (d)

शिखरांची समुद्रसपाटीपासूनची अचूक उंची पुढीलप्रमाणे आहे: - (a) मकालू: ८,४८५ मीटर (जगातील ५ वे सर्वोच्च शिखर) - (c) अन्नपूर्णा: ८,०९१ मीटर (जगातील १० वे सर्वोच्च शिखर) - (b) नंदादेवी: ७,८१६ मीटर (भारतातील २ रे सर्वोच्च शिखर - निर्विवाद भूभागातील)...

प्रश्न #53 📅 MPSC Pre 2024
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती सिंधु नदीची उपनदी नाही ?
EN Which of the following is NOT a tributary of the Indus River?
  • (A) चिनाब
  • (B) बियास
  • (C) सोन
  • (D) रावी
अचूक उत्तर: पर्याय (C) सोन

सोन नदी (Son River) ही सिंधूची उपनदी नसून ती गंगा नदीची उजव्या तीरावरील प्रमुख उपनदी आहे. तिचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक पठारावर होतो आणि ती बिहारमध्ये पाटण्याजवळ गंगेला मिळते. - चिनाब, बियास आणि रावी या सिंधू नदीच्या प्रसिद्ध उपनद्या आहेत. 📌 MPSC...

प्रश्न #54 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
POCRA बद्धल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
EN Which of the following statements about PoCRA is INCORRECT?
  • (A) कमालीच्या हवामानाच्या घटनांमध्ये शेती आणि शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी क्लायमेट रेझिलिएंट अॅग्रीकल्चर प्रकल्प सुरू केला आहे.
  • (B) प्रकल्पाचे नाव 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प' असे आहे.
  • (C) 5.0 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेले शेतकरी या प्रकल्पांतर्गत विविध अनुदानासाठी पात्र आहेत.
  • (D) हा प्रकल्प महाराष्ट्रातील केवल 15 जिल्ह्यांपुरता सुरूवातील मर्यादित होता.
अचूक उत्तर: पर्याय (C) 5.0 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेले शेतकरी या प्रकल्पांतर्गत विविध अनुदानासाठी पात्र आहेत.

योग्य उत्तर: पर्याय ३ (५.० हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेले शेतकरी या प्रकल्पांतर्गत विविध अनुदानासाठी पात्र आहेत) स्पष्टीकरण: - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA - Project on Climate Resilient Agriculture): - उद्दिष्ट: हवामान बदलामुळे...

प्रश्न #55 📅 Combine Group B Pre 2024
+1.0 / -0.25
स्वामीनाथन (१९७०) यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे
अ. १०० सेमी पेक्षा जास्त पण १२० सेमी पेक्षा कमी
ब. ३० सेमी पेक्षा कमी
क. २०० सेमी पेक्षा जास्त
ड. १०० सेमी पेक्षा कमी पण ४० सेमी पेक्षा जास्त.
EN According to the definition by Swaminathan (1970), dry farming in India refers to areas where the average annual rainfall is:
a. More than 100 cm but less than 120 cm
b. Less than 30 cm
c. More than 200 cm
d. Less than 100 cm but more than 40 cm

Options:
  • (A) फक्त अ
  • (B) अ आणि ब
  • (C) फक्त क
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ड

योग्य उत्तर: पर्याय ४ (फक्त ड) स्पष्टीकरण: - कोरडवाहू शेतीची व्याख्या (Dr. M. S. Swaminathan, 1970): - हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या मते भारतातील कोरडवाहू शेती (Dryland Farming) म्हणजे असा प्रदेश जेथे सरासरी वार्षिक पर्जन्य ४०...

प्रश्न #56 📅 MPSC Pre 2024
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN Which of the following statements is INCORRECT?
  • (A) अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटसमुह आहे.
  • (B) भारताची सागरी सरहद्द किनारपट्टीपासून 12 नाविक मैल आहे.
  • (C) बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेटे आहेत.
  • (D) भारताची पाकिस्तान व बांगलादेशाबरोबर भू-सीमेची नैसर्गिक सरहद्द आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) भारताची पाकिस्तान व बांगलादेशाबरोबर भू-सीमेची नैसर्गिक सरहद्द आहे.

योग्य उत्तर: पर्याय ४ (भारताची पाकिस्तान व बांगलादेशाबरोबर भू-सीमेची नैसर्गिक सरहद्द आहे) स्पष्टीकरण: - विधान ४ चुकीचे आहे: भारत आणि पाकिस्तान तसेच भारत आणि बांगलादेश यांच्यातील भू-सीमा ही पर्वत, नद्या किंवा समुद्रासारखी 'नैसर्गिक सरहद्द' (Natural...

प्रश्न #57 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
a. डीआरडीओ ची आण्विक विकिरण व्यवस्थापन तंत्रज्ञानाची संरक्षण प्रयोगशाळा जोधपूर येथे आहे.
b.वरील प्रयोगशाळा रेडिओआयसोटोप उपयोजनाशी सुद्धा निगडीत आहे.
c. डीआरडीओ ची स्थापना 1968 मधे झाली.
डीआरडीओ संदर्भात वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे /आहेत ?
EN a. DRDO's Defence Laboratory for nuclear radiation management technology is located at Jodhpur.
b. The above laboratory is also associated with radioisotope applications.
c. DRDO was established in the year 1968.
Which of the above statement(s) regarding DRDO is/are correct?
  • (A) विधान b
  • (B) विधान c
  • (C) विधान a आणि b
  • (D) विधान a
अचूक उत्तर: पर्याय (C) विधान a आणि b

योग्य उत्तर: पर्याय ३ (विधान a आणि b) स्पष्टीकरण: - डीआरडीओ (DRDO) आणि संरक्षण प्रयोगशाळा जोधपूर: - विधान (a) बरोबर आहे: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (DRDO) संरक्षण प्रयोगशाळा, जोधपूर (Defence Laboratory, Jodhpur - DLJ) ही आण्विक किरणोत्सर्ग...

प्रश्न #58 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता विद्यार्थी उपग्रह जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर यांनी 2021 साली संयुक्तपणे विकसित केला आहे ?
EN Which of the following student satellites was jointly developed by G. H. Raisoni College of Engineering, Nagpur in the year 2021?
  • (A) PISAT
  • (B) UNITYSat
  • (C) KalamSat - V2
  • (D) PRATHAM
अचूक उत्तर: पर्याय (B) UNITYSat

योग्य उत्तर: पर्याय २ (UNITYSat) स्पष्टीकरण: - युनिटीसॅट (UNITYsat): - हा तीन भारतीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे तयार केलेला ३ उपग्रहांचा समूह (Constellation of 3 satellites) आहे: १. जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ...

प्रश्न #59 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
भारतात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
EN On which date is National Technology Day celebrated in India?
  • (A) 11 में
  • (B) 15 ऑक्टोबर
  • (C) 05 जून
  • (D) 11 जून
अचूक उत्तर: पर्याय (A) 11 में

योग्य उत्तर: पर्याय १ (११ मे) स्पष्टीकरण: - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस (National Technology Day): - भारतात दरवर्षी ११ मे हा दिवस 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो. - ऐतिहासिक पार्श्वभूमी: - ११ मे १९९८ रोजी भारताने राजस्थानमधील पोखरण...

प्रश्न #60 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
जागतिक स्थान निश्चिती प्रणाली (GPS) प्राप्तकर्ता संदर्भात सर्वेक्षण दर्जाविषयी कोणती विधाने सत्य आहेत ?
a. सर्वात अचूक आहे.
b. सर्वात कमी खर्चिक आहे
c. बहुतेक व्यावसायिक सर्वेक्षण-कर्त्याद्वारे वापरले जाते
d. त्यांच्या वापरासाठी अचूकता महत्वाची नाही
EN Which statements are TRUE regarding survey-grade GPS receivers?
a. Is the most accurate.
b. Is the least expensive.
c. Is used by most professional surveyors.
d. Accuracy is not important for their use.
  • (A) a आणि c
  • (B) c आणि d
  • (C) b आणि c
  • (D) a, b आणि d
अचूक उत्तर: पर्याय (A) a आणि c

योग्य उत्तर: पर्याय १ (a आणि c) स्पष्टीकरण: - सर्वेक्षण दर्जाचे जीपीएस रिसीव्हर्स (Survey-Grade GPS Receivers): - विधान (a) सत्य आहे: हे रिसीव्हर्स दुहेरी फ्रिक्वेन्सी (Dual frequency - L1 and L2/L5), कॅरियर-फेज ट्रॅकिंग आणि RTK (Real-Time...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स