📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ (CSAT) पेपर-२ (पृष्ठ 4)

MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 80 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 4 / 4
🎯 MPSC राज्यसेवा

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 80)
प्रश्न #61 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 61. पुढे दिलेल्या अभिव्यक्ती अभ्यासून अपरिचित भाषेची संरचना ओळखा. यासाठी दोन गृहीतके वापरा: नियमाला अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीतून साधित नियम लागू पडतात.

po nayot means She eats everything.
su ?yot means You will eat.
ki ?yotna means I will eat nothing.
leyot rah yotle su means Are you eating a lot or a little ?
?’nafor ak means Demand everything.

“Will she eat a lot ?” हे या भाषेत व्यक्त करणारा पर्याय निवडा.
EN Q. 61. Study following expressions and recognise the structure of the unfamiliar language.

Use two assumptions that: there are no exceptions to the rule and only those rules apply which may be derived from given expressions.

po nayot means She eats everything.
su ?yot means You will eat.
ki ?yotna means I will eat nothing.
leyot rah yotle su means Are you eating a lot or a little ?
?’nafor ak means Demand everything.

Select the option that expresses “Will she eat a lot ?” in this language.
  • (A) po yotle
  • (B) ?leyot po
  • (C) ?yotle po
  • (D) po ?leyot
अचूक उत्तर: पर्याय (B) ?leyot po

योग्य उत्तर पर्याय 2 (?leyot po) आहे. सांकेतिक भाषेचे घटकवार विश्लेषण : 'po nayot' = 'She eats everything' आणि 'su ?yot' = 'You will eat' $\implies$ क्रियापद मूळ 'yot' म्हणजे 'eat' (खाणे). 'po nayot' आणि '?’nafor ak' (Demand everything) $\implies$...

प्रश्न #62 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 62. अनुक्रमे (a) आणि (b) या जागांसाठी उचित शब्द वा शब्दसमूह जोडी निवडा.

नव्या औषधावर जरी भरमसाठ प्रमाणात (a)______ स्रोत खर्ची घातलेले असूनही मानवी चाचण्यांत मिळालेल्या विपरीत परिणामांमुळे त्याचा विकास थांबवण्यात आला. एके काळी ज्याचे एक प्रकारे अनेक शारीरिक व मानसिक विकारांवर (b)______ उपचार करण्यासाठी उपयुक्त म्हणून स्वागत झाले होते ते औषध आता फक्त त्याच्या विकासकांना दिवाळे काढायला लावणारा आर्थिक पांढरा हत्ती म्हणून आठवले जाण्याची शक्यता आहे.
EN Q. 62. Select the appropriate pair of words or group of words to fill places (a) and (b) respectively.

Although considerable _______ (a) resources had already been expended on the new drug, development had to be halted due to adverse effects during human testing; once hailed as a kind of _________ (b) that could be used to treat numerous physical and mental ailments, the drug will likely be remembered only as a financial albatross that bankrupted its developers.
  • (A) नैसर्गिक व विनाकाम पगार
  • (B) नैसर्गिक व भिकारलक्षणी
  • (C) आर्थिक व भिकारलक्षणी
  • (D) आर्थिक व रामबाण
अचूक उत्तर: पर्याय (D) आर्थिक व रामबाण

प्रश्न #63 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 63. नुकत्याच पार पडलेल्या सरपंचासाठीच्या निवडणुकीत चार उमेदवारांना एकूण 972 मते मिळाली. जिंकलेल्या व्यक्तीला मिळालेली मते त्यांच्या विरोधकांपेक्षा अनुक्रमे 52, 78 आणि 102 अधिक आहेत. दिलेल्या माहितीच्या संदर्भात सत्य विधान निवडा.
EN Q. 63. In a recent election for Sarpanch, a total or 972 votes were cast for the four candidates, the winner exceeding his opponents by 52, 78 and 102 votes, respectively. Select the true statement with respect to given information.
  • (A) कोणताही निष्कर्ष काढण्यासंबंधाने सामग्री अपुरी आहे.
  • (B) जिंकलेल्या उमेदवाराला सगळी मिळून 132 मते जादा मिळाली.
  • (C) एका उमेदवाराला 200 मते मिळाली.
  • (D) जिंकलेल्या उमेदवाराला 301 मते मिळाली.
अचूक उत्तर: पर्याय (D) जिंकलेल्या उमेदवाराला 301 मते मिळाली.

योग्य उत्तर पर्याय 4 (जिंकलेल्या उमेदवाराला 301 मते मिळाली) आहे. गणिती मांडणी : जिंकलेल्या उमेदवाराला मिळालेली मते $W$ मानू. त्याच्या तीन विरोधकांना जिंकलेल्या उमेदवारापेक्षा अनुक्रमे 52, 78 आणि 102 मते कमी मिळाली: उमेदवार 2 = $(W - 52)$ उमेदवार 3 =...

प्रश्न #64 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 64. सतेजा तिच्या चार नातवंडांना घेऊन गाडी रपेटीला गेली आणि त्यांनी सहा चौकांना भेट दिली. यातील प्रत्येकाला तिने रपेटीदरम्यान वापरलेल्या रस्त्यांचे नकाशे रेखाटायला सांगितले तेव्हा त्यांनी पुढील नकाशे तयार केले, मात्र चौकांची सापेक्ष स्थाने नेमकेपणाने दाखवली नव्हती. जर यातील फक्त तीन नकाशे योग्य असतील तर यातील अयोग्य जोडण्या दाखवणारा नकाशा निवडा.

पर्यायी उत्तरे :
EN Q. 64. Sateja took her four grandchildren for a car ride and they visited six junctions. When she asked each of them to draw road maps that they used during their ride, they produced the following maps though all did not show exact relative positions of road connections. If only three maps are correct, then select the map with incorrect connections.

Alternative options :
अचूक उत्तर: पर्याय (A)

योग्य उत्तर पर्याय 1 आहे. आलेख सिद्धांतानुसार (Graph Topology) चौकांच्या जोडण्यांची पडताळणी : सर्व नकाशांमध्ये 6 चौक (Vertices) आणि रस्ते (Edges) दाखवले आहेत. प्रत्येक चौकात मिळणाऱ्या रस्त्यांची संख्या (Degree of Vertex) तपासू : पर्याय 2, 3 आणि 4...

प्रश्न #65 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 65. दोन समद्विभुज समलंब चौकोनी आकाराचे डेस्क जोडून सुसम षटकोनी पृष्ठाचे टेबल करून त्या भोवती सहा विद्यार्थी गटचर्चेसाठी बसले आहेत. प्रत्येकजण टेबलाच्या फक्त एकेका बाजूला बसला आहे. कामिला ही आर्या व पिनाक यांच्या दरम्यान बसली आहे. बंकू हा ईनीच्या डावीकडून दुसऱ्या स्थानी बसला आहे. नानू हा पिनाकच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी बसला आहे. आर्या कामिलाच्या शेजारी बसलेली नाही.

आर्याच्या समोरच्या बाजूला बसलेली व्यक्ती दर्शवणारा पर्याय निवडा.
EN Q. 65. Two isosceles trapeziums shaped desks are joined so as to form a regular hexagonal table top and six students are sitting around it for a group discussion. Each one is occupying only one side of the table. Camila is sitting in between Arya and Pinak. Banku is sitting two places to the left of Eni. Nanu is sitting two places to the right of Pinak. Arya is not sitting next to Camila.

Select the option that indicates the person sitting opposite to Arya.
  • (A) कामिला
  • (B) बंकू
  • (C) ईनी
  • (D) नानू
अचूक उत्तर: पर्याय (A) कामिला

योग्य उत्तर पर्याय 1 (कामिला) आहे. बैठक व्यवस्थेचे टप्प्याटप्प्याने विश्लेषण : षटकोनी टेबलाभोवती 6 जागा आहेत (1 ते 6 घड्याळाच्या दिशेने). अट 1 : बंकू हा ईनीच्या डावीकडून दुसऱ्या स्थानी बसला आहे. ईनीला जागा 1 वर मानल्यास, बंकू जागा 3 वर बसेल. अट 2...

प्रश्न #66 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 66. जर A $ B चा अर्थ A हा B चा भाऊ आहे; A @ B चा अर्थ A ही B ची बायको आहे; A # B चा अर्थ A ही B ची मुलगी आहे आणि A * B चा अर्थ A हे B चे वडील आहेत, तर W, T व Q ही भावंडे असल्याचे दर्शवणारी नातेसाखळी निवडा.
EN Q. 66. If A $ B means A is the brother of B; A @ B means A is the wife of B; A # B means A is the daughter of B and A * B means A is the father of B, then select the relation chain that indicates W, T and Q are siblings.
  • (A) P @ Q $ W * T # U
  • (B) P @ W $ Q * T # U
  • (C) P @ Q $ T # U * W
  • (D) P @ Q $ T # W * U
अचूक उत्तर: पर्याय (C) P @ Q $ T # U * W

योग्य उत्तर पर्याय 3 (P @ Q $ T # U * W) आहे. नातेसंबंध चिन्हांचे अर्थ : $ = भाऊ @ = पत्नी # = मुलगी * = वडील पर्याय 3 ची नातेसाखळी पडताळू (P @ Q $ T # U * W) : P @ Q : P ही Q ची पत्नी आहे (म्हणजे Q हा पुरुष आहे). Q $ T : Q हा T चा भाऊ आहे (म्हणजे Q...

प्रश्न #67 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 67. तीन विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिले आहेत. यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा.

विधाने :
सर्व B हे X आहेत.
सर्व X हे G आहेत.
काही G हे T आहेत.

निष्कर्ष :
अ. काही B हे T आहेत.
ब. काही T हे X आहेत.
क. सर्व B हे G आहेत.
ड. काही T हे G आहेत.

पर्यायी उत्तरे :
EN Q. 67. Three statements and conclusions based on these are given below. Select the option with valid conclusion/s.

Statements :
All Bs are Xs.
All Xs are Gs.
Some Gs are Ts.

Conclusions :
a. Some Bs are Ts.
b. Some Ts are Xs.
c. All Bs are Gs.
d. Some Ts are Gs.

Alternative options :
  • (A) क आणि ड
  • (B) अ आणि ब
  • (C) ब आणि क
  • (D) अ आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) क आणि ड

योग्य उत्तर पर्याय 1 (क आणि ड) आहे. वेन आकृती व निष्कर्षांचे विश्लेषण : विधान 1 : सर्व B हे X आहेत ($B \subseteq X$) विधान 2 : सर्व X हे G आहेत ($X \subseteq G$) या दोन्हीवरून : सर्व B हे G आहेत ($B \subseteq G$). त्यामुळे निष्कर्ष क (सर्व B हे G...

प्रश्न #68 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 68. एका मत्स्यसंग्रहालयात काही मासे आहेत. त्यातील आठ ठिपकेवाले तर तेरा पट्टेवाले आहेत. संग्रहालयातील पाच सोनेरी माशांपैकी सर्व फक्त ठिपकेवाले आहेत. सात गुलाबी माशांपैकी प्रत्येकावर एक तर पट्टे आहेत किंवा ठिपके आहेत. संग्रहालयातील माशांची शक्य असलेली किमान संख्या निवडा.
EN Q. 68. In an aquarium there are certain number of fishes. Of these eight are spotted and thirteen are striped. Of the five golden fishes in the aquarium all have only spots. Of the seven pink fishes each one only has either stripes or spots. Select the minimum possible number of fishes in the aquarium.
  • (A) 10
  • (B) 12
  • (C) 13
  • (D) 19
अचूक उत्तर: पर्याय (D) 19

योग्य उत्तर पर्याय 4 (19) आहे. दिलेली माहिती : एकूण ठिपकेवाले मासे = 8 एकूण पट्टेवाले मासे = 13 सोनेरी मासे = 5 (हे सर्व केवळ ठिपकेवाले आहेत, पट्टेवाले नाहीत). गुलाबी मासे = 7 (प्रत्येकावर केवळ एकतर पट्टे आहेत किंवा ठिपके आहेत, दोन्ही नाहीत). किमान...

प्रश्न #69 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 69. दोघा भावांच्या दोन झोपड्या एका मध्यम आकाराच्या तळ्याच्या विरुद्ध बाजूंना आहेत. प्रत्येक भावाला तळे ओलांडून एकमेकांच्या झोपडीत जाण्यासाठी तळ्यातील 12 दगड वापरावे लागतात. या दगडांना एक ते बारा या संख्या वापरून रांगेने क्रमांक दिले आहेत. या दगडांवर एक चतुर पुढीलप्रमाणे उड्या मारत आहे. दर मिनिटाला तो ज्या दगडावरून सुरुवात करतो त्यापासूनच्या पाचव्या दगडावर उडी मारतो. म्हणजे जर त्याने चौथ्या दगडावरून उडी मारली तर तो नवव्या दगडावर उतरतो, नवव्या दगडावरून तो दुसऱ्या दगडावर उतरतो आणि याप्रमाणे तो उड्या मारत राहतो.

जर चतुराने दुसऱ्या दगडावरून उड्या मारायला सुरुवात केली आणि छत्तिसाव्या मिनिटाला त्याने उड्या मारणे थांबवले तर तो ज्या क्रमांकाच्या दगडावर असेल तो दर्शवणारा पर्याय निवडा.
EN Q. 69. There are two huts of two brothers each on the opposites sides of a medium sized pond. Each brother has to use 12 stones in the pond to visit each other’s hut by crossing the pond. These stones are numbered serially using numbers one to twelve. A dragon fly is jumping on these stones as follows; every minute it jumps to the fifth stone from where it started. Thus if it jumps from the fourth stone it would go to the ninth stone, from the ninth stone it would go to the second stone and so on.

Select the option that indicates the number of stones on which this dragon fly would be resting if it stops jumping at the 36th minute if it starts jumping from the stone that is numbered two.
  • (A) 6
  • (B) 2
  • (C) 8
  • (D) 4
अचूक उत्तर: पर्याय (B) 2

प्रश्न #70 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 70. अन्या, बन्या, दिन्या, आणि विन्या यांनी वर्गसोबत्यांसाठी गोष्टीचे पुस्तक आणले. ते त्यांच्यापैकी एकाकडे आहे. त्या सर्वांना ते कोणाकडे आहे हे माहीत आहे आणि प्रत्येकाने त्यासंबंधाने प्रतिपादन केले. जर त्यांच्यापैकी फक्त एक प्रतिपादन असत्य असेल तर पुस्तक असलेली व्यक्ती निवडा.

विधाने :
अन्या : माझ्याकडे पुस्तक नाही आणि दिन्याकडेही पुस्तक नाही.
बन्या : माझ्याकडे पुस्तक नाही आणि अन्याकडेही पुस्तक नाही.
दिन्या : माझ्याकडे पुस्तक नाही आणि बन्याकडेही पुस्तक नाही.
विन्या : माझ्याकडे पुस्तक नाही आणि अन्याकडेही पुस्तक नाही.
EN Q. 70. Anya, Banya, Dinya and Vinya brought a story book for their classmate. The book is with someone among them. They all know who has the book and each one makes a statement about this. Select the person with the book if only one of them is making a false statement.

Statements :
Anya : I don’t have the book and Dinya also doesn’t have the book.
Banya : I don’t have the book and Anya also doesn’t have the book.
Dinya : I don’t have the book and Banya also doesn’t have the book.
Vinya : I don’t have the book and Anya also doesn’t have the book.
  • (A) अन्या
  • (B) बन्या
  • (C) दिन्या
  • (D) विन्या
अचूक उत्तर: पर्याय (D) विन्या

योग्य उत्तर पर्याय 4 (विन्या) आहे. अट : पुस्तक 4 पैकी एकाकडेच आहे, आणि चौघांपैकी फक्त एक विधान असत्य आहे (बाकी 3 विधाने सत्य आहेत). पर्यायांची पडताळणी : जर पुस्तक विन्याकडे असेल : अन्याचे विधान : "माझ्याकडे पुस्तक नाही आणि दिन्याकडेही नाही"...

प्रश्न #71 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 71. DEAR, MEAD, WARE आणि DRWA यापैकी तीन शब्दांच्या अंक संकेतांची अनुक्रमरहीत यादी 1435, 6342 व 5231 अशी आहे. REAM साठी संकेत निवडा.
EN Q. 71. The number code for three words from among DEAR, MEAD, WARE and DRWA are listed here in a random order as 1435, 6342 and 5231. Select the code for REAM.
  • (A) 4135
  • (B) 4235
  • (C) 6135
  • (D) 1345
अचूक उत्तर: पर्याय (C) 6135

योग्य उत्तर पर्याय 3 (6135) आहे. अंक व अक्षरांची सुसंगती (Cryptarithm Decoding) : चार शब्द दिले आहेत: DEAR, MEAD, WARE, DRWA. या चारही शब्दांत 'A' हे अक्षर समान आहे. दिलेल्या तीन संकेतांमध्ये (1435, 6342, 5231) केवळ '3' हा एकमेव अंक तिन्हीमध्ये...

प्रश्न #72 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 72. 100 एकक लांबीच्या रस्त्याच्या विरुद्ध टोकांकडून दोन स्कूटरस्वारांनी एकाच वेळी विरुद्ध दिशांनी जायला सुरुवात केली आहे. प्रत्येक स्वार ताशी 40 एकक वेगाने जात आहे. त्यांनी प्रवासाला सुरुवात केली त्या क्षणी स्वारांपैकी एकावरील माशी उडून ती दुसऱ्या स्वारावर बसण्यासाठी निघाली. जर ती माशी ताशी 60 एकक वेगाने उडत असेल तर तिला जितके अंतर कापण्याची गरज आहे ते एककात निर्देशित करणारा पर्याय निवडा.
EN Q. 72. Two scooter riders moving in opposite directions start at the same time from opposite ends of a 100-unit-long road. Each rider moves at a speed of 40 units per hour. At the moment they start, a fly leaves one of the riders and flies to land on the other. If the fly travels at 60 units an hour, select the option that indicates distance in units the fly needs to travel.
  • (A) 160
  • (B) 140
  • (C) 300
  • (D) 200
अचूक उत्तर: पर्याय (C) 300

योग्य उत्तर पर्याय 3 (300) आहे. गणिती विश्लेषण व अधिकृत उत्तरतालिका स्पष्टीकरण : रस्त्याची लांबी = 100 एकक. दोन्ही स्वार रस्त्याच्या विरुद्ध टोकांवरून प्रवास सुरू करतात. जर ते विरुद्ध दिशांनी (एकमेकांपासून दूर) जात असतील, तर त्यांच्यातील अंतर वाढत...

प्रश्न #73 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 73. सर्व पर्याय अभ्यासून सर्वात जवळपास सारखी विचारप्रक्रिया वापरणारी जोडी निवडा.

अ. विविध प्राण्यांदरम्यानच्या संपर्कांची संशोधकांनी पाहणी केली आहे आणि मिरकॅट उपयोगात आणत असलेल्या इशारे आणि साद यांच्या मालिका या स्वागतासाठी आणि सावध करण्यासाठी अशा दोन गटांत मोडतात असे त्यांना आढळले. हा मिरकॅट घालीत असलेला साद स्वागतासाठी नाही याची आपल्याला खात्री असल्यामुळे तो सावधगिरीचा इशारा देण्याच्या प्रयत्नात आहे हे आपण मान्य करायलाच हवे.

ब. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी सेंद्रीय किंवा असेंद्रीय खते यांतून निवड करणे आवश्यक आहे. सेंद्रीय खते कमी पिके उत्पादन देण्याची शक्यता असते आणि काही काळ असेंद्रीय पद्धतींचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रीय पद्धतींचा वापर करण्यासाठी स्वतःत बदल करणे मुष्कील होते. यासाठी शेतकऱ्यांनी दूरगामी परिणामांचा विचार करून स्वतःसाठी निर्णय घेतला पाहिजे.

क. एकतर तरुण दर वर्षी हुशार होत जात असतील किंवा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावे म्हणून परीक्षा सोप्या होत जात असतील. आधीच्या तुलनेत आताच्या तरुण व्यक्ती अधिक बुद्धिमान असल्याचा नगण्य पुरावा बुद्धिमत्ता चाचण्यांतून आणि अन्य गृहीत मानकांमार्फत मिळत असल्यामुळे पूर्वीपेक्षा आताची परीक्षा प्रणाली विद्यार्थ्यांसाठी सोपी ठरते असेच अनुमान आपण काढले पाहिजे.

ड. मोकळा जाळ वापरण्यापेक्षा लाकूड जाळणाऱ्या बंदिस्त चुली हा तुमचं अन्न शिजवण्याचा उत्तम मार्ग आहे. लाकूड जाळणाऱ्या बंदिस्त चुली खूपच कार्यक्षम असतात तर याउलट मोकळ्या जाळाच्या चुली हवा गरम करण्यात उष्णता गमावतात. यामुळे जास्त लोकांनी लाकूड जाळणाऱ्या बंदिस्त चुलींचा वापर करायला हवा.

पर्यायी उत्तरे :
EN Q. 73. By studying all following options, select a pair that uses most closely similar reasoning.

a. Researchers have looked at the communication between different animals and found that meerkats have a series of alerts and calls that fall into two categories, greetings and alarms. Since we can be sure that this meerkat is not calling as a greeting, we must accept that he is attempting to raise the alarm.

b. Farmers must choose between using organic or non-organic fertilisers on their land. Organic fertilisers can produce a lower crop yield and farmers may find it difficult to change to organic methods if they have been using non-organic methods for some time. Farmers should, therefore, consider the longer-term impacts of their decisions.

c. Either young persons are getting cleverer each year or examinations are becoming easier for students to pass. Since there is very little evidence from IQ testing and other supposed benchmarks that young persons are more intelligent now than in the past, we must conclude that the examination system is easier for students today than it was in the past.

d. Closed wood burning chulhas are a better way to cook your food than open fire chulhas. Closed wood burning chulhas are highly efficient, whereas the open fire of open fire chulhas loses a great deal of heat in the air. More people should, therefore, use closed wood burning chulhas in their homes.

Alternative options :
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि क

योग्य उत्तर पर्याय 3 (अ आणि क) आहे. तर्कशास्त्राच्या संरचनेचे विश्लेषण (Formal Logic Comparison) : विधान अ : दोनच शक्यता आहेत: एकतर $P$ (स्वागत) किंवा $Q$ (इशारा). $P$ नाही हे सिद्ध झाले ($ eg P$). निष्कर्ष: म्हणून $Q$ असलेच पाहिजे. विधान क : दोनच...

प्रश्न #74 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 74. जयचे मांजर अमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे, परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजराएवढेच आहे, जे अमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयच्या मांजरापेक्षा लहान आहे. जर आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील आणि आकाराने लहान मांजरे आज्ञाधारक असतील तर पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजरमालकाची जोडी निवडा.
EN Q. 74. Jay’s cat is bigger than Amy’s cat, but is smaller than Jaini’s cat. Fija’s cat is the same size as Venu’s cat, which is bigger than Amy’s cat, but smaller than Jay’s. If bigger cats are faster, but smaller cats are more obedient, select from the following list the pair of keepers who have the fastest and most obedient cats.
  • (A) फिजा व जैनी
  • (B) अमी व जय
  • (C) वेणू व जैनी
  • (D) जैनी व अमी
अचूक उत्तर: पर्याय (D) जैनी व अमी

योग्य उत्तर पर्याय 4 (जैनी व अमी) आहे. मांजरांच्या आकाराचा क्रम मांडू : जयचे मांजर अमीपेक्षा मोठे पण जैनीपेक्षा लहान आहे: $$ ext{जैनी} > ext{जय} > ext{अमी}$$ फिजाचे मांजर वेणूएवढेच आहे, जे अमीपेक्षा मोठे आणि जयपेक्षा लहान आहे: $$ ext{जय} > (...

प्रश्न #75 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 75. सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 2/5 मुली आहेत आणि यातील 2/3 मुलींनी गणितात 90% च्या वर गुण मिळवले. जर 36 मुलींनी गणितात 90% च्या वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.
EN Q. 75. In a group 2/5 of all students are girls and 2/3 of girls scored above 90% marks in Mathematics. If 36 girls have scored above 90%, then select the option that indicates the number of students who are not girls.
  • (A) 54
  • (B) 81
  • (C) 90
  • (D) 135
अचूक उत्तर: पर्याय (B) 81

योग्य उत्तर पर्याय 2 (81) आहे. अपूर्णांकांची मांडणी : गटातील एकूण विद्यार्थी संख्या $X$ मानू. मुलींची संख्या = $ rac{2}{5} X$ 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या मुली = मुलींच्या $ rac{2}{3}$ भाग : $$ ext{गुणवंत मुली} = rac{2}{3} imes rac{2}{5} X =...

प्रश्न #76 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 76. शैक्षणिक उपकरण म्हणून पडद्यांचे लाभ मागे पडून त्यापासूनच्या व्यसनांचा धोका आणि विकास खुंटणे वाढलेले आहे या निरीक्षणांशी माहिती तंत्रज्ञानाच्या अगदी जवळ असलेले लोक सहमत आहेत. पडदे विकसनशील मेंदूच्या समाधान केंद्रात ते स्वतःचे बस्तान मांडतात. जबाबदार पालक म्हणून तुम्ही...
EN Q. 76. People who are closest to information technology agree with the observation that benefits of screens as a learning tool are overblown and the risks for addiction and stunting development seems high. Screens are said to be beyond personal control and we situate them in pleasure centres of the developing brains. As a responsible parent you will :
  • (A) उच्च शाळेत पोहोचेपर्यंत मुलांना सेलफोन वापरू देणार नाही तसेच वाहन चालवताना त्याच्या वापरावर बंदी घालाल आणि त्याच्या घरातील वापरावर कठोर मर्यादा घालाल.
  • (B) मुलांच्यापुढे आदर्श ठेवण्यासाठी आत्यंतिक गरजेखेरीज घरी पडद्यांचा आणि महाजालाचा वापर करणार नाही.
  • (C) भरपूर प्रमाणात दूरदर्शन पाहात तुम्ही मोठे झालेले असल्याने अपरिचिताबद्दल न घाबरता तुम्ही तुमच्या नुकत्याच चालू लागलेल्या मुलाला आयपॅडबरोबर खेळण्याची मोकळीक द्याल.
  • (D) या समस्येशी व लाभांशी संबंधित अस्सल संशोधन अभ्यासून समंजसपणे प्रत्येक निर्णय घ्याल.
अचूक उत्तर: पर्याय (D) या समस्येशी व लाभांशी संबंधित अस्सल संशोधन अभ्यासून समंजसपणे प्रत्येक निर्णय घ्याल.

योग्य उत्तर पर्याय 4 (या समस्येशी व लाभांशी संबंधित अस्सल संशोधन अभ्यासून समंजसपणे प्रत्येक निर्णय घ्याल) आहे. निर्णयप्रक्रियेचे विश्लेषण (Decision Making Analysis) : एका जबाबदार पालकाची भूमिका ही टोकाची बंधने लादणे (उदा. पर्याय 1 मधील अतिरेकी बंदी)...

प्रश्न #77 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 77. तरुण व्यक्ती म्हणून ओळख असून आपल्या लोकसंख्येचा 32% भाग असलेल्या, 10 ते 24 वयोगटातील मुलगे व मुली शारीरिक आणि संप्रेरकांमुळे होणारे बदल, बरोबरीच्यांचा दबाव, एकाकीपणा, शारीरिक आकर्षण, लैंगिक कुतूहल इत्यादींमुळे तणावाखाली असतात हे पाहण्यात आले आहे. याबरोबरीने सामाजिक माध्यमे, खाण्याच्या आरोग्याला हानीकारक सवयी, विविध प्रकारची व्यसने, निष्काळजीपणा इत्यादी त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. अनेक वेळा वैचारिक गोंधळ आणि वैफल्य त्यांना आत्महत्येकडे घेऊन जाते. एक जबाबदार डॉक्टर आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही ही मोहीम सुरू करण्याला प्राधान्य द्याल...
EN Q. 77. It is observed that the girls and boys between age group 10 to 24, called as young people that comprise 32% of our population, are stressed due to physical and hormonal changes, peer pressure, loneliness, physical attraction, curiosity about sex life, etc. Along with this things like social media, unhealthy eating habits, addiction of various kinds, carelessness, etc. affect their physical, emotional and social health. Many a times confusion and frustration lead them to commit suicide. Being a responsible doctor and senior officer in the health department you will give priority to initiate drive for :
  • (A) मुलींची तसेच मुलांची लग्नाच्या वयाच्या कायदेशीर मर्यादा कमी करण्याला.
  • (B) शैक्षणिक आणि सामुदायिक सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या संस्थांच्या सहभागाने किशोरवयीन व्यक्तिस्नेही आरोग्य सेवा निर्माण करण्याला.
  • (C) तरुण व्यक्तींना विविध स्वरूपाची प्रदूषणे कमी करणे, परिस्थितिस्नेही जीवनशैली स्वीकारणे, जीवविघटनक्षम आणि ऊर्जाबचत करणारी उत्पादने रचणे, अन्न, पाणी ऊर्जा यांच्या अपव्ययाला प्रतिबंध करणे इत्यादीसारख्या विधायक आणि आव्हानात्मक कृतींत गुंतवण्याला.
  • (D) सर्व संबंधितांना, तरुण व्यक्तींना आत्महत्येकडे लोटण्याची शक्यता असणाऱ्या वर्तनाबाबत दक्ष राहायला मदत देण्याला.
अचूक उत्तर: पर्याय (B) शैक्षणिक आणि सामुदायिक सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या संस्थांच्या सहभागाने किशोरवयीन व्यक्तिस्नेही आरोग्य सेवा निर्माण करण्याला.

योग्य उत्तर पर्याय 2 (शैक्षणिक आणि सामुदायिक सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या संस्थांच्या सहभागाने किशोरवयीन व्यक्तिस्नेही आरोग्य सेवा निर्माण करण्याला) आहे. सार्वजनिक आरोग्य प्रशासकीय विश्लेषण : आरोग्य विभागाचा वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर म्हणून तुमचे मूळ...

प्रश्न #78 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 78. वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थींना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंबंधित निर्णय घ्यायला साहाय्य देण्याचा कार्यभार तुमच्याकडे सोपवलेला आहे. रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना तुमच्या प्रशिक्षणार्थीला पाठचे दिवे नसलेली चारचाकी आढळली. प्रशिक्षणार्थीने चालकाला गाडी थांबवण्याचा हुकूम दिला आणि तपशीलात जाऊन चौकशी केली. तो स्वतःच संबंधित गाडीचा मालक आहे आणि स्वतःच्या जुळ्या मुलींच्या दर्जेदार शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी तो दिवसा एक आणि पूर्वरात्री एक अशा दोन नोकऱ्या करतो व त्यामुळे सदर बाब त्याच्या लक्षात आली नाही असे चालकाने सांगितले. स्वतःच्या दाव्यांसंबंधातील सर्व दस्तावेजही त्याने दाखवले. प्रशिक्षणार्थीने त्याला बऱ्याच मोठ्या रकमेचा दंड देण्यास फर्मावले. मी जाणूनबुजून नियम तोडलेला नाही आणि यापुढे मी काळजी घेईन असे चालक गयावया करून विनवू लागला. प्रशिक्षणार्थीने तुम्हाला तोडगा सुचवण्याची विनंती केली आहे. तुम्ही सुचवाल :
EN Q. 78. You are in the charge of assisting trainees of the traffic control department to make decisions related to on-the-spot punishment for the violations of traffic rules. While patrolling during the night your trainee came across a car without rear lights. The trainee ordered the driver to stop the car and conducted a detailed inquiry. Driver revealed that he is the owner of the car in question and does two jobs; one during the day and one during the early night to save money for providing quality education for his two twin daughters and thus failed to notice the situation. He also produced all the documents related to his claims. The trainee ordered him to pay quite a big amount as a fine. The driver started pleading repeatedly that he did not violate the rule knowingly and will be careful hereafter, The trainee requests you to suggest a solution. You will suggest that,
  • (A) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना आपण नेहमीच विभागाने निर्धारित केलेला दंड केला पाहिजे कारण सुव्यवस्था राखणे हे आपले कर्तव्य आहे.
  • (B) व्यक्ती गरजू वाटते म्हणून तिला वाजवी रक्कम दंड म्हणून द्यायला सांगा आणि तो तिचा पहिला गुन्हा आहे म्हणून जाऊ द्याल.
  • (C) त्याला काही वेळ न्यायालयीन कोठडीत ठेवून नंतर समज देऊन सोडून देणे ठीक होईल.
  • (D) दुर्लक्ष होण्यासंबंधी चालकाकडे सबळ कारण असल्यामुळे त्याचं जगणं कठीण करण्याऐवजी त्याला कडक समज देऊन सोडून द्या.
अचूक उत्तर: पर्याय (D) दुर्लक्ष होण्यासंबंधी चालकाकडे सबळ कारण असल्यामुळे त्याचं जगणं कठीण करण्याऐवजी त्याला कडक समज देऊन सोडून द्या.

प्रश्न #79 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 79. एका आस्थापनाकडून “आस्थापनाची सामाजिक जबाबदारी” (CSR) या योजनेअंतर्गत, जीवनाच्या सर्व पैलूंसंबंधात नवनिर्मिती प्रस्थापित करण्यासाठी निधी देणाऱ्या कचेरीत प्रमुख म्हणून तुमची नेमणूक झाली आहे. तुमच्याकडे दोन मागण्या आल्या आहेत आणि त्यातील फक्त एकीची निवड तुम्हाला करायची आहे. नवोपक्रमित योग व्यवहार करून लोकांना आध्यात्मिक होण्यासाठी धर्म, जात किंवा पंथ यांच्या निरपेक्ष मदत देणे हे यातील एका संघटनेचे ध्येय आहे. या संघटनेची प्रमुख शहरातील एका प्रभावी नेत्याची गुरू आहे आणि तो नेता तुमच्यावर तिच्या मागणीची निवड करावी म्हणून दबाव आणत आहे. तरुण उद्योजकांच्या दुसऱ्या नवोपक्रमशील संघटनेला शहर स्वच्छ राखणाऱ्या सफाई सेवकांना देणारी उपकरणे विकसित करायची आहेत. त्यांची उपकरणे कर्मचाऱ्यांना स्वतः घाणेरडे न होता सर्व प्रकारची घाण हाताळायला मदत करतील व विविध रोगांना बळी जाण्यापासून वाचवतील अशी हमी संघटनेने काही प्रात्यक्षिकांसह दिलेली आहे. तुम्ही...
EN Q. 79. You have been appointed as the head of the office that allocates funds for promoting innovations in all walks of life by a corporation under the CSR (Corporate Social Responsibility) scheme. You have received two proposals and as a rule, you need to select only one of these. One organization aims at assisting people for becoming spiritual irrespective of religion, caste, or creed, using innovative yoga practices. The head of this organization is the guru of one of the influential leaders from the city and he is pressurizing you to select his proposal. Another enterprise of young entrepreneurs wants to develop tools for sanitation workers who maintain the city clean on no-profit basis. With some demonstrations, the enterprise guarantees that their tools will help workers to handle all sort of dirt without getting dirty and save them from becoming prone to various diseases. You will :
  • (A) समाजातील भ्रष्टाचार, अन्याय आणि पिळवणूक यांचे निर्मूलन करण्यासंबंधात आध्यात्मिकतेने काही सकारात्मक भूमिका घेतली आहे असे आतापर्यंत तुमच्या पाहण्यात नसल्याने तुम्ही निर्णय घेणे लांबणीवर टाकाल.
  • (B) या लोकांना आरोग्यपूर्ण व सन्मानाचे जीवन जगण्याचा हक्क आहे म्हणून अशा उपकरणांचे तातडीने विकसन करण्याची गरज असल्याने तुम्ही उद्योजकांच्या गटाला निधी द्याल.
  • (C) दोघांनाही समाधानी ठेवण्यासाठी दोन्ही अर्जदारांना उपलब्ध निधी सारखा विभागून देण्यासाठी व्यवस्थापनाकडून खास परवानगी मिळवाल.
  • (D) शहरात या गुरूचे श्रीमंत असे अनेक शिष्य असल्याने आणि व्यापक समाजाच्या लाभासाठी ते चांगले काम करत असल्याचे त्यांचे मत असल्याने तुम्ही आध्यात्मिक संघटनेला निधी द्याल.
अचूक उत्तर: पर्याय (B) या लोकांना आरोग्यपूर्ण व सन्मानाचे जीवन जगण्याचा हक्क आहे म्हणून अशा उपकरणांचे तातडीने विकसन करण्याची गरज असल्याने तुम्ही उद्योजकांच्या गटाला निधी द्याल.

योग्य उत्तर पर्याय 2 (या लोकांना आरोग्यपूर्ण व सन्मानाचे जीवन जगण्याचा हक्क आहे म्हणून अशा उपकरणांचे तातडीने विकसन करण्याची गरज असल्याने तुम्ही उद्योजकांच्या गटाला निधी द्याल) आहे. व्यावसायिक नैतिकता आणि प्राधान्यक्रम (Professional Ethics & Public...

प्रश्न #80 📅 MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019
+1.0 / -0.25
प्र. 80. नुकतीच तुमची नेमणूक एका प्रभागातील झाडांची जोपासना व ओंडक्यांच्या अवैध वाहतुकीवरील बंदी यावर देखरेख करणाऱ्या विभागात झाली आहे. सार्वजनिक बसमधून प्रवास करताना तुम्हाला पुढच्या बाकावर बसलेल्या सहप्रवाशांचा संवाद ऐकण्याचा योग आला. ते तुमच्या आता राज्याच्या विभाग प्रमुखपदी बढती मिळालेल्या पूर्वाधिकाऱ्यांच्या कामाची स्तुती करत होते. त्यांच्या चर्चेनुसार तुमचे पूर्वाधिकारी खूप चांगली व्यक्ती आहे. त्यांनी कधीच लाच घेतली नाही आणि भागातील झाडे तोडल्याबद्दल कोणाही व्यक्तीविरुद्ध कारवाई केली नाही. अनेक प्रसंगी बेकायदेशीर वृक्षतोड करण्यावरही त्यांनी कधी आक्षेप घेतला नाही. तुम्ही...
EN Q. 80. Recently you are appointed as the head of a department that looks after conserving trees in the area and prevention of illegal transport of logs. While traveling by public bus you got a chance to hear a conversation between fellow passengers occupying the next seats. They were praising the work of your predecessor who is now promoted as the state-wide head of the department. According to their discussion, your predecessor was a very good person, who never took bribes and did not prosecute persons for cutting trees in the area. He never objected to cutting trees even though in many instances it was illegal. You would :
  • (A) संवादात सहभागी होऊन तुमच्या पूर्वाधिकाऱ्यांच्या लोकप्रियतेबाबत अधिक जाणून घ्याल व लोकांना समाधानी ठेवण्यासाठी तुमच्या डावपेचांचे नियोजन कराल.
  • (B) संवादात सहभागी होऊन तुमचे पूर्वाधिकारी जरी चांगली व्यक्ती होते तरी त्यांनी त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडले नाही हे पटवून द्याल.
  • (C) त्या भागातील शाळा व महाविद्यालयांच्या मदतीने लोकांच्या संबंधित कायद्याच्या आकलनासंबंधाने सर्वेक्षण कराल आणि लोकांना या कायद्याच्या महत्त्वाबाबत जागरूक करण्यासाठी उपक्रम कराल.
  • (D) त्यांच्या वृक्षतोडीसंबंधीच्या कायद्यांच्या आकलनाची माहिती मिळवण्यासाठी संवादात सहभागी व्हाल आणि संबंधित कायद्यांच्या अंमलबजावणीचे तुमचे डावपेच रचाल.
अचूक उत्तर: पर्याय (C) त्या भागातील शाळा व महाविद्यालयांच्या मदतीने लोकांच्या संबंधित कायद्याच्या आकलनासंबंधाने सर्वेक्षण कराल आणि लोकांना या कायद्याच्या महत्त्वाबाबत जागरूक करण्यासाठी उपक्रम कराल.

योग्य उत्तर पर्याय 3 (त्या भागातील शाळा व महाविद्यालयांच्या मदतीने लोकांच्या संबंधित कायद्याच्या आकलनासंबंधाने सर्वेक्षण कराल आणि लोकांना या कायद्याच्या महत्त्वाबाबत जागरूक करण्यासाठी उपक्रम कराल) आहे. प्रशासकीय दृष्टिकोन (Public Administration...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स