📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 70)

Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning

'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,708 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 70 / 86
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))

2 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1,381 ते 1,400 (एकूण 1,708)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
अ) बाबा आमटेंना 1999 साली आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार मिळाला.
ब) या पुरस्काराची सुरुवात महात्मा गांधींच्या 120 व्या जयंती दिनी झाली होती.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements is NOT correct?
a) Baba Amte received the International Gandhi Peace Prize in 1999.
b) This prize was instituted on the 120th birth anniversary of Mahatma Gandhi.
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही नाही
  • (D) दोन्हीही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना त्यांच्या कुष्ठरोग निवारण, आदिवासी कल्याण आणि मानवतावादी सेवेसाठी 1999 चा आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता (बरोबर आहे). 2...

+1.0 / -0.25
“अस्पृश्यता हा हिंदू समाजाचा गँगरीन ग्रस्त अवयव आहे आणि तो दूर करण्यासाठी उपाययोजना केली नाही तर समाज पंगू होईल आणि .........नष्ट होईल." हे विधान खालीलपैकी कोणी केले?
EN "Untouchability is a gangrenous limb of Hindu society, and if measures are not taken to remove it, society will become crippled and ......... will be destroyed." Who among the following made this statement?
  • (A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • (B) छ. शाहू महाराज
  • (C) महात्मा गांधी
  • (D) पं. मदन मोहन मालवीय
अचूक उत्तर: पर्याय (C) महात्मा गांधी

अस्पृश्यतेविषयी महात्मा गांधींचे उद्गार: 1. विधान: *"अस्पृश्यता हा हिंदू समाजाचा गँगरीन ग्रस्त अवयव (gangrenous limb) आहे आणि तो दूर करण्यासाठी उपाययोजना केली नाही तर समाज पंगू होईल आणि नष्ट होईल."* 2. संदर्भ: हे ऐतिहासिक आणि मार्मिक विचार...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान चूक आहे :
EN Which of the following statements is incorrect?
  • (A) राष्ट्रीय मागास वर्ग आयोग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयास इतर मागास वर्गाच्या केंद्रीय यादीत समावेश करण्याच्या जाती, उपजाती इ. बाबत सल्ला देतो.
  • (B) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत मागास वर्ग विभाग, इतर मागास वर्गाच्या सक्षमीकरणासाठी धोरण ठरविणे, नियाजन करणे व कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची काळजी घेतो.
  • (C) अक्षमता असलेल्या व्यक्तींच्या सक्षमीकरणाची जबाबदारी न्याय व सक्षमीकरण मंत्रालयावर आहे.
  • (D) अल्पसंख्यांकाच्या सक्षमीकरणाची (कल्याणाची) जबाबदारी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयावर आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) अल्पसंख्यांकाच्या सक्षमीकरणाची (कल्याणाची) जबाबदारी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयावर आहे.

मंत्रालयांची जबाबदारी - चुकीचे विधान ओळखणे: 1. विधाने तपासू: - विधान 1: राष्ट्रीय मागासवर्ग आयोग (NCBC) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाला इतर मागासवर्गाच्या केंद्रीय यादीत जातींचा समावेश करण्याबाबत सल्ला देतो (बरोबर आहे). - विधान 2: सामाजिक...

+1.0 / -0.25
'टाटा इन्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ने केलेल्या पाहणीनुसार वृद्धांना जास्तीत जास्त भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या आहेत ?
अ) आर्थिक समस्या ब) आरोग्य व वैद्यकीय समस्या
क) वेळ कसा घालवावा ड) एकटेपणा
पर्यायी उत्तरे:
EN According to a survey conducted by the Tata Institute of Social Sciences (TISS), which problems are faced the most by the elderly?
a) Financial problems b) Health and medical problems
c) How to spend time d) Loneliness
Answer options:
  • (A) अ आणि ब
  • (B) अ आणि क
  • (C) ब आणि ड
  • (D) क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) अ आणि क

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) पाहणी - वृद्धांच्या समस्या: 1. पाहणीचे निष्कर्ष: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने (TISS) भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर केलेल्या समाजशास्त्रीय पाहणीनुसार, वृद्धांना प्रामुख्याने दोन सर्वात...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत रु. 21,000/ - पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील लाभधारक सदस्याला फक्त रु. 400/- इतकी निवृत्ती वेतनाची रक्कम मिळते.
ब) या योजनेकरीता 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले निराधार पात्र आहेत.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements is correct?
a) Under Shravan Bal Seva State Pension Scheme, a beneficiary member from a family having annual income up to Rs. 21,000/- gets a pension amount of only Rs. 400/-.
b) Destitute persons aged above 60 years are eligible for this scheme.
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही नाही
  • (D) दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही नाही

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ: श्रावण बाळ योजनेत (गट ब) ₹21,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील लाभार्थ्याला दरमहा केवळ ₹400 नव्हे, तर दरमहा ₹600 (आता सुधारित ₹1,500) इतके निवृत्ती वेतन दिले...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) वृद्धत्वासंबंधीचे दुसरे जागतिक अधिवेशन लिस्बनमध्ये साल 2002 मध्ये भरले होते.
ब) याकरता ठरविलेला लोगो सन 1999 च्या वयस्क लोकांकरताच्या आंतरदेशीय वर्षाच्या लोगोपासून घेतला गेला.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements is correct?
a) The Second World Assembly on Ageing was held in Lisbon in the year 2002.
b) The logo decided for this was adopted from the logo of the 1999 International Year of Older Persons.
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही नाही
  • (D) दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

वृद्धत्वावरील दुसरे जागतिक अधिवेशन (Second World Assembly on Ageing): 1. विधान अ: वृद्धत्वावर संयुक्त राष्ट्रांचे दुसरे जागतिक अधिवेशन 2002 मध्ये पोर्तुगालमधील लिस्बन येथे नव्हे, तर माद्रिद, स्पेन (Madrid, Spain) येथे 8 ते 12 एप्रिल 2002 दरम्यान...

+1.0 / -0.25
माता-पिता आणि ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण अधिनियम (2007) नुसार :
अ) “मुले' म्हणजे मुलगा, मुलगी, अल्पवयीन नातू आणि नात.
ब) “पालक" म्हणजे दत्तक पिता किंवा माता असा अर्थ होत नाही.
क) “ज्येष्ठ नागरिक' म्हणजे साठ वर्षांचा किंवा त्यापेक्षा अधिक वयाचा कोणीही भारतीय नागरिक.
ड) “निर्वाह' या संकल्पनेत वैद्यकीय उपचारांचा समावेश होतो.
पर्यायी उत्तरे:
EN According to the Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act (2007):
a) 'Children' includes son, daughter, minor grandson and minor granddaughter.
b) 'Parent' does not include adoptive father or adoptive mother.
c) 'Senior citizen' means any citizen of India who has attained the age of sixty years or above.
d) 'Maintenance' includes provision for medical attendance and treatment.
Answer options:
  • (A) फक्त अ बरोबर आहे
  • (B) फक्त ब बरोबर आहे
  • (C) फक्त क आणि ड बरोबर आहे
  • (D) फक्त अ आणि ड बरोबर आहे
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त क आणि ड बरोबर आहे

माता-पिता आणि ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण अधिनियम, 2007: 1. विधान अ (चूक): या कायद्यानुसार 'मुले' (Children) यामध्ये सज्ञान मुलगा, मुलगी, सज्ञान नातू आणि सज्ञान नात यांचा समावेश होतो; अल्पवयीन (Minor) मुले/नातवंडे यात येत नाहीत. 2. विधान ब...

+1.0 / -0.25
खालील विधानांपैकी कोणती खरी नाहीत?
अ) भारतातील साठ वर्षावरील स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा वैधव्याचे प्रमाण खूप अधिक आहे कारण
(i) स्त्रिया त्यांच्यापेक्षा वयाने खूप वर्षांनी मोठे असणाऱ्या पुरुषांशी विवाह करतात.
(ii) बऱ्याच स्त्रिया पुनर्विवाह करत नाहीत
(iii) स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा अधिक असते.
ब) सन 1991 मध्ये वैधव्य गाठलेल्या स्त्रिया पुरुषांपेक्षा दुप्पट होत्या
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements is/are not true?
a) The incidence of widowhood among women aged above 60 years in India is much higher than in men because:
(i) Women marry men who are much older than them.
(ii) Many women do not remarry.
(iii) Life expectancy of women is higher than that of men.
b) In 1991, the number of widowed women was double that of widowed men.
Answer options:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्हीही नाही
  • (D) दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ ब

भारतातील वृद्ध स्त्रियांमधील वैधव्याचे प्रमाण: 1. विधान अ (सत्य आहे): भारतातील 60 वर्षांवरील वृद्ध स्त्रियांमध्ये वैधव्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. याची मुख्य कारणे म्हणजे: (i) स्त्रियांचा विवाह त्यांच्यापेक्षा वयाने 5 ते 10...

+1.0 / -0.25
पुढील विचार फेब्रुवारी 2012 मध्ये भरलेल्या 44 व्या भारतीय कामगार परिषदेत कोणी मांडले?
युवा रोजगार हा आपल्या सरकारचा अधिक प्राधान्याचा विषय आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण जलद गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या मागणीनुसार आपल्या युवकांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करू.
EN Who expressed the following views at the 44th Indian Labour Conference held in February 2012?
'Youth employment is a high priority for our government. This will be possible only when we equip our youth with the necessary skills demanded by a fast growing economy.'
  • (A) श्री. प्रणव मुखर्जी
  • (B) डॉ. मनमोहन सिंग
  • (C) श्री. सिस राम ओला
  • (D) श्री. जितेंद्र सिंग
अचूक उत्तर: पर्याय (B) डॉ. मनमोहन सिंग

44 वी भारतीय कामगार परिषद (ILC 2012) - उद्घाटन भाषण: 1. संदर्भ व विचार: फेब्रुवारी 2012 मध्ये नवी दिल्ली येथे भरलेल्या 44 व्या भारतीय कामगार परिषदेचे (44th Indian Labour Conference) उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh)...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
अ) कंत्राटी कामगार (नियंत्रण आणि निर्मुलन) कायदा त्या घटकांना लागू आहे ज्यात 30 किंवा अधिक कामगार आहेत.
ब) कंत्राटी कामगार कायदा त्या घटकांना लागू नाही ज्यात काम अधून मधून किंवा हंगामी स्वरूपाचे असते.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements is not correct?
a) The Contract Labour (Regulation and Abolition) Act applies to establishments having 30 or more workmen.
b) The Contract Labour Act does not apply to establishments where work is of an intermittent or casual/seasonal nature.
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही नाही
  • (D) दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

कंत्राटी कामगार (नियंत्रण आणि निर्मूलन) कायदा, 1970 - अयोग्य विधान: 1. विधान अ (योग्य नाही/चुकीचे): कंत्राटी कामगार कायदा, 1970 च्या कलम 1(4) नुसार, हा कायदा ज्या आस्थापना किंवा कंत्राटदाराकडे 20 किंवा अधिक कामगार (30 नव्हे) कार्यरत आहेत, त्यांना...

+1.0 / -0.25
आंतरराष्ट्रीय श्रमिन संघटनेने एच.आय.व्ही./एड्स आणि कामगार जगासंबंधी मांडलेल्या आचारसंहिते मध्ये खालील मुद्यांसंबंधी मार्गदर्शन केले आहे :
अ) एच. आय. व्ही. / एड्स चा प्रसार रोखणे.
ब) कलंक किंवा लांछनाची भावना दूर करणे.
क) बाधीत कामगारांची देखभाल आणि त्यांना आधार देणे.
पर्यायी उत्तरे:
EN The ILO code of practice on HIV/AIDS and the world of work provides guidelines on which of the following points?
a) Prevention of HIV/AIDS transmission
b) Eliminating stigma and discrimination
c) Care and support of infected/affected workers
Answer options:
  • (A) फक्त अ बरोबर आहे
  • (B) वरील सर्व विधाने बरोबर
  • (C) अ व क बरोबर आहेत
  • (D) फक्त क बरोबर आहे
अचूक उत्तर: पर्याय (B) वरील सर्व विधाने बरोबर

ILO ची एचआयव्ही/एड्स आणि कामगार जगताविषयीची आचारसंहिता: 1. आचारसंहितेचा गाभा: आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (ILO) कामाच्या ठिकाणी एच.आय.व्ही./एड्सच्या संदर्भात 2001 मध्ये एक जागतिक आचारसंहिता (Code of Practice on HIV/AIDS and the World of Work) जाहीर...

+1.0 / -0.25
खालील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे?
अ) भारतातील कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण दोन टप्प्यात झाले, पहिल्यांदा नॉन कोकींग कोळशाच्या खाणींचे झाले.
ब) कोकींग कोळशाच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण सन 1972 मध्ये झाले व त्या हिंदुस्थान कोकींग कोल लिमीटेड मध्ये विलीन झाल्या.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is correct?
a) Nationalization of coal mines in India took place in two phases, first with non-coking coal mines.
b) Coking coal mines were nationalized in the year 1972 and merged into Bharat Coking Coal Limited (BCCL).
Answer options:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) काहीही नाही
  • (D) दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (C) काहीही नाही

भारतातील कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (चूक): भारतात कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण दोन टप्प्यांत झाले, परंतु पहिल्या टप्प्यात कोकिंग कोळशाच्या (Coking Coal) खाणींचे राष्ट्रीयीकरण झाले (1971-72); त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) एक कामगार संघटना म्हणून 'सेवा' (एस.इ.डब्ल्यू.ए.) या संस्थेची नोंदणी 1982 साली करण्यात आली.
ब) ही गरीब स्त्रियांची संघटना पूर्ण रोजगारीकरिता आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements is correct?
a) SEWA (Self-Employed Women's Association) was registered as a trade union in the year 1982.
b) This organization of poor self-employed women is for full employment.
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही नाही
  • (D) दोन्हीही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

'सेवा' (SEWA - Self-Employed Women's Association): 1. विधान अ (चूक): प्रसिद्ध समाजसेविका इला भट्ट (Ela Bhatt) यांनी 'सेवा' (SEWA) या संस्थेची स्थापना आणि कामगार संघटना (Trade Union) म्हणून अधिकृत नोंदणी 1972 मध्ये (1982 नव्हे) अहमदाबाद, गुजरात येथे...

+1.0 / -0.25
माध्यमिक राज्यांमध्ये अपंगांकरिता समाविष्ट शिक्षण या योजनेमध्ये पूर्व माध्यमिक शिक्षण उत्तीर्ण करणारे आणि शासकीय, स्थानिक, शासनसहाय्यित शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलांचा समावेश करण्यात आला आहे. जे 14+ ते 18+ (इ. 9 वी ते 12 वी) वयाचे आहेत. आणि आणि मध्ये उल्लेखित दोष इ. केलेल्या ज्यांना एक किंवा एकपेक्षा अधिक अपंगता आहे. अपंगता नामोल्लेख याप्रमाणे - अन्धत्व, कमी दृष्टी, उपचारित मिर्गी, श्रवण.
EN Under the Inclusive Education for Disabled at Secondary Stage (IEDSS) scheme, all children who have passed upper primary education and are studying in government, local body, and government-aided schools in the age group 14+ to 18+ (Classes IX to XII) having one or more disabilities mentioned under ________ and ________ are covered (disabilities such as blindness, low vision, leprosy cured, hearing impairment, etc.):
  • (A) अपंगत्व कायदा (1995), राष्ट्रीय विश्वस्त अधिनियम (1999).
  • (B) अपंगत्व कायदा (1994), राष्ट्रीय विश्वस्त अधिनियम (1999).
  • (C) अपंगत्व कायदा (2004), राष्ट्रीय विश्वस्त कायदा (2006).
  • (D) यापैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (A) अपंगत्व कायदा (1995), राष्ट्रीय विश्वस्त अधिनियम (1999).

माध्यमिक स्तरावरील दिव्यांगांसाठी समाविष्ट शिक्षण (IEDSS) मधील कायदे: 1. योजनेची पार्श्वभूमी: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 2009-10 मध्ये सुरू केलेल्या IEDSS योजनेअंतर्गत 9 वी ते 12 वी मधील दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण दिले...

+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींना सामाजिक दृष्ट्या अपंग' म्हणता येईल?
अ) मूकबधीर ब) अनाथ
क) परित्यक्ता ड) वेडा
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following persons can be termed 'socially handicapped'?
a) Deaf and mute
b) Orphan
c) Deserted woman / destitute
d) Insane

Answer options:
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) क आणि ड
  • (D) अ आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) ब आणि क

सामाजिक दृष्ट्या अपंग (Socially Handicapped): 1. संकल्पना: समाजशास्त्र आणि समाजकल्याण विभागाच्या वर्गीकरणानुसार: - शारीरिक/मानसिक अपंग (Physically/Mentally Handicapped): मूकबधिर, अंध, अस्थिव्यंग, वेडा/मनोविकृत हे जैविक किंवा वैद्यकीय अपंग आहेत...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते अपंगत्व पी. डब्लु. डी. 1995 कायद्यामध्ये समाविष्ट केलेले नाही?
अ) अल्प दृष्टी ब) मतीमंद
क) बहिरेपणा ड) मानसिक आजार
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following disabilities is NOT included in the Persons with Disabilities (PwD) Act, 1995?
a) Low vision
b) Mental retardation
c) Hearing impairment / deafness
d) Mental illness

Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) अ आणि ब
  • (C) अ, ब आणि ड
  • (D) वरील तिन्हींपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील तिन्हींपैकी कोणतेही नाही

अपंग व्यक्ती कायदा, 1995 मधील समाविष्ट अपंगत्वे: 1. कायद्यातील ७ अपंगत्वे: 'अपंग व्यक्ती कायदा, 1995' च्या कलम 2(i) नुसार खालील 7 अपंगत्वे अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली होती: - (1) अंधत्व (Blindness) - (2) अल्प दृष्टी (Low Vision) - (3) कुष्ठरोग...

+1.0 / -0.25
पुढील विधानांवर विचार करा.
अ) अपंग व्यक्ती कायदा 1995, 1996 मध्ये अधिसूचित करण्यात आला.
ब) त्यामध्ये केंद्र, राज्य आणि स्थानिक शासनाच्या जबाबदाऱ्यांची यादी दिली आहे.
क) या कायद्यामध्ये केंद्रीय पातळीवर एक मुख्य आयुक्त आणि प्रत्येक राज्यामध्ये एका आयुक्ताची तरतूद करण्यात आली आहे.
ड) मुख्य आयुक्तांना फौजदारी न्यायालयाचे अधिकार आहेत.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements:
a) The Persons with Disabilities Act, 1995 was notified in 1996.
b) It lists the responsibilities of the Central, State, and local governments.
c) Under this Act, provision is made for a Chief Commissioner at the central level and a Commissioner in each State.
d) The Chief Commissioner has the powers of a criminal court.

Answer options:
  • (A) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
  • (B) फक्त अ, ब आणि क बरोबर आहेत.
  • (C) फक्त ड बरोबर आहे.
  • (D) फक्त क बरोबर आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त अ, ब आणि क बरोबर आहेत.

अपंग व्यक्ती कायदा 1995 - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (बरोबर): 1995 मध्ये संमत झालेला हा कायदा 1 जानेवारी 1996 रोजी राजपत्रात अधिसूचित करून लागू करण्यात आला (बरोबर आहे). 2. विधान ब (बरोबर): या कायद्यात अपंगांच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी आणि...

+1.0 / -0.25
खालील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) वर्ष 2000 ओरिसाच्या वादळानंतर आणि जानेवारी 2001 च्या गुजरात भूकंपानंतर एम एच आर डी तर्फे 2003 ला एन पी ई ई ई हा एक सर्वंकष कार्यक्रम सुरू करण्यात आला.
ब) या कार्यक्रमात सुसूत्रता राखण्याचे काम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेंसिंगला देण्यात आले.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is correct?
a) After the Orissa cyclone in 1999/2000 and the Gujarat earthquake in January 2001, a comprehensive NPEEE program was initiated by MHRD in 2003.
b) The coordination of this program was assigned to the Indian Institute of Remote Sensing.

Answer options:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) न अ न ब
  • (D) दोन्हीही अ व ब
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ

NPEEE कार्यक्रम - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (योग्य): 1999 च्या ओडिशा सुपर सायक्लॉन आणि 26 जानेवारी 2001 च्या विनाशकारी गुजरात भूकंपाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (MHRD) 2003 मध्ये 'नॅशनल प्रोग्राम ऑन अर्थक्वेक...

+1.0 / -0.25
खालील विधानांपैकी कोणते चुकीचे आहे?
अ) थाई भाषेतील ‘फायलिन' या संज्ञेचा अर्थ आपत्ती असा आहे.
ब) त्या आधीचे चक्रीवादळ जे भारतीय उपमहाद्वीपात बांगलादेशमध्ये झाले त्यास नाव महासेन देण्यात आले जे मलेशियाने सुचविले होते.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements is incorrect?
a) The term 'Phailin' in Thai language means 'disaster'.
b) The earlier cyclone that occurred in Bangladesh in the Indian subcontinent was named 'Mahasen', which was suggested by Malaysia.

Answer options:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्हीही नाही
  • (D) दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (D) दोन्ही

+1.0 / -0.25
खालील विधानांपैकी कोणते खरे आहे?
अ) 2013 मधील हैयान या चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम फिलीपाइन्स या देशावर झाला.
ब) फिलीपाईन्स दक्षिण अटलांटिक महासागरात आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements is true?
a) Typhoon Haiyan in 2013 had the maximum impact on the Philippines.
b) The Philippines is located in the South Atlantic Ocean.

Answer options:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) काहीही नाही
  • (D) दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ

चक्रीवादळ 'हैयान' (Typhoon Haiyan): 1. विधान अ (खरे आहे): नोव्हेंबर 2013 मध्ये आलेल्या श्रेणी-5 च्या अत्यंत तीव्र अशा 'हैयान' (स्थानिक नाव: योलांडा - Yolanda) या चक्रीवादळाचा सर्वात भीषण तडाखा फिलिपाइन्स या देशाला बसला, ज्यात 6 हजारांहून अधिक...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स