🏛️ इतिहास व महाराष्ट्राचा इतिहास • TOPIC PRACTICE HUB

आधुनिक भारताचा इतिहास व स्वातंत्र्य चळवळ

Modern Indian History & Freedom Movement — History of India & Maharashtra

'आधुनिक भारताचा इतिहास व स्वातंत्र्य चळवळ' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 9,543 MCQs
विषय विभाग इतिहास व समाजसुधारक
पृष्ठ क्रमांक 1 / 478
🎯 आरोग्य विभाग 🎯 जिल्हा परिषद (ZP)

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in आधुनिक भारताचा इतिहास व स्वातंत्र्य चळवळ)

17 उपघटक
युरोपियनांचे आगमन, ब्रिटिश सत्ता स्थापना व विस्तार
Advent of Europeans & Expansion of British Rule
376 प्रश्न
ब्रिटिशांची महसूल पद्धती, जमीन सुधारणा व आर्थिक धोरण
British Economic Policies, Land Revenue & Impact
121 प्रश्न
घटनात्मक विकास, सनदी कायदे व व्हाईसरॉय कालखंड
Constitutional Developments, Charter Acts & Viceroys
177 प्रश्न
१८५७ चा राष्ट्रीय उठाव: कारणे, विस्तार व परिणाम
Revolt of 1857: Causes, Leadership & Impact
77 प्रश्न
शेतकरी, कामगार व आदिवासींचे उठाव आणि चळवळी
Peasant, Labour & Tribal Uprisings in India
170 प्रश्न
आधुनिक पाश्चात्य शिक्षण प्रसार व शैक्षणिक समित्या
Evolution of Modern Education & Commissions
134 प्रश्न
सामाजिक व धार्मिक प्रबोधन चळवळी आणि संस्था
Socio-Religious Reform Movements & Organizations
350 प्रश्न
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना व मवाळ कालखंड
Foundation of Indian National Congress & Moderate Era
134 प्रश्न
लोकमान्य टिळक, जहाल राष्ट्रवाद व होमरूल चळवळ
Lokmanya Tilak, Extremist Nationalism & Home Rule Movement
87 प्रश्न
मुस्लिम लीगची स्थापना व खिलाफत चळवळ
All India Muslim League & Khilafat Movement
20 प्रश्न
सशस्त्र क्रांतिकारी चळवळ व देशभक्त क्रांतिकारक
Revolutionary Freedom Movement & Freedom Fighters
134 प्रश्न
गांधीयुगाची सुरुवात व प्रारंभिक सत्याग्रह
Advent of Mahatma Gandhi & Early Satyagrahas
52 प्रश्न
असहकार चळवळ, चौरीचौरा व स्वराज्य पक्ष
Non-Cooperation Movement & Swaraj Party
68 प्रश्न
सायमन कमिशन, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंग व गोलमेज परिषदा
Civil Disobedience Movement & Round Table Conferences
51 प्रश्न
चले जाव आंदोलन (१९४२), प्रांतिक सरकारे व स्वातंत्र्याकडे वाटचाल
Quit India Movement (1942) & Final Phase to Independence
95 प्रश्न
आझाद हिंद सेना व नेताजी सुभाषचंद्र बोस
Indian National Army & Netaji Subhash Chandra Bose
22 प्रश्न
स्वातंत्र्योत्तर भारत: संस्थानांचे विलीनीकरण व राष्ट्र उभारणी
Post-Independence India: Integration of Princely States
184 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 9,543)
+1.0 / -0.25
वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले ?
अ. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली
ब. मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला
क. भारतात नागरीकरणाचा वेग वाढला
ड. देशी उद्योगधंद्यात वाढ झाली
EN Which of the following changes took place in India due to colonialism?
a. The feeling of nationalism grew
b. Medieval regimes came to an end
c. The pace of urbanization in India increased
d. Indigenous industries grew
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त अ, ब आणि क
  • (C) फक्त ब आणि क
  • (D) फक्त ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त ब आणि क

योग्य उत्तर: पर्याय (३) फक्त ब आणि क सविस्तर विश्लेषण: ब्रिटिश वसाहतवादामुळे भारतात घडून आलेल्या सामाजिक व राजकीय परिवर्तनांचे विश्लेषण: * विधान अ: राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली (वसाहतवादाच्या शोषणाविरोधातील प्रतिक्रियेतून हा आधुनिक परिणाम झाला...

+1.0 / -0.25
वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले ?
अ. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली
ब. मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला
क. भारतात नागरीकरणाचा वेग वाढला
ड. देशी उद्योगधंद्यात वाढ झाली
EN Which of the following changes took place in India due to colonialism?
a. The feeling of nationalism grew
b. Medieval regimes came to an end
c. The pace of urbanization in India increased
d. Domestic industries grew
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त ब आणि क
  • (C) फक्त अ, ब आणि क
  • (D) फक्त ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, ब आणि क

योग्य उत्तर: पर्याय (३) फक्त अ, ब आणि क सविस्तर विश्लेषण: वसाहतवादामुळे भारतात घडून आलेल्या सामाजिक व राजकीय परिवर्तनांचे विश्लेषण: * विधान अ बरोबर आहे: ब्रिटिशांच्या एकात्मिक शासनव्यवस्थेविरुद्ध आणि आर्थिक शोषणाविरुद्ध सर्व भारतीय एकत्र आल्याने...

+1.0 / -0.25
1909 च्या मोर्ले-मिन्टो सुधारणा कायद्याबद्दल "हे शुद्ध टोणग्याचे आचळ ठरतील यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही", अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली ?
EN Regarding the Morley-Minto Reforms Act of 1909, who gave the reaction: 'These will prove to be mere teats of a bullock, from which the milk of public welfare cannot be obtained'?
  • (A) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
  • (B) आर. सी. मुजूमदार
  • (C) लोकमान्य टिळक
  • (D) लाला लजपत राय
अचूक उत्तर: पर्याय (C) लोकमान्य टिळक

योग्य उत्तर: पर्याय ३ (लोकमान्य टिळक) विश्लेषण: * १९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यावर कडाडून टीका करताना लोकमान्य टिळक यांनी 'केसरी'मध्ये "हे शुद्ध टोणग्याचे आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही" अशी प्रसिद्ध प्रतिक्रिया दिली होती. *...

+1.0 / -0.25
"येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत; किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील" असे ______ यांनी ______यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते.
EN 'The people here will not sit quiet merely receiving education, nor will they be satisfied by being given a share in the administration; in fact, they will seek to establish their claim over the entire governance', was stated by ______ in a letter sent to ______.
  • (A) लॉर्ड मेकॉले पब्लिक एज्युकेशन कमिटी
  • (B) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन कोर्ट ऑफ डिरेक्टर्स
  • (C) जॉर्ज रसेल क्लार्क - ब्रिटीश पार्लमेंट
  • (D) लॉर्ड अॅम्हर्स्ट - गव्हर्नर जनरल
अचूक उत्तर: पर्याय (B) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन कोर्ट ऑफ डिरेक्टर्स

योग्य उत्तर: पर्याय २ (माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन - कोर्ट ऑफ डिरेक्टर्स) विश्लेषण: * मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर माउन्टस्टुअर्ट एल्फिन्स्टन (Mountstuart Elphinstone) यांनी लंडन येथील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सला (Court of Directors)...

+1.0 / -0.25
ब्रिटीश इंडियन असोसिएशन या संस्थेने इ.स. 1853 मध्ये चार्टर कायद्याच्या नूतनीकरण प्रसंगी संसदेकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या ?
(a) कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असावे.
(b) मोठमोठ्या उच्च पदांचे वेतन कमी करण्यात यावे.
(c) नव्या कायदेमंडळाची निर्मिती करून त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व द्यावे.
(d) मीठ, अबकारी व मुद्रा कर समाप्त करण्यात यावा.
पर्यायी उत्तरे :
EN What demands did the British Indian Association submit to the British Parliament on the occasion of the renewal of the Charter Act in 1853?
(a) The spheres of the legislature, executive, and judiciary should be separate.
(b) Salaries of high posts should be reduced.
(c) A new legislature should be created with Indian representation.
(d) Salt duty, excise duties, and stamp duties should be abolished.
Alternative answers:
  • (A) फक्त (a) आणि (d)
  • (B) (a), (b) आणि (d)
  • (C) (a), (b) आणि (c)
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) (a), (b) आणि (d)

योग्य उत्तर (a), (b) आणि (d) आहे. स्पष्टीकरण: • ब्रिटीश इंडियन असोसिएशन (British Indian Association - 1851, कलकत्ता): - या संस्थेने 1853 मध्ये ब्रिटिश संसदेत चार्टर कायद्याच्या (Charter Act of 1853) नूतनीकरण प्रसंगी एक सविस्तर अर्ज (Petition)...

+1.0 / -0.25
1857 च्या बंडाबाबत, "बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते." हे विधान कोणी केले ?
EN Regarding the 1857 revolt, who made the statement: 'If the rebels had found even a single capable leader, the British rule over India would have been destroyed'?
  • (A) लॉर्ड कॅनिंग
  • (B) सर ह्यू रोज
  • (C) जॉन लॉरेन्स
  • (D) लॉर्ड डलहौसी
अचूक उत्तर: पर्याय (C) जॉन लॉरेन्स

योग्य उत्तर: पर्याय (३) जॉन लॉरेन्स स्पष्टीकरण: • सर जॉन लॉरेन्स यांचे विधान: पंजाबचे तत्कालीन मुख्य आयुक्त आणि भारताचे भावी व्हाइसरॉय सर जॉन लॉरेन्स (Sir John Lawrence) यांनी १८५७ च्या उठावाचे गांभीर्य मान्य करताना हे ऐतिहासिक उद्गार काढले होते...

+1.0 / -0.25
31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते ?
अ. मोतीलाल नेहरू
ब. अवंतिकाबाई गोखले
क. महात्मा गांधी
ड. विठ्ठलभाई पटेल
EN On 31 October 1920, the first session of the All India Trade Union Congress was held in Mumbai under the presidency of Lala Lajpat Rai. Who among the following was NOT present at this session?
a. Motilal Nehru
b. Avantikabai Gokhale
c. Mahatma Gandhi
d. Vithalbhai Patel
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब आणि ड
  • (C) फक्त क
  • (D) फक्त ब
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त क

योग्य उत्तर पर्याय (३) आहे. स्पष्टीकरण: - ३१ ऑक्टोबर १९२० रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस' (AITUC) चे पहिले अधिवेशन भरले. - या ऐतिहासिक अधिवेशनाला पं. मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल, अवंतिकाबाई गोखले...

+1.0 / -0.25
इ.स. 1940 मधील ऑगस्ट प्रस्तावात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या ?
(a) दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारतात वसाहतीच्या धर्तीची पूर्णपणे जबाबदार शासन व्यवस्था स्थापण्यास मदत केली जाईल.
(b) गव्हर्नर जनरलच्या मंडळात आणखी काही भारतीयांचा समावेश केला जाईल.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following provisions were included in the August Offer of 1940?
(a) After the Second World War ends, assistance will be given to set up a fully responsible governance system on Dominion lines in India.
(b) More Indians will be included in the Governor-General's Council.
Alternative answers:
  • (A) पर्याय (a) योग्य व पर्याय (b) चुकीचा आहे.
  • (B) पर्याय (b) योग्य व पर्याय (a) चुकीचा आहे.
  • (C) दोन्ही तरतुदी बरोबर आहेत.
  • (D) दोन्ही तरतुदी चुकीच्या आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही तरतुदी बरोबर आहेत.

योग्य उत्तर: पर्याय (३) दोन्ही तरतुदी बरोबर आहेत. सविस्तर विश्लेषण: • ऑगस्ट प्रस्ताव (August Offer - 8 ऑगस्ट 1940): दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सचा पराभव झाल्यावर ब्रिटिश संकटात आले. भारतीयांचे युद्धात सहकार्य मिळवण्यासाठी व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो...

+1.0 / -0.25
पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?
अ. भगत सिंह व राजगुरु यांनी साँडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली.
ब. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली.
क. मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकरांनी केली.
EN Which of the following statements is incorrect?
a. Bhagat Singh and Rajguru assassinated the British officer Saunders.
b. Anant Laxman Kanhere assassinated Jackson, the Collector of Nashik.
c. The Chapekars assassinated Commissioner Rand of Bombay.
Alternative answers:
  • (A) फक्त क
  • (B) फक्त ब
  • (C) फक्त अ
  • (D) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त क

योग्य उत्तर: पर्याय १ (फक्त क) स्पष्टीकरण: • विधानांची सत्यता तपासणी: - विधान अ बरोबर आहे: १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर येथे भगतसिंग आणि राजगुरू यांनी लाला लजपत राय यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक जे. पी. साँडर्स याची गोळ्या झाडून हत्या...

+1.0 / -0.25
भुसावळ बॉम्ब खटल्यात खालीलपैकी कोणास पकडण्यात आले होते ?
EN Who among the following was arrested in the Bhusawal Bomb Case?
  • (A) सदाशिव मलकापूरकर
  • (B) विश्वनाथ वैशंपायन
  • (C) बापूसाहेब सहस्त्रबुद्धे
  • (D) गजानन पोतदार
अचूक उत्तर: पर्याय (A) सदाशिव मलकापूरकर

योग्य उत्तर: पर्याय १ (सदाशिव मलकापूरकर) स्पष्टीकरण: • हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) च्या क्रांतिकारकांनी महाराष्ट्रात भुसावळ येथे बॉम्ब निर्मिती व वाहतुकीचे केंद्र उभारले होते. • मे १९२९ मध्ये भुसावळ रेल्वे स्टेशनवर ब्रिटीश...

+1.0 / -0.25
लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतूसे बनविण्याचे शिक्षण घेण्यासाठी _______यांना नेपाळ येथे पाठविले होते.
EN To learn the manufacture of rifles and ammunition, Lokmanya Tilak sent _______ to Nepal.
  • (A) दादासाहेब खापर्डे व न. चि. केळकर
  • (B) श्रीधर अणे व श्रीपाद कुलकर्णी
  • (C) हणमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर
  • (D) कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर व दादासाहेब खापर्डे
अचूक उत्तर: पर्याय (C) हणमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर

योग्य उत्तर: पर्याय ३ (हणमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर) स्पष्टीकरण: • लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ब्रिटीश भारताबाहेर नेपाळमध्ये गुप्त दारूगोळा व बंदूक कारखाना उभारण्याची एक धाडसी गुप्त योजना (नेपाळ योजना) आखली होती. • आधुनिक रायफली आणि...

+1.0 / -0.25
लॉर्ड हार्डिंग (1844 -48) यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले ?
EN Which first war took place during the period of Lord Hardinge (1844–48)?
  • (A) इंग्रज - मराठा युद्ध
  • (B) इंग्रज - शिख युद्ध
  • (C) इंग्रज - अफगान युद्ध
  • (D) इंग्रज - मुघल युद्ध
अचूक उत्तर: पर्याय (B) इंग्रज - शिख युद्ध

योग्य उत्तर: पर्याय (२) इंग्रज - शिख युद्ध सविस्तर विश्लेषण: * लॉर्ड हार्डिंग प्रथम (कारकीर्द १८४४–१८४८): यांच्या गव्हर्नर जनरलपदाच्या कार्यकाळात पहिले इंग्रज-शिख युद्ध (First Anglo-Sikh War, १८४५–१८४६) लढले गेले. * पार्श्वभूमी: महाराजा...

+1.0 / -0.25
मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कौन्सिल अॅक्ट, 1909 च्या द्वारे ____________ केल्या.
EN In order to appease the moderates and win over the support of the Muslims, the British Government introduced _______ the Act, 1909. through the Indian Councils
  • (A) मॉर्ले-मिंटो सुधारणा
  • (B) माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणा
  • (C) भारतीय शिक्षण सुधारणा
  • (D) भारतीय नागरी सेवा सुधारणा
अचूक उत्तर: पर्याय (A) मॉर्ले-मिंटो सुधारणा

योग्य उत्तर: पर्याय १ (मॉर्ले-मिंटो सुधारणा) विश्लेषण: * १९०९ च्या इंडियन कौन्सिल ॲक्टला 'मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा' (Morley-Minto Reforms) म्हणून ओळखले जाते. * त्या वेळी जॉन मॉर्ले (John Morley) हे ब्रिटनचे भारतमंत्री (Secretary of State for...

+1.0 / -0.25
1919 च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती ?
अ. मुडीमन कमिटी ब. सायमन कमिटी
क. लॉर्ड मेकॉले कमिटी ड. हंटर कमिटी
EN Which committee was appointed to investigate the defects/working of the Act of 1919?
a. Muddiman Committee b. Simon Commission
c. Lord Macaulay Committee d. Hunter Committee
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) फक्त ब आणि क
  • (D) फक्त क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

योग्य उत्तर: पर्याय १ (फक्त अ - मुडीमन कमिटी) विश्लेषण: * १९१९ च्या माँटफोर्ड कायद्यातील त्रुटींची आणि प्रांतीय द्विदल शासनपद्धतीच्या (Dyarchy) अपयशाची चौकशी करण्यासाठी ब्रिटीश सरकारने १९२४ मध्ये मुडीमन कमिटी (Muddiman Committee) नेमली होती. *...

+1.0 / -0.25
कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला ?
अ. शेतकरी ब. जमीनदार
क. कारखानदार ड. कारागीर
EN Which class benefited the most under the Permanent Settlement revenue system?
a. Farmers b. Zamindars
c. Industrialists d. Artisans
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त क आणि ड
  • (C) फक्त अ
  • (D) फक्त ब
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ब

+1.0 / -0.25
19 व्या शतकात महाराष्ट्रात बहुतांश शेतकरी कर्जबाजारी होण्यास कारणीभूत ठरलेल्या व ब्रिटीशांची महसूली नीती स्पष्ट करणाऱ्या इ.स. 1880 मधील खोती वतन कायद्याशी खालीलपैकी संबंधित वैशिष्ट्ये कोणती ?
अ. सरकारने ठरविलेला शेतसारा देणे खोतांना बंधनकारक.
ब. शेतकऱ्यांनी सारा भरता यावा यासाठी पीक पद्धतीत बदल केला.
क. शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी कर्ज मिळण्याची सोय उपलब्ध केली.
ड. शेतसारा रोख किंवा धान्याच्या रूपात भरण्याची सोय झाली.
इ. शेतीचे अंशतः व्यापारीकरण झाले.
EN Which of the following features are related to the Khoti Settlement Act of 1880 AD, which contributed to widespread indebtedness among farmers in 19th-century Maharashtra and clearly illustrated British revenue policy?
a. Khots were bound to pay the land revenue fixed by the government.
b. Cropping patterns were changed so that farmers could pay the revenue.
c. Credit facilities were made available to farmers to pay revenue.
d. Facility was provided to pay land revenue in cash or in kind.
e. Partial commercialization of agriculture took place.
  • (A) अ, क, इ
  • (B) अ, क, ड
  • (C) ब, ड, इ
  • (D) अ, ब, इ
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, इ

योग्य उत्तर: पर्याय (४) अ, ब, इ १८८० चा खोती वतन कायदा (Khoti Settlement Act, 1880): कोकणातील शेतकरी कर्जबाजारी होण्यास कारणीभूत ठरलेल्या १८८० च्या खोती वतन कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे होती: • अ) सरकारने ठरविलेला शेतसारा देणे खोतांना...

+1.0 / -0.25
प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती ?
(a) ना.म. जोशी यांनी 'सोशल सर्व्हीस लिंग' स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.
(b) देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देश्याने नामदार गोखले यांनी 'सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटी' ही संस्था स्थापन केली.
(c) या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथआश्रम काढले.
(d) अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following social activities were carried out on behalf of / associated with Prarthana Samaj?
(a) N. M. Joshi founded the 'Social Service League' to improve the condition of laborers.
(b) With the objective of training national missionaries for the service of India, Gopal Krishna Gokhale founded the 'Servants of India Society'.
(c) An orphanage was started at Nashik on behalf of this Samaj.
(d) For the upliftment of the depressed classes, Maharshi Vitthal Ramji Shinde founded the 'Depressed Classes Mission'.
Alternative answers:
  • (A) (a) आणि (b) फक्त
  • (B) (b) आणि (c) फक्त
  • (C) (a), (b) आणि (d) फक्त
  • (D) (b), (c) आणि (d) फक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (b) आणि (d) फक्त

योग्य उत्तर (a), (b) आणि (d) फक्त आहे. स्पष्टीकरण: • विधान (a) बरोबर आहे: प्रार्थना समाजाचे सक्रिय सदस्य नारायण मल्हार (ना.म.) जोशी यांनी कामगारांच्या कल्याणासाठी 1911 मध्ये मुंबईत 'सोशल सर्व्हिस लीग' (Social Service League) ची स्थापना केली. • विधान...

+1.0 / -0.25
____________ या समाजाचे सदस्य होण्यासाठी; "व्यक्तीला, ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते".
EN To become a member of the ____________ society, "it was compulsory for a person to eat bread baked by Christians and drink water from the hands of Muslims".
  • (A) ब्राह्मो समाज
  • (B) आर्य समाज
  • (C) प्रार्थना समाज
  • (D) सत्यशोधक समाज
अचूक उत्तर: पर्याय (C) प्रार्थना समाज

योग्य उत्तर प्रार्थना समाज आहे. स्पष्टीकरण: • पार्श्वभूमी व ऐतिहासिक संदर्भ: - 1849 मध्ये स्थापन झालेल्या 'परमहंस सभा' या संस्थेमध्ये नवीन सदस्याला प्रवेश देताना जातीभेद नष्ट करण्याचे प्रतीक म्हणून ख्रिश्चनाने तयार केलेला पाव खावा लागे आणि इतर...

+1.0 / -0.25
मुंबई येथे 'स्टुडंट लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटी' च्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा सहभाग होता ?
अ. गोपाळ गणेश आगरकर
ब. दादाभाई नौरोजी
क. डॉ. भाऊ दाजी लाड
ड. विश्वनाथ नारायण मंडलीक
EN Who among the following persons participated in the founding of the 'Students' Literary and Scientific Society' in Mumbai?
a. Gopal Ganesh Agarkar
b. Dadabhai Naoroji
c. Dr. Bhau Daji Lad
d. Vishwanath Narayan Mandlik
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त अ, ब आणि क
  • (C) फक्त ब, क आणि ड
  • (D) फक्त अ, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त ब, क आणि ड

योग्य उत्तर फक्त ब, क आणि ड आहे. स्पष्टीकरण: • स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी (Students' Literary and Scientific Society): - स्थापना 13 जून 1848 रोजी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झाली. - या सोसायटीच्या स्थापनेत दादाभाई नौरोजी (ब), डॉ...

+1.0 / -0.25
1857 च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते ?
(a) उपक्रमशिलता व सहकार्य
(b) संघटना व शिस्त
(c) मळेवाल्यात पडलेली फूट
(d) हिंदू-मुस्लिम शेतकरी ऐक्य
पर्यायी उत्तरे :
EN After the Revolt of 1857, what was the reason for the success of indigo farmers in Bengal in their uprising against the planters?
(a) Initiative and cooperation
(b) Organization and discipline
(c) Division among the planters
(d) Hindu-Muslim peasant unity
Alternative answers:
  • (A) फक्त (b), (c) आणि (d)
  • (B) फक्त (a), (b) आणि (d)
  • (C) फक्त (a), (b) आणि (c)
  • (D) फक्त (a) आणि (c)
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त (a), (b) आणि (d)

योग्य उत्तर: पर्याय (२) फक्त (a), (b) आणि (d) स्पष्टीकरण: • बंगालमधील नीळ उत्पादकांचा उठाव (१८५९-१८६०): १८५७ च्या उठावानंतर बंगालमध्ये युरोपियन नीळ मळेवाल्यांच्या शोषणाविरुद्ध सुरू झालेला नीळ उठाव (Indigo Revolt) यशस्वी ठरला. या यशाची प्रमुख कारणे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स