🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

तुलनात्मक विश्लेषण व क्रमवारी

Comparison Analysis, Height/Weight Ordering — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'तुलनात्मक विश्लेषण व क्रमवारी' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 34 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 1 / 2
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 34)
प्रश्न #1 📅 Combine Group B Pre 2025
+1.0 / -0.25
सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण निलाक्षपेक्षा नाही. चैताली नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही. तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण ?
EN Sanvi is taller than Yuvika, but not taller than Nilaksh. Chaitali is taller than Namita, but not taller than Yuvika. Who among them is the tallest?
  • (A) निलाक्ष
  • (B) युविका
  • (C) नमिता
  • (D) सान्वी
अचूक उत्तर: पर्याय (A) निलाक्ष

दिलेल्या माहितीनुसार उंचीची तुलना करू: 1. सान्वी ही युविकापेक्षा उंच आहे, पण निलाक्षपेक्षा उंच नाही: $$\text{निलाक्ष} > \text{सान्वी} > \text{युविका}$$ 2. चैताली ही नमितापेक्षा उंच आहे, पण युविकापेक्षा उंच नाही: $$\text{युविका} > \text{चैताली} >...

प्रश्न #2 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
खालील प्रश्नात I आणि II ह्या दोन घटना दिलेल्या आहेत. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधांचे स्वरूप ठरवा. I व II मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून अचूक उत्तर निश्चित करा.
घटना :
I. श्री हरी आगीत मारले गेले.
II. कंपनी मध्ये आग लागली.
पर्यायी उत्तरे :
EN In the following question, two events I and II are given. Read both events carefully and determine the nature of the relationship between them. Assuming the information given in I and II is true, determine the correct answer.
Events:
I. Shri Hari was killed in a fire.
II. A fire broke out in the company.
Alternative Answers:
  • (A) I हा परिणाम आहे आणि II हे त्याचे प्रमुख कारण आहे.
  • (B) II हा परिणाम आहे आणि I हे त्याचे प्रमुख कारण आहे.
  • (C) II हा परिणाम आहे, परंतु I हे त्याचे प्रमुख कारण नाही.
  • (D) वरीलपैकी एकही बरोबर नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही बरोबर नाही.

प्रश्न #3 📅 Tax Assistant Mains 2021
+1.0 / -0.25
अझिजकडे प्रत्येकी विभिन्न वजने असलेले A, B, C, D आणि E या नामनिर्देशनांचे लोखंडी गोळे आहेत. B चे वजन A च्या वजनाच्या निम्मे आहे. B चे वजन C च्या वजनाच्या साडेचार पटीने जास्त आहे. D चे वजन C च्या वजनाच्या दुप्पट आहे. E चे वजन D च्या वजनाच्या दुप्पट आहे. A चे वजन E च्या वजनापेक्षा जास्त आहे, ज्याचे वजन C च्या वजनापेक्षा जास्त आहे. त्यांच्या वजनाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी केली तरी ज्याचा क्रमांक बदलणार नाही असा गोळा निवडा.
EN Aziz has iron balls designated as A, B, C, D, and E, each having different weights. The weight of B is half the weight of A. The weight of B is 4.5 times the weight of C. The weight of D is twice the weight of C. The weight of E is twice the weight of D. The weight of A is greater than the weight of E, whose weight is greater than the weight of C. Select the ball whose position will not change whether they are arranged in ascending or descending order of their weights.
  • (A) D
  • (B) E
  • (C) B
  • (D) C
अचूक उत्तर: पर्याय (B) E

लोखंडी गोळे: A, B, C, D, E दिलेले संबंध: 1. $B = \frac{1}{2} A \implies A = 2B$ 2. $B = 4.5 C$ 3. $D = 2C$ 4. $E = 2D = 2(2C) = 4C$ सोयीसाठी $C$ चे वजन 2 एकक मानू: • $C = 2$ • $D = 2 \times 2 = 4$ • $E = 4 \times 2 = 8$ • $B = 4.5 \times 2 = 9$...

प्रश्न #4 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
जेव्हा गुलाबी X आहे, पांढरा Y आहे. जेव्हा गुलाबी X नाही, पिवळा Z आहे. परंतु पिवळा Z. असेपर्यंत पांढरा Y असणार नाही. जर सर्व माहिती सत्य असेल तर सत्य विधान निवडा.
EN When Pink is X, White is Y. When Pink is not X, Yellow is Z. But White will not be Y as long as Yellow is Z. If all information is true, select the true statement.
  • (A) पिवळा Z असताना, गुलाबी X आहे.
  • (B) पांढरा Y नसताना, पिवळा Z नाही.
  • (C) पिवळा Z असल्याने, गुलाबी X नाही.
  • (D) पांढरा Y असताना, गुलाबी X नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) पिवळा Z असल्याने, गुलाबी X नाही.

दिलेली विधाने: 1. जेव्हा गुलाबी X आहे, तेव्हा पांढरा Y आहे: $$\text{गुलाबी X} \implies \text{पांढरा Y}$$ 2. जेव्हा गुलाबी X नाही, तेव्हा पिवळा Z आहे: $$\text{गुलाबी X नाही} \implies \text{पिवळा Z}$$ 3. जोपर्यंत पिवळा Z आहे, तोपर्यंत पांढरा Y असणार...

प्रश्न #5 📅 PSI Mains 2019
+1.0 / -0.25
परमितने बियांचे रोझपेक्षा जास्त नमुने गोळा केले. रोझने नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले. नीलने परमितपेक्षा जास्त नमुने गोळा केले. ऋताने परमितपेक्षा जास्त परंतु नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले. सर्वात जास्त नमुने गोळा करणारी व्यक्ती दर्शवणारा पर्याय निवडा.
EN Parmit collected more seed samples than Rose. Rose collected fewer samples than Neil. Neil collected more samples than Parmit. Ruta collected more samples than Parmit but fewer than Neil. Select the option indicating the person who collected the maximum number of samples.
  • (A) परमित
  • (B) ऋता
  • (C) नील
  • (D) रोझ
अचूक उत्तर: पर्याय (C) नील

बियांच्या नमुन्यांची तुलना करू: 1. परमितने रोझपेक्षा जास्त नमुने गोळा केले: $$\text{परमित} > \text{रोझ}$$ 2. रोझने नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले: $$\text{नील} > \text{रोझ}$$ 3. नीलने परमितपेक्षा जास्त नमुने गोळा केले: $$\text{नील} > \text{परमित}$$...

प्रश्न #6 📅 ASO Mains 2019
+1.0 / -0.25
खालील 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांच्या यादीत लगतच्या जोडीची बेरीज मूळ संख्या आहे. यादी अभ्यासा आणि त्यासंबंधीचे चुकीचे विधान निवडा. 20, A, 16, 15, 4, B, 12, C, 10, 7, 6, D, 2, 17, 14, 9, 8, 5, 18, E
EN In the following list of natural numbers from 1 to 20, the sum of each adjacent pair is a prime number. Study the list and select the incorrect statement regarding it: 20, A, 16, 15, 4, B, 12, C, 10, 7, 6, D, 2, 17, 14, 9, 8, 5, 18, E
  • (A) D या वर्णाक्षराची किंमत B च्या किंमतीनुसार बदलते.
  • (B) E या वर्णाक्षराची किंमत निश्चितपणे 13 आहे.
  • (C) A या वर्णाक्षराची किंमत निश्चितपणे 3 आहे.
  • (D) B ची किंमत एक तर 1 किंवा 19 असेल.
अचूक उत्तर: पर्याय (A) D या वर्णाक्षराची किंमत B च्या किंमतीनुसार बदलते.

दिलेली यादी (1 ते 20 नैसर्गिक संख्या): 20, A, 16, 15, 4, B, 12, C, 10, 7, 6, D, 2, 17, 14, 9, 8, 5, 18, E अट: लगतच्या प्रत्येक जोडीची बेरीज मूळ संख्या (Prime Number) आहे. यादीतील उरलेल्या 5 संख्या: {1, 3, 11, 13, 19} अक्षरांची मूल्ये शोधू: 1...

प्रश्न #7 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
काली, ऑर्थर, हेमा, फातिमा आणि लेना पाच सुगाव्यांच्या मदतीने खजिना शोध घेत आहेत. कालीला सर्व सुगावे लागले पण तिने शोध सर्वात शेवटी संपवला. लेना दुसऱ्या क्रमांकाला परतली पण तिचे दोन सुगावे चुकले. लेनापेक्षा हेमाचे दोन जास्त प्रश्न बरोबर होते पण तिने लेनाच्या नंतर शोध संपवला. ऑर्थर लेनापेक्षा अधिक वेगात नव्हता. फातिमा हेमापेक्षा अधिक वेगात होती आणि तिचा फक्त एकच प्रश्न चुकला. जर वरील माहिती सत्य असेल तर पुढीलपैकी सत्य असणे शक्य नाही असे फक्त एक विधान निवडा.
EN Kali, Arthur, Hema, Fatima, and Lena are searching for a treasure with the help of five clues. Kali found all the clues, but she finished the search last. Lena returned in second place, but missed two clues. Hema had two more clues correct than Lena, but she finished the search after Lena. Arthur was not faster than Lena. Fatima was faster than Hema and she missed only one clue. If the above information is true, select the only statement among the following that cannot possibly be true.
  • (A) फातिमा सर्वप्रथम आली
  • (B) हेमा कालीपेक्षा वेगवान होती
  • (C) फातिमा ऑर्थरपेक्षा वेगवान होती
  • (D) लेना तिसरी आली
अचूक उत्तर: पर्याय (D) लेना तिसरी आली

दिलेली माहिती: • खजिना शोधात सहभागी: काली, ऑर्थर, हेमा, फातिमा, लेना • काली सर्वात शेवटी परतली $\implies$ काली = 5 वा क्रमांक. • लेना दुसऱ्या क्रमांकाला परतली $\implies$ लेना = 2 रा क्रमांक (हे विधानातच स्पष्ट दिले आहे!). विधानांची सत्यता तपासू...

प्रश्न #8 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
या वर्षी प्रथमच माझ्या नव्या आंब्याच्या झाडावर 96 फळे धरली. हा आनंद साजरा करण्यासाठी गावच्या प्रथेप्रमाणे पाच फळे पाखरांसाठी झाडावर ठेवून यातील बहुतेक माझ्या काही शेजाऱ्यांना द्यायचे आहेत. माझे कुटुंब धरून सर्व शेजाऱ्यांना समान संख्येने आंबे मिळायला हवेत आणि ते जास्तीत शेजाऱ्यांना मिळावेत अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक शेजाऱ्याला. किमान पांच तरी आंबे मिळायला हवेत. आंब्यांची पिशवी मिळणार आहे अशा शेजाऱ्यांची आणि प्रत्येक पिशवीत असलेल्या आंब्यांची अनुक्रमे संख्या निवडा :
EN This year, for the first time, my new mango tree bore 96 fruits. To celebrate this joy, as per the village tradition, after leaving five fruits on the tree for the birds, I want to give most of these to some of my neighbors. I desire that everyone, including my family and all the neighbors, should get an equal number of mangoes and that as many neighbors as possible should receive them. Each neighbor must get at least five mangoes. Select the number of neighbors who will receive a bag of mangoes and the number of mangoes in each bag, respectively:
  • (A) वाटण्यासाठी उपलब्ध असलेल्या फळांची संख्या विषम असल्यामुळे आंब्यांच समान वाटप करणे कठीण आहे.
  • (B) 12 आणि 7.
  • (C) 13 आणि 7.
  • (D) 7 आणि 13.
अचूक उत्तर: पर्याय (B) 12 आणि 7.

दिलेले: • झाडावर एकूण आंबे = 96 • पाखरांसाठी झाडावर ठेवलेले आंबे = 5 • वाटपासाठी उपलब्ध आंबे $= 96 - 5 = 91$ अटी: 1. सर्व शेजारी आणि स्वतःचे कुटुंब यांना प्रत्येकी समान संख्येत आंबे मिळाले पाहिजेत. 2. प्रत्येक पिशवीत किमान 5 आंबे असायला हवेत. 3...

प्रश्न #9 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
खालील विधानांवर विचार करा :
(a) कुंदा ही दुपारी 12 ते सं. 4 वाजेपर्यंत मंगळवार, गुरुवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते.
(b) तिची लहान बहीण नयना ही सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी स. 10 ते दु. 2 वाजेपर्यंत घरी असते.
(c) सर्वात मोठी बहीण ज्योती ही स. 9 ते दु. 12 वाजेपर्यंत सोमवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी आणि दु. 2 ते सं. 4 या वेळेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते.
तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी व किती वाजता एकत्र घरी असतात ?
EN Consider the following statements:
(a) Kunda is available at home from 12 noon to 4 p.m. on Tuesday, Thursday, and Sunday.
(b) Her younger sister Nayana is at home from 10 a.m. to 2 p.m. on Monday, Thursday, Friday, and Sunday.
(c) The eldest sister Jyoti is available at home from 9 a.m. to 12 noon on Monday, Wednesday, and Thursday, and from 2 p.m. to 4 p.m. on Friday, Saturday, and Sunday.
On which day(s) and at what time are all three sisters at home together?
  • (A) गुरुवार - दु. 12 वा. व रविवारी दु. 12 वा.
  • (B) गुरुवार - दु. 12 वा. व रविवारी दु. 2 वा.
  • (C) गुरुवार - दु. 2 वा. व रविवारी दु. 2 वा.
  • (D) गुरुवार - दु. 2 वा. व रविवारी दु. 12 वा.
अचूक उत्तर: पर्याय (B) गुरुवार - दु. 12 वा. व रविवारी दु. 2 वा.

तिन्ही बहिणींच्या घरी उपलब्ध असण्याच्या वेळा तपासू: 1. कुंदा: • मंगळवार, गुरुवार, रविवार: दुपारी 12:00 ते संध्याकाळी 4:00. 2. नयना: • सोमवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार: सकाळी 10:00 ते दुपारी 2:00. 3. ज्योती: • सोमवार, बुधवार, गुरुवार: सकाळी 9:00 ते...

प्रश्न #10 📅 ASO Mains 2018
+1.0 / -0.25
संदेश गुप्त राखण्यासाठी जितू आणि अलेक्स यांनी पुढील नियमांवर आधारित संकेत प्रणाली तयार केली.
(a) A ते M पर्यंतच्या प्रत्येक अक्षराऐवजी वर्णक्रम उलटा गणून Z ते N चा समक्रम असणारे अक्षर ठेवायचे म्हणजे A होईल Z, B होईल Y, असे क्रमाने होईल. N ते Z या वर्णाक्षरांऐवजी A ते M वर्णाक्षरे ठेवायची म्हणजे N होईल A, O होईल B, असे क्रमाने होईल.
(b) प्रक्रिया (a) मधून मिळालेल्या प्रत्येक अक्षराऐवजी सर्व वर्णाक्षरे उलट्या क्रमाने मांडून त्या प्रत्येक अक्षराचा दोन अंकी क्रम तेथे ठेवायचा, म्हणजे A होईल 26, B होईल 25, X होईल 03 असे क्रमाने होईल.
याच प्रणालीवर आधारित LUKEWARM या शब्दाचा संकेत निवडा -
पर्यायी उत्तरे :
EN To keep messages secret, Jitu and Alex developed a coding system based on the following rules:
(a) For each letter from A to M, replace it by counting the alphabet in reverse order with corresponding letters from Z to N (i.e., A becomes Z, B becomes Y, and so on). For letters from N to Z, replace them with letters from A to M in regular order (i.e., N becomes A, O becomes B, and so on).
(b) For each letter obtained from step (a), arrange all letters in reverse order and substitute its two-digit position (i.e., A becomes 26, B becomes 25, X becomes 03, and so on).
Based on this system, select the code for the word LUKEWARM:
Alternative answers:
  • (A) 1221110523151813
  • (B) 1219110517012213
  • (C) 1221110517012213
  • (D) 1219110517012613
अचूक उत्तर: पर्याय (B) 1219110517012213

संकेत प्रणालीचे नियम: • नियम (a): - A ते M या अक्षरांना उलट्या क्रमाने Z ते N च्या समकक्षाने बदलावे (A $\rightarrow$ Z, B $\rightarrow$ Y, ..., M $\rightarrow$ N). - N ते Z या अक्षरांना A ते M ने बदलावे (N $\rightarrow$ A, O $\rightarrow$ B, ..., Z...

प्रश्न #11 📅 STI Mains 2018
+1.0 / -0.25
पुढील विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.
विधान 1 (S1) - जर (x x x) = (y x y), तर x नेहमीच y इतका असेल.
विधान 2 (S2) - जर (x x x x x) = (yxyxy), तर x इतका नेहमी असू शकेल y.
EN Select the correct option with reference to the following statements:
Statement 1 (S1) - If (x × x) = (y × y), then x will always be equal to y.
Statement 2 (S2) - If (x × x × x) = (y × y × y), then x will always be equal to y.
  • (A) S1-सत्य; S2 - असत्य
  • (B) S1- असत्य; S2-सत्य
  • (C) S1 व S2 दोन्ही असत्य
  • (D) S1 व S2 दोन्ही सत्य
अचूक उत्तर: पर्याय (C) S1 व S2 दोन्ही असत्य

दोन्ही विधानांची सत्यता तपासू: विधान 1 (S1): जर $(x \times x) = (y \times y)$, तर $x$ नेहमीच $y$ इतका असेल. • $(x \times x) = (y \times y) \implies x^2 = y^2$ • यावरून $x = y$ किंवा $x = -y$ असू शकते. • उदा. जर $x = 3$ आणि $y = -3$ असेल, तर...

प्रश्न #12 📅 ASO Mains 2018
+1.0 / -0.25
निवडीसाठी माहितीपत्रकाच्या 500 प्रति छापण्यासाठी उपलब्ध असलेल्या किंमतींच्या दोन रचना उपलब्ध आहेत. त्या पुढील प्रमाणे :
X : संख्येचा विचार न करता प्रत्येक माहितीपत्रकाची समान किंमत विचारात घेणे.
Y : सुरुवातीला निश्चित केलेली किंमत विचारात घेऊन नंतर प्रत्येक माहितीपत्रकासाठी "X" रचनेपेक्षा कमी किंमत विचारात घेणे.
वरीलप्रमाणे सर्वात कमी खर्चिक किंमत रचना निश्चित करण्यासाठी पुढे दिलेल्या माहितीसंचातील एकाची निवड करा.
EN Two pricing schemes are available for printing 500 copies of a brochure for selection, as follows:
X : Charging a constant price per brochure regardless of quantity.
Y : Charging a fixed initial fee, and then a lower price per brochure than that of scheme "X".
To determine the least expensive pricing scheme, select one of the following sets of information:
  • (A) 200 माहितीपत्रकांची दोन्ही किंमत रचना वापरून किमती दाखवणारे उदाहरण.
  • (B) X रचना वापरून दर माहितीपत्रकाची किंमत आणि Y रचना वापरून सुरुवातीची किंमत.
  • (C) X रचना वापरून 1 माहितीपत्रकाची किंमत आणि Y रचना वापरून 2 माहिती पत्रकांची किंमत.
  • (D) उपलब्ध असलेल्या X व Y रचना वापरून छपाईसाठी समान किमतींची देयके असलेल्या माहितीपत्रकांची संख्या.
अचूक उत्तर: पर्याय (D) उपलब्ध असलेल्या X व Y रचना वापरून छपाईसाठी समान किमतींची देयके असलेल्या माहितीपत्रकांची संख्या.

प्रश्न #13 📅 Group C Pre 2017
+1.0 / -0.25
एका संख्येची 13 पट ही 105 पेक्षा ज्या किमतीने अधिक आहे, तितक्याच किमतीने ती संख्या 105 पेक्षा कमी आहे या अटी पूर्ण करणारी संख्या निवडा.
EN Select the number that satisfies the condition that 13 times the number exceeds 105 by as much as the number itself is less than 105.
  • (A) 15
  • (B) 90
  • (C) 60
  • (D) संख्या निवडण्यासाठी विशिष्ट किंमत किती ते माहीत असणे आवश्यक
अचूक उत्तर: पर्याय (A) 15

ती संख्या $x$ मानू. दिलेल्या अटीनुसार: "संख्येची 13 पट 105 पेक्षा जितक्याने जास्त आहे, तितक्यानेच ती संख्या 105 पेक्षा कमी आहे." $$13x - 105 = 105 - x$$ समीकरण सोडवू: $$13x + x = 105 + 105$$ $$14x = 210$$ $$x = \frac{210}{14} = 15$$ पडताळा: • 13 पट...

प्रश्न #14 📅 Combine Group B Pre 2017
+1.0 / -0.25
@, ©, #, $ आणि * या प्रतिकांचा उपयोग पुढीलप्रमाणे करण्यात आलेला आहे :
P©Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही.
P*Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही आणि Q पेक्षा लहान नाही.
P@Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही आणि Q एवढा नाही.
P$Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही.
P#Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही आणि Q एवढा नाही.
यावर आधारित खाली तीन विधाने दिलेली आहेत आणि त्यावरून काढलेले तीन निष्कर्ष दिलेले आहेत. निष्कर्षांबाबत योग्य तो पर्याय निवडा.
विधाने - H * M ; M @ T ; T $ K
निष्कर्ष -
(I) - K # M
(II) - T # H
(III) - H @ K
EN The symbols @, ©, #, $ and * are used with the following meanings:
P©Q means P is not smaller than Q.
P*Q means P is neither greater than Q nor smaller than Q.
P@Q means P is neither greater than Q nor equal to Q.
P$Q means P is not greater than Q.
P#Q means P is neither smaller than Q nor equal to Q.
Based on this, three statements and three conclusions drawn from them are given below. Select the appropriate option regarding the conclusions.
Statements: H * M ; M @ T ; T $ K
Conclusions:
(I) - K # M
(II) - T # H
(III) - H @ K
  • (A) फक्त निष्कर्ष (I) आणि (II) बरोबर आहेत
  • (B) फक्त निष्कर्ष (II) आणि (III) बरोबर आहेत
  • (C) फक्त निष्कर्ष (I) आणि (III) बरोबर आहेत
  • (D) निष्कर्ष (I), (II) आणि (III) सर्व बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) निष्कर्ष (I), (II) आणि (III) सर्व बरोबर आहेत

प्रतीकांचे अर्थ: • $P \text{ © } Q$: $P$, $Q$ पेक्षा लहान नाही $\implies P \ge Q$ • $P * Q$: $P$, $Q$ पेक्षा मोठा नाही व लहान नाही $\implies P = Q$ • $P @ Q$: $P$, $Q$ पेक्षा मोठा नाही व समान नाही $\implies P < Q$ • $P \$ Q$: $P$, $Q...

प्रश्न #15 📅 PSI Mains 2017
+1.0 / -0.25
जर a+b ही c+d पेक्षा लहान आहे आणि d+e ही a+b पेक्षा लहान आहे तर e च्या संदर्भातील सत्य पर्याय निवडा.
EN If a + b is less than c + d and d + e is less than a + b, then select the true option regarding e.
  • (A) d पेक्षा लहान
  • (B) c पेक्षा लहान
  • (C) c शी समान
  • (D) d शी समान
अचूक उत्तर: पर्याय (B) c पेक्षा लहान

प्रश्न #16 📅 STI Mains 2017
+1.0 / -0.25
समीर हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे, शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेंगणा कोण ?
EN Sameer is taller than Kabir, Kabir is taller than Ameer, Sudhir is taller than Shishir, Shishir is taller than Kabir. Who is the shortest among all of them?
  • (A) समीर
  • (B) शिशिर
  • (C) अमीर
  • (D) कबीर
अचूक उत्तर: पर्याय (C) अमीर

दिलेल्या माहितीनुसार उंचीची तुलना करू: 1. समीर हा कबीरपेक्षा उंच आहे: $$\text{समीर} > \text{कबीर}$$ 2. कबीर हा अमीरपेक्षा उंच आहे: $$\text{कबीर} > \text{अमीर}$$ 3. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे: $$\text{सुधीर} > \text{शिशिर}$$ 4. शिशिर हा कबीरपेक्षा...

प्रश्न #17 📅 ASO Mains 2017
+1.0 / -0.25
अंकिता ही संगितापेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगितापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे. शिरिष हा श्याम आणि संगितापेक्षा लहान आहे. संगिता ही श्यामपेक्षा मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे ?
EN Ankita is older than Sangita. Girish is older than Sangita but younger than Ankita. Shirish is younger than Shyam and Sangita. Sangita is older than Shyam. Who is the youngest among them?
  • (A) गिरिश
  • (B) श्याम
  • (C) शिरिष
  • (D) संगिता
अचूक उत्तर: पर्याय (C) शिरिष

वयाची तुलना करू: 1. अंकिता ही संगितापेक्षा मोठी आहे: $$\text{अंकिता} > \text{संगिता}$$ 2. गिरीश हा संगितापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे: $$\text{अंकिता} > \text{गिरीश} > \text{संगिता}$$ 3. संगिता ही श्यामपेक्षा मोठी आहे: $$\text{संगिता} >...

प्रश्न #18 📅 STI Mains 2016
+1.0 / -0.25
शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे. राजू चारूपेक्षा उंच आहे परंतु ती बालापेक्षा ठेंगणा आहे. स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे. चारू शिरीषपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण आहे ?
EN Shirish is taller than Spandan. Raju is taller than Charu but shorter than Bala. Spandan is shorter than Charu. Charu is taller than Shirish. Who is the tallest?
  • (A) शिरीष
  • (B) बाला
  • (C) स्पंदन
  • (D) राजू
अचूक उत्तर: पर्याय (B) बाला

दिलेल्या विधानांनुसार उंचीचा क्रम मांडू: 1. शिरीष हा स्पंदनपेक्षा उंच आहे: $$\text{शिरीष} > \text{स्पंदन}$$ 2. राजू हा चारूपेक्षा उंच आहे परंतु बालापेक्षा ठेंगणा आहे: $$\text{बाला} > \text{राजू} > \text{चारू}$$ 3. स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे...

प्रश्न #19 📅 Tax Assistant Pre 2016
+1.0 / -0.25
केट ही युगपेक्षा वयाने तीनपट मोठी आहे. मिनी ही वयाने झरिनच्या निम्मे आहे. युग मिनीपेक्षा वयाने मोठा आहे. सत्य अनुमानाची निवड करा.
EN Kate is three times as old as Yug. Mini is half as old as Zarin. Yug is older than Mini. Select the true conclusion.
  • (A) केट कदाचित झरिनपेक्षा वयाने लहान असेल
  • (B) युग वयाने झरिनपेक्षा मोठा आहे
  • (C) केट वयाने झरिनपेक्षा मोठी आहे
  • (D) वरील सर्व अनुमाने सत्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) केट वयाने झरिनपेक्षा मोठी आहे

दिलेली माहिती समीकरणात मांडू: 1. केट ($K$) ही युग ($Y$) पेक्षा तीनपट मोठी आहे: $$K = 3Y$$ 2. मिनी ($M$) ही झरिन ($Z$) च्या निम्मे आहे: $$M = \frac{1}{2} Z \implies Z = 2M$$ 3. युग ($Y$) हा मिनी ($M$) पेक्षा मोठा आहे: $$Y > M$$ तुलना: समीकरण (3) च्या...

प्रश्न #20 📅 PSI Pre 2016
+1.0 / -0.25
जर p > q आणि r < 0, तर पुढीलपैकी कोणती राशी सत्य आहे ?
EN If p > q and r < 0, then which of the following expressions is true?
  • (A) pr < qr
  • (B) p +r < q + r
  • (C) p - r < q - r
  • (D) कोणतीहि सत्य नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) pr < qr

दिलेले: • $p > q$ • $r < 0$ ($r$ ही ऋण संख्या आहे) असमानतेचा मूलभूत नियम: जेव्हा कोणत्याही असमानतेच्या दोन्ही बाजूंना ऋण संख्येने गुणले जाते, तेव्हा असमानतेचे चिन्ह उलट होते (Reverses). $$p > q \quad \text{आणि} \quad r < 0$$ $$\implies p \times r <...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स