🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

कोडी, बैठक व्यवस्था व तार्किक रचना (Puzzles) (पृष्ठ 4)

Puzzles, Floor & Circular Seating Arrangements — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'कोडी, बैठक व्यवस्था व तार्किक रचना (Puzzles)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 110 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 4 / 6
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 110)
प्रश्न #61 📅 PSI Mains 2016
+1.0 / -0.25
"लुटूया आनंद उन्हाळी अध्ययनाचा" या प्रकल्पाच्या प्रमुखांना A, B, C, D, E, F, G व H या आठ स्वेच्छेने पुढे आलेल्या आठजणांतून चार विद्यार्थ्यांची निवड करायची आहे. निवडलेली प्रत्येक व्यक्ती निवड केलेल्या किमान एका तरी अन्य व्यांक्तच्या आवडीत सहभागी असेल तसेच ईतरांच्या आवडीबद्दल नावड वाटत असूनही विद्याथ्यांनी त्या व्यक्तिशी सहकार्य करायला शिकावे अशी इच्छा असल्यामुळ निवडलेल्या प्रत्येक व्यक्तिला अन्य तीन व्यक्तिच्या किमान एका तरी आवडीबाबत नावड असायला हवी असा त्यांनी निर्णय घेतला.
प्रत्येक व्यक्तिच्या आवडी व नावडीबाबतची पुढील सामग्री अभ्यासा व दिलेल्या अटींचे समाधान करणारा चमू निवडा.
A ला रंग कला, वाचन आवडते व पाऊला वाटा चालण्याचा तिटकारा वाटतो. B ला वाचनाची व चित्रपट पाहण्याची आवड आहे पण चालण्याचा तिटकारा आहे. C चालण्याचा आनंद लुटते पण तिला वाचनाची आवड नाही. D ला पक्षी निरीक्षण आवडते पण ती चित्रपट पाहण्याचा तिटकारा करते. E चित्रपट पाहण्याचा आनंद लुटते पण वाचन व पक्षी निरीक्षणाचा तिटकारा करते. F ला रंग कला आवडते पण ती वाचन व पक्षी निरीक्षणाचा तिटकारा करते. G ला चालणे व पक्षी निरीक्षण आवडते पण ती रंगकलेचा आनंद लुटत नाही. H वाचनाचा आणि चालण्याचा आनंद लुटते पण तिला पक्षी निरीक्षण आवडत नाही.
EN The head of the 'Enjoy Summer Learning' project wishes to select four students from eight volunteers A, B, C, D, E, F, G, and H. Each selected student must share an interest with at least one other selected student; furthermore, to teach students to cooperate despite differences, each selected student must have a dislike for at least one of the interests of the other three members.
Study the interests and dislikes of each person:
A likes painting and reading, hates walking trails.
B likes reading and watching movies, hates walking.
C enjoys walking, dislikes reading.
D likes bird watching, hates watching movies.
E enjoys watching movies, hates reading and bird watching.
F likes painting, hates reading and bird watching.
G likes walking and bird watching, does not enjoy painting.
H enjoys reading and walking, dislikes bird watching.
Select the team that satisfies the given conditions:
  • (A) A, B, E, F
  • (B) C, D, E, F
  • (C) D,E, F, H
  • (D) A, B, D, G
अचूक उत्तर: पर्याय (D) A, B, D, G

8 स्वेच्छेने पुढे आलेले विद्यार्थी: A, B, C, D, E, F, G, H. 4 विद्यार्थ्यांचा चमू निवडायचा आहे. अटी: 1. निवडलेली प्रत्येक व्यक्ती इतर किमान एका व्यक्तीच्या आवडीत सहभागी असायला हवी (समान आवड). 2. प्रत्येक व्यक्तीला इतर तिघांच्या किमान एका आवडीबद्दल...

प्रश्न #62 📅 STI Pre 2016
+1.0 / -0.25
M, T, J, R, D, W आणि Q या व्यक्ती A, B आणि C या गाड्यांतून प्रवास करत आहेत. प्रत्येक गाडीत किमान दोन व्यक्ती आहेत. यात तीन महिला असून प्रत्येक गाडीत एक महिला आहे. T या व्यक्तिला फक्त Q या व्यक्तिबरोबरच प्रवास करायचा आहे व त्या B गाडीतून प्रवास करत आहेत. M ही व्यक्ती A या गाडीतून प्रवास करत आहे. D आणि W या व्यक्ती C गाडीतून प्रवास करत नाहीत. J ही व्यक्ती महिला नाही तर W ही व्यक्ती महिला आहे. तर J ही व्यक्ती कोणत्या गाडीतून प्रवास करत आहे?
EN Persons M, T, J, R, D, W, and Q are travelling in three cars A, B, and C. There are at least two persons in each car. Among them are three females, with exactly one female in each car. T wants to travel only with Q and they travel in car B. M travels in car A. D and W do not travel in car C. J is not female, while W is female. In which car is J travelling?
  • (A) A
  • (B) B
  • (C) C
  • (D) यापैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) C

7 व्यक्ती: M, T, J, R, D, W, Q 3 गाड्या: A, B, C (प्रत्येक गाडीत किमान 2 व्यक्ती, 3 महिला असून प्रत्येक गाडीत 1 महिला). दिलेल्या अटींचे विश्लेषण करू: 1. "T या व्यक्तीला फक्त Q या व्यक्तीबरोबरच प्रवास करायचा आहे व त्या B गाडीतून प्रवास करत आहेत"...

प्रश्न #63 📅 STI Pre 2016
+1.0 / -0.25
ऐशा व तिच्या नवऱ्याने काल त्यांचे शेजारी असलेल्या दोन भिन्न लिंगी जोडप्यांना इफ्तार मेजवानीचे निमंत्रण दिले होते. ते सर्वजण वर्तुळाकार बसले होते व मध्यभागी अन्न ठेवले होते. ऐशाने तुम्हाला पुढील तथ्ये सांगितली आहेत. डॅनी एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो अनुच्या डावीकडे बसला आहे. ईशा एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी माझ्या नवऱ्याच्या डावीकडे बसली आहे. दिनू एका स्त्रीच्या डाव्या बाजूला बसला आहे जी राजाच्या डावीकडे बसली आहे. मी माझ्या नवऱ्याच्या शेजारी बसलेली नाही. दिलेल्या पर्यायांतून माझ्या नवऱ्याचे नाव निवडा -
EN Yesterday, Aisha and her husband invited two neighbor heterosexual couples for an Iftar feast. All of them sat in a circle with food placed in the center. Aisha told you the following facts: Danny sits to the left of a woman who sits to the left of a man who sits to the left of Anu. Isha sits to the left of a man who sits to the left of a woman who sits to the left of a man who sits to the left of a woman who sits to the left of my husband. Dinu sits to the left of a woman who sits to the left of Raja. I do not sit adjacent to my husband. From the given options, select the name of my husband:
  • (A) इतर स्त्रिया त्यांच्या नवऱ्यांच्या शेजारी बसल्या आहेत वा नाहीत याची माहिती आवश्यक आहे
  • (B) राजा
  • (C) दिनू
  • (D) डॅनी
अचूक उत्तर: पर्याय (B) राजा

ऐशा आणि तिचा नवरा, अधिक दोन शेजारी जोडपी (एकूण 6 व्यक्ती = 3 पुरुष व 3 स्त्रिया). सर्वजण वर्तुळाकार बसले आहेत. माहितीचे विश्लेषण: - ऐशा म्हणते: "मी माझ्या नवऱ्याच्या शेजारी बसलेली नाही." - दिलेल्या विधानांनुसार: - दिनू, राजा, डॅनी हे पुरुष आहेत...

प्रश्न #64 📅 STI Pre 2015
+1.0 / -0.25
A, B, C, D, E, F, G आणि H असे आठ मित्र वर्तुळ्ठकार बसलेले आहेत. सर्वांची तोंडे वर्तूळ मध्याकडे आहेत. A, B च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी व F च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. D हा A किंवा B च्या बाजूला बसत नाही. C व G नेहमी एकमेकांजवळ बसतात. H हा D च्या बाजूला बसत नाही. C हा B च्या बाजूला बसत नाही. पत्ते खेळण्यासाठी त्यांनी चार जणांचा एक, असे दोन गट तयार केले. प्रत्येक गटात, एक सोडून एक असे सदस्य घेण्यात आलेत. खालीलपैकी कोणता समूह, अशा प्रकारे तयार झालेला गट असू शकणार नाही?
EN Eight friends A, B, C, D, E, F, G, and H are seated around a circle facing the center. A is seated third to the left of B and second to the right of F. D does not sit adjacent to A or B. C and G always sit together. H does not sit adjacent to D. C does not sit adjacent to B. To play cards, they formed two groups of four members each by selecting alternate members. Which of the following cannot be a group formed in this manner?
  • (A) AGEF
  • (B) CBDH
  • (C) HCBD
  • (D) AFDB
अचूक उत्तर: पर्याय (D) AFDB

8 मित्र वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत: A, B, C, D, E, F, G, H. - A हा B च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी व F च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी आहे. - D हा A किंवा B च्या बाजूला बसत नाही. - C व G नेहमी शेजारी बसतात आणि C हा B च्या...

प्रश्न #65 📅 STI Pre 2015
+1.0 / -0.25
जेव्हा लैला, लीला, ललिता व लीना वयानुसार उभ्या राहातात तेव्हा लैला लहान असल्याने पहिली उभी राहाते तर लीला शेवट पूरा करते. तथापि जेव्हा त्या उंचीनुसार उभ्या राहातात, ललिता सर्वात ठेंगू असल्याने पहिली उभी राहाते तर लीला तिसऱ्या जागी येते. दोन्ही रांगांत लीना दुसऱ्या जागीच येते. लीला शेजारची वयाने लहान व्यक्ती निवडा.
EN When Laila, Leela, Lalita, and Leena stand according to age, Laila being the youngest stands first while Leela finishes last. However, when they stand according to height, Lalita being the shortest stands first while Leela comes third. In both queues, Leena comes second. Select the person next to Leela who is younger in age.
  • (A) लैला
  • (B) लीला
  • (C) ललिता
  • (D) लीना
अचूक उत्तर: पर्याय (C) ललिता

चार मुली: लैला, लीला, ललिता, लीना. 1. वयानुसार क्रम (लहान ते मोठी): - लैला लहान असल्याने पहिली उभी राहते (स्थान 1). - लीला शेवट पूर्ण करते (स्थान 4). - लीना दोन्ही रांगांत दुसऱ्या स्थानी येते (स्थान 2). - उरलेली ललिता तिसऱ्या स्थानी येईल (स्थान 3)...

प्रश्न #66 📅 Group C Pre 2015
+1.0 / -0.25
A, B, C, D, E, F आणि G हे सर्वजण एका गोलाकार टेबलभोवती बसले आहेत. अ. F हा G च्या उजव्या बाजूला दुसरा आहे. ब. B हा F च्या शेजारी पण, G च्या शेजारी नाही. क. E हा C च्या शेजारी व G च्या उजव्या बाजूस चौथा. ड. D हा E आणि A यांच्या मध्ये बसलेला आहे. तर G च्या डाव्या बाजूस चौथ्या स्थानी कोण बसलेला असेल ?
EN A, B, C, D, E, F, and G are all seated around a circular table.
a. F is second to the right of G.
b. B is a neighbor of F but not of G.
c. E is a neighbor of C and fourth to the right of G.
d. D is seated between E and A.
Who is seated fourth to the left of G?
  • (A) C
  • (B) D
  • (C) A
  • (D) B
अचूक उत्तर: पर्याय (A) C

7 व्यक्ती वर्तुळाकार बसल्या आहेत: A, B, C, D, E, F, G (केंद्राकडे तोंड). दिलेल्या अटींची मांडणी करू: 1. G चे स्थान 1 मानू. 2. "F हा G च्या उजव्या बाजूला दुसरा आहे" $\implies$ F स्थान 3 वर. 3. "E हा G च्या उजव्या बाजूस चौथा आहे" $\implies$ E स्थान 5...

प्रश्न #67 📅 Group C Pre 2015
+1.0 / -0.25
सात सारख्या आकाराच्या सफरचंदांचे 12 मुलांत समान वाटप करायचे आहे. एकाही सफरचंदाचे चारपेक्षा जास्त तुकडे करायचे नाहीत. तर कमीत कमी तुकडे करून समान वाटप करण्याची पद्धत पर्यायांतून निवडा.
EN Seven apples of equal size are to be distributed equally among 12 children. No apple should be cut into more than four pieces. Select the method from the options to distribute equally by making the minimum number of pieces.
  • (A) दिलेल्या अटींप्रमाणे असे समान वाटप करणे शक्य नाही.
  • (B) प्रत्येक सफरचंदाचे प्रत्येकी चार तुकडे करून ते सारखे वाटायचे व चार शिल्लक ठेवायचे.
  • (C) चार सफरचंदांचे प्रत्येकी चार व तीन सफरचंदांचे प्रत्येकी तीन असे तुकडे करायचे.
  • (D) चार सफरचंदांचे प्रत्येकी तीन असे व तीन सफरचंदांचे प्रत्येकी चार असे तुकडे करायचे.
अचूक उत्तर: पर्याय (D) चार सफरचंदांचे प्रत्येकी तीन असे व तीन सफरचंदांचे प्रत्येकी चार असे तुकडे करायचे.

दिलेली माहिती: - 7 सफरचंद आणि 12 मुले. प्रत्येक मुलाला समान वाटा हवा आहे. $$\text{प्रत्येकाचा वाटा} = \frac{7}{12}\text{ सफरचंद}$$ - अट: एकाही सफरचंदाचे 4 पेक्षा जास्त तुकडे करायचे नाहीत आणि कमीत कमी तुकडे करायचे आहेत. अपूर्णांकाची फोड करू...

प्रश्न #68 📅 STI Pre 2015
+1.0 / -0.25
A, B, C, D, E आणि F हे पुस्तक वाचण्याचा आनंद घेणाऱ्या गटाचे सदस्य आहेत. C ही व्यक्ती गावाची सरपंच आहे आणि ही जागा स्त्रियांसाठी आरक्षित आहे. F ही व्यक्ती पखवाज वाजवते आणि ती अविवाहित आहे. A चा भाऊ हा D चा नवरा आहे. B ची पत्नी गटाची सदस्य नाही परंतु कधीतरी ती त्याच्यासोबत वाचन सत्राला येते. B आणि F हे एकाच भागात रहातात. यात दोन विवाहित जोडपी आहेत. तर F चे B शी नाते काय?
EN A, B, C, D, E, and F are members of a book reading club. C is the Sarpanch of the village, and this post is reserved for women. F plays the pakhawaj and is unmarried. A's brother is D's husband. B's wife is not a member of the group but sometimes accompanies him to the reading sessions. B and F live in the same area. There are two married couples in the group. What is F's relationship to B?
  • (A) नवरा
  • (B) वडील
  • (C) पत्नी
  • (D) पुरेशी माहिती दिलेली नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) पुरेशी माहिती दिलेली नाही

प्रश्न #69 📅 ASO Pre 2015
+1.0 / -0.25
A, B, C, D, E आणि F हे कुटुंब सदस्य आहेत. C ही इंजिनीअर व्यक्ती E चे वडील आहेत. A ही F ची आजी असून ती जिल्हाधिकारी होती. B ही व्यक्ती E चे आजोबा असून शेतकरी आहेत. कुटुंबात दोन विद्यार्थी असून ती भावंडे आहेत. एकजण कायद्याची पदवी मिळवण्यासाठी झटत आहे तर दुसरी व्यक्ती समाजकार्यातील पदवीसाठी झटत आहे. यात दोन विवाहित जोडपी आहेत. कुटुंबात एकजण शेतकरी, एकजण निवृत्त अधिकारी, एकजण इंजिनीअर आणि एकजण न्युरोसर्जन आहे. D या व्यक्तीचा व्यवसाय दर्शविणारा पर्याय निवडा.
EN A, B, C, D, E, and F are family members. C is an engineer and the father of E. A is the grandmother of F and was a District Collector. B is the grandfather of E and is a farmer. There are two students in the family who are siblings; one is pursuing a law degree and the other a degree in social work. There are two married couples. In the family, one is a farmer, one a retired officer, one an engineer, and one a neurosurgeon. Select the option indicating D's profession.
  • (A) कायद्याच्या पदवीसाठी झटणारा विद्यार्थी
  • (B) समाजकार्याच्या पदवीसाठी झटणारा विद्यार्थी
  • (C) न्युरोसर्जन
  • (D) D च्या व्यवसाया संदर्भातील वस्तुस्थिती पुरवलेली नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) न्युरोसर्जन

कुटुंबातील सदस्य: A, B, C, D, E, F (6 सदस्य). व्यवसाय: शेतकरी, निवृत्त अधिकारी (जिल्हाधिकारी), इंजिनीअर, न्युरोसर्जन, आणि 2 विद्यार्थी (कायद्याचा विद्यार्थी व समाजकार्याचा विद्यार्थी). माहितीचे विश्लेषण: 1. B हे E चे आजोबा असून शेतकरी आहेत: - B =...

प्रश्न #70 📅 Tax Assistant Pre 2015
+1.0 / -0.25
अतुल व्यक्तिगत नृत्य प्रशिक्षक आहे. पुढच्या आठवड्यात बुधवार ते रविवार त्याने ग्राहक आरक्षित केले आहेत. दिनाच्या दोन दिवस आधी मधु प्रशिक्षण घेणार आहे. चंदाचे आरक्षण मिकीच्या दोन दिवस आधी आहे जो दिनाच्या नंतर एक दिवस आणि ललिताच्या एक दिवस आधी येणार आहे. सरते शेवटी शिवला मधुच्या चार दिवस नंतर वेळ दिला आहे. जर मधु बुधवारी प्रशिक्षण घेणार असेल, तर कोणत्या दिवशी अतुलने दोघांना वेळ दिली आहे ?
EN Atul is a personal dance trainer. He has scheduled clients from Wednesday to Sunday next week. Madhu will train two days before Dina. Chanda has an appointment two days before Mickey, who comes one day after Dina and one day before Lalita. Finally, Shiv is scheduled four days after Madhu. If Madhu trains on Wednesday, on which day has Atul scheduled two clients?
  • (A) गुरूवार
  • (B) शुक्रवार
  • (C) शनिवार
  • (D) रविवार
अचूक उत्तर: पर्याय (D) रविवार

दिवस: बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. दिलेल्या माहितीनुसार क्रम लावू: 1. "मधु बुधवारी प्रशिक्षण घेणार आहे": - बुधवार = मधु 2. "दिनाच्या दोन दिवस आधी मधु प्रशिक्षण घेणार आहे": - मधु (बुधवार) हा दिनाच्या 2 दिवस आधी आहे $\implies$ शुक्रवार =...

प्रश्न #71 📅 STI Mains 2014
+1.0 / -0.25
F, H, J, K आणि N या पाच विद्यार्थ्यांचा एक गट आहे.
- H आणि J हे गणित व भूगोलाचा अभ्यास करतात.
- F आणि J हे गणित व इतिहासाचा अभ्यास करतात.
- H आणि K हे मनोविज्ञान व भूगोलाचा अभ्यास करतात.
- K आणि N हे मनोविज्ञान व जीवविज्ञानाचा अभ्यास करतात.
- N हा जीवविज्ञान, इतिहास आणि मनोविज्ञानाचा अभ्यास करतो.
मनोविज्ञान, भूगोल आणि जीवविज्ञान यांचा अभ्यास कोण करतो?
EN There is a group of five students F, H, J, K, and N.
- H and J study Mathematics and Geography.
- F and J study Mathematics and History.
- H and K study Psychology and Geography.
- K and N study Psychology and Biology.
- N studies Biology, History, and Psychology.
Who studies Psychology, Geography, and Biology?
  • (A) N
  • (B) K
  • (C) J
  • (D) H
अचूक उत्तर: पर्याय (B) K

पाच विद्यार्थ्यांचे विषय खालीलप्रमाणे मांडू: 1. H आणि J $\implies$ गणित, भूगोल 2. F आणि J $\implies$ गणित, इतिहास 3. H आणि K $\implies$ मनोविज्ञान, भूगोल 4. K आणि N $\implies$ मनोविज्ञान, जीवविज्ञान 5. N $\implies$ जीवविज्ञान, इतिहास, मनोविज्ञान आता...

प्रश्न #72 📅 PSI Pre 2014
+1.0 / -0.25
A, B, C, D, E, F हे सहा मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत. E हा D च्या डाव्या बाजूस आहे. C हा A आणि B च्या मध्ये आहे. F हा E आणि A च्या मध्ये आहे. तर B च्या डाव्या बाजूला कोण आहे ?
EN Six friends A, B, C, D, E, and F are playing in a circular ground facing each other. E is to the left of D. C is between A and B. F is between E and A. Who is to the left of B?
  • (A) A
  • (B) D
  • (C) C
  • (D) E
अचूक उत्तर: पर्याय (B) D

6 मित्र वर्तुळाकार मैदानात समोरासमोर बसून खेळत आहेत: A, B, C, D, E, F. दिलेल्या अटींनुसार घड्याळाच्या दिशेने (Clockwise) क्रम लावू: 1. "E हा D च्या डाव्या बाजूस आहे": - समोरासमोर (केंद्राकडे तोंड) बसल्यामुळे D च्या डावीकडे E आहे: $D \to E$ 2. "F हा...

प्रश्न #73 📅 PSI Mains 2013
+1.0 / -0.25
शाळेने आयोजित केलेल्या सुदृढ व काळजीवाहू माता या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यासाठी निमा, रझिया, मेरी व झरी या चौघींची निवड झाली आहे. त्यांच्याबद्दलची पुढील माहिती वाचून प्रथम विजेतीचे नाव सांगा. हिरवा पोशाख घातलेली व्यक्ती सर्वोत्तम सुदृढ व काळजीवाहू माता ठरली आहे. ओळीने ठेवलेल्या चार खुर्च्यांवर त्या बसल्या आहेत. त्या सर्वजणींनी पांढ-या, गुलाबी, हिरव्या व निळ्या अशा विविध रंगाचे पोशाख परिधान केले आहेत. त्यांच्यापैकी एकच दुस-या क्रमांकाची विजेती आहे व ती मेरीशेजारी बसली आहे. दुस-या क्रमांक विजेतीने गुलाबी पोशाख परिधान केला आहे. झरी ओळीच्या टोकाला (ओळीत शेवटी) बसलेली नाही व तिला दुसरा क्रमांक मिळालेला नाही. प्रथम व दुस-या क्रमांकविजेत्या व्यक्ती एकमेकांच्या शेजारी बसलेल्या नाहीत. मेरीने पांढरा पोशाख परिधान केला आहे. रझियाने गुलाबी पोशाख परिधान केला आहे. निळा व गुलाबी पोशाख परिधान केलेल्या स्पर्धक ओळीच्या शेवटी बसल्या आहेत.
EN Four mothers—Nima, Razia, Mary, and Zari—were selected for the finals of the 'Fit and Caring Mother' contest organized by a school. Read the information about them and name the first-place winner: The person wearing green is adjudged the best fit and caring mother. They are seated on four chairs placed in a row. They are dressed in white, pink, green, and blue. Only one among them is the runner-up and is seated next to Mary. The runner-up wore pink. Zari is not seated at either end of the row and did not win second prize. The first and second prize winners are not seated adjacent to each other. Mary wore white. Razia wore pink. The contestants wearing blue and pink are seated at the ends of the row.
  • (A) मेरी
  • (B) रझिया
  • (C) निमा
  • (D) झरी
अचूक उत्तर: पर्याय (D) झरी

प्रश्न #74 📅 STI Pre 2013
+1.0 / -0.25
मंचावर A, B, C व D या चार राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना बसविण्याची जबाबदारी श्री गर्ग यांच्यावर आहे. या प्रवक्त्यांबरोबर एक समन्वयक ही आहे. समन्वयकासह प्रवक्त्यांची नावे जेरे, हमीद, खेमू, थापा व पटेल अशी आहेत: समन्वयकाने मधल्या म्हणजे तिस-या आसनावरच बसायला हवे. C या पक्षाच्या प्रवक्त्याला D या पक्षाच्या प्रवक्त्याच्या शेजारी बसायचे नाही. पटेल हे A या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. B व C या पक्षांचे प्रवक्ते समन्वयकांच्या दोन्ही बाजूंना बसतील. हमीद हे समन्वयक नाहीत व ते खेमू आणि थापा यांच्यामध्ये बसतील. समन्वयक खेमू किंवा पटेल यांच्या शेजारी बसणार नाहीत. जेरे हे C या पक्षाचे प्रवक्ते आहेत व ते चौथ्या आसनावर बसतील. कोण समन्वयक आहे ?
EN Mr. Garg is responsible for seating spokespersons of four political parties A, B, C, and D on the stage, along with a coordinator. The names of the spokespersons including the coordinator are Jere, Hamid, Khemu, Thapa, and Patel. The coordinator must sit in the middle (3rd) seat. The spokesperson of party C does not want to sit adjacent to party D's spokesperson. Patel represents party A. Spokespersons of parties B and C will sit on either side of the coordinator. Hamid is not the coordinator and will sit between Khemu and Thapa. The coordinator will not sit adjacent to Khemu or Patel. Jere is the spokesperson for party C and will sit in the 4th seat. Who is the coordinator?
  • (A) जेरे
  • (B) थापा
  • (C) खेमू
  • (D) पटेल
अचूक उत्तर: पर्याय (B) थापा

5 आसने (1 ते 5): 4 पक्षांचे प्रवक्ते (A, B, C, D) आणि 1 समन्वयक. व्यक्ती: जेरे, हमीद, खेमू, थापा, पटेल. दिलेल्या अटींचे विश्लेषण: 1. "समन्वयकाने मधल्या म्हणजे तिसऱ्या आसनावरच बसायला हवे": - आसन 3 = समन्वयक. 2. "जेरे हे C या पक्षाचे प्रवक्ते आहेत व...

प्रश्न #75 📅 PSI Mains 2013
+1.0 / -0.25
मधू, भोलू, कनू, ज्ञानू, मिनू व नलू हे सहा मित्र मैत्रिणी षट्कोनाकार क्षेत्राच्या बाजू तयार होतील अशा पद्धतीनेसहा खुर्च्या मांडून बसले आहेत. मधू ज्ञानूच्या समोर व तो कनूच्या शेजारी उजव्या हाताला बसला आहे. मिनू ही मधू व नलू यांच्या मध्ये बसली असून ती नेमकी भोलूच्या समोर आहे.
पुढीलपैकी तीन जोड्या त्यांच्या बसण्याच्या पद्धतीनुसार समान आहेत म्हणून त्यांचा गट होऊ शकतो. तर कोणती जोडी वेगळी आहे ?
EN Six friends Madhu, Bholu, Kanu, Gyanu, Minu, and Nalu are seated in six chairs arranged to form the sides of a hexagonal area. Madhu sits opposite Gyanu and immediately to the right of Kanu. Minu sits between Madhu and Nalu and is directly opposite Bholu. Three of the following pairs are similar based on their seating pattern and form a group. Which pair is the odd one out?
  • (A) नलू - भोलू
  • (B) नलू- मधू
  • (C) नलू -मिनू
  • (D) मधू - भोलू
अचूक उत्तर: पर्याय (C) नलू -मिनू

6 मित्र षट्कोनाकार बसले आहेत: मधू, भोलू, कनू, ज्ञानू, मिनू, नलू. - मधू हा ज्ञानूच्या समोर बसला आहे. - मधू हा कनूच्या उजव्या हाताला बसला आहे. - मिनू ही मधू व नलू यांच्या मध्ये बसली आहे. - मिनू ही नेमकी भोलूच्या समोर आहे. जोड्यांचे विश्लेषण: - पर्याय...

प्रश्न #76 📅 PSI Mains 2011
+1.0 / -0.25
रमेश क्रिकेट खेळतो, रमेश व महेश हॉकी खेळतात. गणेश व परेश खो-खो खेळतात. महेश व गणेश फुटबॉल खेळतात. तर फुटबॉल व हॉकी हे दोन्ही खेळ खेळणाऱ्या मुलाचे नाव काय ?
EN Ramesh plays cricket. Ramesh and Mahesh play hockey. Ganesh and Paresh play kho-kho. Mahesh and Ganesh play football. What is the name of the boy who plays both football and hockey?
  • (A) रमेश
  • (B) महेश
  • (C) गणेश
  • (D) परेश
अचूक उत्तर: पर्याय (B) महेश

मुले आणि त्यांचे खेळ: 1. रमेश $\implies$ क्रिकेट खेळतो. 2. रमेश व महेश $\implies$ हॉकी खेळतात. 3. गणेश व परेश $\implies$ खो-खो खेळतात. 4. महेश व गणेश $\implies$ फुटबॉल खेळतात. आता फुटबॉल व हॉकी खेळणारे खेळाडू पाहू: - हॉकी खेळणारे: रमेश, महेश...

प्रश्न #77 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी विसंगत अक्षरगट (Odd group out) ओळखा:
1) CGK
2) MQU
3) EIM
4) FJO
EN Find the odd letter group out from the following:
1) CGK
2) MQU
3) EIM
4) FJO
  • (A) CGK
  • (B) MQU
  • (C) EIM
  • (D) FJO
अचूक उत्तर: पर्याय (D) FJO

प्रत्येक पर्यायातील अक्षरांमधील फरक तपासू: 1. CGK: - C (3) + 4 = G (7) - G (7) + 4 = K (11) (फरक = +4, +4) 2. MQU: - M (13) + 4 = Q (17) - Q (17) + 4 = U (21) (फरक = +4, +4) 3. EIM: - E (5) + 4 = I (9) - I (9) + 4 = M (13) (फरक = +4, +4) 4. FJO: - F...

प्रश्न #78 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी विसंगत गट (Odd one out) ओळखा:
1) OUX
2) AEI
3) IOU
4) EIO
EN Find the odd group out from the following:
1) OUX
2) AEI
3) IOU
4) EIO
  • (A) OUX
  • (B) AEI
  • (C) IOU
  • (D) EIO
अचूक उत्तर: पर्याय (A) OUX

इंग्रजी वर्णमालेतील स्वर (Vowels: A, E, I, O, U) आणि व्यंजने (Consonants) यांच्या आधारावर वर्गीकरण करू: - पर्याय 2 (AEI): A, E, I $\to$ तिन्ही अक्षरे स्वर (Vowels) आहेत. - पर्याय 3 (IOU): I, O, U $\to$ तिन्ही अक्षरे स्वर (Vowels) आहेत. - पर्याय 4...

प्रश्न #79 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी विसंगत पर्याय (Odd group) निवडा:
1) BYCX
2) EVFU
3) JQKX
4) IRKP
EN Choose the odd group out from the following:
1) BYCX
2) EVFU
3) JQKX
4) IRKP
  • (A) BYCX
  • (B) EVFU
  • (C) JQKX
  • (D) IRKP
अचूक उत्तर: पर्याय (C) JQKX

प्रत्येक गटातील पहिल्या दोन आणि शेवटच्या दोन अक्षरांची जोडी तपासू (Opposite letter pairs - बेरीज 27): 1. BYCX: - B (2) + Y (25) = 27 (विरुद्ध जोडी) - C (3) + X (24) = 27 (विरुद्ध जोडी) 2. EVFU: - E (5) + V (22) = 27 (विरुद्ध जोडी) - F (6) + U (21) =...

प्रश्न #80 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी विसंगत पर्याय (Odd one out) निवडा:
1) BDG
2) CEH
3) DFI
4) EGL
EN Select the odd one out from the following:
1) BDG
2) CEH
3) DFI
4) EGL
  • (A) BDG
  • (B) CEH
  • (C) DFI
  • (D) EGL
अचूक उत्तर: पर्याय (D) EGL

प्रत्येक पर्यायातील अक्षरांच्या स्थानांमधील फरक तपासू: 1. BDG: - B (2) + 2 = D (4) - D (4) + 3 = G (7) $\implies (+2, +3)$ 2. CEH: - C (3) + 2 = E (5) - E (5) + 3 = H (8) $\implies (+2, +3)$ 3. DFI: - D (4) + 2 = F (6) - F (6) + 3 = I (9)...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स