🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

रांगेतील स्थान, क्रम व मांडणी (Ranking & Order)

Ranking, Linear Sequence & Position in Row — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'रांगेतील स्थान, क्रम व मांडणी (Ranking & Order)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 41 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 1 / 3
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 41)
प्रश्न #1 📅 Combine Group B Pre 2025
+1.0 / -0.25
21 मुलींच्या रांगेमध्ये, जेव्हा मोनिकाला उजवीकडे चौथ्या जागेवर हलवले जाते, तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने किती जागा होती ?
EN In a row of 21 girls, when Monika was shifted four places to the right, she became 12th from the left end of the row. What was her original position from the right end of the row?
  • (A) 9वी
  • (B) 10वीं
  • (C) 11वी
  • (D) 14वी
अचूक उत्तर: पर्याय (D) 14वी

रांगेतील एकूण मुली = $N = 21$. 1. मोनिकाला उजवीकडे 4 जागा हलवल्यानंतर ती डावीकडून 12 व्या स्थानी येते ($L_{\text{नवीन}} = 12$). 2. उजवीकडे सरकल्याने क्रमांक वाढतो. म्हणून मोनिकाचे मूळ स्थान डावीकडून: $L_{\text{मूळ}} = 12 - 4 = 8$ वे. 3. रांगेतील...

प्रश्न #2 📅 Group C Pre 2024
+1.0 / -0.25
एका वर्गात N हा पाचव्या क्रमांकावर आहे. S हा शेवटून आठव्या क्रमांकावर आहे. जर T हा N नंतर सहावा आणि N आणि S च्या मध्यभागी असेल तर वर्गात किती विद्यार्थी आहेत?
EN In a class, N is ranked fifth. S is ranked eighth from the bottom. If T is sixth after N and is exactly midway between N and S, how many students are there in the class?
  • (A) 23
  • (B) 24
  • (C) 25
  • (D) 26
अचूक उत्तर: पर्याय (B) 24

विद्यार्थ्यांची क्रमवारी: 1. N चा वरून क्रमांक $= 5$ वा. 2. T हा N नंतर 6 वा असल्याने T चा वरून क्रमांक $= 5 + 6 = 11$ वा. 3. T हा N आणि S च्या मध्यभागी असल्याने, S हा T नंतर 6 वा असेल. म्हणून S चा वरून क्रमांक $= 11 + 6 = 17$ वा. 4. S चा शेवटून...

प्रश्न #3 📅 Group C Mains 2023
+1.0 / -0.25
एका 30 मुलांच्या रांगेमध्ये, P हा उजव्या टोकापासून चवथा आणि W हा डाव्या टोकापासून दहावा आहे. P आणि W मध्ये किती मुले आहेत ?
EN In a row of 30 boys, P is fourth from the right end and W is tenth from the left end. How many boys are there between P and W?
  • (A) 15
  • (B) 16
  • (C) 17
  • (D) 20
अचूक उत्तर: पर्याय (B) 16

रांगेतील एकूण मुले $= N = 30$. - P चे स्थान उजव्या टोकापासून चौथे आहे ($R_P = 4$). - W चे स्थान डाव्या टोकापासून दहावे आहे ($L_W = 10$). P आणि W यांच्या दरम्यान असणाऱ्या मुलांची संख्या काढू...

प्रश्न #4 📅 WRD_PWD_CIVIL 2023
+1.0 / -0.25
विधान: "उन्हाळ्याच्या दिवसांत राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा भासतो."
कृतीचे मार्ग:
१. स्थानिक प्रशासनाने जलसंवर्धन व पाणी पुनर्वापराचे व्यापक प्रकल्प तातडीने हाती घ्यावेत.
२. सर्व नवीन आणि अस्तित्वातील निवासी संकुलांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याच्या (Rainwater Harvesting) यंत्रणेला प्रोत्साहन व सक्ती करावी.

समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणता कृतीचा मार्ग योग्य आहे?
EN Statement: "During summer months, there is an acute drinking water shortage across the National Capital Region."
Courses of Action:
1. The municipal administration should immediately undertake comprehensive water conservation and recycling projects.
2. Rainwater harvesting should be actively mandated and incentivized across all residential housing complexes.

Which course(s) of action logically follow to resolve the issue?
  • (A) केवळ कृतीचा मार्ग २ योग्य आहे.
  • (B) कृतीचा मार्ग १ आणि २ दोन्ही योग्य आहेत.
  • (C) कृतीचा मार्ग १ किंवा २ यांपैकी कोणताही योग्य नाही.
  • (D) केवळ कृतीचा मार्ग १ योग्य आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) कृतीचा मार्ग १ आणि २ दोन्ही योग्य आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (२) कृतीचा मार्ग १ आणि २ दोन्ही योग्य आहेत. स्पष्टीकरण व प्रशासकीय विश्लेषण: * समस्या: उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई. * कृती १ चे मूल्यमापन: जलसंवर्धनाचे (Water Conservation) प्रकल्प सुरू केल्याने उपलब्ध पाण्याचा अपव्यय टळतो आणि...

प्रश्न #5 📅 WRD_PWD_CIVIL 2023
+1.0 / -0.25
50 गुणवंत विद्यार्थ्यांच्या एका गुणवत्ता यादीत, वरून मोजल्यास अमोलचा क्रमांक 15 वा आहे. तर त्याच यादीत खालून मोजल्यास अमोलचा क्रमांक कितवा असेल?
EN In a merit list of 50 qualifying students, Amol ranks 15th from the top. What is Amol's rank when counted from the bottom of the list?
  • (A) 37 वा
  • (B) 30 वा
  • (C) 36 वा
  • (D) 35 वा
अचूक उत्तर: पर्याय (C) 36 वा

अचूक उत्तर: पर्याय (3) 36 वा स्पष्टीकरण: एकाच व्यक्तीचे दोन्ही टोकांकडून स्थान आणि एकूण संख्या यांच्यातील संबंधाचे सूत्र खालीलप्रमाणे आहे: $$\text{एकूण संख्या} = (\text{वरून स्थान} + \text{खालून स्थान}) - 1$$ दिलेली माहिती: * एकूण विद्यार्थी = 50 *...

प्रश्न #6 📅 WRD_PWD_CIVIL 2023
+1.0 / -0.25
42 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात राकेशचा वरून 15 वा क्रमांक आहे आणि गुणवत्ता यादीत राजेशच्या खाली नेमके 8 विद्यार्थी आहेत. तर राकेश आणि राजेश यांच्या दरम्यान एकूण किती विद्यार्थी आहेत?
EN In a class of 42 students, Rakesh ranks 15th from the top, and there are exactly 8 students below Rajesh's rank. How many students are there between Rakesh and Rajesh?
  • (A) 19
  • (B) 16
  • (C) 17
  • (D) 18
अचूक उत्तर: पर्याय (D) 18

अचूक उत्तर: पर्याय (4) 18 स्पष्टीकरण: दिलेली माहिती: * वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या = 42 * राकेशचा वरून क्रमांक = 15 वा * राजेशच्या खाली नेमके 8 विद्यार्थी आहेत. याचा अर्थ राजेशचा खालून क्रमांक = $8 + 1 = 9$ वा आहे. राजेशचा वरून क्रमांक काढू...

प्रश्न #7 📅 WRD_PWD_CIVIL 2023
+1.0 / -0.25
49 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात करीमचा वरून 16 वा क्रमांक आहे. तर गुणवत्ता यादीत करीमचा खालून कितवा क्रमांक असेल?
EN Karim ranks 16th from the top in a class of 49 students. What is his rank counted from the bottom?
  • (A) 33 वा
  • (B) 32 वा
  • (C) 34 वा
  • (D) 35 वा
अचूक उत्तर: पर्याय (C) 34 वा

अचूक उत्तर: पर्याय (3) 34 वा स्पष्टीकरण: रांगेत किंवा गुणवत्ता यादीत खालून स्थान काढण्याचे मानक सूत्र: $$\text{खालून क्रमांक} = (\text{एकूण विद्यार्थी} - \text{वरून क्रमांक}) + 1$$ दिलेली माहिती: * एकूण विद्यार्थी = 49 * करीमचा वरून क्रमांक = 16...

प्रश्न #8 📅 WRD_PWD_CIVIL 2023
+1.0 / -0.25
A, B, C, D, E, F आणि G हे सात धावपटू एका शर्यतीत धावत आहेत. E हा A च्या पुढे पण F च्या मागे आहे. D हा केवळ दोन धावपटूंच्या पुढे आहे. G हा सर्वात शेवटी धावत आहे. C हा केवळ दोन धावपटूंच्या मागे आहे. F हा पहिल्या स्थानावर नाही. तर मागून चौथ्या स्थानावर कोणता धावपटू धावत आहे?
EN Seven athletes A, B, C, D, E, F, and G participate in a race. E is ahead of A but behind F. D is ahead of only two athletes. G is running last. C is running behind only two athletes. F is not in the first position. Which athlete is running in the fourth position from behind?
  • (A) C
  • (B) E
  • (C) A
  • (D) D
अचूक उत्तर: पर्याय (B) E

अचूक उत्तर: पर्याय (2) E स्पष्टीकरण: शर्यतीत 1 (सर्वात पुढे) ते 7 (सर्वात शेवटी) अशी सात स्थाने मानू: $$1 > 2 > 3 > 4 > 5 > 6 > 7$$ दिलेल्या निश्चित अटींची मांडणी: 1. 'G सर्वात शेवटी धावत आहे': स्थान 7 = G 2. 'D हा केवळ दोन धावपटूंच्या पुढे आहे': D...

प्रश्न #9 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता, त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाएवढी फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली, तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 24 पायऱ्या असतील, तर त्या भक्ताजवळ किती फुले होती ?
EN When a devotee went to a temple for worship, he placed flowers on each step equal to the step number. He offered 9 flowers to the deity, after which 17 flowers were left with him. If the temple has 24 steps, how many flowers did the devotee have initially?
  • (A) 415
  • (B) 362
  • (C) 346
  • (D) 326
अचूक उत्तर: पर्याय (D) 326

भक्ताने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाइतकी फुले ठेवली आहेत: 1. मंदिरात एकूण 24 पायऱ्या आहेत. पायऱ्यांवर ठेवलेली एकूण फुले म्हणजेच पहिल्या 24 नैसर्गिक संख्यांची बेरीज: $S_n = \frac{n(n + 1)}{2}$...

प्रश्न #10 📅 Group C Pre 2019
+1.0 / -0.25
फोटो काढण्यासाठी 5 मुली एका बाकावर बसलेल्या आहेत. लताच्या लगेचच डावीकडे सविता बसलेली आहे. कविताच्या लगेचच डावीकडे अमृता बसलेली आहे. अमृताच्या लगेचच डावीकडे भाविका बसलेली आहे तर मध्यभागी कोण बसलेले आहे?
EN Five girls are sitting on a bench to have their photograph taken. Savita is sitting immediately to the left of Lata. Amrita is sitting immediately to the left of Kavita. Bhavika is sitting immediately to the left of Amrita. Who is sitting in the middle?
  • (A) सविता
  • (B) कविता
  • (C) अमृता
  • (D) लता
अचूक उत्तर: पर्याय (B) कविता

पाच मुलींच्या डावीकडून उजवीकडे बसण्याची स्थिती अटींनुसार मांडू: 1. "सविता ही लताच्या लगेचच डावीकडे बसलेली आहे": क्रम: `सविता - लता` (2 मुलींचा गट). 2. "अमृता ही कविताच्या लगेचच डावीकडे बसलेली आहे": क्रम: `अमृता - कविता`. 3. "भाविका ही अमृताच्या...

प्रश्न #11 📅 Group C Pre 2017
+1.0 / -0.25
गोपाळच्या पुढे 3 मुले सोडून त्या रांगेत 8 मुले उभी आहेत आणि गोपाळच्या मागे 5 मुले सोडून त्याच रांगेत 12 मुले उभी आहेत, तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत ?
EN Ahead of Gopal, leaving 3 boys, 8 boys are standing in the row, and behind Gopal, leaving 5 boys, 12 boys are standing in the same row. How many total boys are there in that row?
  • (A) 28
  • (B) 30
  • (C) 27
  • (D) 29
अचूक उत्तर: पर्याय (D) 29

प्रश्न #12 📅 PSI Mains 2016
+1.0 / -0.25
एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी 11 व्या क्रमांकावर शेवटून 31 व्या क्रमांकावर आहे. जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 8 असेल तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते?
EN Among the students who passed in an annual examination, Manasi is ranked 11th from the top and 31st from the bottom. If the number of students who failed the examination is 8, how many students appeared for the examination?
  • (A) 48
  • (B) 49
  • (C) 50
  • (D) यापैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) 49

प्रश्न #13 📅 STI Pre 2016
+1.0 / -0.25
पुढे दिलेल्या मालिकेच्या संदर्भात कोणते अक्षर एका अक्षराच्या डावीकडून दुसरे आहे जे एका अक्षराला उजवीकडे लागून आहे जे एका अक्षराच्या डावीकडून चौथे आहे जे E अक्षराच्या डावीकडून तिसऱ्या असलेल्या आणि H अक्षराच्या उजवीकडून दुसऱ्या असलेल्या अक्षराच्या मधोमध आहे.
A B C D E F G H I J
EN With reference to the series given below, which letter is second to the left of the letter that is immediately to the right of the letter that is fourth to the left of the letter which is midway between the letter third to the left of letter E and the letter second to the right of letter H?
A B C D E F G H I J
  • (A) J
  • (B) D
  • (C) H
  • (D) A
अचूक उत्तर: पर्याय (D) A

दिलेली वर्णमाला मालिका: `A (1) B (2) C (3) D (4) E (5) F (6) G (7) H (8) I (9) J (10)` प्रश्नातील विधानाचा शेवटून सुरुवातीकडे टप्प्याटप्प्याने उलगडा करू: 1. "E अक्षराच्या डावीकडून तिसऱ्या असलेल्या अक्षर": E हे 5 व्या क्रमांकावर आहे. त्याच्या...

प्रश्न #14 📅 PSI Mains 2014
+1.0 / -0.25
सहा जणांच्या रांगेत D आणि C हे E चे लगतचे शेजारी आहेत. B हा फक्त A चा शेजारी आहे. A हा F पासून चौथा आहे. तर दोन टोकांना कोण आहेत ?
EN In a row of six persons, D and C are the immediate neighbours of E. B is the neighbour of only A. A is fourth from F. Who are at the two ends?
  • (A) F आणि B
  • (B) B and D
  • (C) C and A
  • (D) F and C
अचूक उत्तर: पर्याय (A) F आणि B

सहा व्यक्ती एका रांगेत (जागा 1 ते 6) बसल्या आहेत: 1. "B हा फक्त A चा शेजारी आहे": ज्या व्यक्तीला फक्त एकच शेजारी असतो, ती व्यक्ती रांगेच्या अगदी टोकाला (जागा 1 किंवा 6 वर) बसलेली असते. म्हणून B हा टोकाला आहे आणि A हा त्याच्या लगतच्या जागेवर आहे. 2...

प्रश्न #15 📅 Clerk Typist Pre 2014
+1.0 / -0.25
1.50 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 27 मुलांना क्रिडांगणावर ओळीत उभे केले आहे. यातील ओळीच्या एका टोकापासून कमाने उभी असलेली दोन व ओळीत 14 व्या व 17 व्या ऋ्मांकावर उभी असलेली दोन अशी चार मुले आपापल्या जागा सोडून निघून गेली. उरलेल्या मुलांनी स्वतःच्या जागा बदलल्या नाहीत. तर आता ओळीच्या टोकाला असलेल्या मुलांच्या दरम्यानचे अंतर किती?
EN 27 children are made to stand in a line on a playground at intervals of 1.50 metres from each other. Four children left their places: two standing consecutively from one end of the line, and two standing at the 14th and 17th positions in the line. The remaining children did not change their positions. What is now the distance between the children standing at the two ends of the line?
  • (A) 34.50 मीटर
  • (B) 36 मीटर
  • (C) 39 मीटर
  • (D) 37.50 मीटर
अचूक उत्तर: पर्याय (B) 36 मीटर

1. सुरुवातीला 27 मुले एका ओळीत प्रत्येकी 1.50 मीटर अंतरावर उभी आहेत (जागा क्र. 1 ते 27). दोन लगतच्या मुलांमधील अंतर $= 1.50$ मीटर. 2. चार मुले निघून गेली: - एका टोकापासून क्रमाने उभी असलेली 2 मुले (समजा जागा क्र. 1 आणि 2 निघून गेली). त्यामुळे आता...

प्रश्न #16 📅 PSI Pre 2014
+1.0 / -0.25
शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे. तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत ?
EN 288 school children were asked to stand in rows. The number of rows is half the number of children in each row. How many children are there in each row?
  • (A) 12
  • (B) 16
  • (C) 20
  • (D) 24
अचूक उत्तर: पर्याय (D) 24

शाळेतील एकूण मुले $= 288$. दिलेली अट: रांगांची संख्या ही प्रत्येक रांगेतील मुलांच्या निमपट (अर्धी) आहे. समजा प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या $C$ आहे. म्हणून रांगांची संख्या $R = \frac{C}{2}$. एकूण मुले $= R \times C$ $\frac{C}{2} \times C = 288$...

प्रश्न #17 📅 ASO Mains 2012
+1.0 / -0.25
क्रिकेटचा सामना बघत, आठ मित्र एका रांगेत पुढील प्रमाणे बसले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून, त्याच्या उजवीकडे कोणीही नाही, इला व गणेश यांच्यामध्ये फराहा आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. इला ही धनराजच्या शेजारी आहे. चंद्रिका कडेला आहे. तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ति आहेत ?
EN While watching a cricket match, eight friends are seated in a row as follows:
Bharat is to the right of Ashok, and there is no one to his right.
Farah is between Ila and Ganesh.
Ganesh is to the right of Husein.
Ashok is between Bharat and Dhanraj.
Ila is adjacent to Dhanraj.
Chandrika is at an end.
How many persons are seated between Ashok and Ganesh?
  • (A) 1
  • (B) 2
  • (C) 3
  • (D) 4
अचूक उत्तर: पर्याय (C) 3

आठ मित्रांची डावीकडून उजवीकडे जागांची मांडणी करू (जागा क्र. 1 ते 8): 1. "अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून, त्याच्या उजवीकडे कोणीही नाही": याचा अर्थ भारत हा सर्वात उजव्या टोकाला आहे $\implies$ जागा 8 = भारत. अशोक भारताच्या डावीकडे आहे $\implies$ जागा...

प्रश्न #18 📅 STI Pre 2012
+1.0 / -0.25
कवायतीसाठी मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत, तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर एकूण मुले 484 असतील तर कवायतीसाठी केलेल्या रांगा किती ?
EN For a physical drill, the number of rows of children is equal to the number of children in each row. If the total number of children is 484, how many rows were formed for the drill?
  • (A) 24
  • (B) 22
  • (C) 18
  • (D) 28
अचूक उत्तर: पर्याय (B) 22

प्रश्न #19 📅 PSI Mains 2011
+1.0 / -0.25
एका रांगेत संदिप डावीकडून 25 वा आहे, व उजवीकडून तो 25 वा आहे तर रांगेत एकूण मूले किती आहे ?
EN In a row, Sandeep is 25th from the left and 25th from the right. How many boys in total are there in the row?
  • (A) 50
  • (B) 49
  • (C) 48
  • (D) 51
अचूक उत्तर: पर्याय (B) 49

रांगेत संदिपचे स्थान: - डावीकडून क्रमांक $= 25$ वा ($L = 25$) - उजवीकडून क्रमांक $= 25$ वा ($R = 25$) रांगेतील एकूण मुलांची संख्या काढण्याचे सूत्र: $\text{एकूण मुले} = \text{डावीकडून स्थान} + \text{उजवीकडून स्थान} - 1$...

प्रश्न #20 📅 PSI Mains 2011
+1.0 / -0.25
पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा ही लिनाच्या उजव्या बाजूस आहे. रीटानंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लिनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना ही लिनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे तर मध्यभागी कोण बसलेले आहे ?
EN Five girls are sitting in a row such that Rita is to the right of Leena. Next to Rita, Sita is to her left. Geeta is to the left of Leena. Meena is to the left of Leena but to the right of Geeta. Who is sitting in the middle?
  • (A) लिना
  • (B) मीना
  • (C) गीता
  • (D) सीता
अचूक उत्तर: पर्याय (A) लिना

पाच मुलींच्या डावीकडून उजवीकडे बसण्याची स्थिती मांडू: 1. "गीता ही लिनाच्या डाव्या बाजूस आहे": गीता ... लिना. 2. "मीना ही लिनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे": यावरून गीता, मीना आणि लिना यांचा क्रम मिळतो: गीता < मीना < लिना. 3...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स