📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 12)

Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning

'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,708 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 12 / 86
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))

2 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 221 ते 240 (एकूण 1,708)
+1.0 / -0.25
अ) भारतीय संविधानानुसार 14 वर्षाहुन कमी वयाची व्यक्ती बालक होय.
ब) भारतीय जनगणनेतही 14 वर्षाहुन कमी वयाच्या व्यक्तीला बालक मानले जाते.
क) बाल अधिकार कन्वेशन (सी.आर.सी.) नुसार 18 वर्षाहुन कमी वयाची व्यक्ती बालक आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे / आहेत ?
EN a) According to the Constitution of India, a person below the age of 14 years is a child.
b) In the Census of India, a person below the age of 14 years is considered a child.
c) According to the Convention on the Rights of the Child (CRC), a person below the age of 18 years is a child.
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि क

बालक (Child) या संज्ञेच्या व्याख्या: 1. विधान 'अ' बरोबर आहे: भारतीय संविधानातील बालकांविषयक विशेष तरतुदींमध्ये 14 वर्षांखालील व्यक्तीला बालक मानले आहे: - कलम 24: 14 वर्षांखालील कोणत्याही बालकाला कारखान्यात वा खाणीत कामावर ठेवण्यास मनाई. - कलम 21A व...

+1.0 / -0.25
'पोक्सो' कायदा 2012 मधील तरतुदीनुसार मुलांचे खालीलपैकी कोणते हक्क आहेत ?
अ) मुलगा/मुलगी यांचा 'जबाब' अथवा ' म्हणणे' त्यांच्या घरी किंवा त्यांच्या पसंतीने निवडलेल्या ठिकाणी प्राधान्याने नागरी पोशाखातील महिला पोलीस अधिकारी अथवा उप-निरीक्षक पदापेक्षा खालच्या श्रेणीतील नसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यामार्फत नोंदविण्यात यावे.
ब) चौकशीच्या काळात मुलगा/मुलगी आरोपीच्या संपर्कात येणार नाही याची खात्री पोलीस अधिकाऱ्यांनी केली पाहिजे.
क) मुलगा/मुलगी यांना रात्री पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेतले जाऊ शकते.
पर्यायी उत्तरे :
EN Under the provisions of the 'POCSO' Act 2012, which of the following are rights of children?
a) The statement of a child should be recorded at their residence or at a place of their choice, preferably by a woman police officer in civil clothes not below the rank of sub-inspector.
b) The police officer must ensure that the child does not come into contact with the accused during inquiry.
c) A child can be detained at a police station overnight.
Answer options:
  • (A) अ आणि ब
  • (B) अ, ब आणि क
  • (C) ब आणि क
  • (D) अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब

पोक्सो कायदा, 2012 (POCSO Act) अंतर्गत बालकांचे हक्क: बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO Act), 2012 च्या कलम 24 नुसार: 1. विधान 'अ' बरोबर आहे (कलम 24(1)): मुलाचा जबाब त्याच्या घरी किंवा त्याच्या पसंतीच्या ठिकाणी घेतला जावा, आणि तो शक्यतो...

+1.0 / -0.25
एकात्मीक बालविकास योजने (आय.सी.डी.एस.) संदर्भात खालीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहे/आहेत ?
अ) ही योजना 2 ऑक्टोबर 1975 पासून सुरु करण्यात आली.
ब) ही योजना महात्मा गांधी यांच्या 108 व्या जयंती दिनी सुरु करण्यात आली.
क) या योजनेचा उद्देश बालकांच्या योग्य मानसीक, शारीरिक व सामाजिक विकासासाठी पाया घालणे हा आहे.
ड) सहा वर्षांखालील वयाच्या बालकांच्या पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणने.
पर्यायी उत्तरे :
EN Regarding the Integrated Child Development Services (ICDS), which of the following statement(s) is/are correct?
a) This scheme was launched on 2 October 1975.
b) This scheme was launched on the 108th birth anniversary of Mahatma Gandhi.
c) The objective of this scheme is to lay the foundation for proper psychological, physical, and social development of the child.
d) To bring about improvement in the nutritional and health status of children under six years of age.
Answer options:
  • (A) फक्त ड
  • (B) फक्त ब
  • (C) ब, क आणि ड
  • (D) अ, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, क आणि ड

एकात्मिक बाल विकास योजना (ICDS) - विधानांची पडताळणी: 1. विधान 'अ' बरोबर आहे: ICDS योजना 2 ऑक्टोबर 1975 रोजी प्रायोगिक तत्त्वावर 33 विकास प्रकल्पांमध्ये सुरू करण्यात आली. 2. विधान 'ब' चूक आहे: महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 चा आहे. त्यामुळे 2...

+1.0 / -0.25
अ) मुलांमधील पोषण पातळी सुधारणे हे मध्याह्न भोजन योजनेचे उद्दिष्ट्य आहे.
ब) मध्याह्न भोजन ही योजना जगातील सर्वांत मोठी शालेय आहार योजना आहे.
क) दारिद्र्य रेषेखालील मुलांसाठीची ही योजना आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
EN a) Improving nutritional levels among children is the objective of the Mid-Day Meal Scheme.
b) The Mid-Day Meal Scheme is the world's largest school feeding program.
c) This scheme is meant only for children living below the poverty line.
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) अ, ब आणि क
  • (B) अ आणि क
  • (C) अ आणि ब
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

+1.0 / -0.25
बालमजुरी समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणता कायदा केला ?
अ) फॅक्टरी कायदा
ब) खाण कायदा
क) बालकामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा
ड) सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा हक्क कायदा
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following laws were enacted by the Government of India to address the problem of child labour?
a) Factories Act
b) Mines Act
c) Child Labour (Prohibition and Regulation) Act
d) Right to Free and Compulsory Education Act
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) क आणि ड
  • (C) अ, क आणि ड
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड

+1.0 / -0.25
माँटेसरी पद्धती मध्ये बालकाच्याचा....... विकास हे पहिले तत्व आहे. अ) व्यक्तीमत्व ब)मानसिक क)सृजनशील ड) स्वयं शिक्षण पर्यायी उत्तरे :
EN In the Montessori method, the ...... development of the child is the first principle:
a) Personality b) Mental c) Creative d) Self-education
Answer options:
  • (A) ब
  • (B) अ आणि ब
  • (C) अ
  • (D) ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ

मॉन्टेसरी शिक्षण पद्धती (Montessori Method): 1. इटालियन शिक्षणतज्ज्ञ व डॉक्टर मारिया मॉन्टेसरी (Maria Montessori) यांनी बालशिक्षणासाठी ही पद्धती विकसित केली. 2. मॉन्टेसरी पद्धतीचे पहिले आणि मूलभूत तत्त्व म्हणजे बालकाचा संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास...

+1.0 / -0.25
'चिल्ड्रेन्स एड सोसायटी' नावाच्या अशासकीय संस्थेने 1941 मध्ये मुंबईमध्ये.......मुलांसाठी घर उभारले.
EN In 1941, an NGO named 'Children's Aid Society' established a home in Mumbai for ...... children.
  • (A) सिझोफ्रेनिक
  • (B) ऑटिस्टिक
  • (C) मानसिक अपंगत्व
  • (D) शारीरिकदृष्ट्या अपंग
अचूक उत्तर: पर्याय (C) मानसिक अपंगत्व

चिल्ड्रन्स एड सोसायटी आणि मानखुर्द संस्था: 1. चिल्ड्रन्स एड सोसायटी (Children's Aid Society): ही मुंबईतील बाल कल्याणासाठी कार्य करणारी 1927 मध्ये स्थापन झालेली नामवंत अशासकीय संस्था (NGO) आहे. 2. या संस्थेने 1941 मध्ये मुंबईतील मानखुर्द येथे विशेष...

+1.0 / -0.25
अ) ग्राम विकास व महिला बाल विकास विभागातर्फे मुंबईत दरवर्षी महिला बचत गटांच्या उत्पादनांचे 'सरस महालक्ष्मी' प्रदर्शन भरवले जाते.
ब) सुमन सुकळीकर उदोगीनी महिला सक्षमीकरण ही योजना महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्यासाठी सुरु केली आहे.
वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहे/आहेत ?
EN a) Every year in Mumbai, the Rural Development and Women & Child Development Department organizes the 'Saras Mahalaxmi' exhibition of products of women's self-help groups.
b) Suman Sukalikar Udyogini Mahila Sakshamikaran Scheme was launched to provide loans to women's self-help groups at zero percent interest.
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

'महालक्ष्मी सरस' प्रदर्शन आणि महिला सक्षमीकरण: 1. विधान 'अ' बरोबर आहे: महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग आणि उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) यांच्या वतीने दरवर्षी मुंबईत महिला बचत गटांच्या हस्तकला व उत्पादनांचे राज्यस्तरीय...

+1.0 / -0.25
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या छळास प्रतिबंध करणारे कायदे कोणते आहेत ?
अ) समान वेतन अधिनियम 1970
ब) प्रसुती लाभ अधिनियम 1964
क) विशाखा मार्गदर्शक तत्वे 1997
पर्यायी उत्तरे
EN Which of the following are laws/measures to prevent harassment of women at workplace?
a) Equal Remuneration Act 1976
b) Maternity Benefit Act 1961
c) Vishaka Guidelines 1997
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) अ आणि ब
  • (C) फक्त क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त क

+1.0 / -0.25
81 व्या घटना दुरुस्तीत महिलांना संसदेत किती टक्के आरक्षणाचा प्रस्ताव होता ?
EN What percentage of reservation for women in Parliament was proposed in the 81st Constitutional Amendment Bill?
  • (A) 10%
  • (B) 30%
  • (C) 33%
  • (D) 50%
अचूक उत्तर: पर्याय (C) 33%

81 वी घटनादुरुस्ती विधेयक आणि महिला आरक्षण: 1. 81 वे घटनादुरुस्ती विधेयक, 1996: तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने 12 सप्टेंबर 1996 रोजी लोकसभेत 81 वे घटनादुरुस्ती विधेयक मांडले. 2. प्रस्तावित आरक्षण: या विधेयकाद्वारे...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय महिला आयोगाची खालीलपैकी कोणती कार्य आहे/आहेत ?
अ) महिला अत्याचार विरोधी कायदयाचे पुनर्मुल्यांकन करणे.
ब) पारिवारीक महिला लोक अदालतीचे' आयोजन करणे.
क) गरीब स्त्रियांना लघु अनुदान बिगर शासकिय संस्थे (एनजीओ) मार्फत देणे.
ड) महिलांकरीता कायदेविषयक जाणीव जागृती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following is/are function(s) of the National Commission for Women?
a) Reviewing legislation on crimes against women.
b) Organizing 'Parivarik Mahila Lok Adalat'.
c) Providing micro-grants to poor women through NGOs.
d) Organizing legal awareness training programmes for women.
Answer options:
  • (A) अ आणि ब
  • (B) अ, ब आणि क
  • (C) ब, क आणि ड
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब आणि ड

राष्ट्रीय महिला आयोगाची (NCW) वैधानिक कार्ये: राष्ट्रीय महिला आयोग कायदा, 1990 च्या कलम 10 अन्वये आयोगाची कार्ये: 1. महिला अत्याचार विरोधी कायद्याचे पुनर्मूल्यांकन करणे (अ): महिलांवरील कायद्यांचा अभ्यास करून सुधारणा सुचवणे (कलम 10(1)(d)). 2...

+1.0 / -0.25
शासन निर्णय दि. 2 नोव्हेंबर 2015 नुसार महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याशी बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ कार्यक्रम संबंधित नाही ?
EN According to the Government Resolution dated 2 November 2015, which district of Maharashtra is not associated with the Beti Bachao-Beti Padhao programme?
  • (A) औरंगाबाद
  • (B) कोल्हापूर
  • (C) बीड
  • (D) सोलापूर
अचूक उत्तर: पर्याय (D) सोलापूर

बेटी बचाओ-बेटी पढाओ (BBBP) - महाराष्ट्र शासन निर्णय (2 नोव्हेंबर 2015): 1. महाराष्ट्र शासनाने 2 नोव्हेंबर 2015 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार (GR) राज्यातील ज्या 10 जिल्ह्यांमध्ये बाल लिंग गुणोत्तर (CSR) सर्वात कमी होते, त्या जिल्ह्यांमध्ये हा...

+1.0 / -0.25
महाराष्ट्र शासनाने राज्यातील खेळाडुंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रोत्साहन मिळावे, युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे याकरिता राष्ट्रकूल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या खेळाडुंसाठी खालीलपैकी कोणता निर्णय घेण्यात आला ?
अ) सुवर्णपदक विजेत्या खेळाडुंना 50 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्या खेळाडुंना 30 लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्या खेळाडुंसाठी 20 लाख असे बक्षीस देण्यात येणार आहे.
ब) सुवर्णपदक विजेत्या खेळाडुंच्या मार्गदर्शकासाठी 12.50 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्या खेळाडुंच्या मार्गदर्शकासाठी 7.50 लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्या खेळाडुंच्या मार्गदर्शकासाठी 5 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे / आहेत ?
EN To encourage the state's athletes in international sporting events and attract youth towards sports, which decision was taken by the Government of Maharashtra for medal winners of the Commonwealth Games 2022?
a) Gold medal winners to receive ₹ 50 lakh, Silver medal winners ₹ 30 lakh, and Bronze medal winners ₹ 20 lakh.
b) Coaches of Gold medalists to receive ₹ 12.50 lakh, Silver coaches ₹ 7.50 lakh, and Bronze coaches ₹ 5 lakh.
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

+1.0 / -0.25
मजबूत आणि निरोगी पिढ्या विकसित करुन भविष्यकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सुसज्ज बनवणे' हे राष्ट्रीय युवा धोरण 2014 चे एक उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी खालीलपैकी कोणती प्राथमिकता आहे ?
अ) आरोग्य आणि निरोगी जीवनशैली
ब) क्रिडा
क) सामाजिक मूल्यांची वाढ
ड) शिक्षण
पर्यायी उत्तरे :
EN 'Developing strong and healthy generations equipped to take on future challenges' is an objective of the National Youth Policy 2014. To achieve this, which of the following is a priority?
a) Health and healthy lifestyle
b) Sports
c) Promotion of social values
d) Education
Answer options:
  • (A) अ फक्त
  • (B) अ आणि ड
  • (C) अ, ब आणि क
  • (D) ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ फक्त

राष्ट्रीय युवा धोरण 2014 - निरोगी पिढी उद्दिष्ट व प्राधान्यक्रम: 1. उद्दिष्ट 2: राष्ट्रीय युवा धोरण 2014 (NYP-2014) चे दुसरे प्रमुख उद्दिष्ट 'मजबूत आणि निरोगी पिढ्या विकसित करून भविष्यकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सुसज्ज बनवणे' (Develop a strong...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय युवा धोरणानुसार 'युवक' आणि 'किशोर' म्हणजे
EN According to the National Youth Policy, 'Youth' and 'Adolescents' refer to:
  • (A) अनुक्रमे वय वर्ष 15 ते 29 आणि वय वर्ष 10 ते 19 या वयोगटातील व्यक्ती.
  • (B) अनुक्रमे वय वर्ष 14 ते 28 आणि वय वर्ष 12 ते 18 या वयोगटातील व्यक्ती.
  • (C) अनुक्रमे वय वर्ष 15 ते 30 आणि वय वर्ष 12 ते 19 या वयोगटातील व्यक्ती.
  • (D) अनुक्रमे वय वर्ष 15 ते 35 आणि वय वर्ष 10 ते 19 या वयोगटातील व्यक्ती.
अचूक उत्तर: पर्याय (A) अनुक्रमे वय वर्ष 15 ते 29 आणि वय वर्ष 10 ते 19 या वयोगटातील व्यक्ती.

राष्ट्रीय युवा धोरणानुसार 'युवक' आणि 'किशोर' व्याख्या: 1. युवक (Youth): राष्ट्रीय युवा धोरण 2014 नुसार 'युवक' म्हणजे वय वर्षे 15 ते 29 या वयोगटातील व्यक्ती. 2. किशोर (Adolescents): राष्ट्रीय युवा धोरण आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार 'किशोर'...

+1.0 / -0.25
अ) नेहरु युवाकेंद्र संघठन 1970 मध्ये सुरु झाले.
ब) नेहरु युवाकेंद्र संघटनेचा उद्देश 'युवकांचे व्यक्तीमत्व आणि नेतृत्व गुण विकसीत करणे आणि त्यांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी करुन घेणे' हा आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे / आहेत ?
EN a) Nehru Yuva Kendra Sangathan was established in 1970.
b) The objective of Nehru Yuva Kendra Sangathan is 'to develop personality and leadership qualities of youth and engage them in nation-building activities'.
Which of the above statement(s) is/are incorrect?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

नेहरू युवा केंद्र संघटन (Nehru Yuva Kendra Sangathan - NYKS): 1. स्थापना (विधान अ): नेहरू युवा केंद्रांची स्थापना 1972 मध्ये (पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या रजत जयंती वर्षानिमित्त) करण्यात आली होती, 1970 मध्ये नाही. पुढे 1987 मध्ये या केंद्रांचे नियमन...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
अ) सर्वसाधारण लोकसंख्येपेक्षा आदिवासी समूह आजारपण आणि कुपोषण या धोक्यांना लवकर बळी पडतात, त्यांना सार्वजनिक अथवा जिल्हा आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी 05 ते 80 कि.मी. चे अंतर कापावे लागते.
ब) संपूर्ण भारतात सार्वजनिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना सरासरी 13.55 कि.मी. अंतर प्रवास करावा लागतो. पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) Tribal groups succumb to sickness and malnutrition earlier than the general population, and have to cover a distance of 5 to 80 km to reach a public or district health centre.
b) Across India, people have to travel an average distance of 13.55 km to reach a Primary Health Centre.
Answer options:
  • (A) अ फक्त
  • (B) ब फक्त
  • (C) अ आणि ब
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

आदिवासी आरोग्य आणि आरोग्य केंद्रांचे अंतर (डॉ. अभय बंग समिती अहवाल): 1. विधान अ: भारताच्या आदिवासी आरोग्य विषयक तज्ज्ञ समितीच्या (डॉ. अभय बंग समिती) अहवालानुसार, दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी समूह हे कुपोषण, मलेरिया, सिकलसेल आणि बालमृत्यू या...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे / आहेत ?
अ) गडचिरोली येथील 'हेमलकसा' हा आदिवासींसाठीचा आरोग्य प्रकल्प डॉ. आमटे दांपत्याने उभा केला आहे.
ब) मेळघाट येथे कुपोषण व अर्भक मृत्यूची समस्या सोडवण्यासाठी डॉ. बंग दांपत्य काम करीत आहेत.
क) ठाणे जिल्ह्यात 'कोसबाड' येथे ताराबाई मोडक यांनी शैक्षणिक चळवळ सुरु केली.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) The 'Hemalkasa' health project for tribals in Gadchiroli was established by the Amte couple.
b) Dr. Bang couple are working in Melghat to resolve the issues of malnutrition and infant mortality.
c) Tarabai Modak started an educational movement at 'Kosbad' in Thane district.
Answer options:
  • (A) अ आणि ब
  • (B) अ आणि क
  • (C) ब आणि क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

आदिवासी कल्याण व समाजसुधारक विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ: गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील 'हेमलकसा' येथे माडिया गोंड आदिवासींसाठी 'लोकबिरादरी प्रकल्प' आणि आरोग्य रुग्णालय डॉ. प्रकाश आमते आणि डॉ. मंदाकिनी आमते यांनी उभा केला आहे (बरोबर...

+1.0 / -0.25
आदिवासींना खालीलपैकी कोणकोणत्या नावाने संबोधले जाते ?
अ) वन्यजाती
ब) गिरीजन
क) अनुसूचीत जमाती
ड) मूळ निवासी
पर्यायी उत्तरे :
EN By which of the following names are tribals addressed?
a) Vanyajati b) Girijan
c) Scheduled Tribes d) Original Inhabitants (Mool Niwasi)
Answer options:
  • (A) अ, ब आणि ड
  • (B) क आणि ड
  • (C) ब anfor ड
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

आदिवासींची विविध नामाभिधाने: 1. भारताच्या विविध भागांत आणि इतिहासामध्ये आदिवासी समूहांना वेगवेगळ्या नावांनी संबोधले गेले आहे: - अ) वन्यजाती (Vanyajati): जंगलात व निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे लोक. - ब) गिरीजन (Girijan): पर्वतांमध्ये व...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
अ) अनुसूचित जाती, जमाती व महिला यांच्या उद्योजकतेला मदत व प्रोत्साहन देण्यासाठी 'स्टार्ट अप इंडिया' ही योजना सुरु केली.
ब) महिला उद्योजकतेला प्रोत्साहन, कौशल्य विकास व उद्योगांना निधीची उपलब्धता व्हावी या हेतूने 'प्रधानमंत्री मुद्रा योजना' सुरु केली.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) 'Start-up India' scheme was launched to support and encourage entrepreneurship among Scheduled Castes, Scheduled Tribes, and women.
b) 'Pradhan Mantri MUDRA Yojana' was launched with the aim of promoting women entrepreneurship, skill development, and availability of funds to enterprises.
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी नाही

उद्योजकता योजना - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ: अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला उद्योजकांना ₹ 10 लाख ते ₹ 1 कोटीपर्यंत बँक कर्ज देऊन प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 'स्टँड-अप इंडिया' (Stand-Up India) ही योजना सुरू केली आहे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स