📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 13)

Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning

'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,708 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 13 / 86
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))

2 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 241 ते 260 (एकूण 1,708)
+1.0 / -0.25
भारतीय राजघटनेच्या कोणत्या कलमात असे म्हटले आहे की, 'राज्य पर्यावरणाचे रक्षण आणि सुधारणा करण्यासाठी आणि देशातील जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करेल ?
EN In which Article of the Constitution of India is it stated that 'The State shall endeavour to protect and improve the environment and to safeguard the forests and wild life of the country'?
  • (A) कलम 48 A
  • (B) कलम 51 A
  • (C) कलम 40
  • (D) वरीलपैकी काहीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) कलम 48 A

भारतीय राज्यघटनेचे कलम 48 A (पर्यावरण, जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण): 1. कलम 48 A: भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये (भाग IV) 42 व्या घटनादुरुस्तीने (1976) कलम 48 A समाविष्ट करण्यात आले. 2. तरतूद: "राज्य देशाच्या पर्यावरणाचे रक्षण आणि...

+1.0 / -0.25
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजने संदर्भात
अ) आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना 50 हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येते.
ब) विवाह करणाऱ्यामध्ये एक अनुसूचीत जाती/जमाती विमुक्तजाती व भटक्या जमातीच्या व्यक्तीपैकी व दुसरी व्यक्ती सवर्ण समाजातील असावी.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे / आहेत ?
EN With reference to the Inter-caste Marriage Incentive Scheme:
a) Financial assistance of Rs. 50,000 is provided to inter-caste married couples.
b) Among the marrying couple, one person should belong to Scheduled Castes / Scheduled Tribes / De-notified Tribes and Nomadic Tribes, and the other person should belong to the upper-caste (Savarna) community.
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) वरीलपैकी सर्व
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) वरीलपैकी सर्व

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना (Inter-caste Marriage Incentive Scheme): 1. आर्थिक साहाय्य (विधान अ): जातीव्यवस्था व अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना महाराष्ट्र शासनातर्फे ₹ 50,000 चे आर्थिक अनुदान (प्रोत्साहनपर...

+1.0 / -0.25
अ) सामाजिकीकरण ही एक अध्ययन प्रक्रिया आहे.
ब) सामाजिकीकरण प्रक्रियेत व्यक्तीकडून संस्कृतीचे संपादन होणे.
क) सामाजिकरणामुळे व्यक्तीत सामाजिक भूमिका वाढविण्याची क्षमता निर्माण होते.
वरीलपैकी कोणते विधान /विधाने चुकीचे आहे / आहेत ?
EN a) Socialization is a learning process.
b) In the process of socialization, acquisition of culture takes place by an individual.
c) Socialization develops the capacity in an individual to perform social roles.
Which of the above statement(s) is/are incorrect?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ, ब आणि क
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी नाही

सामाजिकीकरण प्रक्रिया (Process of Socialization) - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ: सामाजिकीकरण ही मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत निरंतर चालणारी एक आजीवन अध्ययन प्रक्रिया (Life-long learning process) आहे (बरोबर आहे). 2. विधान ब: सामाजिकीकरणाच्या...

+1.0 / -0.25
महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्तजाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणीक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2019 रोजी केली.
EN Which of the following institutions was established by the Government of Maharashtra on 8 August 2019 for the educational, financial, and social development of Other Backward Classes (OBC), VJNT, and Special Backward Classes (SBC)?
  • (A) बार्टी
  • (B) सारथी
  • (C) महाज्योती
  • (D) नायक
अचूक उत्तर: पर्याय (C) महाज्योती

महाज्योती (MAHAJYOTI) - 8 ऑगस्ट 2019: 1. स्थापना: महाराष्ट्र शासनाने 8 ऑगस्ट 2019 रोजी शासन निर्णय काढून 'महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था' (महाज्योती - MAHAJYOTI) या स्वायत्त संस्थेची स्थापना केली. 2. मुख्यालय: याचे मुख्यालय नागपूर...

+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेतील कलम क्र.......राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाशी संबंधित आहे.
EN Article ...... of the Constitution of India is related to the National Commission for Scheduled Castes.
  • (A) 225
  • (B) 338
  • (C) 138
  • (D) 57
अचूक उत्तर: पर्याय (B) 338

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग - कलम 338: 1. घटनात्मक तरतूद: भारतीय राज्यघटनेच्या कलम 338 (Article 338) अन्वये 'राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग' (National Commission for Scheduled Castes - NCSC) ची स्थापना करण्यात आली आहे. 2. कार्य: अनुसूचित जातींच्या...

+1.0 / -0.25
श्रावणबाळ योजनेचा फायदा खालीलपैकी कोणत्या वयातील जेष्ठनागरीकांना मिळतो ?
EN Senior citizens of which of the following age groups get the benefit of the Shravanbal Yojana?
  • (A) वय 58 वर्षांवरील
  • (B) वय 60 वर्षावरील
  • (C) वय 65 वर्षावरील
  • (D) वय 75 वर्षावरील
अचूक उत्तर: पर्याय (C) वय 65 वर्षावरील

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (Shravanbal Yojana): 1. पात्रता वयोमर्यादा: महाराष्ट्र शासनाच्या श्रावणबाळ योजनेचा लाभ वय वर्षे 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो. 2. गट अ: ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील (BPL) यादीत...

+1.0 / -0.25
अ) ज्येष्ठ नागरीक याचा अर्थ 60 वर्षे पूर्ण केलेला कोणताही पुरुष अथवा स्त्री असा होतो.
ब) छोटे कुटुंब व राहण्यासाठी छोटी जागा या कारणामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या वाढत आहेत.
क) नोकरी, व्यवसायामुळे होणाऱ्या स्थलांतरामुळे जेष्ठांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
EN a) Senior citizen means any man or woman who has completed 60 years of age.
b) The problems of senior citizens are increasing due to small family size and small living space.
c) Migration due to employment and occupation has created problems for the elderly.
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) अ आणि ब
  • (C) अ, ब आणि क
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क

ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या आणि समस्यांचे विश्लेषण: 1. विधान अ: सामान्यपणे वयाच्या 60 व्या वर्षी नोकरीतून सेवानिवृत्ती होते. भारतात 'राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक धोरण' तसेच 2007 च्या कायद्यानुसार 60 वर्षे पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती 'ज्येष्ठ नागरिक'...

+1.0 / -0.25
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त वयाची किती वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठनागरीकांना महाराष्ट्र राज्यपरिवहन बस मधून मोफत प्रवास करता येतो ?
EN On the occasion of Azadi Ka Amrit Mahotsav, senior citizens completing how many years of age are allowed free travel in Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) buses?
  • (A) वय वर्षे 58 पूर्ण
  • (B) वय वर्षे 60 पूर्ण
  • (C) वय वर्षे 65 पूर्ण
  • (D) वय वर्षे 75 पूर्ण
अचूक उत्तर: पर्याय (D) वय वर्षे 75 पूर्ण

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना (MSRTC मोफत प्रवास): 1. घोषणा: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट 2022 मध्ये 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' लागू केली. 2. पात्रता: या योजनेनुसार वय वर्षे 75 पूर्ण केलेल्या सर्व ज्येष्ठ...

+1.0 / -0.25
2011 च्या वृद्धांच्या राष्ट्रीय धोरणामध्ये कशावर भर देण्यात आला ?
अ) वृद्धांना समान संधी, त्यांच्या हक्काचे संरक्षण व त्यांच्या संपूर्ण सहभागाला चालना देणे.
ब) राज्य सरकारांनी वृद्धांबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करणे.
क) वृद्ध महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
ड) वृद्ध महिलांसाठी विशेष वृद्धाश्रम स्थापण्यास प्रोत्साहन देणे.
पर्यायी उत्तरे :
EN What was emphasized in the National Policy on Senior Citizens, 2011?
a) Promoting equal opportunities, protection of rights, and full participation for the elderly.
b) Implementation of laws related to senior citizens by State Governments.
c) Bringing elderly women into the mainstream of society.
d) Promoting the establishment of special old age homes for elderly women.
Answer options:
  • (A) अ, ब आणि क
  • (B) अ, ब आणि ड
  • (C) अ, क आणि ड
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब आणि क

ज्येष्ठ नागरिकांचे राष्ट्रीय धोरण, 2011 (National Policy on Senior Citizens 2011): 1. कथन अ: या धोरणाचा मुख्य भर वृद्धांना समान संधी देणे, त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना समाजाच्या विकासात संपूर्ण सहभाग मिळवून देणे यावर आहे...

+1.0 / -0.25
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 नुसार, खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे / आहेत ?
अ) शासनाच्या निवासी संकुलात वृद्धाश्रमांना जागा देणे.
ब) नविन टाऊनशिप किंवा मोठ्या संकुलास परवानगी देताना वृद्धाश्रम स्थापन करणे सक्तीचे..
क) म्हाडा व सिडको सारख्या गृहनिर्माण प्रकल्पात वृद्धांसाठी सोई-सुविधा.
पर्यायी उत्तरे :
EN According to the Maharashtra Senior Citizen Policy 2013, which of the following statement(s) is/are correct?
a) Providing space for old age homes in government residential complexes.
b) Making it mandatory to establish an old age home while granting permission for a new township or large complex.
c) Providing facilities and amenities for senior citizens in housing projects like MHADA and CIDCO.
Answer options:
  • (A) अ आणि ब
  • (B) अ आणि क
  • (C) ब आणि क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक धोरण, 2013 (Maharashtra Senior Citizen Policy 2013): 1. विधान अ: शासकीय निवासी संकुलांमध्ये किंवा सार्वजनिक इमारतींमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्रांसाठी जागा राखून ठेवणे (बरोबर आहे). 2. विधान ब: नवीन...

+1.0 / -0.25
कोणती समिती ही कामगार अन्वेषण समिती म्हणून ओळखली जाते ?
EN Which committee is known as the Labour Investigation Committee?
  • (A) जॉर्ज समिती
  • (B) गोरे समिती
  • (C) रेगे समिती
  • (D) पावलस समिती
अचूक उत्तर: पर्याय (C) रेगे समिती

कामगार अन्वेषण समिती (Labour Investigation Committee - 1944): 1. समितीची स्थापना: ब्रिटीश भारत सरकारने 1944 मध्ये कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा, कामाच्या वेळा, किमान वेतन, आरोग्य आणि कल्याणकारी सुविधांचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी 'कामगार अन्वेषण...

+1.0 / -0.25
कार्यरत वयाची वाढती लोकसंख्या : अ) आर्थिक वाढीच्या संधी निर्माण करते. ब) रोजगार निर्मितीसाठी आव्हान निर्माण करते. क) आर्थिक वाढीच्या संदर्भात आव्हाने निर्माण करते. ड) अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचा प्रश्न निर्माण करते. पर्यायी उत्तरे :
EN Growing working-age population:
a) Creates opportunities for economic growth.
b) Creates challenges for employment generation.
c) Creates challenges with respect to economic growth.
d) Creates problems of dependent population.
Answer options:
  • (A) अ, ब, क आणि ड सर्व बरोबर आहेत
  • (B) अ आणि ब बरोबर आहेत
  • (C) फक्त अ बरोबर आहे
  • (D) फक्त ड बरोबर आहे
अचूक उत्तर: पर्याय (B) अ आणि ब बरोबर आहेत

+1.0 / -0.25
भारत सरकारने 1920 मध्ये........इथे इंडियन लेबर ब्युरोची स्थापना केली.
EN The Government of India established the Indian Labour Bureau in 1920 at .........
  • (A) सिमला
  • (B) दिल्ली
  • (C) मुंबई (बॉम्बे)
  • (D) कोलकाता (कलकत्ता)
अचूक उत्तर: पर्याय (A) सिमला

इंडियन लेबर ब्युरोची स्थापना (Shimla): 1. स्थापना व मुख्यालय: भारत सरकारने 1920 च्या दशकात औद्योगिक कामगारांची माहिती, महागाई निर्देशांक (CPI) आणि वेतन आकडेवारी संकलित करण्यासाठी सिमला (Shimla) येथे 'लेबर ब्युरो' (Labour Bureau / Indian Labour...

+1.0 / -0.25
कर्मचारी राज्य विमा कायदा विमाधारक व्यक्तींना खालीलपैकी कोणत्या दोन तरतुदी वगळता सहा प्रमुख प्रकारचे फायदे प्रदान करतो:
EN The Employees' State Insurance Act provides six major types of benefits to insured persons, except which two of the following provisions?
  • (A) वैद्यकीय लाभ, आजारपण लाभ
  • (B) अपंगत्व लाभ, मातृत्व लाभ
  • (C) शैक्षणिक लाभ, करमणूक लाभ
  • (D) अवलंबितांचा लाभ, अंत्यसंस्कार लाभ
अचूक उत्तर: पर्याय (C) शैक्षणिक लाभ, करमणूक लाभ

कर्मचारी राज्य विमा कायदा (ESI Act, 1948) - 6 प्रमुख लाभ: 1. कायद्यातील ६ प्रमुख लाभ: - (1) आजारपण लाभ (Sickness benefit) - (2) मातृत्व लाभ (Maternity benefit) - (3) अपंगत्व लाभ (Disablement benefit) - (4) अवलंबितांचा लाभ (Dependants' benefit) - (5)...

+1.0 / -0.25
बॉम्बे सोशल सव्हिस लोग जी सव्र्हेंट्स ऑफ इंडिया सोसायटीने सुरू केली आहे त्यामध्ये कामगार कल्याणासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. खालीलपैकी कोणत्या उपक्रमांचा त्यामध्ये समावेश होतो ? अ) रात्रशाळांद्वारे सामुहिक शिक्षणाचा प्रसार ब) सार्वजनिक आरोग्याचा प्रचार. क) कामगारांना अपघातांसाठी नुकसान भरपाई मिळणे सुनिश्चित करणे. ड) कामगार वर्गासाठी मनोरंजन आणि खेळ. पर्यायी उत्तरे :
EN The Bombay Social Service League, founded by the Servants of India Society, undertakes several activities for labour welfare. Which of the following activities are included in it?
a) Promotion of mass education through night schools
b) Promotion of public health
c) Ensuring accident compensation for workers
d) Recreation and sports for the working class
Answer options:
  • (A) अ आणि ब बरोबर आहेत
  • (B) ब, क आणि ड बरोबर आहेत
  • (C) अ, ब, क आणि ड बरोबर आहेत
  • (D) अ, क आणि ड बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब, क आणि ड बरोबर आहेत

बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग (Bombay Social Service League): 1. स्थापना व नेते: नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये स्थापन केलेल्या 'सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी'चे निष्ठावान सदस्य नारायण मल्हार जोशी (एन. एम. जोशी) यांनी 1911 मध्ये मुंबईत 'बॉम्बे...

+1.0 / -0.25
संयुक्त राष्ट्रसंघाने.......हे वर्ष "बेघरांसाठी आंतरराष्ट्रीय आश्रय वर्ष" म्हणून घोषित केले.
EN The United Nations proclaimed the year ________ as the 'International Year of Shelter for the Homeless'.
  • (A) 1985
  • (B) 1987
  • (C) 1988
  • (D) 1989
अचूक उत्तर: पर्याय (B) 1987

बेघरांसाठी आंतरराष्ट्रीय आश्रय वर्ष (IYSH) - 1987: 1. घोषणा: संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) आमसभेने ठराव क्र. 37/221 अन्वये 1987 हे वर्ष "बेघरांसाठी आंतरराष्ट्रीय निवारा/आश्रय वर्ष" (International Year of Shelter for the Homeless - IYSH) म्हणून घोषित...

+1.0 / -0.25
महाराष्ट्र प्रकल्प विस्थापित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम,.........विस्थापित व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी विविध उपाययोजना प्रदान करतो.
EN The Maharashtra Resettlement of Project Displaced Persons Act, ________ provides various measures for the rehabilitation of displaced persons.
  • (A) 1957
  • (B) 1966
  • (C) 1976
  • (D) 1987
अचूक उत्तर: पर्याय (C) 1976

महाराष्ट्र प्रकल्प विस्थापित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, 1976: 1. कायद्याची पार्श्वभूमी: धरणे, पाटबंधारे आणि औद्योगिक विकास प्रकल्पांमुळे विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी कायदेशीर चौकट तयार करणारे महाराष्ट्र हे...

+1.0 / -0.25
भारत सरकारच्या मते जुलै 2021 पर्यंतचा देशातील भूकंपांचा इतिहास लक्षात घेता भारताच्या एकूण सर्वसाधारण भू-भागाला (ज्यामध्ये भारतातील सर्व घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो) वेगवेगळ्या तीव्रतेच्या भूकंपांचा धोका आहे.
EN According to the Government of India, considering the country's earthquake history up to July 2021, ________ of India's total landmass (including all States and Union Territories) is prone to earthquakes of different intensities.
  • (A) 65%
  • (B) 59%
  • (C) 40%
  • (D) 30%
अचूक उत्तर: पर्याय (B) 59%

+1.0 / -0.25
भारतातील "राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरणाचे नेतृत्व _______करतात.
EN In India, the National Disaster Management Authority (NDMA) is headed by ________.
  • (A) भारताचे गृहमंत्री
  • (B) भारताचे संरक्षण मंत्री
  • (C) भारताचे पंतप्रधान
  • (D) भारताच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचे कॅबीनेट मंत्री
अचूक उत्तर: पर्याय (C) भारताचे पंतप्रधान

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) चे नेतृत्व: 1. कायदेशीर पदसिद्ध नेतृत्व: 'आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005' च्या कलम 3(2) अन्वये भारताचे पंतप्रधान (Prime Minister of India) हे 'राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे' (National Disaster...

+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य जोड्या ओळखा (दहशतवाद संबंधी कायदे) : अ) राष्ट्रीय सुरक्षा कायदा 1980 ब) दहशतवादी व विध्वंसक कृती कायदा 1985 क) अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा 1990 पर्यायी उत्तरे :
EN Identify the correctly matched pairs (Laws related to security/terrorism):
a) National Security Act - 1980
b) Terrorist and Disruptive Activities (Prevention) Act - 1985
c) Essential Services Maintenance Act - 1990

Answer options:
  • (A) फक्त अ, क
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, ब
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, ब

दहशतवाद व सुरक्षेशी संबंधित कायदे - जोड्यांचे विश्लेषण: 1. अ) राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA): हा कायदा 1980 मध्ये संमत करण्यात आला (बरोबर जुळलेली जोडी). 2. ब) दहशतवादी व विध्वंसक कृती प्रतिबंधक कायदा (TADA): हा कायदा पंजाबमधील दहशतवादाच्या...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स