📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 6)

Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning

'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,708 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 6 / 86
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))

2 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 101 ते 120 (एकूण 1,708)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती योजना दारिद्र्यरेषेखालील वय वर्ष ६० वरील वृद्धांना भौतीक साधन आणि जगण्यासाठी सहाय्यक उपकरणे पुरविते ?
EN Which of the following schemes provides physical aids and assisted-living devices to senior citizens aged 60 and above belonging to the BPL category?
  • (A) प्रधानमंत्री वय वंदन योजना
  • (B) राष्ट्रीय वयोश्री योजना
  • (C) प्रधानमंत्री जनआरोग्य योजना
  • (D) वयोश्रेष्ठ सम्मान
अचूक उत्तर: पर्याय (B) राष्ट्रीय वयोश्री योजना

राष्ट्रीय वयोश्री योजना (Rashtriya Vayoshri Yojana): 1. सुरुवात: केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने 1 एप्रिल 2017 रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथून 'राष्ट्रीय वयोश्री योजना' सुरू केली. 2. उद्दिष्ट: दारिद्र्यरेषेखालील (BPL) वय वर्षे...

+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य कथने ओळखा.
अ. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या घटनात्मक संरक्षणाशी संबंधित सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 338 नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्याची तरतूद आहे.
ब. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी एकल विशेष अधिकारी ऐवजी 1990 च्या 65 व्या घटना दुरुस्ती कायद्याने उच्चस्तरीय बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगाच्या स्थापनेची तरतूद केली.
क. अनुसूचित जातीसाठीचा राष्ट्रीय आयोग मासिक अहवाल राष्ट्रपतीकड़े सादर करतो.
EN Identify the correct statement(s) from the following:
a. Under Article 338 of the Constitution of India, there is a provision to appoint a Special Officer for Scheduled Castes and Scheduled Tribes to investigate all matters relating to the constitutional safeguards for SCs and STs.
b. In place of a single Special Officer for SCs and STs, the 65th Constitutional Amendment Act of 1990 provided for the establishment of a high-level multi-member National Commission.
c. The National Commission for Scheduled Castes submits a monthly report to the President.
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब

अनुसूचित जाती व जमाती आयोग - कथनांचे विश्लेषण: 1. कथन अ: मूळ राज्यघटनेतील कलम 338 अन्वये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या घटनात्मक संरक्षणाची तपासणी करण्यासाठी राष्ट्रपती एका 'विशेष अधिकाऱ्याची' (Special Officer / Commissioner for SCs & STs)...

+1.0 / -0.25
योग्य कथन/ने ओळखा
अ. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने प्रायोजित केलेल्या "संवरती जाये जीवन की राहे" या मालिके अंतर्गत अस्पृश्यता निर्मूलन व अत्याचार प्रतिबंध या विषयावर चार रेडिओ कार्यक्रम प्रसारित करण्यात आले.
ब. 2017 मध्ये महाराष्ट्रातील अकोला, भंडारा, परभणी जिल्हा हे अस्पृश्यता प्रवण क्षेत्रे होती.
EN Identify the correct statement(s):
a. Under the series 'Sanwarti Jaye Jeevan Ki Raahein' sponsored by the Ministry of Information and Broadcasting, four radio programmes were broadcast on the eradication of untouchability and prevention of atrocities.
b. In 2017, Akola, Bhandara, and Parbhani districts in Maharashtra were untouchability-prone areas.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ब दोन्ही

अस्पृश्यता निर्मूलन व अत्याचार प्रतिबंध - कथनांचे विश्लेषण: 1. कथन अ: केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या आकाशवाणीने प्रायोजित केलेल्या "संवरती जाये जीवन की राहे" या विशेष जनजागृती मालिकेअंतर्गत अस्पृश्यता निर्मूलन आणि ॲट्रॉसिटी प्रतिबंध या...

+1.0 / -0.25
आई वडील व जेष्ठ नागरीकांच्या चरितार्थ व कल्याण अधिनियम 2007 नुसार खालीलपैकी कोणते विधान / विधाने चुकीचे आहे/आहेत ?
a. पाल्यांना त्यांच्या पालकांना निर्वाह खर्च देण्याचे बंधन घालण्यात आले.
b. शासकीय वाहनात प्रवास करतांना प्रवास भाड्यात सवलत देणे.
c. निवृत्ति वेतन देणे बंधनकारक.
EN According to the Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007, which of the following statement(s) is/are incorrect?
a. Children are obligated to pay maintenance expenses to their parents.
b. Concession in travel fare while travelling in government vehicles.
c. Mandatory payment of pension.
  • (A) फक्त c
  • (B) फक्त b
  • (C) b आणि c
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) b आणि c

आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ व कल्याण अधिनियम, 2007 (Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007): 1. कथन a: पाल्यांना (मुलगा, मुलगी, नातू इ.) किंवा वारसदारांना आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांचा निर्वाह खर्च (भरणपोषण) देणे...

+1.0 / -0.25
1995 साली ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ति वेतन योजने संदर्भात खालीलपैकी कोणते विधान /विधाने चुकीची आहे/आहेत ?
a. दारिद्रय रेषे खालील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी.
b. या योजने अंतर्गत 50 वर्षावरील व्यक्तींना दर महा 200 रुपये आणि 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना 500 रुपये प्रतिमहिना निवृत्ती वेतन दिले जाते.
EN With reference to the Indira Gandhi National Old Age Pension Scheme launched by the Ministry of Rural Development in 1995, which of the following statement(s) is/are incorrect?
a. To provide financial security to senior citizens below poverty line.
b. Under this scheme, persons aged above 50 years receive Rs. 200 per month and persons aged above 60 years receive Rs. 500 per month as pension.
  • (A) फक्त a
  • (B) फक्त b
  • (C) a आणि b
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त b

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना (IGNOAPS): 1. कथन a: ही योजना 1995 मध्ये राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाचा (NSAP) एक भाग म्हणून ग्रामीण विकास मंत्रालयाने दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत ?
a. जेष्ठ नागरीकांना वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे घालविता यावा याकरिता वृद्धाश्रम ही योजना 1963 पासून स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविली जाते.
b. वृद्धाश्रम योजने अंतर्गत वृद्धाश्रमामध्ये 60 वर्षे वय असलेले पुरुष व 55 वर्षे वय असलेल्या महिलांना प्रवेश देण्यात येतो.
c. 'मातोश्री वृद्धाश्रम' ही योजना शासन निर्णय 17 नोव्हेंबर 1990 नुसार सुरू करण्यात आली.
EN Which of the following statement(s) is/are incorrect?
a. To enable senior citizens to spend old age peacefully, the Old Age Home scheme has been implemented through NGOs since 1963.
b. Under the Old Age Home scheme, men aged 60 years and women aged 55 years are admitted to old age homes.
c. The 'Matoshree Old Age Home' scheme was launched as per Government Resolution dated 17 November 1990.
  • (A) फक्त a
  • (B) a आणि c
  • (C) फक्त c
  • (D) b आणि c
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त c

वृद्धाश्रम योजना व मातोश्री वृद्धाश्रम विश्लेषण: 1. विधान a: ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ सुखाने घालविता यावा म्हणून महाराष्ट्रात 1963 च्या शासन निर्णयान्वये स्वयंसेवी संस्थांमार्फत वृद्धाश्रम योजना सुरू करण्यात आली (बरोबर आहे). 2. विधान b...

+1.0 / -0.25
वरिष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, भारत शासनाद्वारा सुरू करण्यात आली आहे त्या हेल्पलाईनचा नंबर काय आहे ?
EN What is the toll-free number of the National Helpline for Senior Citizens (Elderline) launched by the Ministry of Social Justice and Empowerment, Government of India?
  • (A) 1916
  • (B) 14567
  • (C) 1098
  • (D) 182
अचूक उत्तर: पर्याय (B) 14567

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन (Elderline): 1. हेल्पलाइन नंबर: केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांसाठी '14567' हा टोल-फ्री राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक (Elderline) सुरू केला आहे. 2. कार्य: या हेल्पलाइनद्वारे...

+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य कथने ओळखा.
अ. 2018 मध्ये पंतप्रधान श्रम पुरस्कार हा तीन श्रेण्यामध्ये श्रम भूषण, श्रम वीर/ वीरांगणा आणि श्रम श्री/श्रम देवी अशा प्रकारे देण्यात आला.
ब. 2018 मध्ये विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार हा श्रेणी अ, ब व क मध्ये प्रदान करण्यात आला.
क. पंतप्रधान श्रम पुरस्कार हा 1990 मध्ये कामगारांसाठी प्रारंभ करण्यात आला.
EN Identify the correct statement(s) from the following:
a. In 2018, the Prime Minister's Shram Awards were given in three categories: Shram Bhushan, Shram Veer/Veerangana, and Shram Shree/Shram Devi.
b. In 2018, the Vishwakarma Rashtriya Puraskar was conferred under Class A, B and C.
c. Prime Minister's Shram Awards for workers were instituted in 1990.
  • (A) फक्त अ, क
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, ब
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, ब

कामगार पुरस्कार - कथनांचे विश्लेषण: 1. कथन अ (योग्य): पंतप्रधान श्रम पुरस्कार हे तीन मुख्य श्रेणींमध्ये दिले जातात: (1) श्रम भूषण, (2) श्रम वीर/श्रम वीरांगना आणि (3) श्रम श्री/श्रम देवी (बरोबर आहे). 2. कथन ब (योग्य): औद्योगिक सुरक्षितता आणि...

+1.0 / -0.25
कामगार नुकसान भरपाई कायदा, 1923 नुसार, __________ अंतर्गत आश्रित म्हणजे मृत कामगाराचे खालीलपैकी कोणतेही नातेवाईक ते विधवा, औरस मुलगा, अविवाहित औरस मुलगी, विधवा आई आहेत.
EN According to the Workmen's Compensation Act, 1923, under __________ 'dependant' means any of the following relatives of a deceased workman, namely a widow, a legitimate son, an unmarried legitimate daughter, or a widowed mother:
  • (A) कलम 2[1](d)
  • (B) कलम 2[1](e)
  • (C) कलम 2[1](m)
  • (D) कलम 2[1](i)
अचूक उत्तर: पर्याय (A) कलम 2[1](d)

कामगार भरपाई कायदा, 1923 - 'आश्रित' (Dependant) ची व्याख्या: 1. कलम: कर्मचारी/कामगार नुकसान भरपाई कायदा, 1923 (Workmen's Compensation Act, 1923 - आता Employee's Compensation Act) च्या कलम 2(1)(d) मध्ये 'आश्रित' (Dependant) ची कायदेशीर व्याख्या...

+1.0 / -0.25
वेठबिगाराबाबत खालील कथने लक्षात घ्या.
अ. वेठबिगार व्यवस्था (निर्मूलन) कायदा 1976 दि. 25.10.1975 पासून लागू होऊन संपूर्ण देशभरातून वेठबिगार व्यवस्था रद्द करण्यात आली आहे.
ब. उपरोक्त कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केल्याबद्दलच्या गुन्ह्यासाठी 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची आर्थिक दंडासह शिक्षा होवू शकते.
वरीलपैकी अयोग्य कथन/ने ओळखा.
EN Consider the following statements regarding bonded labour:
a. The Bonded Labour System (Abolition) Act, 1976 came into force with effect from 25.10.1975, abolishing the bonded labour system throughout the country.
b. Any offence for contravention of the provisions of the said Act is punishable with imprisonment up to 5 years along with fine.
Identify the incorrect statement(s) from the above:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

वेठबिगार व्यवस्था (निर्मूलन) कायदा, 1976 - कथनांचे विश्लेषण: 1. कथन अ (योग्य): हा कायदा राष्ट्रपतींच्या वटहुकुमानंतर 25 ऑक्टोबर 1975 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला आणि संसदेने 1976 मध्ये तो कायदा म्हणून संमत केला, ज्यायोगे संपूर्ण...

+1.0 / -0.25
भारतात गैर सरकारी संघटना कोणती भूमिका पार पाडतात ?
a. सर्वाधिक असुरक्षित अशा समाज घटकांपर्यंत त्या पोहोचतात.
b. आरोग्य, रोग आणि औषध क्षेत्रात त्या जन जागृती घडवून आणतात.
c. कौशल्याधारित शिक्षणाच्या क्षेत्रात त्या काम करतात.
d. समाजातील असुरक्षित घटकांच्या प्रश्नांकडे लक्ष आकर्षित करू शकतात तसेच परदेशातून मदतनिधी मिळवू शकतात.
EN What role do Non-Governmental Organizations (NGOs) play in India?
a. They reach the most vulnerable sections of society.
b. They create public awareness in the fields of health, disease, and medicine.
c. They work in the field of skill-based education.
d. They can draw attention to the problems of vulnerable groups in society as well as mobilize funds from abroad.
  • (A) केवळ a, b आणि c
  • (B) यापैकी सर्व
  • (C) केवळ b, c आणि d
  • (D) केवळ b आणि c
अचूक उत्तर: पर्याय (B) यापैकी सर्व

भारतात गैर-सरकारी संघटनांची (NGOs) भूमिका: 1. कथन a: त्या दुर्गम व दुर्लक्षित भागातील अत्यंत असुरक्षित, वंचित व सीमांतिक घटकांपर्यंत थेट पोहोचतात (बरोबर आहे). 2. कथन b: सार्वजनिक आरोग्य, साथीचे आजार, औषधोपचार आणि स्वच्छतेबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर...

+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम अपंगत्वाच्या बाबतीत राज्याला कामाचा अधिकार, शिक्षण आणि सार्वजनिक सहाय्य सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी तरतूद करण्याचे निर्देश देते ?
EN Which Article of the Constitution of India directs the State to make effective provision for securing the right to work, to education and to public assistance in cases of disablement?
  • (A) कलम 41
  • (B) कलम 15[4]
  • (C) कलम 16
  • (D) कलम 19[1]
अचूक उत्तर: पर्याय (A) कलम 41

अपंगत्वाच्या बाबतीत राज्याला निर्देश देणारे कलम 41: 1. कलम 41: भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांमधील (DPSP) कलम 41 (Article 41) राज्याला निर्देश देते की, *"आपल्या आर्थिक सामर्थ्याच्या आणि विकासाच्या मर्यादेत राज्याने कामाचा अधिकार, शिक्षणाचा...

+1.0 / -0.25
संयुक्त राष्ट्र आमसभेने ________ हे 'संयुक्त राष्ट्रांचे अपंग व्यक्तीसाठीचे दशक' म्हणून घोषित केले होते.
EN The United Nations General Assembly proclaimed ________ as the 'United Nations Decade of Disabled Persons'.
  • (A) 1995-2004
  • (B) 1983-1992
  • (C) 2000-2010
  • (D) 1973-1982
अचूक उत्तर: पर्याय (B) 1983-1992

संयुक्त राष्ट्रांचे अपंग व्यक्तींसाठीचे दशक (1983-1992): 1. घोषणा: संयुक्त राष्ट्रसंघाने 1981 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती वर्ष' (IYDP) म्हणून साजरे केल्यानंतर, अपंग व्यक्तींच्या हक्कांची अंमलबजावणी सातत्याने चालू ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्र...

+1.0 / -0.25
दिव्यांगजनाच्या हक्कांवरील संयुक्त राष्ट्र परिषद, 2006 नुसार प्रत्येक राष्ट्र सदस्यावर कोणते उत्तरदायित्व आहे ?
अ. परिषदेच्या तरतुदींची अंमलबजावणी
ब. देशाच्या कायद्यांची परिषदे बाबत सुसंगती
क. राष्ट्राचा अहवाल तयार करणे
ड. दिव्यांगजनांचे हक्क त्यांना मिळवून देण्यात मदत करणे
EN According to the United Nations Convention on the Rights of Persons with Disabilities, 2006, what responsibilities lie on each member State?
a. Implementation of the provisions of the Convention
b. Harmonizing the country's domestic laws with the Convention
c. Preparing the country report
d. Assisting persons with disabilities in realizing their rights
  • (A) फक्त अ, ब, ड
  • (B) फक्त ब, क, ड
  • (C) फक्त अ, ब, क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांवरील संयुक्त राष्ट्र परिषद, 2006 (UNCRPD): 1. सदस्य देशांचे उत्तरदायित्व: UNCRPD 2006 नुसार स्वाक्षरी करणाऱ्या प्रत्येक सदस्य देशावर पुढील सर्व उत्तरदायित्वे बंधनकारक आहेत: - अ) तरतुदींची अंमलबजावणी: परिषदेतील सर्व...

+1.0 / -0.25
विकलांग मुलांच्या शिक्षण व प्रशिक्षणासाठी भारतात खालीलपैकी कोणत्या प्रमुख कार्यक्रमांचा समावेश होतो ?
a. दवाखान्यात बिछान्याच्या बाजुला शिकवणे
b. दवाखान्यात शालेय वर्ग
c. विकलांग मुलांसाठी विशेष निवासी शाळा
d. विकलांग मुलांसाठी विशेष दिवस-शाळा
EN Which of the following major programs are included in India for the education and training of disabled children?
a. Bedside instruction in hospitals
b. Hospital school classes
c. Special residential schools for disabled children
d. Special day schools for disabled children
  • (A) a, b, c व d
  • (B) b व c
  • (C) b, c व d
  • (D) c व d
अचूक उत्तर: पर्याय (A) a, b, c व d

भारतातील विकलांग मुलांचे शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम: 1. समाविष्ट कार्यक्रम: भारतात दिव्यांग/विकलांग मुलांच्या शैक्षणिक व विकासात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध पातळ्यांवर कार्यक्रम चालवले जातात: - a) दवाखान्यात बिछान्याच्या बाजूला शिकवणे (Bedside...

+1.0 / -0.25
सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रांतून पर्यावरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यास 'चॅम्पियन्स ऑफ दि अर्थ' हा पुरस्कार पुढीलपैकी कोणती संस्था प्रदान करते ?
EN Which of the following organizations confers the 'Champions of the Earth' award for outstanding contribution to the environment from the public and private sectors?
  • (A) इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN)
  • (B) फूड अॅण्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायजेशन (FAO)
  • (C) इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC)
  • (D) युनायटेड नेशन्स एनव्हायर्नमेंटल प्रोग्रॉम (UNEP)
अचूक उत्तर: पर्याय (D) युनायटेड नेशन्स एनव्हायर्नमेंटल प्रोग्रॉम (UNEP)

'चॅम्पियन्स ऑफ दि अर्थ' (Champions of the Earth) पुरस्कार: 1. देणारी संस्था: 'चॅम्पियन्स ऑफ दि अर्थ' हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान असून तो 'संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम' (United Nations Environment Programme - UNEP) द्वारे...

+1.0 / -0.25
अरुणाचल प्रदेश राज्य वि. खुदीराम चकमा, 1994 हा खटला पुढीलपैकी कोणाशी/कशाशी संबंधित आहे ?
EN The case State of Arunachal Pradesh vs Khudiram Chakma, 1994 is related to which of the following?
  • (A) अल्पसंख्याक
  • (B) निर्वासित
  • (C) अनुसूचित जाती आणि जमाती
  • (D) छळवणूक
अचूक उत्तर: पर्याय (B) निर्वासित

अरुणाचल प्रदेश राज्य वि. खुदीराम चकमा (1994) खटला - निर्वासित: 1. खटल्याचा विषय: 'अरुणाचल प्रदेश राज्य विरुद्ध खुदीराम चकमा (1994)' हा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक खटला 'चकमा निर्वासित' (Chakma Refugees) यांच्या मानवी हक्कांच्या संरक्षणाशी संबंधित...

+1.0 / -0.25
पुढील विधानांचा अभ्यास करा :
अ. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड भूस्खलनासाठी कारण असते.
ब. महाराष्ट्रात भूस्खलन प्रवण क्षेत्रात अनेक वसाहती आहेत.
क. बहुतेक वेळा भूस्खलनाची घटना घडल्यावर शासनाचा प्रतिसाद हा प्रतिक्षिप्त प्रतिक्रियेप्रमाणेच असतो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
EN Study the following statements:
a. Large-scale deforestation is a cause of landslides.
b. In Maharashtra, there are many settlements in landslide-prone areas.
c. Most often, after a landslide occurs, the government's response is like a reflex action.

Which of the statements above are correct?
  • (A) सर्व विधाने बरोबर आहेत
  • (B) केवळ अ आणि ब
  • (C) केवळ अ
  • (D) केवळ ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) सर्व विधाने बरोबर आहेत

भूस्खलन (Landslides) आणि शासकीय प्रतिसाद - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (बरोबर): डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड (Deforestation) मुळे जमिनीची धूप होते, मातीची पकड सैल होते आणि मुसळधार पावसात तीव्र भूस्खलन घडते (बरोबर आहे). 2. विधान...

+1.0 / -0.25
योग्य कथन/ने ओळखा :
अ. पॉस्को, जगातील सर्वात चौथ्या मोठ्या दक्षिण कोरीयाच्या पोलाद कंपनीने, 2005 मध्ये उत्तर प्रदेश सरकार सोबत प्लांट उभारण्यासाठी सामंजस्य करार केला होता.
ब. भू संपादनाला विरोध करणाऱ्या लोकांनी दक्षिण कोरीयाच्या पोलाद कंपनीच्या प्रकल्पामुळे त्यांची उपजीविका नष्ट होईल असे मत व्यक्त केले.
EN Identify the correct statement(s):
a. POSCO, the world's fourth largest South Korean steel company, signed an MoU in 2005 with the Uttar Pradesh government to set up a plant.
b. People opposing land acquisition expressed the view that their livelihoods would be destroyed due to the South Korean steel company's project.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

पॉस्को (POSCO) प्रकल्प - विधानांचे विश्लेषण: 1. कथन अ (चूक): दक्षिण कोरियाची आघाडीची पोलाद कंपनी 'पॉस्को'ने (POSCO) जून 2005 मध्ये उत्तर प्रदेश सरकारसोबत नव्हे, तर ओडिशा सरकारसोबत (Government of Odisha) सुमारे...

+1.0 / -0.25
ग्रामीण विकास मंत्रालयाने तयार केलेले नवीन पुनर्वसाहत आणि पुनर्वसन धोरण, 2007 ________ यावर लक्ष केंद्रीत करते.
a. धोरणामध्ये सर्व अनैच्छिक विस्थापनाचा समावेश होतो.
b. 400/200 किंवा अधिक कुटुंबासाठी सपाट किंवा आदिवासी प्रदेशासाठी सामाजिक प्रभाव मूल्यांकन सुरू केले.
c. विस्थापनापूर्वी पुनर्वसनाचे तत्व.
d. भूमिहीनासह सर्व कुटुंबासाठी घरकूल.
e. सामुदायिक आणि धार्मिक बैठकासाठी आदिवासीना मोफत जमीन मिळेल.
EN The National Rehabilitation and Resettlement Policy, 2007 formulated by the Ministry of Rural Development focuses on ________:
a. The policy covers all involuntary displacement.
b. Introduced Social Impact Assessment for displacement of 400/200 or more families in plain/tribal areas.
c. Principle of rehabilitation before displacement.
d. Housing for all families, including the landless.
e. Tribals will get free land for community and religious gatherings.
  • (A) वरील सर्व
  • (B) b आणि c
  • (C) d आणि e
  • (D) a आणि c
अचूक उत्तर: पर्याय (A) वरील सर्व

राष्ट्रीय पुनर्वसाहत आणि पुनर्वसन धोरण, 2007 (NRRP 2007): 1. धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये: केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने 2007 मध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रीय पुनर्वसन धोरणात पुढील सर्व तरतुदींचा समावेश आहे: - a: विकास प्रकल्पांमुळे होणाऱ्या सर्व...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स